29 जुलै-दैनंदिन शालेय परिपाठ
→ प्रार्थना
: मंगलमय चरणी तुझ्या विनंती हीच देवा....
→ श्लोक
-मना सर्वथा सत्य सांडू नको रे मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे ॥ मना सत्य ते सत्य वाचे वदावे । मना मिष्य ते मिथ्य सोडूनि द्यावे ॥
-हे मना, जे सत्य असेल, ते कधीही सोडू नकोस. असत्याचा आग्रह मुळीच धरू नकोस. नेहमी खरे तेच बोल. मिथ्य असत्य कधीही मुखातून निघू देऊ नकोस. (खोटे ते खोटेच खोटे कधी बोलू नकोस.)
→ चिंतन
- चुका ह्या होणारच. मात्र त्या कळताच कबूल करून प्रायश्चित्त घ्यावे. महात्मा गांधी
- कोणताही माणूस सर्वगुणसंपन्न नसतो. त्यामुळे एखादे काम करताना नेहमीच ते पूर्ण होईल, चांगले होईल असे नाही. प्रयत्न करूनही माणसाच्या हातून चूक घडते. चूक होणे हा काही गुन्हा नाही. पण झालेल्या चुका कबूल करून, त्या सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याबद्दल प्रायश्चित्त घेतले पाहिजे. म्हणजे तीच चूक पुन्हा होत नाही.
→ कथाकथन
'खारू आणि राघू'
एका झाडावर एक चिमुकली खारू राहायची. प्राण्यांच्या शाळेला पडलेली सुट्टीही संपत आली होती. पावसात शाळा | सुरू होणार होती. खारूचं सुट्टीत खूप खेळून झाले होते. त्याच झाडावर एका पोपट राहायचा. त्यांचे नाव राघू. राघूची नि खारूची खूप मैत्री होती. एकदा राघू आजारी होता तेव्हा शाळा बुडवून खारू त्याच्याजवळ बसून राहिली. घुबडजींकडून उगाळलेले औषध आणून त्याला दिले. त्याची सेवा केली, हे राघूही | विसरला नव्हता. खारूला राघू अगदी भावासारखा! एकदा कावळेदादा म्हणाला, 'तुझी खारीची जात नि त्याची पोपटाची त्याच्याशी तू मैत्री कशी काय करतेस? 'खार म्हणाली, मी जातपात मानत नाही. सगळे प्राणी देवबाप्पाचे असतात. आपण इतरांचे मन बघावे. स्वभाव चांगला असेल तर दोस्ती करावी. मग तो कुणी का असेना !" खारू सगळ्यांना मदत करायची. ससा घाबरट होता; पण खारूबरोबरच गवतात खेळून खेळून तोही धीट झाला. बंगल्याभोवती ही बाग होती नि | त्या बागेतच झाडावर खारूचे नि राधूचे घरटे होते. बंगल्यातल्या मुलाने ससा पाळला होता. शिवाय त्याच्या घरात एक मांजरही होते. ते सर्वांचा द्वेष | करायचे. खारू चपळ होती नि राधूला उडता येत होते. यामुळे मांजराला कळेना, की त्या दोघांना धरायचे कसे? मारायचे कसे? मग ते लबाडीने वागले. अगदी शेपटीबिपटी हलवत, गोड आवाज काढून म्हणाले, 'राघू, सुट्टी संपत आली ना ! मला वाईट वाटतेय. माझी शाळा वेगळी असली म्हणून काय झाले? | आपली घरे जवळ जवळ आहेत. माझ्याशी तू आणि खारु मैत्री कराल का? या ना गवतात खेळायला मस्त लोळू आपण. बाळाच्या या बंगल्यातसुद्धा घेऊन | जाईन मी तुम्हाला ! टीव्ही कधी पाहिलात तुम्ही? केवल म्हणजे काय ते माहीत आहे? खूप गंमत दाखवीन मी तुम्हाला.' राघू आणि खारू गालांत हसले. | राघू म्हणाला, 'आज, केबलवाल्याचा संप आहे ना? बाळच मघाशी बडबडत होता.' मनीचा एक डाव फसला तरी तिने लबाडी सोडली नाही. ती म्हणाली, | 'असेल. आपण टेप लावू, कॅसेट ऐकू. 'मनीमाऊचे बाळ करूं गोरं गोरं पान' गाणे एकलेय का? मी तुम्हाला टेपरेकॉर्डर लावून द्यायला सांगेन.' खारू हसून म्हणाली, 'पण वीज तर गेलेली आहे. गाणे कसे वाजणार?" लबाड मनी विचार करून म्हणाली, 'बाळाचा टेपरेकॉर्डर बॅटरीवर चालतो. आता झाले समाधान ?' राघू आणि खारू खाली आले की झेप घेऊन एकाला तरी पकडता येईल; चट्टामट्टा करता येईल, असे स्वप्न दुष्ट मनी बघत होती. राघूने थोडा | विचार केला. मग तो म्हणाला, 'अगं मने, तूच ये ना त्यापेक्षा आमच्या घरी. झाडावर चढता येते ना? तुमच्या प्युरसी कॅट स्कूलमध्ये शिकवितात ना? ये की मग ! हळूहळू चढ, काय? आधी तू ये, मग आम्ही येतो.' मनीला वाटले, काय हरकत आहे?' शेवटी खारूला धरण्यासाठी, राघुला मारण्याशी मतलब आहे. तिला काही झाडावर चढण्याची सवय नव्हती. तरी तोल सांभाळत ती झाडावर चढलीच. जांभळाचे झाड तसे उंचच होते. राघुला हसू येत होते. त्याने | खारूच्या कानात काहीतरी सांगितले, त्याच झाडावर मधमाशांनी एक पोळे केले होते. राघूच्या वडिलांची-पोपटरावांची परवानगी घेऊनच ते केले होतं. कारण पोपटाचे कुटुंब तिथे आधीपासूनच राहत होते. मनीला यातले काहीच माहिती नव्हते. तिच्या ध्यानीमनी फक्त शिकारीचाच विचार ! बाकी काही ठाऊकच नाही, मनी उंचावर पोळ्यापाशी येताच मधमाशा चवताळल्या. त्यांना तिथे कुणीही परके आलेले खपत नसे. मनी मध चाटायाला लाटायाला आलेली आहे असेच त्यांना वाटले. त्या दुष्ट मनीवर तुटून पडल्या. मनी केकाटू लागली. मँडमँ व रडू लागली. माशांनी तिला चटाचटा चावे घेतले. तिचा तोलच गेला. ती धपकन खाली पडली. तिचे अंग चांगलेच शेकले. ती रडत, लंगडत पळाली. मधमाश्यांनी तिचा पाठलाग केला नि सळो की पळो करून | टाकले. मुलांनो, तुम्हीसुद्धा फार गोड बोलणाऱ्या लबाडांपासून सावध राहा आणि जशास तसे वागा. त्यातच खरा शहाणपणा आहे!
→ सुविचार
• निर्बलांना रक्षण देणे हीच बलाची खरी सफलता होय.
→ दिनविशेष
• पं. ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा स्मृतिदिन - १९०१ :
-'इतक्या अलौकिक बुद्धीचा विद्यार्थी अजून आम्ही पाहिला नव्हता.' अशा शब्दात | साने गुरुजींनी ज्याच्याबद्दल उद्गार काढले ते म्हणजे बंगालमधील प्रसिद्ध समाजसेवक ईश्वरचंद्र विद्यासागर. आपले सारे आयुष्य त्यांनी स्त्रियांच्या उद्धारासाठी आणि ज्ञानाच्या प्रसारासाठी वेचले. स्त्रियांचे कैवारी म्हणून उभ्या भरतखंडात त्यांचे नाव गाजले. त्यांच्या दीर्घ प्रयत्नांमुळे सन १८५६ मध्ये | विधवा विवाहाला कायद्याची संमती मिळाली. शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी महनीय कामगिरी केली. जुन्या पाठशालांच्या पद्धतीत फरक करून त्यात नवीन | शिक्षणपद्धती सुरू केली. वेताळपंचविशी, उपक्रमणिका, कौमुदीचे तीन भाग, शाकुन्तलाचे बंगाली भाषांतर ही त्यांची पुस्तके होत...
→ मूल्ये • समता, निर्भयता, शिक्षणाविषयी प्रेम.
→ अन्य घटना
• विनोदी लेखक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा जन्म - १८७१
• मल्याळम लेखक टी. एस. पिल्ले यांना 'ज्ञानपीठ' पुरस्कार - १९८५
• ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी अरुणा असफ अली यांचे निधन - १९९६. सत्यशोधक केशवराव विचारे जन्मदिन - १८८९
→ उपक्रम-
• महाराष्ट्रातील समाजसुधारकांची चरित्रे व त्यांच्या कार्याची माहिती मुलांना सांगावी. समाजातील अनिष्ट प्रथा, अंधश्रद्धा दूर करण्यासाठी मलांकडून चित्रे, भित्तिचित्रे काढून घेऊन प्रदर्शन भरवावे.
समूहगान
- • पेड़ों को क्यों काटते हो, दो पेड लगाके देखो ना.....
→ सामान्यज्ञान
• महाराष्ट्रातील काही समाजसुधारकः
• गोपाळ गणेश आगरकर
• लोकहितवादी
• न्यायमूर्ती माधव गोविंद रानडे
• विठ्ठल रामजी शिंदे
• राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
• संत गाडगेबाबा
• महात्मा जोतिबा फुले
• राजर्षी छत्रपती शाहू महाराज
• कर्मवीर भाऊराव पाटील
• महर्षी धोडे केशव कर्वे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा