Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, ३१ जुलै, २०२३

31 जुलै-दैनंदिन शालेय परिपाठ

 


प्रार्थना 

: नमो भास्करा दे अनोखा प्रकाश, तनुचा मनाचा कराया विकास....

 → श्लोक 

 - सत्यं ब्रुयात् प्रियंब्रूयात् बुयात् सत्यमप्रियम । प्रियं च नानृतं ब्रूयात् एषः धर्मोः सनातनः ।

 : खरे बोलावे, इतरांना आवडेल असे बोलावे, मात्र इतरांना आवडत नसेल ते खरे असले तरी बोलू नये. तसेच इतरांना आवडते म्हणून खोटे बोलू नये. हा सनातन धर्म आहे. 

चिंतन

 -गरिबीचे प्रदर्शन करणे हे गरिबीचे दुःख भोगण्यापेक्षाही अधिक कष्टदायक आहे. प्रेमचंद

- गरिबीमुळे माणसाला अनेक हालअपेष्टांना तोंड द्यावे लागते, दुःख भोगावे लागते. पण गरिबीतही मनुष्य ताठ मानेने, स्वाभिमानाने जगू गरिबीचे प्रदर्शन करणे ही गोष्ट मात्र कष्टदायक आहे. गरिबीच्या प्रदर्शनामुळे माणसाची लाचारी वाढत जाते. एकदा माणूस लाचार झाला की तो स्वाभिमानाने पुन्हा ताठ उभा राहू शकत नाही. म्हणूनच प्रत्यक्ष गरिबीपेक्षा गरिबीचे प्रदर्शन करणे हे अधिक त्रासदायक आहे असे म्हणतात. शकतो. 

कथाकथन

'लोभी बगळा आणि हुशार खेकडा

-एका जंगलात एक तळे होते. त्यात एक म्हातारा बगळा राहत होता. म्हातारपणामुळे तळ्यातील मासे पकडण्याची शक्तीसुद्धा नव्हती. एके दिवशी भुकेने व्याकुळ झाल्याने तो बगळा त्या तळ्याकाठी रडत बसला होता. त्याचे रडणे ऐकून जवळच | राहणारा खेकडा त्या बगळ्याची विचारपूस करायला आला. 'बगळेकाका, आज आपण इथं रडत बसलात. तेव्हा आपल्या जेवणाची काही सोय नाही काय?" बगळ्याने सांगितले, 'बाळा, तुला काय सांगणार ! मी आजपासून हिंसा करायची नाही असं ठरवलंय. उपासमारीने जीव गेला तरी चालेल...... पण मी निश्चय सोडणार नाही. माझ्या अंगी आता एकदम वैराग्य आलंय !' माझ्या आसपास इतके मासे हिंडताहेत पण मी ढुंकूनसुद्धा बघत नाही !' खेकडा विचारतो, 'पण काका, हे वैराग्य अचानक कसे आले ? त्यामागे काही कारण घडले का?" त्याबरोबर बगळा धूर्तपणे उत्तर देतो, 'बाळा,! या भविष्य सांगितल्याने मी दुःखी आहे !' खेकडा विचारतो, 'कसलं भविष्य?' अरे, आता बारा वर्ष पाऊस न पडून या तळ्यातले पाणी आटून जाणार. हे भविष्य ऐकल्यावर मी अतिशय दुःखी झालो आहे. 'बगळा डोळे पुसत होता, 'आता या तळ्यातले पाणी हळूहळू आटते आहे. ज्याच्याबरोबर आज इतकी वर्ष  आनंदाने काढली ते आता नाश पावणार. छे! ही कल्पनाच मी सहन करू शकत नाही !' खेकडा घाबरुन विचारतो, ' बगळेकाका, यावर उपाय नाही का ?" बगळा विचार करून सांगतो,' आहे एक उपाय निश्चित आहे ! इथून जवळ एक मोठे तळे आहे. बाराच वर्षे नाहीतर चोवीस वर्ष जरी पाऊस पडला नाही तरी पाणी आटणार नाही. माझ्या पाठीवर बसून येण्यास जे तयार होतील त्यांनाच त्या तळ्यात जाता येइल.' त्या खेकड्याने पाण्यातील सर्व प्राण्यांना ही गोष्ट सांगितली. त्याबरोबर सर्व प्राणी 'मला आधी न्या, मला आधी न्या' चा घोष करीत बगळ्याकडे येतात. प्रत्येक प्राण्याला आपल्या पाठीवर नेऊन बगळा तळ्याजवळ काही अंतरावरील दगडाच्या शिळेवर त्या प्राण्याला आपटून मारी त्याला खाऊन टाकल्यावर पुन्हा दुसरा म्हणजे मग तिसरा.... असा त्या प्राण्यांना खायचा क्रम बगळ्याने लावला. खेकड्याला आता बगळ्याबद्दल संशय होता. म्हणून तो बगळ्याला विचारतो, 'बगळेकाका, खरं तुमची आणि माझी भेट पहिल्यांदा झाली.... पण मला अजून तुम्ही त्या सरोवरावर नेलेच नाही.' बगळाही धूर्तपणे विचार करतो, 'रोज तेच तेच खाऊन कंटाळा आलाय.  रुचिपालट म्हणून आज खेकड्याला सांगतो, 'चल तर... बस पाठीवर !' बगळा त्या नेहमीच्या शिळेजवळ खेकड्याला आणतो. खेकड्याला आजूबाजूला हाडे । काटे आणि मांस पडलेले दिसते. खेकडा बगळ्याला म्हणतो, 'काका... तुम्ही थकला असाल. इथं विश्रांती घेऊ आणि मग तळ्याकडे जाऊ.' बगळा आपल्या | पाठीवर बसलेला खेकडा तावडीत अडकलेला बघून खेकड्याला सांगतो, 'अरे मूर्खा... तळे, बिळे काही नाही! आता तुला विश्रांती देतो माझ्या पोटात. तिकडे तुझे सर्व मित्र भेटतील. चल घे देवाचे नाव !' बगळ्याचा दुष्टपणा लक्षात आल्यावर खेकडा आपल्या दोन्ही नाग्यांनी बगळ्याची मान पकडून कापून काढतो. ती मान घेऊन खेकडा परत त्या तळ्याकडे आल्यावर सर्व प्राण्यांना दुष्ट बगळ्याची गोष्ट सांगतो आणि म्हणतो, 'जे या तळ्यात राहिलेत त्यांच्या आयुष्याची दोरी बळकट म्हणून ! नशीब तुमचे.... मी मध्येच मला न्यायला बगळ्याला सांगितले! आता मी त्याला ठार मारल्याने आपण सुखाने राहू.' 

सुविचार

 • लोभाच्या अतिरेकामुळे प्राणावरही संकट येते.

 → दिनविशेष 

 • जगन्नाथ शंकरशेठ स्मृतिदिन १८६५ : 

 मॅट्रिक परीक्षेसाठी ठेवलेल्या संस्कृत भाषेच्या शिष्यवृत्तीमुळे जगन्नाथ शंकरशेठ यांचे नाव - | अजरामर झाले. चारित्र्यसंपन्न, दानशूर आणि लोकहितसाठी झटणारे असे हे व्यक्तित्व. आधुनिक मुंबईच्या शिल्पकारांमध्ये त्यांचे स्थान प्रमुख, त्यांचा जन्म १० फेब्रु. १८०३ ला एका धनवंत व दानशूर घराण्यात झाला. मुंबइच्या सार्वजनिक जीवनात त्यांचा सर्वांगीण सहभाग होता. इंग्रजी शिक्षणाची पहिली | शाळा, मुलींच्या शिक्षणासाठी पहिली शाळा, गुन्हेगार प्रवृत्तीच्या मुलांसाठी सुधारशाळा, वैद्यकीय शिक्षण, कायदेशिक्षण, कलाशिक्षण अशा शिक्षणाच्या सर्व शाखांसाठी त्यानी अत्यंत परिश्रम घेतले. रेल्वे सुरू करण्यात त्यांचा पुढाकार होता. बँका स्थापन करण्यात त्यांचा सहभाग होता. किनाऱ्यालगत समुद्री वाहतूक सुरू करण्यासाठी बाँबे स्टीम नेव्हीगेशन त्यांनी स्थापली. विहार तलावातून पाणीपुरवठा, राणीची बाग आणि म्युझीयम त्यांनीच सुरू केले. लोकाग्रणीत पहिला अशी त्यांची सर्वांनी प्रशंसा केली. 

 → मूल्ये 

 • परोपकार, देशसेवा, समाजसेवा 

अन्य घटना 

•मुन्शी प्रेमचंद जन्मदिन १८८०. 

•बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण - १८९३. 

• बालवीर चळवळीचा भारतात शुभारंभ १९०८. 

• महात्मा गांधींच्या उपस्थितीत मुंबईत परदेशी कापडाची होळी - १९२१.

• • क्रांतिकारक उधमसिंग यांना फाशी १९४०. 

महान पार्श्वगायक मो. रफी यांचा मृत्यु - १९८०

 → उपक्रम 

 मुन्शी प्रेमचंद यांच्या कथा गोष्टीरूपाने सांगाव्यात. जगन्नाथ शंकरशेठ यांच्या कार्याची माहिती मुलांना सांगावी.

  → समूहगान 

  • जयोऽस्तुते श्रीमहन्मंगले, शिवास्पदे शुभदे ..... 

सामान्यज्ञान

 • युरोप खंडात फ्रान्स, जर्मनी आणि स्वित्झर्लंड या तिन्ही देशांच्या सरहद्दींवर येणारे एक खेडेगाव आहे. त्याचे नाव आल्टेनबर्ग. या तिन्हींपैकी कुठल्याच देशात ते मोडत नाही. साहजिकच या ठिकाणी कुणाचेच राज्य नाही. त्यामुळे अधिकार नाहीत, पोलिस नाहीत आणि करही नाहीत. येथील लोक जर्मन आणि फ्रेंच भाषांची सरमिसळ करून एक निराळीच भाषा बोलतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा