Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, २४ जुलै, २०२३

नववी भूगोल 5) वृष्टी

                 नववी भूगोल 5) वृष्टी 



■प्र. पुढील वर्णनावरून वृष्टीची रूपे ओळखा :

(१) हा तुम्ही वापरत असलेल्या पाण्याच मूळ स्रोत आहे. कधी मुसळधार, तर कधी संततधार पडतो. भारतातील बहुतेक शेती याच्यावरच अवलंबून असते.

उत्तर : पाऊस.

-------------------------

(२) पाण्याचे सूक्ष्मकण वातावरणात तरंगत असल्याचा अनुभव येतो. यामुळे लंडनमध्ये हिवाळ्यात दुपारपर्यंत सूर्यदर्शन होत नाही.अशी स्थिती सहसा सकाळी किंवा सायंकाळनंतर अनुभवास येते.

उत्तर : धुके 

-------------------------

 (३) विषुववृत्तावर अशी वृष्टी कधीही होत नाही. घन स्वरूपात होणाऱ्या या वृष्टीमुळे शेतातील पिकांचे अतोनात नुकसान होते.

उत्तर : गारपीट.

-------------------------

 (४) भूपृष्ठावर शुभ्र कापसासारखे थर साचतात. हिवाळ्यात जम्मू-काश्मीरच्या राजधानीचे ठिकाण बदलावे लागते. महाराष्ट्रातअशी वृष्टी होत नाही.

उत्तर : हिमवृष्टी.

-------------------------

(५) हिवाळ्यात सकाळी/पहाटे गवतावर, झाडांच्या पानांवर

पाण्याचे थेंब दिसतात.

उत्तर : दव.

-------------------------

(६) हिवाळ्यात सकाळी समोरचे काही दिसत नाही, वाहतुकीवर

परिणाम होतो. अपघात होण्याची शक्यताही असते.

उत्तर : धुके.

-------------------------

प्र.  वेगळा घटक ओळखा :

*(१) प्रतिरोध पाऊस, आम्लपाऊस, आवर्त पाऊस, अभिसरण

पाऊस.

 उत्तर-आम्लपाऊस

-------------------------

(२) हिमवर्षाव, पाऊस, गारपीट, दव.

उत्तर- दव

-------------------------

(३) तापमापक, पर्जन्यमापक, वातदिशादर्शक, मोजपात्र.

उत्तर -मोजपात्र

-------------------------

(४) धुके, गारा, दव, दहिवर.

उत्तरे : गारा. 

-------------------------

■प्र. फरक स्पष्ट करा : 

(१) दव आणि दहिवर.

★1)दव

१. भूपृष्ठानजीक सांद्रीभवन क्रिया घडल्यास दव पाहायला मिळते.

२. भूपृष्ठानजीक हवेचा अतिथंड वस्तूंशी संपर्क आल्यास थंड वस्तूच्या पृष्ठभागावर जलबिंदू जमतात, हेच दव होय. 

३. थोडक्यात, दव हे प्रामुख्याने सांद्रीभवन क्रियेमुळे तयार होते.

★2 )दहिवर

  १. भूपृष्ठालगतचे तापमान गोठणबिंदूच्या खाली गेले, तर दहिवर पाहायला मिळते. 

२. तापमान गोठणबिंदूच्याही खाली गेल्याने जमिनीलगतच्या बाष्पाचे संप्लवन क्रियेमुळे हिमकणांत रूपांतर होते, तसेच पृष्ठभागावरील दव गोठते, हेच दहिवर होय. 

३. थोडक्यात, दहिवर हे प्रामुख्याने संप्लवन क्रियेमुळे तयार होते. 

 -------------------------

1)हिम आणि गारा

★हिम

१. संप्लवन क्रियेमुळे हिम बनते.

२. हिम हे प्रामुख्याने हिवाळ्यात

बनते. ३. हवेतील बाष्पाचा अतिथंड हवेशी संपर्क आल्यास हिम बनते.

४. हिमातील हिमकण सुटे असतात. 

५. घनरूपी हिमकणांच्या वृष्टीला

हिमवृष्टी म्हणतात. 

६. हिमवृष्टीतील हिम हे पांढरे अपारदर्शक भुसभुशीत असते. 

७. हिमवृष्टी प्रदेशासाठी बहुतांशी लाभदायकच असते; कारण हिमवृष्टी हाच त्या प्रदेशासाठी जलस्रोत असतो. अतिहिमवृष्टी झाली, तर काही प्रमाणात जीवित व वित्तहानी होते. 

★2)गारा

१. हवेच्या ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे बर्फाचे समकेंद्री थर साचून गारा बनतात.

२. गारा या प्रामुख्याने उन्हाळ्यात बनतात.

 ३. अति उष्णता आणि जास्त आर्द्रता यांमुळे ऊर्ध्वगामी प्रवाहातून गारा बनतात. 

४. गारेतील जलकणांचे घनीभवन समकेंद्री असते. 

५. समकेंद्री घनीभवनाने मोठ्या झालेल्या गारा गुरुत्वाकर्षणामुळे वेगाने जमिनीवर पडतात, त्यास 'गारपीट' म्हणतात.

६. गारा मात्र टणक व मोठ्या असतात. 

७. गारपीट मात्र बहुतांशी हानिकारक असते. गारपिटीमुळे पिकांचे व शेतकऱ्यांचे खूप नुकसान होते. शिवाय घरे, झाडे, विजेचे खांब, माणसे, गुरे, पक्षी यांनाही धोका असतो.  

-------------------------

■प्र. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा :

(१) पृथ्वीवर कोणकोणत्या स्वरूपात वृष्टी होते?

उत्तर : आकाशातून किंवा ढगातून जमिनीकडे पाण्याचा द्रवरूपात किंवा घनरूपात होणारा वर्षाव म्हणजे 'वृष्टी' होय. पृथ्वीवर हिम,गारा, पाऊस, धुके, दव, दहिवर या स्वरूपात वृष्टी होते.

--------------------------------

(२) पर्जन्यछायेच्या प्रदेशात पावसाचे प्रमाण कसे असते ?

उत्तर : पर्जन्यछायेच्या प्रदेशात वाहणारे वारे कोरडे असतात.

त्यांची बाष्पाधारण क्षमताही जास्त असते. त्यामुळे या भागात पावसाचे

प्रमाण खूपच कमी असते. म्हणूनच खरंतर या प्रदेशास पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणतात.

--------------------------------

 (३) कोणत्या प्रकारचा पाऊस जगात सर्वाधिक भागांत पडतो ? का ?

उत्तर : पर्वतरांगांच्या अडथळ्यामुळे पडणाऱ्या पावसाला प्रतिरोध पाऊस म्हणतात. जगात सर्वांत जास्त भागात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो.

पृथ्वीचे सुमारे ७० टक्के भूपृष्ठ पाण्याने व्यापले असून, बाष्पयुक्त वारे समुद्राकडून जमिनीकडे वाहण्याचे प्रमाण जगात जास्त आहे. या तुलनेत आरोह किंवा आवर्ताची परिस्थिती जगात सर्वत्र आणि रोजच नसते. भूपृष्ठावर अनेक पर्वतरांगा, डोंगररांगा सर्वत्र आहेत. या पर्वत/ डोंगररांगांना बाष्पयुक्त वारे अडतात व पर्वताच्या अडथळ्यामुळे असे वारे वर-वर जातात, सांद्रीभवन होते व पाऊस पडतो. या पावसाचे क्षेत्र जगात सर्वत्र व विशाल असते. या तुलनेत आरोह पाऊस फक्त विषुववृत्तीय प्रदेशात व आवर्त पाऊस प्रामुख्याने समशीतोष्ण कटिबंधातच पडतो. थोडक्यात, प्रतिरोध पाऊस जगात सर्वाधिक प्रमाणात पडतो.

--------------------------------

 (४) भूपृष्ठालगतच्या वातावरणात सांद्रीभवन झाल्यास कोणकोणते जलाविष्कार दिसून येतात ?

उत्तर : भूपृष्ठालगतच्या वातावरणात सांद्रीभवन झाल्यास धुके, दव व दहिवर हे जलाविष्कार दिसून येतात.

--------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा