14 ऑगस्ट-दैनंदिन शालेय परिपाठ
→ प्रार्थना
- ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो....
→ श्लोक
- वित्त्वंच नृपत्वंच चैव तुल्य कदाचन । स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते ।।
विद्वता आणि राजेपण यांची कधीही तुलना होऊ शकत नाही. राजाची पूजा त्याच्या देशातच होते; तर विद्वानाची पूजा सर्वत्र होत असते.
→ चिंतन
- मला काम करणं आवडतं. कामाशिवाय एक क्षणही मी जाऊ देत नाही. जेव्हा मी निष्क्रीय बनतो आणि माझी विचारशक्ती सुस्तावते तेव्हा तो काळ क्विनीनपेक्षाही कडू आणि लांडग्याच्या दातांपेक्षाही कठोर बनतो. काहीही काम न करता बसणं म्हणजे काळाचे जागच्या जागी खूर आपटणे. शरीराला जसं हृदयं तसं हाताला काम हवं. - खलील जिब्रान
→ कथाकथन
- आपल्या सूर्यमालेत आपली पृथ्वी हा सर्व प्राणीमात्रांचा एकमेव आधार आहे. या पृथ्वीवरच असंख्य | प्रकारच्या वनस्पती वाढतात आणि माणसांसह अनेक पशु पक्षी येथे राहतात. या सर्वांचे पालन-पोषण पृथ्वी करते. त्यामुळेच सर्व जीवसृष्टी पृथ्वीची | कृतज्ञ आहे. मानवाचा आजपर्यंतचा विकास 'पृथ्वी' वरील विविध प्रकारच्या साधनसंपत्तीमुळेच शक्य झाला आहे. एका अर्थाने पृथ्वी आपणा सर्वांची | पालनकर्ती आहे. त्यामुळेच सर्व जीवसृष्टी पृथ्वीची कृतज्ञ आहे. मानवाचा आजपर्यंतचा विकास 'पृथ्वी' वरील विविध प्रकारच्या साधनसंपत्तीमुळेच | शक्य झाला आहे. एका अर्थाने पृथ्वी आपणा सर्वांची पालनकर्ती आहे. त्यामुळेच अनेक समाजात 'पृथ्वी' ला देवत्य दिले आहे; आणि अनेक प्रसंगी पृथ्वीची पूजाही केली जाते. नवीन वास्तू बांधताना, मांडव घालताना आजही भूमिपूजन करतात ते पृथ्वीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच असते. | पूर्वीच्या काळी आपले ऋषी-मुनी सकाळच्या प्रार्थनेतही 'पादस्पर्श क्षमस्व मे ।।' म्हणजेच 'माझ्या पादस्पर्शाबद्दल तू मला क्षमा कर' असे म्हणून ...
- | पृथ्वीची क्षमा मागत. काळाच्या ओघात हे सर्व मागे पडले. माणूस पैशामागे, सुखामागे धावू लागला. यांत्रिक-तांत्रिक विज्ञानाच्या मदतीने पृथ्वीवरील | मुबलक साधनसंपत्तीही कशीही निष्काळजीपणे वापरू लागला. मानवाला भरभरून देणाऱ्या अशा या पालनकर्ती पृथ्वीला मानवाने मात्र परत काय दिले? तर भरपूर प्रदूषण, वनतोड, पशुपक्ष्यांची हत्या, बॉम्बस्फोट इ. यामुळेच मानवाचे स्वतःचेच आयुष्य धोक्यात आल्याची जाणीव त्याला आता उशीराने होऊ लागली. या चुकांबद्दल आपण पूर्वीच्या ऋषी-मुनींप्रमाणे केवळ पृथ्वीची क्षमायाचना करून भागेल काय? नक्कीच नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत, विद्यार्थ्यांपासून शास्त्रज्ञापर्यंत सर्वांनी आपल्या धरणीमातेच्या संरक्षणासाठी, संवर्धनासाठी विशेष प्रयत्न करायला हवेत. तुम्ही जरी विद्यार्थी असलात, लहान असलात तरी तुम्हीही या प्रयत्नात सहभागी होऊ शकता. कागद वाया घालवायचा नाही, प्लॅस्टिकचा वापर कमीत कमी करायचा, ज्या गोष्टीची गरज नाही, तिचा हट्ट धरायचा नाही, सर्व वस्तू काळजीपूर्वक आणि पुरेपूर वापरायच्या आणि आई-वडिल, शिक्षकांचे ऐकायचे या गोष्टी तुम्ही नक्कीच करू शकता, हो की नाही ! आपली पृथ्वी, आपली वसुंधरा, आपली धरणीमाता वाचली तरच इतर जीवसृष्टीसह मनुष्य वाचणार आहे. म्हणूनच 'मानवाने वाया घालवू नये क्षण मानवाने वाया घालवू नये कण ।।' हा जीवनमंत्र स्वीकारुया! आपली पृथ्वी वाचवू या!! आपण आपल्याला वाचवू या !!!
- सुविचार
• करू रक्षण पर्यावरणाचे, साधेल कल्याण मानवाचे!
• वृक्ष म्हणजे पृथ्वीने आकाशाच्या विशाल भूर्जपत्रावर लिहिलेली काव्ये होत. •
• पर्यावरण रक्षण, हेच मूल्यशिक्षण!
• वनीकरणास द्या साथ, गावाचा करा विकास!
→ दिनविशेष
जॉलिए जाँ फ्रेडरिक स्मृतिदिन - १९५८ :
जाँ फ्रेडरिक हे फ्रेंच पदार्थविज्ञान शास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म दि. ९ मे १९०० रोजी | झाला. यांनी प्रथम वास्तुविज्ञानाचा अभ्यास करून नंतर रसायनशास्त्राचा अभ्यास केला. फॅकल्टी ऑफ सायन्सेस या पॅरिस येथील इन्स्ट्यूिटमध्ये ते प्राध्यापक झाले. प्रसिद्ध शास्त्रज्ञ मादाम क्युरी हिची मुलगी इरीन क्युरी ही त्यांची पत्नी. या दोघांनी रेडियमसंबंधी आणखी संशोधन केले व १९३५ मधील रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळविले. राज्यकर्त्यांचा विरोध पत्करूनही अणुशक्तीचा वापर मानवी हितासाठी करावा यासाठी त्यांनी आयुष्यभर निकराचे प्रयत्न केले. दुसऱ्या महायुद्धामधील यांची कामगिरी महत्त्वाची होती. जर्मनीच्या हाती पडू नये म्हणून गुप्ततेने त्यांनी महत्त्वाचे तंत्रज्ञान सुरक्षिततेसाठी इंग्लंडमध्ये पाठविले. या दोघांच्या जिद्दीमुळेच फ्रान्स अणुशक्ती संशोधनात इंग्लंड-अमेरिकेच्या बरोबरीने अग्रेसर राहिला.
मूल्ये -
• देशप्रेम, मानवता, विज्ञाननिष्ठा
→ अन्य घटना
- • शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या बळकटीसाठी खांदेरीचा किल्ला बांधून घेतला - १६७८.
• दुसरे महायुद्ध समाप्त - १९४५.
• भारताच्या घटना समितीच्या महत्त्वपूर्ण अधिवेशनाला रात्री ११ वाजता सुरुवात झाली - १९४७. e पेरांबूर येथे रेल्वेगाड्यांना लागणारे डबे निर्मितीच्या कारखान्याची स्थापना - १९५५.
• ऑलपिंक स्पर्धेमध्ये कुस्तीचे ब्राँझ पदक मिळविणारे मल्ल व मुंबई पोलिस सहाय्यक आयुक्त खाशाबा जाधन यांचे निधन - १९८४.
→ उपक्रम
• किरणोत्सारी मूलद्रव्यांची माहिती सांगावी स्वतंत्र विधान रेडियमच्या उपयोगांविषयी माहिती मिळवावी.
• → समूहगान
• देश हमारा धरती अपनी, हम धरती के लाल....
सामान्यज्ञान
• भारताचे एकूण क्षेत्रफळ सुमारे ३२.८८ लक्ष चौरस कि.मी. आहे. तर लोकसंख्या सुमारे ८४ कोटी ६३ लक्ष इतकी आहे. (१९९१). म्हणजेच भारताची लोकसंख्या दर चौ. कि.मी. मध्ये सुमारे २५६ इतकी आहे
. • चीन हा आशिया खंडातील सर्वात मोठा देश आहे. चीनचे क्षेत्रफळ सुमारे ९५.६१ लक्ष चौरस कि.मी. आहे. तर लोकसंख्या सुमारे ११३ कोटी इतकी आहे. चीनची लोकसंख्या दर चौ. कि.मी.ला ११८ इतकी आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा