→ प्रार्थना
- सर्वात्मका शिव सुंदरा, स्वीकार या अभिवादना...
→ श्लोक
- विचारूनि बोले, विवंचूनि चाले । तयाचेनि संतप्त तेही निवाले । बरे शोधिल्यावीण बोलो नको हो । जनी चालणे शुद्ध नेमस्त राहो ।।
हे मना, जो विचारपूर्वक बोलतो, विवेकाने वागतो, त्याच्या संगतीमुळे दुःखाने संतप्त झालेले लोकही शांत होतात. त्यांना समाधान मिळते. न. चांगले कोणते वाईट कोणते याचा नीट शोध घेऊनच काय ते बोलावे. समाजात वागणेही निर्मळ आणि नीतिनियमांना धरून असावे
→ चिंतन
- क्रांती हा मनुष्याचा निसर्गदत्त हक्क आहे. स्वातंत्र्य हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्क आहे. या ध्येयासाठी आणि या निष्टमा आमच्या वाट्यास येणाऱ्या कोणत्याही हालअपेष्टांचे आम्ही स्वागतच करू. कारण आझादी और जिदंगी एक बात है, गुलामी और मं एक बात है । - शहीद भगतसिंग
देव-देशसेवेसाठी सर्वही करीन, चित्त वित्त जीवन माझे सर्व हारवीन, प्राणपुरुष माझे माझ्या मातृभूमीवर कामी, जरी येई उपयोगातकितिक होई नामी. - साने गुरुजी
. आपल्या देशासाठी, आपल्या मातृभूमीसाठी प्रत्येकाने तनमनधनाने झीज सोसली पाहिजे. देशाची सेवा हीच खरी ईश्वरपूजा आहे. देश हाच आहे. आपल्या देशासाठी प्रसंगी प्राणार्पण करायची वेळ आली तर त्याचीही प्रत्येकाने तयारी ठेवली पाहिजे. भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी अनेक वीरान आपल्या प्राणांचे बलिदान केले. भारतमाता स्वतंत्र झाली. आता या भारताच्या उत्कर्षासाठी आपण साऱ्यांनी तनमनधनाने कार्य करायला हवे.-
कथाकथन -
'भारताचा स्वातंत्र्यदिन' - पंधरा ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्यदिन. १५ ऑगस्ट १९४७ रोजी पं. नेहरूंनी म्हटल्याप्रमाणे मध्य १.२ वाजता सारे जग निद्रिस्त असता भारताने नवचैतन्याने जागृत होऊन स्वातंत्र्य संपादन केले. दीडशे वर्षांच्या ब्रिटिशांच्या गुलामगिरीत असलेल्या मातेच्या पायातील शृंखला तुटून पडल्या. भारताच्या कानकोपऱ्यात स्वातंत्र्याचा जयजयकार झाला. १८५७ साली स्वातंत्र्ययुद्धाला सुरुवात इन क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, भगतसिंग,
चंद्रशेखर आझाद, मदनलाल धिंग्रा, चाफेकर बंधू, स्वा. सावरकर अशा अनेक क्रांतिकारकांनी ह सरकारला सळो की पळो करून सोडले. अनेक क्रांतिकारकांनी बलिदान केले नंतर लोकमान्यांनी 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि त मिळवणार' अशी सिंहगर्जना केली. १९४२ मध्ये महात्मा गांधीनी 'चले जाव' चळवळ सुरू केली स्वदेशी, स्वराज्य, विदेशी मालाचा बहिष्कार अ राष्ट्रीय शिक्षण ही काँग्रेसच्या लढ्यांची चतु:सूत्री बनली. दादाभाई नौरोजी, लो.टिळक, नाम. गोखले, म. गांधी, पं. नेहरू नेताजी सुभाषचंद्र बोस नेत्यांच्या नेतृत्वाखाली १९४३ पर्यंत काँग्रेसने देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक लढे दिले. त्यात लक्षावधी भारतीयांनी लाठीमार, अश्रुधूर व गोळीबार | तोंड दिले. असंख्य लोकांनी तुरुंगवास पत्करला. कित्येकांनी आपल्या प्राणांची आहुती स्वातंत्र्याच्या बलिवेदीवर दिली आणि भारतावर राज्य ब्रिटिश अशक्य झाल्यामुळे लॉर्ड माऊंटबॅटन यांच्या हस्ते या सर्वांचा परिणाम म्हणजे १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. १५० वर्षे भारतक फडकणारा इंग्रजांचा युनियन जॅक खाली उतरविला अशोकचक्रांकित भारताचा तिरंगा ध्वज डौलाने फडकू लागला. अर्थात भारत खंडित झाला ह | त्यामुळे या आनंदाच्या दिवशी भारतीयांच्या एका डोळ्यात हासू व दुसऱ्या डोळ्यात आसू होते. यावेळी योगी अरविंदांनी इशारा दिला.
भारतमातेचे भंगलेले आहे. ते एकसंघ केल्याशिवाय भारताचे भवितव्य ठीक नाही. असे असले तरी १५ ऑगस्ट भारतीयांच्या जीवनातील अपूर्व दिवस सोनिया दिन. फार मोठा टप्पा भारताने गाठला. आपली मान अधिक उन्नत केली. हा दिवस प्रत्येक भारतीयाने अत्यंत आनंदाने, जबाबदारीने साजरा करावयाच आहे. या दिवशी शाळा-महाविद्यालयात, सार्वजनिक संस्थात, शासकीय इमारतीत ध्वजवंदनाचा कार्यक्रम आयोजित केलेला असतो. यादिवशी प्रत्येक भारतीयाने राष्ट्रध्वजाला प्रणाम केलाच पाहिजे. अनेक विद्यार्थी या दिवशी शाळा, कॉलेजकडे फिरकतही नाहीत. हे अत्यंत अयोग्य आहे. आपली नैि जबाबदारी समजून ध्वजवंदनाला गेले पाहिजे. या दिवशी आयोजित केलेल्या कार्यक्रमात भाग घेतला पाहिजे. आपल्याला हे स्वातंत्र्य कसे मिळा आपली जबाबदारी काय आहे याचा प्रत्येकाने आपल्याशी विचार केला पाहिजे. स्वातंत्र्यदिनाच्या पर्वावर मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !
सुविचार
• स्वातंत्र्यदिन - • चिरायू होवो.
• देश, धर्म यांच्यासाठी रणी झुंजताना । मृत्यू ज्यास येई भाग्य थोर जाणा ।।
• राहिले. त्यांन विचारले. ते भरलेल्या स बरबटलात. तसेच वाग आणि जे होणार "
• प्राणाहूनही स्वातंत्र्य महान
. → दिनविशेष
- • भारताचा स्वातंत्र्यदिन - १९४७ : हिंदुस्थानातील ब्रिटिश सत्तेला मोठा हादरा देणारी घटना सन १८५७ साली घडली. इंग्रज १८५७ चा उठाव आपल्या सर्वसामर्थ्यानिशी मोडून काढला. यातूनच पुढे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी ही परंपरा पुढे चालवित | हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी 'जशास तसे' या धोरणाचा पुरस्कार करणारा क्रांतिकारकांचा गट निर्माण झाला. सन १९२० मध्ये लो. टिळक महानिर्वाण झाले आणि भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याची सूत्रे गांधीजींनी हाती घेतली. इंग्रज सरकारने चालविलेली दडपशाही, जुलमी कायदे यंत्र मोठी अहिंसात्मक प्रतिकार करण्यासाठी त्यांनी जनतेला हाक दिली. यानंतर १९४२ च्या 'चले जाव' आंदोलनाने पुढे उग्र स्वरूप धारण केले. नेताजी सुभाष बोस यांनी आझाद हिंद सेना उभारून हिंदुस्थानातील ब्रिटिश सत्तेवर जोराचा घणाघात घातला. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्यप्राप्ती झाली जवळजवळ १५० वर्षे हिंदुस्थानावर फडकणारे ब्रिटिशांचे युनियन जॅक खाली उतरविले गेले आणि अशोकचक्र चिन्हांकित तिरंगा ध्वज डौलाने फडकविल गेला. पहाटेच्या वेळी केलेल्या आपल्या भाषणात पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू म्हणाले, "अनेक वर्षापूर्वी आपल्या भवितव्याविषयी एक ध निर्धारित केले होते ते साध्य करण्याकरिता घेतलेली प्रतिज्ञा पुन्हा घेण्याची आज वेळ आली आहे. एका युगाचा अंत होऊन नवे युग सुरू करणारा उ दिवस राष्ट्राच्या इतिहासात क्वचितच उगवत असतो, तो मंगल दिवस उगवला आहे. याप्रसंगी भारतीय जनतेची आणि त्याहूनही श्रेष्ठ अशा मानवतसेवा करण्याची आज आपण पुन्हा प्रतिज्ञा घेऊ या
→ मूल्ये
- • राष्ट्रप्रेम, स्वतंत्रता.
→ अन्य घटना -
• फ्रान्सचा जगप्रसिद्ध सम्राट, एक असामान्य सेनानी व कार्यक्षम प्रशासक नेपोलियन बोनापार्ट यांचा जन्मदिन -
• योगी अरविंद घोष यांचा जन्मदिन - १८७२
• रामकृष्ण परमहंस यांची समाधी - १८८६
• भारतामध्ये दिल्ली येथे पहिले दूरदर्शन केंद्र सुरू - १
• भारतात दूरदर्शनचे रंगीत प्रक्षेपण सुरू झाले - १९८२.
• स्वातंत्र्यलढ्यातील विविध प्रसंग सांगा.. → समूहगान -
• विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा उँचा रहे हमारा...
• झेंडा अमुचा प्रिय देशाचा, फडकतवरी महान....
→ सामान्यज्ञान -
• २२ जुलै १९४७ रोजी भरलेल्या घटनासभेत सर्वानुमते भारताच्या राष्ट्रध्वजाची निवड करण्यात आली. ध्वजाच्या लांबी प्रमाण ३:२ असे आहे. तर मध्य भागात एक चक्र असून त्यास २४ आरे आहेत. (९२)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा