16 ऑगस्ट-दैनंदिन शालेय परिपाठ
प्रार्थना
ईश्वर अल्लाह तेरे नाम, सबको सन्मति दे भगवान.. -
→ श्लोक
- जलै तैलं, खले गुहां, पात्रे दानं मनागपि । प्राज्ञे शास्त्रं स्वयं याति विस्तारं वस्तुशक्तित: ।।
पाण्यात तेलाचा विस्तार होतो, दुष्टांच्या मनात गुपित विस्तारते, योग्य माणसास थोडे जरी दान दिले तर त्याची प्रसिद्धी होते आणि बुद्धिमान माणसाच्या बुद्धीत शास्त्राचा विस्तार होत असतो. हे सारे त्या-त्या वस्तुनिष्ठ शक्तींच्या मुळे होते.
→ चिंतन
संत हा हिरव्या चाफ्याच्या फुलासारखा असतो. सुंदर वास तर येतो, पण हिरव्या पानांमध्ये ते फूल शोधून काढता येत नाही. त्याप्रमाणे जेथे संत आहे तेथे आनंद आणि समाधान असते, पण तो बाहेरून सामान्य माणसासारखाच असल्यामुळे आपल्याला ओळखता येत नाही.. फडक्यात रुपया बांधला तरी फडक्याला महत्त्व नसून त्यातल्या रुपयाला असते. त्याचप्रमाणे संतांच्या बाह्यांगाला महत्त्व नसून त्यांना परमेश्वराचा जो ध्यास असतो त्याला महत्त्व आहे.
कथाकथन
- 'तेनालीरामचे चातुर्य' - एके दिवशी राजा कृष्णदेवराय आणि तेनालीराम संध्याकाळी बाहेर फिरावयास गेले. दोघेही निरनिराळ्या विषयांवर चर्चा करण्यात मन होते. त्यांना आपल्या आसपास काय आहे. याची जराही चिंता नव्हती. अचानक तेनालीरामचा पाव रस्त्यावर पडलेल्या शेणात पडला आणि पायाचा अंगठा भरला. तो साफ करण्यासाठी तेनालीराम आसपास कोठे पाणी आहे का, ते शोधू लागले. जवळच त्यांना एक झरा दिसला आणि ते आपला पाय शेणाने भरलेला अंगठा धुवू लागला. त्याच वेळी महाराज तेनालीरामला म्हणाले, "आपण जरी कितीतरी वेळा अंगठा | धुतला तरी थोडीबहुत घाण आणि वास त्याला राहणारच. " तेनालीराम म्हणाले, 'महाराज! मी माझा अंगठा अगदी रगडून रगडून धुतला आहे. अजून एकदा धुतो.' त्यावर महाराज म्हणाले, "काही उपयोग नाही. घाण वासाचा अंश अवश्य तुमच्या पायाला राहणारच, त्यापेक्षा अंगठाच कापून टाका. जर आपण असे करु शकत नसाल तर माझ्या महालात येऊ नका. मला ते अजिबात आवडणार नाही की महालातील किमती गालिच्यांना अंगठ्याचा घाण वास लागावा!' जशी आपली आज्ञा. पण ज्या प्रकारे मी माझ्या अंगठ्याची सफाई केली आहे तशी कोणीच आजपर्यंत केली नसेल. आता तो पहिल्यासारखाच शुद्ध आणि पवित्र झाला आहे.' तेनालीरामने उत्तर दिले. महाराज आपल्या मुद्दावर मुद्दामच अडून होते. ते म्हणाले, 'अंगठा कापल्याशिवाय पाय स्वच्छ होवून शकत नाही. हा आमचा पहिला आणि शेवटचा निर्णय आहे.' तेनालीराम यावर म्हणाले, 'ठीक आहे महाराज! पण जर मी आपल्याला आपल्या चुकीचा अनुभव आणून दिला तर आपण आपली चूक कबूल कराल?' महाराज हसून म्हणाले. 'तुझे प्रयत्न करुन पहा; पण माझा विचार अगदी पक्का आहो. जर तुम्ही आम्हाला चुकीचे ठरवू शकलात तर तुम्हाला १,००० • सुवर्णमुद्रा बक्षीस म्हणून देऊ.' तेनालीराम बरेच दिवस घरी राहिले. त्यांनी उत्तम प्रकारे गुलाब आपल्या बगीचात लावले. काही दिवसात सारे गुलाब उमलले. एकदा असेच तेनालीरामशी गाठ पडली. राजाने कुशल विचारले. तेनालीरामाने बगीच्यातील सुंदर फुलांचे ताटवे बघण्यास महाराजांना बोलावले. फुले पाहून महाराज खूष झाले आणि पुढच्याच क्षणी शेणाने | भरलेल्या खड्यात पडले आणि पूर्णपणे लडबडले. ते पाहून तेनालीरामला फार आनंद झाला. तो म्हणाला, "महाराज आपण तर सगळेच शेणाने बरबटलात. आता आपण दरबारात जाऊ शकणार ना शयनकक्षात. किमतीच्या गालिच्या, सिंहासनाला आणि पूर्ण किल्ल्याला दुर्गंध येईल. आपणही तसेच वागाल की हे सर्व खराब होणार नाही," राजा विचारात पडला. तेनालीराम पुन्हा म्हणाले, “थोडे थांबा महाराज, मी आता तलवार घेऊन येतो आणि जे-जे अवयव शेणाने घाण झाले आहेत ते-ते कापून टाकतो. इतक्या सफाईने तुमचे शरीर धडापासून अलग करीन की तुम्हाला त्रासही नाही होणार." राजाने आपली चूक मान्य केली आणि त्या खड्ड्यातून वर काढण्याची विनंती केली. तेनालीरामने राजाला बाहेर काढले. स्वच्छ केले आणि आपले कपडे घालण्यास दिले. राजाची माफीही मागितली. राजाने खुश होऊन १,००० • सुवर्णमुद्रा तेनालीरामला बक्षीस दिल्या.
सुविचार
• जीवनात जर काही साध्य करायचे असेल तर दोन गोष्टींची आवश्यकता आहे; एक ध्यास दुसरी अभ्यास
• यश हवे असेल तर यशाची वाट पाहू नका, प्रसंगावधान ठेवून परिश्रम करा व चातुर्याचा वापर करा. यश तुमच्या पायांशी लोळण घेईल
→ दिनविशेष -
१८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामाची शताब्दि देशभर साजरी केली गेली.
• मूल्ये
• शुचिता, श्रमनिष्ठा.
• अन्य घटना - • संत ज्ञानेश्वर जयंती - १२७५. • खंडुजी भोसले स्मृतिदिन - १७८९.
→ उपक्रम
-> - • संतांच्या चरित्रातील प्रसंग सांगा
→ समूहगान -
• या भूमीचे पुत्र आम्ही, उंचवू देशाची शान ........
→ सामान्यज्ञान '-
• 'नेफिडा मॅक्युलाय' या शास्त्रीय नावाने ओळखला जाणारा एक कोळी प्रशांत महासागरात ५ अंश दक्षिण अक्षांशावर असले | न्यू गिनी बेटावरील जंगलात आढळतो. या कोळ्याचे वर्तुळाकार जाळे सायकलीच्या चाकापेक्षा मोठे असते. या कोळ्यातील मादी नरापेक्षा ३००मोठी असते व आकाराने मानवी हाताच्या पंजाएवढी असते.
नाव व त्यांचा पक्ष राज्य कालखंड सुचेता कृपलानी (काँग्रेस) उत्तर प्रदेश १९६३-६७
सुचेता कृपलानी (काँग्रेस) उत्तर प्रदेश १९६३-६७ नंदिनी सत्पथी (काँग्रेस) उडिसा १८७२-७४, १९७४-७६ शशिकला काकोडकर (महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टी) सईदा अन्वरा तैमूर (काँग्रेस) गोवा १९७३ ७७, १८७७-७९
(काँग्रेस) गोवा १९७३ ७७, १८७७-७९ १९८०-८१ जानकी रामचंद्रन (अण्णा द्रविड मुन्नेत्र कळगम) जे. जयललिता (अण्णा द्रमुक) तामिळनाडू ७ जानेवारी, ३० जानेवारी १९८८ तामिळनाडू १९९१-९६, २९९१, २००२ पासून राजिंदरकौर भट्टल (काँग्रेस) पंजाब बिहार १९९६-९७ राबडीदेवी (राष्ट्रीय जनता दल) १९९७-१९, १९९९-२००० २००२-२००५ १९९८ दिल्ली सुषमा स्वराज्य (भारतीय जनता पार्टी)मायावती (बहुजन समाज पार्टी) १९९५-९६. १९९७, २००२ शीला दीक्षित (कॉग्रेस) दिल्ली १९९८ पासून उमा भारती (भाजपा) मध्य प्रदेश डिसेंबर २००३ ऑगस्ट २००४ २००३ (डिसेंबरपासून) वसुंधराराजे (भाजपा) (९३)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा