18 ऑगस्ट-दैनंदिन शालेय परिपाठ
→ प्रार्थना
प्रभु तेरो नाम जो ध्याये फल पाये सुख लाये...
→ श्लोक -
संपूर्णकुम्भो न करोति शब्दम् । अर्धोघटो घोषमुपैति नूनम् । वद्वान् कुलीनो न करोति गर्वम् । जल्पान्ति मूढास्तु गुणैर्विहीनः
।। भरलेली घागर आवाज करीत नाही. अर्धी भरलेली घागर मात्र पुनः पुन्हा आवाज करते. थोर कुलातील विद्वान गर्व करीत नाही. परंतु अंगी गुण नसलेले मूर्ख लोक मात्र बडबड करीत असतात.
→ चिंतन-
कदम कदम बढाए जा, खुशीके गीत गाए जा, ये जिंदगी है कौम की, तो कौमपे लुटाये जा - नेताजी सुभाषचंद्र बोस तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दूँगा - नेताजी सुभाषचंद्र बोस
कथाकथन
'विश्वासघातकी मित्र' • एक मोठे तळे होते. त्या तळ्यामध्ये एक मगर राहात होते. तळ्याच्या काठावर एक जांभळीचे झाड | होतं. त्या झाडावर एक माकड राहात होते. माकडाची व मगराची खूपच मैत्री होती. तळ्याच्या काठावर पडून मगर माकडाला तळ्यातील गमतीजमती सांगे, झाडावर बसून माकड मगराला जंगलातील गमती सांगे. कधी कधी माकड मगराला झाडावरची ताजी रसाळ जांभळं खायला देई. एक दिवस मगराने माकडाने दिलेली जांभळे मगरीला नेऊन दिली. गोड रसाळ जांभळं खातखात मगर म्हणाली, "अहो, ही जांभळं जर इतकी गोड आहेत तरी ही खाणान्या तुमच्या मित्राचं, माकडाचं काळीज किती गोड असेल. माझी मैत्रिणही म्हणत होती, 'माकडाचं काळीज फार गोड असतं म्हणून मगरीच्या | बोलण्यानं मगराच्या मनात चलबिचल झाली, ते माकडाच्या काळजाचाच विचार करू लागले. एक दिवस संधी साधून मगर माकंडाल म्हणाले, "मित्रा, तू एवढा माझा मित्र पण माझ्या घरी काही तू आला नाहीस, तेव्हा आता मी तुला माझ्या घरी घेऊन जाणारच.” त्यावर हसून माकड म्हणाले, "मला कुठे पाण्यात पोहता येतंय!" "अरे त्याचा विचार मी अगोदरच केलाय. मी तुला माझ्या पाठीवर बसवून घेऊन जाणार आहे." मगर म्हणाले. दुसरे दिवशी माकड मगराच्या पाठीवर बसले, मगर सपासप पाणी कापू लागले. बोलता बोलता मगर तळ्याच्या मध्यावर आले. आणि माकडाला हादरे बसू लागले. त्याचा तोल जाऊ लागला. पाण्याच्या फवाऱ्याने ते चिंब भिजून गेले. मगराला घट्ट मिठ्ठी मारीत ते म्हणाले, "मित्रा मला भीती वाटतेयं. जरा हळू चाल नाहीतर मी पाण्यात पडून जाईन. किती लांब आहे तुझं घर?" "मूर्खा, तुला ठार मारण्याकरिताच मी तुला इथं आणलंय. मगर आपले दात विचकित म्हणाले, ""अरे! पण मगरा, तू माझा मित्र आहेस. आपली एवढ्या दिवसांची मैत्री तू विसरलास माकडं गयावया करीत तू म्हणाले, 'मूर्खा माकडा मगराला कुठला आलाय मित्र! आणि तू जर माझा मित्र म्हणवतोस तर मित्रासाठी मरायला तयार हो. मला तुझं गोड गोडं काळीज हवंय. तुला ठार मारून ते मी खाणार आहे." मगर जिभल्या चाटीत म्हणाले. घाबरलेल्या माकडाला चट्कन युक्ती सुचली. ते म्हणाले. "मित्रा, तुला माझं काळीज हवंय अरे, पण मघाशीच नाही का सांगायचं. आम्ही माकडं काळीज सोबत घेऊन हिंडत नाही. ते झाडावर टांगून ठेवतो. मला त्या झाडाजवळ घेऊन चल. देतो मी तुला काळीज."चल तर मग." मगर पुन्हा मागे वळलं. झाडाजवळ येताच माकडानं चट्कन अमिनीवर उडी मारली आणि ते झाडाच्या शेंड्यावर जाऊन बसलं. आपली लांबसडक गोंडेदार शेपटी हलवित ते म्हणाला "मूर्खा मगर! काळीज का कधी कुणी काढून ठेवते. ते आहे माझ्या शरीरात जा आता इथून आणि पुन्हा कधीही दिसू नकोस! तुझ्यासारख्या दुष्ट विश्वासघातकी मित्राचं तोंड पाहण्याची देखील माझी इच्छा नाही.
→ सुविचार
• "मित्र तो पाहिजे ज्ञानी, विवेकी जाणता भला"• विश्वासघातकी मित्रांपासूनसावधान रहा.
→ दिनविशेष
• नेताजी सुभाषचंद्र बोस स्मृतिदिन - १९४५ : सुभाषचंद्रांचा जन्म कटक येथे झाला. त्यांचे वडील जानकीनाथ बोस प्रसिद्ध वकील होते. सुभाषचंद्र हे शाळेत हुशार विद्यार्थी म्हणून नावाजले होते. कोलकोत्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजात असतानाच त्यांना अध्यात्माची गोडी लागली. ते रामकृष्ण परमहंस व विवेकानंदांचे भक्त बनले. सभोवतालचे वातावरण पाहून त्यांचे रक्त उसळून येई. स्कॉटिश चर्च कॉलेजात ते पहिल्या वर्गात बी. ए. झाले. पुढे आय.सी. एस. होण्यासाठी ते इंग्लंडला गेले. या सनदी परीक्षेत ते चौथे आले. परत आल्यावर लठ्ठ पगाराची सरकारी नोकरी न करता ते स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले. पुढे त्रिपुरा काँग्रेसचे ते अध्यक्ष झाले. देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या कामी इंग्रजविरोधी राष्ट्रांची मदत घेता आली तर घ्यावी या त्यांच्या विचारामुळे काँग्रेस श्रेष्ठींशी त्यांचे मतभेद झाले. त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. नंतर पुरोगामी विचारांचा 'फॉर्वर्ड ब्लॉक' नावाचा पक्ष त्यांनी काढला. सरकारने त्यांना तुरुंगात डांबले. तेथून ते वेषांतर करून निसटले. पुढे बर्लिन मार्गे सिंगापूरला आले. तेथे रासबिहारी बोसांनी आझाद हिंद सेना उभी | केली होती. तिचे नेतृत्व स्वीकारून त्यांनी १९४३ मध्ये आझाद हिंद सेनेची स्थापना केली. 'जय हिंद, चलो दिल्ली' असा नारा देत त्यांची फौज हिंदुस्थानच्या दिशेने कूच करू लागली. सिंगापूरहून जपानी विमानातून टोकिओकडे जाताना वाटेत विमान अपघात होऊन ते मृत्यू पावले. त्यांच्या अपूर्व कर्तृत्वाने ते भारताच्या इतिहासात अजरामर झाले. हिंदुस्थानातील ब्रिटिश सत्तेवर जोरदार घणाघात घालणारे नेताजी सुभाषचंद्र बोस हे अलौकिक व्यक्तिमत्व होय.
• मूल्ये • राष्ट्रप्रेम, जिद्द, साहस, धैर्य →
अन्य घटना
• बाजीराव पेशवे यांचा जन्म १७००
• विष्णुबुवा पलुस्कर यांचा जन्मदिन - १८७२
• विजयालक्ष्मी पंडित यांचा जन्मदिन - १९००
• महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे निधन
• → उपक्रम → समूहगान - • नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे छायाचित्र मिळवा व कार्याबद्दल माहिती मिळवा. -
• नन्हा मुन्ना राही हूँ, देश का सिपाही हूँ..... - १९७९. →
• सामान्यज्ञान
• परागीभवन करणाऱ्या कीटकांमध्ये मधमाशा सर्वांत महत्त्वाच्या ठरतात. त्यातही आग्या, फुलोरी, सातेरी या मध् अधिक समर्थ असतात. त्या दिवसभर काम करतात. पण सकाळी ७ ते ११ आणि संध्याकाळी ४ ते ६ त्यांची संख्या विपुल असते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा