20 ऑगस्ट-दैनंदिन शालेय परिपाठ
→ प्रार्थना
लावियेला दीप प्रेमे, तेवता ठेवू चला...
→ श्लोक
- कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन । मा कर्मफलहेतुर्भूः मा ते संगोऽस्त्वकर्मणि । कर्म करण्याचाच अधिकार तुला आहे. फलाचा अधिकार नाही. कर्माचे फळ मिळावे अशा हेतूने कर्म करू नकोस आणि कर्मच क | विचार मनात येऊ देऊ नकोस. (कर्मफलाची आशा न धरता कर्म करीत राहणेच श्रेयस्कर असते)
→ चिंतन
समाजाने आपल्या पाठीशी राहावे, असे वाटत असेल तर समाजाकरिता कोणतीही गोष्ट करायची तयारी ठेवा. जो स व मनापासून काम करतो त्याला जगाजवळ साह्य मागण्याचा हक्क आहे; व त्याचे मागणे कृतज्ञ जग नाकारणार नाही. समाजाला त्यांचे महत्त्व पटले नाही तरी बदलत्या काळानुसार ते निश्चितच पटेल. तळमळीने केलेल्या कामाची किंमत क नाही. - स्वामी विवेकानंद
→ कथाकथन
'राजीव गांधी' (जन्म २० ऑगस्ट १९४४ - मृत्यू २९ मे १९९९) तरुण व प्रगत विचारांचे पंतप्रधान राजीव गांधी यांचा जन्म मुंबईतील डॉ. शिरोडकर यांच्या प्रसूतिगृहात झाला. इंदिरा गांधी व फिरोज गांधी यांचे ते पहिले पुत्र. त्यांचा जन्म झाला तेव्हा त्यांचे आजोबा पं जवाहरलाल नेहरू हे १९४२ च्या 'भारत छोडो' या स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्याबद्दल अहमदनगरला कारावासाची शिक्षा भोगत होते. पुढे ब्रिटिश सरकारने भारताला स्वातंत्र्य देण्याच्या वाटाघाटी सुरू केल्यावर त्यांची सुटका झाली. छोटा राजीव आजोबांस गांधीजींना भेटण्यासाठी साबरमती आश्रमात जाई व गांधीजींना आपल्याबरोबर खेळायला लावी. पुढे १४ डिसेंबर १९४६ रोजी राजीवजींना संजय नावाचा एक भाऊ झाला. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर पं. नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान झाले. त्यांची काळजी घ्यायला त्यांची पत्नी कमला जिवंत नसल्याने इंदिराजी व फिरोज हे आपल्या दोन्ही मुलांसह लखनौहून दिल्लीस त्यांच्यापाशी राहायला आले. तेव्हा राजीव यांना पूर्वप्राथमिक शिक्षणासाठी शिवनिकेतनमध्ये घालण्यात आले. त्यानंतर त्यांना डेहराडूनच्या बेलहॅम विद्यालयात घातले गेले. तिथे ते शिकत असतानाच दिल्लीस फिरोज गांधीचे हृदयविकाराने निधन झाले. तेव्हा राजीवजींना दिल्लीस आणण्यात येऊन त्यांच्याच हस्ते वडिलांना मंत्रानी देण्यात आला. डेहराडूनचे शिक्षण पूर्ण झाल्यावर उच्च शिक्षणासाठी राजीव इंग्लंडला गेले. चलनविषयक बंधनामुळे त्यांना पुरेसे पैसे पाठविणे शक्य होत नसे. त्यामुळे ते कधी फॅक्टरीत काम करीत तर कधी आईस्क्रीम विकून त्यातून मिळणाऱ्या पैशातून आपल्या गरजा भागवीत. तिथल्याच वास्तव्यात त्यांची इटालियन असलेल्या सोनियांशी मैत्री जमली व त्याची परिणती त्यांच्या लग्नात झाली. इंग्लंडमधील शिक्षण पूर्ण करून भारतात परतल्यावर वैमानिकाचे | शिक्षण घेऊन ते इंडियन एअर लाइन्समध्ये वैमानिकाची नोकरी करू लागले. दरम्यान जवाहरलालजींच्या मृत्यूनंतर शास्त्री व त्यांच्या मृत्यूनंतर इंदिराजी पंतप्रधान झाल्या. त्या पंतप्रधान असतानाच त्यांचा धाकटा मुलगा संजय यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. तेव्हा राजकारणात आईला साहाय्य करण्यासाठी अमेठीची लोकसभेची निवडणूक जिंकून राजीव खासदार झाले. ३१ ऑक्टो. १९८४ रोजी शीख शरीरक्षकांनी गोळ्या झाडून इंदिराजींची हत्या केली. राजीव हे पंतप्रधान व काँग्रेसचे अध्यक्ष झाले. नंतरच्या लोकसभेच्या निवडणुकीत पक्षाला विजयी करून ते पुन्हा पंतप्रधान झाले. आपल्या कारकीर्दीत त्यांनी गुजरात, पंजाब, आसाममधील राजकीय समस्या चातुर्यपूर्ण, व्यवहारी वृत्तीने हाताळल्या. एकविसाव्या शतकाला समर्थपणे सामोरे जाता यावे, या दृष्टीने त्यांनी पावले उचलली. दररोज स्वतः अठरा वीस तास काम करून त्यांनी शासनयंत्रणा अधिक कार्यक्षम केली. पण पुढल्या लोकसभेच्या निवडणुकीत इंदिरा काँग्रेसचा पराभव झाल्याने ते विरोधी पक्षनेते बनले. १९९१ च्या एप्रिलमध्ये व्हावयाच्या विधानसभांच्या निवडणुकीसाठी | आपल्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करण्याकरिता ते श्रीपेरंबदूर येथील सभेत भाषण करायला जात असता मानवी बाँब असलेल्या एका बाईने बॉंबस्फोट केला व त्यात त्यांचा अंत झाला.
→ सुविचार
• 'मरावे परि कीर्तिरुपी उरावे' • 'थोर कृतीच मनुष्याला थोर बनविते. '
→ दिनविशेष -
• राजा राममोहन रॉय यांनी ब्राम्हो समाजाची स्थापना केली - १८२८ : अनेक देवतावाद, मूर्तिपूजा, पूजाअ हल्ले करून राजा राममोहन रॉय यांनी आत्मीय सभा (१८१५), युनिटरीयन कमिटी (१८२२) व ब्राह्मसभा (१८२८) अशा तीन संस्थ त्यांचे एकत्रित स्वरूप म्हणजे ब्राम्होसमाज होय, मानवता, बंधुता, मूर्तिपूजेवरील अविश्वास, एका देवाची प्रार्थना यावर विश्वास अस धर्माच्या व्यक्तीस ब्राम्हो समाजात प्रवेश दिला जाई. १८३३ मध्ये राजा राममोहन रॉय यांच्या अकाली मृत्यूने ब्राम्होसमाज ए द्वारकानाथ टागोर यांनी आर्थिक मदत करून कसाबसा चालविला. नंतर त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव देवेंद्रनाथ टागोर यांनी १८३८ मध्ये ब्राम करुन त्यास ऊर्जितावस्था आणली. त्यांनी ब्राम्हो समाजाची घटना तयार करून त्यांस संघटित करून दिले. ब्राम्हो समाजाचा प्रचार 'तत्त्वत्प्रबोधिनी सभा' स्थापन करून (१८३९). ग्रामीण भागात धर्मप्रचारक पाठविले. सुशिक्षित लोकात प्रचार व्हावा म्हणून 'त नावाचे मासिक सुरू केले. त्यात एकेश्वरवादाचा पुरस्कार केला. वेद हे ब्राम्हो समाजाचे आधारभूत ग्रंथ मानून वेद 'अपौरुषेय' आहेत तेव्हा त्यातील नव्या तरुण सभासदांनी हे अमान्य करून बुद्धिप्रामाण्यावर भर दिला. स्त्रीशिक्षण, विधवा पुनर्विवाह, बहुपलित कार्यक्रमांचा त्यांनी पुरस्कार केला. सतीच्या प्रथेवर बंदी आणण्यात त्यांचे प्रामुख्याने प्रयत्न होते.
→मूल्ये
• स्वाधीनता, समाज सुधारणा.
→ अन्य घटना
• महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांचा जन्मदिन १२२१.
• • पेशवाईतील शूर पुरुष विठ्ठल शिवदेव यांचे निधन - १७६७ • डासांमुळे हिवताप हा रोनाल्ड रॉस यांचा शोध - १८९७
• मांजी प्रधान मंत्री राजीव गांधी यांचा जन्मदिन (सद्भावनादिन) १९४४
• महाराष्ट्रातील प्रसिद्ध जादूगार 'रघुवीर' यांचे निधन - १९८४ • श्रीमती लता मंगेशकर यांना राजीव गांधी पुरस्कार - १९९७. → उपक्रम (९७) -
• ब्राम्हो समाजाच्या सभासदांची माहिती मिळवा.. -
• समूहगान →
• मेरा रंग दे बसंती चोला, माए रंग दे बसंती चोला...
• सामान्यज्ञान
• सूर्यमालेतील सर्वांत मोठा ग्रह गुरु त्याचा 'युरोपा' हा उपग्रह १६१० मध्ये गॅलिलिओने शोधून काढला. युरोपा हा उपग्रह आकाराने आपल्या चंद्रएवढा असून सूर्यमालेतील सर्वांत प्रकाशमान ग्रह आहे. तेथील तापमान अत्यंत कमी असले तरी तेथे पाणी व सजीव असण्याची शक्यता शास्त्रज्ञांना वाटते. तेथील ज्वालामुखी पूर्वी जिवंत असल्याचे डॉ. स्टीव्हन स्क्वेअर्स यांचे मत आहे..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा