→ प्रार्थना
प्रार्थना देव तुला, मीतु देरे वैर वसना...
→ श्लोक
अविद्यागुणे मानव ऊमजेना. श्रमाने त्यांना न कळलेले फायदे चुकवले.विजयपरीक्षेविण बांधिले दृढ नाणे । परी सत्य मिथ्या असे कोण जाणे ।
अज्ञानामुळे माणसाला काहीही समजेनासे होते. भ्रमामुळे आपले हित साधण्यात काय चुकले हेही समजत नाही. पारखून न घेतलेले नाणे पदरात घट्ट बांधून ठेवले तर खरे की खोटे हे कसे कळणार ?
→ चिंतन
माणसाने जीवनात प्रथम आपले ध्येय निश्चित करावे आणि मग त्याच्या मागे धावावे. कशाचीही फिकीर न बाळगता - लोकनिंदेकडे दुर्लक्ष करून लोक काय म्हणतील याची फिकीर ज्याने केली त्याची निष्ठा ढळली. लोक काहीना काही म्हणतच असतात. 'कुणी निंदा, कुणी बंदा अमुचा जनहिताचा धंदा ।हे ध्यानी ठेवून आपला मार्ग चालला पाहिजे. आपले ध्येय निश्चित केले की मार्गातले अडथळे सुगम होतील.
→ कथाकथन
'सत्याची कास कधी सोडू नये' आपलं काही चुकतं आहे असं वैभवशाली माणसाला कधी वाटत नाही. त्याला सत्य सांगायलाही कुणी धजावत नाही. वैभवशाली माणसाच्या पदरी बहुधा हुजऱ्यांचीच संख्या अधिक असते. कालिदासासारखी एखादीच सत्यप्रिय तडफदार व्यक्ती असते. एकदा भोजराजा आणि कालिदास यांच्यामध्ये एका मुद्द्यावरून झगडा झाला. कालिदास हा राजाच्या पदरी होता. पण तो राजाचा आश्रित नव्हता. तो राजाला म्हणाला, "तू मनापासून असं वर्तन केलेलं नाहीस. त्यांत खोटेपणा आहे." ते ऐकून राजा संतापला, म्हणाला, "मला खोटं म्हणतोस? तुझा खरा चाट माझ्यामुळे आहे. तरीही तू मला खोटं ठरवतोस?" कालिदास म्हणाला, "मी माझ्या नशीबानं खातो. तू कोण मला देणारा?" इतकं बोलून कालिदास धारानगरी सोडून निघून गेला. ते पाहून राजा दुःखी झाला. कारण कालिदास त्याच्यावर मनापासून प्रेम करीत असे. बाकी त्याच्याभोवती खुशामत करणारे लोक होते. कालिदासासारखा सत्याग्रही एकही नव्हता, असा गुणी हिरा अंतरल्यामुळे राजा व्याकूळ होऊन गेला. तिकडे कालिदासाचीही तशीच अवस्था झाली होती. क्षणिक रागानं राजा असं बोलला असेल, त्याच्या अंतःकरणात पाप नसणार असं त्याला वाटू लागलं. दरम्यान राजानं दुःखतिरेकामुळे अन्नत्याग केला. कालिदासाला शोधण्यासाठी दाही दिशांना दूत रवाना केले. कालिदासाच्या भेटीचा एकच ध्यास त्यानं घेतला. परंतु कालिदासाचा ठावठिकाणा काही केल्या त्याला मिळेना. राजाला भेटण्याची कालिदासालाही तळमळ लागून राहिली होती. त्यानं राजाकडे एक श्लोक लिहून पाठवला. श्लोकाचा अर्थ होता, हत्तीच्या गंडस्थळातून पाझरणारा मध शोषून घेण्यासाठी भुंगे त्याच्याजवळ येतात. त्यामुळे हत्तीची शोभा वाढते. पण हत्तीनं आपल्या कानांनी त्या भुंग्यांना हाकललं तर त्या हत्तीची शोभा काय राहिली ? भुंगे काय कमळं असतील तिकडे निघून जातील! भोजराजाला त्या श्लोकाचा अर्थ तेव्हाच समजून चुकला. कालिदासाशिवाय दुसरा कोण हा श्लोक लिहिणार. या विचारानं तो तात्काळ उठला आणि कालिदासाचा ठावठिकाणा शोधून त्याच्या भेटीला गेला... त्यामुळे कुठेही असलं तरी माणसानं सत्याची कास कधी सोडू नये.
• सुविचार
• तुम्ही सत्यापासून ढळला नाहीत, तर भविष्यकाळ तुमचाच आहे.
• दिनविशेष
• विष्णु दिगंबर पलुस्कर स्मृतिदिन - १९३१ : एके काळी हलक्या समजल्या जाणान्या गायन कलेला आपल्या असामान कर्तृत्वाने अखिल भारतात मोठी प्रतिष्ठा व कीर्ती मिळवून दिली. विष्णु दिगंबर पलुस्कर हे सांगली जिल्ह्यातील पलुस गावचे. इंग्रजी सहा इयत्तापर्यंत शिक्षण झाल्यावर एका दिवाळीत दारूकामाच्या अपघाताने त्यांच्या डोळ्यांना अधुपणा आला. यामुळे गायनाच्या क्षेत्रात प्रगती करावयाचे ठरवून है मिरजेला आहे. मिरज दरबारचे गवई बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांची फार चांगली तालीम त्यांना मिळाली. पुढे ते ग्वाल्हेरला गेले व तेथे उत्तम हिंदुस्थानी गायकी त्यांनी आत्मसात केली. ५ मे १९०१ रोजी त्यांनी लाहोरला गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली. गुरुकुल आश्रमपद्धतीप्रमाणे । विद्यालय चाले. मुंबईत त्यांनी १९०८ साली गंधर्व महाविद्यालयाची शाखा उघडली. असे हे थोर देशभक्त आणि बाणेदार गायनाचार्य, पलुस्कर मिरत येथे २१ ऑगस्ट १९३१ रोजी मृत्यू पावले.
→ मूल्ये
• कलाप्रेम, अभ्यासूवृत्ती -
→ अन्य घटना
• चोर समाजसेवक गोपाळ कृष्ण देवधर यांचा जन्मदिन १८७१.
• प्रसिद्ध क्रिकेटपटु विनु मंकड यांचे निधन - १९७८.
• उपक्रम
• शास्त्रीय संगीत वाद्ये व गायक यांच्याबद्दल माहिती मिळवा.
→ समूहगान
• कदम कदम बढ़ाए जा, , खुशी के गीत गाये जा.....
→ सामान्यज्ञान
• पंडित रविशंकर यांना मिळालेल्या पदव्या/पुरस्कार
• संगीत अकादमीचे पारितोषिक (१९६२) पदम्भूषण (१९६७) • राष्ट्रपती पुरस्कार (१९६२ व १९८०)
• इंटर नॅशनल म्युझिक कौन्सिलचा युनेस्को पुरस्कार (१९७५) • कालिदास सन्मान (मध्यप्रदेशतर्फे) (१९८७-८८)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा