●प्रार्थना
ॐ असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय....
• श्लोक
• - अती लीनता सर्वभावे स्वभावे । जना सजनालागि संतोषवावे || देहे कारणी सर्व लावीत जावे । सगुणी अती आदरेसी भजावे ।।
- अत्यंत नम्रतेने वागावे, सज्जन लोकांना संतुष्ट करावे. आपली सर्व शक्ती ( देहाची, मनाची, बुद्धीची) सत्कारणी लावावी आणि सगुण साकार अशा - परमेश्वराची भक्ती करावी.
→ चिंतन
- निरनिराळी कार्ये माणसांमुळे नडून राहतात, द्रव्यामुळे नाही. संकटांनी न डगमगता कार्य सिद्धीस नेणारे पुरुष ज्या कार्यास | मिळतील त्याच कार्याला जिवंत कार्य म्हणता येईल. - लोकमान्य टिळक
- मानव संपत्ती ही कोणत्याही राष्ट्रातील अनमोल संपत्ती आहे. काम करणारे तळमळीचे हात, निष्ठेने भरलेली मने असतील तर कोणतेही अवघड काम | साध्य होईल. काम करणाऱ्याला द्रव्य, दैव सुलभ होते. पण पैशाच्या राशी ओतल्या तरी काम करणारे मनुष्यबळ नसेल तर सर्व व्यर्थ होय..
→ कथाकथन
क्रांतीसिंह नाना पाटील:
-'बेचाळीसचा लढा लढवूनी । अजिंक्य जो ठरला प्रतिसरकारचे नाव गाजवुनी । सिंह प्रगट झाला श्वास असेतो गरिबांसाठी । झुंज देत लढला मशाल घेऊनी करी क्रांतीची । मानवतेसाठी झगडला .
-मानवतेचा दीप प्रज्वलित करणाऱ्या क्रांतिसिंह नाना पाटलांचा जन्म ३ ऑगस्ट १९०० 'बहे' (ता. वाळवी. जि. सांगली) या त्यांच्या आजोळी झाला. 'येडे मच्छिद्र' या गावातील रामचंद्र पाटील व गोजराबाई पाटील यांचे ते चिरंजीव नाना पाटील सातवीपर्यंत शिकले. नाना पाटलांचे बालपण विविध चळवळीचा संत तुकारामांच्या विद्रोही विचारांचाही त्यांच्यावर प्रभाव होता. तशातच शाहू महाराजाचे अधिकारी भास्करराव जाधव यांच्याशी त्यांचा घनिष्ठ संबंध आला व जाधवांमुळे ते महात्मा फुलेंच्या विज्ञानवादी, समतावादी सत्यशोधक चळवळीकडे वळले. पुढे नाना पाटील तलाठी झाले. १९२२ साली नलवडे घराण्यातील आक्काबाई यांच्याबरोबर साध्या पद्धतीने कुठल्याही प्रकारचा हुंडा न घेता विवाह पार पाडला. नोकरी सुरू | असतानाच त्यांनी सत्यशोधकीय विचारांचा प्रसार करणे सुरू ठेवले म्हणून त्यांच्यावर कुभांड रचून त्यांना निलंबित करण्यात आले. या प्रकाराने खचून न | जाता 'नोकरी जाणे' ही संधी आहे असे समजून पूर्ण ताकदीने समाजप्रबोधन करू लागले. फुले सत्यशोधक पद्धतीने लग्न अंधश्रद्धा निर्मूलन, कर्मकांडाना, उपासतापासांना फाटा देण्याचा आग्रह, दारुबंदी, स्त्री शिक्षण, साक्षरता प्रसार, अस्पृश्यता निवारण शिक्षण प्रसार, उत्पादकता, काटकसर इत्यादी विषयांवर विचार मांडून जनजागृती करू लागले. सातारा जिल्ह्यात त्यांनी 'युयुत्सु' तरुणांची संघटना बांधली व लोकयुद्ध सुरू केले. मैलच्या मैल विजेच्या तारा तोडल्या. रेल्वे स्टेशनला आगी लावल्या. सरकारी चावड्या उदध्वस्त केल्या. दारुगुते बेचिराख केले. जुलमी सावकारांना लुटले. या काळात त्यांनी सतत इंग्रजांना चकमा दिला. नानांच्या सर्वांगीण कर्तृत्वाला उधाण आले ते १९४२ च्या 'चलेजाव' लढ्याचे प्रभावी कार्य ओसरल्यावर नाना पाटलांच्या प्रेरणा, प्रभाव आणि मार्गदर्शनातून साताऱ्याचे प्रतिसरकार ३ ऑगस्ट १९४३ पासून सुरू झाले. मे १९४२ पर्यंत त्यांनी ते जिद्दीने चालविते. ४४ | महिन्यांच्या भूमिगत काळात क्रांतिसिंहांना अनेक अग्निदिव्यातून जावे लागले. आंदोलन काळात त्यांनी ग्रामराज्याची संकल्पना राबविली. नाना पाटील २ वर्षे शेतकरी कामगार पक्षात होते नंतर ते कम्युनिष्ट पक्षात दाखल झाले. या पक्षाच्या व्यासपीठावरून कामगार व कष्टकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. त्यांनी रशियाचादेखील दौरा केला. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, चीन विरोधी युद्ध अखिल भारतीय किसान सभा, अखिल भारतीय शेतमजूर सभा भूमिहीन शेतकरी चळवळ, कामगार चळवळ महार वतन मुक्तीची चळवळ, धरणग्रस्त चळवळ अशा कष्टकत्यांचा सर्व आवाड्यांवर नाना अखंड लढत राहिले ते दोन वेळा लोकसभेवर निवडून आले. जनसेवा व देशसेवा हेच त्यांनी आपले जीवित कार्य मानले. शेतकरी व कामकरी यांच्याशी पटत | असतानाच ३ डिसेंबर १९७६ ला त्यांचे देहावसान झाले. आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना त्रिवार अभिवादन,
→ सुविचार
• जग हे खूप मोठे आहे. जगापेक्षा जीवन मोठे आहे आणि जीवनापेक्षा आयुष्य मोठे आहे,
• आपण स्वतःसाठी काय केले, यापेक्षा दुसऱ्यासाठी काय केले, यावर आपल्या जीवनाचे मोल ठरते.'
→ दिनविशेष
राष्ट्रकवी मैथिली शरण गुम जन्मदिन १८८६ :
प्रख्यात हिंदी महाकवी मैथिली शरण गुप्त यांचा जन्म उत्तर प्रदेशातील चिरमाव - येथे ३ ऑगस्ट १८८६ रोजी झाला. त्यांचे वडील धार्मिक वृत्तीचे होते. हिंदू धर्म, संस्कृती आणि भक्ती यांचे संस्कार त्यांच्यावर झाले होते. त्याचबरोबर सभोवतालच्या सामाजिक, राजकीय घडामोडी आणि वैचारिक आंदोलनाचा प्रभाव त्यांच्यावर पडला होता, राष्ट्रीय भावनेने ओथंबलेली विपुल कविता त्यांनी लिहिली. त्यांना राष्ट्रकवी म्हणून मान्यता मिळाली ती त्यांच्या 'भारत भारती' या प्रसिद्ध काव्यसंग्रहामुळे. १९४१ साली त्यांनी राष्ट्रीय आंदोलनात | भाग घेतल्यामुळे त्यांना कारावास पत्कारावा लागला. ४० स्वतंत्र ग्रंथ, ६ अनुवादित ग्रंथ, २ महाकाव्ये, २० खंडकाव्ये, स्फुट कविता संग्रह, नाटके इत्यादिचा त्यांच्या लेखनात अंतर्भाव होत. १९३२ मध्ये 'साकेत' हे प्रसिद्ध काव्य त्यांनी लिहिले. 'साकेत' हे हिंदीतील रामभक्तीवरील काव्य लोकप्रिय | झाले काव्यगुणदृष्ट्या हे श्रेष्ठ महाकाव्य मानले जाते. 'पंचवटी' हे शूर्पणखा प्रसंगावरील सुंदर खंड काव्य झाले. 'जय भारत' हे काव्य महाभारतातील अनेक आख्यावर आधारित आहे. 'साकेत' काव्याबद्दल हिंदुस्थानी अॅकॅडमीने १९३५ मध्ये त्यांना पारितोषिक दिले. हिंदी साहित्यात त्यांचे विशेष स्थान मानले गेले आहे. चिरगाव येथे १९ डिसेंबर १९६४ रोजी त्यांचे निधन झाले.
→ मूल्ये
• राष्ट्रप्रेम, साहित्यप्रेम, संस्कृतिप्रेम
→ अन्य घटना
• सदाशिवराव भाऊ पेशवे यांचा जन्मदिन १७३०
• सुतकताई यंत्राचा शोध लावणारा थोर शास्त्रज्ञ आर्कराईट याचा मृत्यू १७८२
• क्रांतिसिंह नाना पाटील जन्म १९००
• शेतकरी कामगार पक्षाची स्थापना १९४७.
• हिंदुस्थान टाइम्सचे संपादक व महात्मा गांधी सुपुत्र देवदास गांधी यांचे निधन १९५७
•भारताचा टेनिसपटू लिअँडर पेस याने अटलांटा शतकमहोत्सवी ऑलिंपिक सामन्यात ब्रन्ि पदक मिळविले १९९६
उपक्रम
हिरवळीतील मुलांना आवडणाऱ्या प्रसंगांचे त्यांनी कथन करावे.
→ समूहगान
• बलसागर भारत होवा, विश्वात शोभुनी राहो....
→ सामान्यज्ञान
• राम जोशी (१७६२-१८१२) प्रसिद्ध मराठी शाहीर. ते संस्कृतचे गाढे अभ्यासक होते. कीर्तनेही करीत.. त्यांच्या काही लावण्या संस्कृतमधूनही आहेत. एक लावणी संस्कृत, मराठी, कानडी व हिंदी अशा चार भाषांतून आहे. मोरोपंतांच्या आर्या त्यांनी कीर्तनातून लोकप्रिय केल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा