Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शुक्रवार, ४ ऑगस्ट, २०२३

5 ऑगस्ट-दैनंदिन शालेय परिपाठ



प्रार्थना

 गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु, गुरूदेवो महेश्वरः...

  → श्लोक

   क्रियेवीण नानापरी बोलिजेते । परी चित्त दुश्चीत ते लाजविते । मना कल्पना धीट सैराट धावे । तया मानवा देव कैसे नि पावे || 

हे मना, चांगले कर्म आणि चांगले आचरण नसताना त्यांच्याविषयी फक्त तोंडाने भडभडा जो बोलतो, (उपदेश करतो), त्याचे मन कुविचारांनी भरलेले असते आणि भाषण व आचरण यातील विसंगती पाहून त्याची त्यालाच लाज वाटते. मन कल्पनांच्याच मागे मोकाट धावत असेल तर त्या माणसाला देव कसा पावणार ? 

चिंतन

- लहान मुलातील विकासाचा सर्वात महत्त्वाचा एक क्षण म्हणजे एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून मुलाला स्वतःची जाणीव होऊ लागते तो क्षण. त्या क्षणापासून ते बदलत्या परिस्थितीनुसार बदलत नाही आणि त्याच्या स्वतःच्या विशिष्ट इच्छा प्रौढांच्या इच्छांशी जुळतीलच असे नाही, लहान | मुलातील विकासाचा हा टप्पा कोमेजू देता कामा नये. लहान वयातील स्वतंत्र विकासाचा टप्पा जितका योग्य विकसित होईल, तितके मोठेपणी मुलांचे व्यक्तिमत्त्व सुदृढ, निकोप बनेल. 

कथाकथन 

'दहा चांगली माणसं समाज वाचवू शकतात' 

- एक दिवस काही देवदूत आब्राहमच्या काफिल्यावरून पुढे चालले होते. वाटेत त्यांना आब्राहमला भेटून त्याच्याकडील पाहुणचार घेण्याची इच्छा झाली. अतिथींच्या वेषात ते आब्राहमच्या तंबूजवळ आले. आब्राहम व सारा यांनी | त्यांचा पाहुणचार केला. बोलता बोलता देवदूत म्हणाले, "आब्राहम, तू ईश्वरभक्त असून मनुष्यधर्माचे पालन करणारा आहेस. तुझ्या काफिल्यातील लोकही तुझ्यासारखेच आचरण करताना दिसतात. तुझ्या काफिल्यातील लोकांची भरभराट होईल." आब्राहम व साराने त्यांचे आभार मानले. पाहुणचार घेतल्यानंतर उठता उठता देवदूत म्हणाले, "आम्ही आता पुढच्या शहरी चाललो आहोत त्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अनाचार माजला आहे. लोक माणुसकी विसरले आहेत. माणूस स्वस्त झालेला आहे. परमेश्वराला विसरले आहेत. तेव्हा त्यांचा लवकरच नाश होणार आहे." देवदूतांच्या बोलण्याचे आब्राहमला खूपच वाईट वाटले. न राहवून त्याने देवदूतांना नम्रपणे विचारले, "देवदूतांनो, कोणत्याही समाजात सर्वच लोक वाईट नसतात. काही मनुष्यधर्माचे पालन करणारीही माणसे आहेत. वाईट लोकांबरोबर परमेश्वराकडून चांगल्या लोकांचाही नाश होणार का?" देवदूत गालातल्या गालात हसले आणि म्हणाले, "आब्राहम, परमेश्वर चांगल्या माणसांची नेहमीच काळजी घेत असतो.. | दुष्टांचा संहार करताना चांगल्या व निरपराध दहा माणसांना त्याचे दु:ख पोहोचणार असेल, तर त्या दहा चांगल्या माणसांसाठी परमेश्वर त्या संपूर्ण समाजाला वाचवतो. म्हणजेच समाजातील चांगल्या वर्तनाची दहा माणसे आपला समाज नाशापासून वाचवू शकतात." देवदूतांचे बोलणे ऐकून आब्राहमचे समाधान झाले. त्याने परमेश्वराचे आभार मानले. 

सुविचार

• माणसा-माणसांत भेद हा निसर्गाने या देवाने केलेला नसून तो माणसानेच केलेला आहे. माणसाने याचे आत्मचिंतन करून सकारात्मक परिवर्तन करावे - म. फुले. 

•  दुःखी-कष्टी लोकांचा क्लेश परिहार करणे, हाच खरा धर्म - भगवान बुद्ध 

•   मानवात दडलेल्या बुद्धिमत्तेला आविष्काराची संधी दिल्यास मानवाची प्रगती होईल.

 → दिनविशेष 

 - • महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार जन्मदिन - १८९० : 

महाडजवळ बोरवाडी येथे त्यांचा जन्म झाला. ते पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयातून मॅट्रिक झाले. फर्ग्युसन महाविद्यालयातून बी.ए. झाल्यावर कायद्याच्या अभ्यासासाठी ते मुंबईस गेले. पुण्यास आल्यावर शिक्षण | प्रसारक मंडळीचे ते आजीवन सदस्य झाले. याच काळात भारत इतिहास संशोधक मंडळाचे ते सहचिटणीस झाले. पुढे हेच कार्य त्यांनी पंचवीस वर्षे केले. मराठी साहित्य परिषद, शिक्षण प्रसारक मंडळी इत्यादी विविध प्रकारच्या सामाजिक संस्थांवर त्यांनी काम केले. इतिहासाचार्य राजवाडे यांच्या | प्रेरणेने ते इतिहास संशोधनाकडे वळले. मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास, संशोधन आणि व्यासंग याला त्यांनी वाहून घेतले होते. म.म. पोतदार म्हणजे महाराष्ट्राचा चालता बोलता इतिहासच. इंग्रजी, मराठी, हिंदी, संस्कृत, उर्दू या भाषांवर त्यांचे असामान्य प्रभुत्व होते. 'मराठी' 'गद्याचा इंग्रजी अवतार' 'विविध दर्शन' 'मी युरोपात काय पाहिले?' अशी त्यांची मोजकी पुस्तके असली तरी वेगवेगळ्या नियतकालिकांतून जवळ जवळ ३७० संशोधन विषयक लेख त्यांनी लिहिले आहेत. केंद्र शासनाने त्यांना महामहोपाध्याय या पदवीने गौरविले. हिंदी साहित्य संमेलनाने त्यांना 'साहित्य वाचस्पती' ही पदवी दिली. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरच्या अक्षरश: शेकडो घराण्यांची आणि घटनांची त्यांना स्मृती होती. 

मूल्ये -

 • राष्ट्रप्रेम, कर्तव्यदक्षता, अभ्यासूवृत्ती. 

अन्य घटना 

• चंद्रावर पाय ठेवणारा पहिला मानव नील आर्मस्ट्रांग याचा जन्म - १९३०

 • मिझोराम या ब्रह्मदेशाच्या सरदहद्दीवरील केंद्रशासित प्रदेशाला राज्याचा दर्जा प्राप्त झाला - १९८७ 

• एका दिवसात ५००८ बाटल्या रक्त शिबिरामध्ये जमा करण्याचा जागतिक विक्रम पुणे येथे केला गेला - १९८

 → उपक्रम 

 - • पुणे येथील भारत इतिहास संशोधक मंडळाबद्दल माहिती मिळवा. • पुणे येथील राजा केळकर संग्रहालयाबद्दल माहिती मिळवा. • शिवाजीचा लाल महाल पहा व अभ्यासा.

 → समूहगान 

• हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे.....

सामान्यज्ञान 

- • १९६१ मध्ये केंद्र सरकारने डॉ. कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या तज्ज्ञ समितीने पत्रद्वारा शिक्षण प्रौढांना देण्याची शिफारस केली. लोकसभेने १९६१ साली विद्यापीठ कायदा सुरुवात केल्यानंतर पत्रद्वारा शिक्षणास प्रारंभ झाला. अशा शिक्षणास प्रथम दिल्ली विद्यापीठाने सुरुवात केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा