→ प्रार्थना
अजाण आम्ही तुझी लेकरे, तू सर्वांचा पिता....
→ श्लोक
-पठतो नास्ति मूर्खत्वं जपतो नास्ति पातकम् । मौनिनः कलहो नास्ति न भयं चास्ति जाग्रतः
-अभ्यास केल्याने मूर्खपण जाते. जप केल्याने पाप नाहीसे होते. मौन धरल्याने भांडण संपते. जागृत राहिल्याने भय दूर होते.
→ चिंतन
- वयाने वाढत जाणान्या प्रत्येक माणसाला सर्व जण मान देतात असे नाही. परंतु त्या माणसाने जर या जगात काही चांगले करून दाखविले ● असेल, इतरांसाठी तो झटला असेल, तर अशा कर्तृत्ववान माणसाला मात्र लोक त्याच्या वयाचा विचार न करता आपोआपच मोठेपणा देत असतात. माणसाचा मोठेपणा त्याच्या वयावर नव्हे, कर्तृत्वावर अवलंबून असतो. सिंहाचा बछडा काही गवत खात नाही. तो शिकारच करणार!
→ कथाकथन
-भगवान बुद्धांचा अष्टांगिक मार्ग
- तथागत भगवान बुद्धाने मानवाच्या कल्याणासाठी अष्टांगिक मार्ग सांगितला आहे. सम्यक - दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती, सम्यक समाधी या अष्टांगिक मार्गाला तथागत भगवान बुद्धाने जीवनाचा मध्यम मार्ग असे नमूद केले आहे. सम्पक दृष्टी : दुःख ज्ञान, दुःख समुदाय ज्ञान, दुःख निरोधाचे ज्ञान आणि दुःख निरोधामी मार्गांचे ज्ञान म्हणजे सम्यक दृष्टी होय. जग दुःखमय आहे आणि अनित्य आहे. या ज्ञानालाच आपण सम्यक दृष्टी म्हणतो, तथागताने सांगितलेल्या हा मध्यम मार्ग आहे. सम्यक संकल्प : प्राणीमात्रांवर इतके प्रेम करा की त्याची हत्या करण्याची इच्छाच होणार नाही. ज्यामुळे अहिंसा संकल्प सिद्ध होईल. या वृत्तीला इच्छा शक्तीचा सम्यक संकल्प असे म्हणतात. सम्यक वाचा : सर्व प्राणी मात्रात फक्त मानवाला 'वाचा' दिली आहे. या देणगीचा विचारपूर्वक वापर करावा. अर्थात खोटे न बोलणे, चुगली न करणे, कठोर शब्दप्रयोग न करणे, अनावश्यक बडबड न करणे, परनिंदेपासून आपल्या जिभेला लगाम घालणे हे सम्यक वाचेचे कर्तव्य आहे. सम्यक कर्म : आपले वर्तन हे इतरांसाठी सुखद असावे, असे सम्यक कर्म सांगतो. आपणाला नेमून दिलेले काम अथवा कर्तव्य हे आपण जीवन मूल्याचा विचार करून अहितकारक पापवृत्ती दुर्गुण बाजूला सारून करणे हे सम्यक कर्माचे ध्येय होय. सम्यक आजीविका मानवाला आपला दैनिक चरितार्थ चालविण्यासाठी अर्थार्जन करावे लागते. हे अर्थार्जन पण तथागताला नेक मार्गाने मिळविलेला पैसा हाच आजीविकेचा सुयोग्य मार्ग वाटतो. वाम मार्गाने इतरांची हानी करून अथवा त्याच्यावर अन्याय करून मिळावलेली धन संपत्ती सिद्धार्थाने अयोग्य ठरविलेली आहे. अर्थात सत्याच्या मार्गाने उपजीविकेची साधने निर्माण करणे व स्वतःचा विकास करणे यालाच "सम्यक आजीविका' म्हणतात. सम्यक व्यायाम : जग हे अविद्येने, दुःख यातनेने भरलेले आहे. या अविद्येचा दुःखाचा नाश करून मानवाला सुखद जीवनाचा मार्ग मोकळा करणे हे सम्यक व्यायामाचे उद्दिष्ट आहे. नियमितपणे सतत कृत्य करून जीवनाचा विकास करणे हे सम्यक व्यायामाचे ध्येय आहे. सम्यक स्मृती : जीवन जगत असताना आपल्या अवती भवती, अनेक दुष्ट प्रवत्तीपासून अलिप्त राहून जीवनाचा विकास साधायला पाहिजे या विकासासाठी वैचारिक निश्चय आणि जागरूकपणा आवश्यक असतो. सम्यक समाधी : मन, चित्त म्हणजे चित्ताची एकाग्रता शांत व प्रसन्न मनोवृत्ती टिकावी म्हणून दुष्ट मनोवृत्ती दूर सारून कामवासनेचा विरोध करावा. तर्क विर्तकाचा योग्य ताळमेळ बसवून विवेकपूर्व वृत्तीने सुखपूर्ण संपादन करण्याच्या प्रवृत्तीला सम्यक समाधी असे म्हणतात.
→ सुविचार
• वयाच्या लहान मोठेपणावर कर्तृत्व अवलंबून नसते, ते मूलतः अंगी असावे लागते.
• यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य ही माणसाची गुणवैशिष्ट्ये आहेत.
→ दिनविशेष
• सर सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचा स्मृतिदिन - १९२५ :
• सुरेंद्रबाबूंचा जन्म कोलकाता येथे एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील - बाबू दुर्गाचरण बॅनर्जी हे प्रसिद्ध डॉक्टर असून मोठे सुधारक होते. सुरेंद्रबाबूंचे प्राथमिक शिक्षण बंगाली पाठशाळेत झाले. बी.ए. ची पदवी घेईपर्यंत त्यांनी अनेक बक्षिसे पटकावली. अत्यंत बुद्धिमान म्हणून त्यांचा लौकिक होता. ते विसाव्या वर्षी आय.सी.एस. (इंडियन सिव्हील सर्व्हिस) झाले. पुढे हरिश्चंद्र विद्यासागर यांनी आपल्या कॉलेजमध्ये इंग्रजीचे प्रोफेसर नेमले. उत्कृष्ट प्रोफेसर व उत्तम व्याख्याते असल्यामुळे त्यांना लोकप्रियता मिळू लागली. पुढे त्यांनी 'बंगाली' नावाचे वृत्तपत्र काढले, सर सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे बंगालमधील जहाल राष्ट्रीय पुढारी होते. 'दहा हजारात एखादा वक्ता असतो' या उक्तीप्रमाणे सुरेंद्रनाथांचे वक्तृत्व श्रेष्ठ दर्जाचे होते. काँग्रेसच्या संस्थापकांपैकी हे एक होते. स्वदेशीची चळवळ आणि बंगालची फाळणी या | संबंधी त्यांनी केलेली लोकजागृती अपूर्व होती. वृत्तपत्र स्वातंत्र्यासाठी त्यांनी कारावासही भोगला होता..
→ मूल्ये
• राष्ट्रप्रेम, विद्वत्ता
→ अन्य घटना
- • पेनिसिलिन या औषधाचा शोध लावणारा ब्रिटिश संशोधक सर अॅलेक्झांडर फ्लेमिंगो याचा जन्म १८८१ • 'एंडरले' ही - | पहिला गी ब्रिटिश खाडी पोहून गेली १९२६ • अमेरिकेने जपानमधील हिरोशिमा या शहरावर अणुबाँब टाकला - १९४५
→ उपक्रम
-भारताचा नकाशा काढून त्यात राज्ये दाखवा. प्रत्येक राज्यातील थोर व्यक्तींची नावे लिहा.
→ समूहगान
इन्साफ की डगरपे, बच्चो दिखाओ चलके...
→ सामान्यज्ञान
• बालिका दिन - ३ जानेवारी
• अणुबॉम्ब निषेध दिन- ६ ऑगस्ट
• प्रजासत्ताक दिन -२६ जानेवारी
• हिंदी दिन - १४ सप्टेंबर
• हुतात्मा दिन -३० जानेवारी
• बालक दिन - १४ नोव्हेंबर
• जागतिक वन दिन - २१ मार्च
• मानवी हक्क दिन - १० डिसेंबर,
• महाराष्ट्र दिन - १ मे..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा