Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

रविवार, ६ ऑगस्ट, २०२३

7 ऑगस्ट-दैनंदिन शालेय परिपाठ

         7 ऑगस्ट-दैनंदिन शालेय परिपाठ


प्रार्थना

 देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो..... 

 → श्लोक 

 - जनी वादविवाद सोडूनि द्यावा । जनी सुखसंवाद सूखे करावा । जगी तोचि तो शोक संतापहारी । तुंटे वाद संवाद तो हितकारी ।। 

 - हे मना, लोकांशी वादविवाद करणे सोडून द्यावे. त्यांच्याशी सुख-संवाद, विचार विनिमय करावा. असा सुख-संवाद दुःखाचे व संतापाचे हरण करतो. ज्याच्यामुळे वाद (भांडण) संपतो असाच संवाद (विचार विनिमय) हितकारक असतो. 


चिंतन

- शिक्षण म्हणजे जन्मात कधी पचनी न पडणारे, डोक्यात सदैव धुडगूस घालणारे आणि आपल्या मेंदूत ठासून कोंबलेले माहितीचे भेंडोळे नव्हे. आपल्याला आवश्यकता आहे 'माणूस' घडविणाऱ्या, शील बनविणाऱ्या शिक्षणाची, शिक्षणाचा अर्थ नुसता माहितीचा संग्रह असाच जर असता तर मग ग्रंथ संग्रहालये हे जगातील मोठे साधू व ज्ञानकोश हे सर्वांत मोठे ऋषी ठरले असते. - स्वामी विवेकानंद


 → कथाकथन -

 'रवींद्रनाथ टागोर

 - (जन्म ६ मे १८६१ - मृत्यू ७ ऑगस्ट १९४९) जन-गण-मन या आपल्या राष्ट्रगीताचे जनक कवी रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म कोलकाता येथे ६ मे १८६१ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव देवेंद्रनाथ देवेंद्रनाथ हे मोठे विद्वान, ऋषितुल्य | पुरुष होते. रविबाबूंचे प्राथमिक शिक्षण घरीच झाले. या काळात ते बंगाली, संस्कृत, इंग्रजी या भाषा व इतिहासादि इतर विषय घरीच शिकले. लहानपणी | रविबाबूंना शाळेत जाण्याचा खूप कंटाळा वाटत असे. रानावनात फिरावे, निसर्ग पाहावा, गाणी म्हणावी, चित्रे काढावी. कविता कराव्यात यातच त्यांचा वेळ जात असे. वयाच्या तेराव्या वर्षीच रवींद्रांचे लग्न झाले. त्यांच्या पत्नीचे नाव मृणालिनी. काही वर्षानंतर रवींद्रनाथ वकिलीचा अभ्यास करण्यासाठी इंग्लंडला गेले. पण, तेथेही त्यांचे अभ्यासात लक्ष लागेना म्हणून ते परत आल्यावर त्यांनी खूप कविता लिहिल्या. कथा, कादंबऱ्या लिहिल्या. लोकांना रवींद्रांच्या कविता खूप आवडत असत. त्यांनी बंगाली भाषेत 'गीतांजली' नावाचा काव्यसंग्रह प्रसिद्ध केला. त्यात सुमारे १०३ कविता आहेत. पुढे या काव्यसंग्रहाचे इंग्रजीत भाषांतर प्रसिध्द झाले. त्या कविता जगातील विद्वान लोकांना अतिशय आवडल्या. याच काव्यसंग्रहाला १९३१ मध्ये | नोबेल पारितोषिक मिळाले. या पारितोषिकामुळे रवींद्रनाथांची व भारताची जगभर कीर्ती झाली. इ.स. १९०१ मध्ये रवींद्रनाथांनी कोलकात्याजवळ एक शाळा काढली. या शाळेचे स्वरूप प्राचीनकाळाच्या आश्रमासारखे होते. सगळे शिक्षण निसर्गाच्या सान्निध्यात, चार भिंतीच्या बाहेर दिले जात असे. रवींद्रांच्या या शाळेलाच 'शांतिनिकेतन' असे म्हणतात. या आश्रमाची वाढ झाली व त्यातूनच विश्वभारती विद्यापीठाची स्थापना झाली. नोबेल पारितोषिकाचे सगळे पैसे (एक लाख वीस हजार रुपये) रवींद्रनाथांनी विश्वभारतीला दिले. रवींद्रनाथांचे हे शैक्षणिक कार्य पाहून इंग्रज सरकारने त्यांना १९९५ मध्ये 'सर' ही पदवी दिली. परंतु १९१९ मध्ये इंग्रजांनी जालियनवाला येथे जे हत्याकांड केले त्याचा निषेध म्हणून रवींद्रनाथांनी 'सर' या पदवीचा त्याग केला. रवींद्रनाथ उत्तम पत्रकार होते. नाटककार होते. संगीतकार होते. नाटकात ते कामही करीत. ७ ऑगस्ट १९४१ रोजी वयाच्या ८१ व्या वर्षी रवींद्रनाथ स्वर्गवासी झाले. मात्र 'गीतांजली' मुळे अमर झाले आहेत.


 → सुविचार

• आपल्याला आज अशा शिक्षणाची गरज आहे की ज्याने शील बनते, मानसिक शक्ती वाढते, बुद्धी चौफर व विशाल होते - आणि ज्यायोगे मनुष्य आपल्याच पायावर उभा राहू शकतो. 


• विद्यादान हे अन्नदानापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे. ते प्राणापेक्षाही श्रेष्ठच, | ज्ञानच माणसाचे खरेखुरे जीवन आहे. - विवेकानंद. 

• शिष्याच्या ठिकाणी आवश्यक असलेले गुण म्हणजे पवित्रता, ज्ञानाची खरी तहान आणि चिकाटी हे होत - विवेकानंद 

• ज्या चारित्र्यामध्ये ज्ञान, भक्ती आणि योग या तिहींचा मधुर मिलाफ होऊन सुसंवाद निर्माण झाला आहे तेच चारित्र्य सर्वात उदात्त होय. 


दिनविशेष

 - • राष्ट्रकवी रवींद्रनाथ टागोर स्मृतिदिन - १९४१ :

- आपली शाळा सुरू होण्यापूर्वी आपण जे राष्ट्रगीत म्हणतो त्याचे कवी रवींद्रनाथ | टागोर होत. भारतात गेल्या शतकात ज्या थोर विभूती निर्माण झाल्या, त्यात जागतिक कीर्तीचे महाकवी, थोर तत्त्वज्ञ, साहित्यिक, नवीन शिक्षणपद्धतीचा पुरस्कार करणारे म्हणून रवींद्रनाथांचा लौकिक आहे. त्यांच्या 'गीतांजली' ला मिळालेल्या नोबेल पारितोषिकामुळे त्यांना जागतिक कीर्ती मिळाली.. त्यांच्या 'जन-गण-मन' या काव्याला राष्ट्रगीताचा दर्जा मिळाल्यामुळे 'राष्ट्रकवी' म्हणून रवींद्रांना अखिल भारतीय कीर्ती मिळाली. बंगाली वाङ्मयाच्या | क्षेत्रात त्यांनी चौफेर प्रगती केली. बंगाली आणि संस्कृत भाषेचा अभ्यास त्यांनी घरीच केला. पुढील शिक्षणासाठी लंडन येथील ब्रायटन विद्यालयात त्यांनी | आपले नाव दाखल केले. परंतु त्यांनी आपले सर्व अध्ययन स्वतःच केले. सन १८८१ मध्ये त्यांनी 'वाल्मिकी प्रतिभा' हे पहिले संगीत नाटक लिहिले. | त्यांची पहिली कादंबरी 'भारती' मासिकात क्रमशः प्रसिद्ध झाली. पुढे त्यांनी 'साधना', 'भारती' व 'बंगदर्शन' या मासिकांचे संपादन केले. १९०१ ते | १९०४ या काळात राष्ट्रीय चळवळीत त्यांनी भाग घेतला. 'शांतिनिकेतन' व 'विश्वभारती' या त्यांनी स्थापन केलेल्या संस्थांमुळे शिक्षण क्षेत्रात एका | नवीन युगाला प्रारंभ झाला. त्यांचे समग्र वाङ्मय ४० खंडात प्रसिद्ध झाले आहे. रवींद्रनाथ टागोर मानवतेचे पुरस्कर्ते होते. 

मूल्ये

• 'सर्वधर्म समभाव, राष्ट्रप्रेम, कलाप्रेम, जिज्ञासा.


 → अन्य घटना

  • कृष्णदेवराय राज्याभिषेक - १५०९.

 

  • पहिल्या महायुद्धात हेरगिरी करणारी जर्मनीची प्रसिद्ध महिला हेर 'माताहरी' हिचा जन्म १८७६ 


  • गवालिया टँक (मुंबई) मैदानावरील ऐतिहासिक सभा.

  

   • केशवराव कृष्णराव दाते विख्यात -- भारतीय हृदयरोग तज्ज्ञ यांचा जबलपूर येथे जन्म - १९१२

  

 • मुंबई महापालिकेने 'बेस्ट' ही बससेवा सुरू केली - १९४७ 

 

• महाराष्ट्रातील कृषि पांडुरंग चिमणाजी पाटील यांचे करा

  

- → उपक्रम

• विविध देशांच्या राष्ट्रगीतांचे संकलन  करा

 

 • शांतिनिकेतनविषयी माहिती मिळवा. 


 • रवींद्रनाथांची बालकथा मिळवून सांगा. 


समूहगान 

• धरतीची आम्ही लेकरं, भाग्यवान धरतीची आम्ही लेकरं...

सामान्यज्ञान

सूर्याचे घनफळ पृथ्वीच्या घनफळापेक्षा १६२ हजार पटीने मोठे आहे. • 

भारतातील गोड्या पाण्याची सरोवरे - 

(१) भीमताल (नैनितालजवळ), 

(२) गुरुडोंगमारचो (सिक्कीम) 

(३) वूलर, दाल, आंचर (कश्मीर),

(४) गोहना (अलकनंदा नदीच्या पात्रात).

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा