Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, २१ ऑगस्ट, २०२३

विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग -२ दहावी 8 पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान

 दहावी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग -२ 

8 पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान


■पुढील रिकाम्या जागा भरून विधाने पुन्हा लिहा-

(1) कृत्रिम रोपण व गर्भरोपण या दोन पद्धतींचा वापर प्रामुख्याने ......... केला जातो.

उत्तर-पशुसंवर्धनसाठी

--------------------

(2) ........................... ही जैवतंत्रज्ञानातील क्लोनिंगनंतरची क्रांतिकारी घटना होय. 

उत्तर-मूलपेशी संशोधन

--------------------------

(3) इन्सुलिन तयार होण्याच्या क्षमतेशी संबंधित विकार म्हणजे ....... होय.

उत्तर-मधुमेह

------------------------------

 (4) ........... या व्यवसायाला भारत सरकारने NKM 16 या कार्यक्रमाद्वारे उत्पादनवाढीकरिता प्रोत्साहन दिले आहे.

उत्तर-मत्स्यशेती

---------------------------------------------

■मूलपेशी किंवा मूलपेशी म्हणजे काय ?

(सराव कृतिपत्रिका - 2 ) उत्तर : मूलपेशी या अविभेदित, प्राथमिक स्वरूपाच्या, स्वतःची पुनरावृत्ती करण्याची क्षमता आणि बहुविधता असलेल्या पालकपेशी असतात. या बहुपेशीय सजीवांत आढळतात.

-----------------------------

■(2) जैवतंत्रज्ञान.

उत्तर : मानवी फायदयाच्या दृष्टीने सजीवांमध्ये कृत्रिमरीत्या जनुकीय बदल व संकर घडवून सुधारणा करण्याला जैवतंत्रज्ञान असे म्हणतात. या तंत्रज्ञानाने नवीन गुणधर्म असणाऱ्या सजीवांची उत्पत्तीकरण येते.

-----------------------------

■(3) जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके.

उत्तर : पिकांच्या प्रजातींत नसलेल्या अशा बाहेरच्या जनुकाला एखादया पिकाच्या जनुकीय साच्यात टाकून मिळवण्यात आलेल्या इच्छित गुणधर्मांच्या पिकांना जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके असे म्हणतात.

-----------------------------

■(4) गोल्डन राईस.

उत्तर : जैवतंत्रज्ञानाने 2005 साली तयार करण्यात आलेली जीवनसत्त्व 'अ'ने समृद्ध असलेली तांदळाची जात, जिच्यात साध्या तांदळापेक्षा 23 पट अधिक बीटा कॅरोटिन सापडते, अशी तांदळाची जात म्हणजे गोल्डन राईस होय.

-----------------------------

■(5) लस.

उत्तर : विशिष्ट रोगजंतू अथवा रोगाविरुद्ध कायमस्वरूपी अथवा काही कालावधीपुरती प्रतिकारक्षमता मिळवण्यासाठी दिलेला 'प्रतिजन 'युक्त पदार्थ म्हणजे लस होय.

-----------------------------

■(6) क्लोनिंग.

उत्तर : एखादी पेशी किंवा अवयव किंवा संपूर्ण शरीराची हुबेहूब प्रतिकृती तयार करणे म्हणजे क्लोनिंग होय.

-----------------------------

■(7) DNA फिंगरप्रिंट.

उत्तर : कोणत्याही व्यक्तीच्या उपलब्ध DNA वरून त्या व्यक्तीची ओळख पटवणे शक्य होते. या पद्धतीला DNA फिंगरप्रिंट असे म्हणतात.

-----------------------------

■(8) हरितक्रांती.

उत्तर : कमी शेतजमिनीत जास्तीत जास्त धान्योत्पादन करण्याच्या पद्धतींना एकत्रितपणे हरितक्रांती म्हणतात

-----------------------------

9) मानवी आरोग्य व्यवस्थापनाच्या दोन प्रमुख बाबी कोणत्या? उत्तर : मानवी आरोग्य व्यवस्थापनाच्या दोन प्रमुख बाबी रोगनिदान आणि रोगोपचार या आहेत.


10)अलीकडे बनवलेल्या लसी सुरक्षित असतात. 

उत्तर : पूर्वीच्या काळी रोगजंतू पूर्ण मारून किंवा त्यांना अर्धमेले करून त्यांचाच लस म्हणून वापर केला जायचा. अशा लसी कधी कधी रोगाचा प्रादुर्भाव करीत असत. परंतु आता जैवतंत्रज्ञानाचा वापर करून कृत्रिमरीत्या लस तयार होते. अशा प्रकारच्या लसीत रोगजंतूंचे जे प्रथिन प्रतिजन म्हणून काम करते, त्याचे जनुक मिळवून त्याच्या मदतीने प्रयोगशाळेतच ते प्रतिजन तयार केले जाते. ह्याचा वापर लस म्हणून करण्यात येतो. तसेच जैवतंत्रज्ञानाच्या आधारे तयार करण्यात आलेल्या लसी अधिक तापस्थिर असतात व त्यांची क्षमता जास्त काळ टिकून राहते. यामुळे अशा लसी अत्यंत सुरक्षित असतात.

-----------------------------

■सूक्ष्मजीवशास्त्र : सूक्ष्मजीवांच्या क्षमता वापरून उत्पादने निर्माण करणे. उदा., दुधापासून दही, मळीपासून मद्यनिर्मिती करणे इत्यादी.

-----------------------------

■(2) जैवरसायनशास्त्र : पेशींच्या प्रतिजैविके, लसी यांची निर्मिती इत्यादी.उत्पादनाच्या साहाय्याने

-----------------------------

■(3) रेण्वीय जीवशास्त्र : मानवी फायदयासाठी डी.एन.ए., प्रथिने यांसारख्या जैवरेणूंचा उपयोग करणे.

-----------------------------

■(4) जनुकीय अभियांत्रिकी : जनुकीय बदल (Genetic

Manipulation) घडवून आणून मानवी फायदयाच्या गुणधर्मांच्या वनस्पती, प्राणी आणि उत्पादने यांची निर्मिती करणे. उदाहरणार्थ, जीवाणूंमध्ये जनुकीय बदल करून इन्सुलिन किंवा मानवी वाढीची संप्रेरके निर्माण करणे.

-----------------------------

(5) ऊतीसंवर्धन, संकरित बियाण्यांची निर्मिती हे तसे गैरजनुकीय जैवतंत्रज्ञान (Non-gene Biotechnology) आहे. यात संपूर्ण पेशी किंवा ऊती वापरली जाते.

 3. जैवतंत्रज्ञानाचे फायदे : (1) प्रतिहेक्टरी जास्त कृषी उत्पादन मिळते.(2) रोगप्रतिकारक वाण तयार झाल्यामुळे रोगनियंत्रणावर होणारा खर्च कमी होतो (3) वर्षाकाठी जास्त उत्पादन मिळते; कारण लवकर फळधारणा होणाऱ्या जाती तार होतात.

-----------------------------

व्याख्या लिहा.

■मूलपेशी किंवा मूलपेशी म्हणजे काय ?

( कृतिपत्रिका-2)

उत्तर : मूलपेशी या अविभेदित, प्राथमिक स्वरूपाच्या, स्वतःची कृती करण्याची क्षमता आणि बहुविधता असलेल्या पालकपेशी असतात. या बहुपेशीय सजीवांत आढळतात.

-----------------------------

■(2) जैवतंत्रज्ञान.

उत्तर: मानवी फायदयाच्या दृष्टीने सजीवांमध्ये कृत्रिमरीत्या जनुकीय बदल व संकर घडवून सुधारणा करण्याला जैवतंत्रज्ञान असे म्हणतात. या तंत्रज्ञानाने नवीन गुणधर्म असणाऱ्या सजीवांची उत्पत्तीकरण येते.

-----------------------------

■(3) जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके.

उत्तर : पिकांच्या प्रजातीत नसलेल्या अशा बाहेरच्या जनुकाला एखादया पिकाच्या जनुकीय साच्यात टाकून मिळवण्यात आलेल्या इच्छित गुणधर्माच्या पिकांना जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके असे म्हणतात.

-----------------------------

■(4) गोल्डन राईस.

उत्तर : जैवतंत्रज्ञानाने 2005 साली तयार करण्यात आलेली जीवनसत्त्व 'अ'ने समृद्ध असलेली तांदळाची जात, जिच्यात साध्या तांदळापेक्षा 23 पट अधिक बीटा कॅरोटिन सापडते, अशी तांदळाची जात म्हणजे गोल्डन राईस होय.

-----------------------------

■(5) लस. 

उत्तर: विशिष्ट रोगजंतू अथवा रोगाविरुद्ध कायमस्वरूपी अथवा काही कालावधीपुरती प्रतिकारक्षमता मिळवण्यासाठी दिलेला 'प्रतिजन 'युक्त पदार्थ म्हणजे लस होय.

-----------------------------

■(6) क्लोनिंग.

उत्तर : एखादी पेशी किंवा अवयव किंवा संपूर्ण शरीराची हुबेहूब प्रतिकृती तयार करणे म्हणजे क्लोनिंग होय.

-----------------------------

■(7) DNA फिंगरप्रिंट.

उत्तर : कोणत्याही व्यक्तीच्या उपलब्ध DNA वरून त्या व्यक्तीची ओळख पटवणे शक्य होते. या पद्धतीला DNA फिंगरप्रिंट असे म्हणतात,

-----------------------------

■(8) हरितक्रांती.

कमी शेत जमिनीत जास्तीत जास्त धान्योत्पादन करण्याच्या पद्धतींना एकत्रितपणे हरितक्रांती म्हणतात.

-----------------------------

एका वाक्यात उत्तरे लिहा:

■पेशीविज्ञानात मोलाचे संशोधन करणाऱ्या भारतीय संस्था कोणत्या व त्या कुठे आहेत ?

उत्तर : पुणे येथील 'राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था' आणि बेंगळुरू येथील 'इनस्टेम' या संस्था पेशीविज्ञानात खूप मोलाचे संशोधन करीत आहेत.

-----------------------------

(2) मूलपेशींचे जतन कसे करण्यात येते ?

उत्तर : नाळेतील रक्त, रक्त-अस्थिमज्जा अथवा कोरकपुटीतील भ्रूणपेशी यांचे नमुने काळजीपूर्वक गोळा करून त्यांना जंतुविरहित अशा छोट्या छोट्या कुप्यांमध्ये 135 °C पासून - 190 °C तापमानात द्रवरूप नायट्रोजनमध्ये ठेवून जतन केल्या जातात.

-----------------------------

(3) मूलपेशीचे स्रोत कोणते ?

उत्तर : गरोदर मातेच्या नाळेत, भ्रूणाच्या 'कोरकपुटी' अवस्थेत, पूर्ण वाढ झालेल्या व्यक्तीच्या रक्त-अस्थिमज्जेत, मेद ऊतीमध्ये व रक्तात मूलपेशी असतात.

-----------------------------

(4) स्रोताच्या आधारावर मूलपेशींचे दोन प्रमुख प्रकार कोणते? 

उत्तर : स्रोताच्या आधारावर मूलपेशींचे दोन प्रमुख प्रकार भ्रूणीय मूलपेशी आणि वयस्क मूलपेशी हे आहेत.

-----------------------------

(5) दान करण्यायोग्य अवयव कोणते ते लिहा.

उत्तर : दान करण्यायोग्य अवयव डोळे, हृदय, मूत्रपिंड (वृक्क), त्वचा, हाडे, यकृत, फुप्फुसे. स्वादुपिंड,

-----------------------------

■(6) जैवतंत्रज्ञानामुळे कोणत्या क्षेत्रांत विशेष प्रगती झली आहे?

 उत्तर : जैवतंत्रज्ञानामुळे मुख्यत्वेकरून शेती व औषधनिर्मितीमध्ये बरीच प्रगती झाली आहे.

-----------------------------

■(7) जैविक खतांमध्ये कोणत्या सजीवांचा वापर केला जातो?

 उत्तर : जैविक खतांमध्ये प्रामुख्याने हायझोबिअम, ॲझोटोबॅक्टर, नोस्टॉक, अॅनाबीना या जीवाणूंचा तसेच अॅझोला या वनस्पतीचा वापर करण्यात येतो.

-----------------------------

■(8) पशुसंवर्धनासाठी मुख्यत्वे कोणत्या दोन पद्धती वापरल्या

उत्तर-पशुसंवर्धनासाठी मुख्यत्वे कृत्रिम रेतन आणि गर्भप्रत्यारोपण या दोन पद्धती वापरल्या जातात.

-----------------------------

■(9) मानवी आरोग्य व्यवस्थापनाच्या दोन प्रमुख बाबी कोणत्या ? 

उत्तर : मानवी आरोग्य व्यवस्थापनाच्या दोन प्रमुख बाबी रोगनिदान आणि रोगोपचार या आहेत.

-----------------------------

■क्लोनिंग.

उत्तर : (1) क्लोनिंग हे अद्ययावत तंत्र आहे ज्यात एखादी पेशी, अवयव किंवा संपूर्ण शरीराची हुबेहूब प्रतिकृती तयार करता येते 

(2) क्लोनिंगचे दोन प्रकार आहेत: प्रजननात्मक क्लोनिंग आणि उपचारात्मक क्लोनिंग.

3) प्रजननात्मक क्लोनिंग: एका शरीरातील केंद्रकविरहित स्त्रीबीज व दुसऱ्या शरीरातील कायिक पेशीचे केंद्रक यांच्या संयोगाने क्लोन बनवणे म्हणजे प्रजननात्मक क्लोनिंग करणे होय. अशा प्रकारच्या क्लोनिंगमध्ये नराच्या शुक्रपेशीची गरज नसते. डॉली मेंढी हे याचे उदाहरण आहे.

------------------------------

पुढील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा :  ■(1) जैवतंत्रज्ञान जसे उपयुक्त आहे तसेच काही प्रमाणात हानिकारकही आहे, यावर तुलनात्मक लेखन करा. किंवा तुलनात्मक दृष्टीने तुमचे मत मांडा. (सराव कृतिपत्रिका - 1)  

उत्तर : (1) जैवतंत्रज्ञानाने मानवजातीला अन्नधान्य विपुल प्रमाणात प्राप्त झाले. त्यामुळे या शास्त्राला उपयुक्त म्हणता येते. आरोग्य आणि औदयोगिक उत्पादनांचे अनेक प्रश्न सहज सोडवले आहेत. पूर्वीच्या काळी अकस्मात रोगराईच्या साथी पसरत अनेक

लोक त्यात मृत्युमुखी पडत अन्नाचा दुष्काळ आणि त्यामुळे होणारी उपासमार मानवजात निघत होती साधारण चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी दुधाची उपलब्धता  फार कमी होती धान्योत्पादनाच्या बाबतीत भारत स्वयंपूर्ण व्हा (2) पण जैवतंत्रज्ञानाच्या उदयानंतर धान्य आणि इतर अन्न याबाबत आपण खूप प्रगती केली आहे. आरोग्याचे अनेक प्रश्न जाता सोपे झाले आहेत. दुर्धर मधुमेहासारख्या रोगांसाठी आता मानवी इन्सुलिनच्या साहाय्याने शर्करा नियंत्रण करणे सोपे झाले आहे (3) विविध लसी तयार झाल्यामुळे रोगांच्या साथीवर नियंत्रण आलेले आहे. (4) प्रदूषण नियंत्रण घनकचरा व्यवस्थापन आणि इंधनाचे प्रश्न आता वेगळ्या पद्धतीने हाताळता येत आहेत. (5) है असे छान चित्र असले तरी जैवतंत्रज्ञानाच्या प्रयोगात एक कृत्रिमता असते. जनुकीय बदल निसांच्या विरुद्ध जाऊन केले जातात जीवाणू-विषाणूच्या जिनोममध्ये मानवी जनुके घालून ईप्सित साधले जाते. (6) क्लोनिंगसारख्या तंत्राला तर नैतिक विरोध आहे मानवी प्रजननाच्या पद्धतीत देखील जैवतंत्रज्ञानाचा वापर करून क्लोनिंग केल्यास येणाऱ्या पिढ्यांना माता असेल पण पित्याची जरुरी लागणार नाही कृत्रिमतेने पृथ्वीवरच्या सजीवांच्या जनुकांचे मानवाने त्याच्या फायदयासाठी फेरबदल केले तर निसर्ग नियमात हे बसणारे नाही. त्याचे दूरगामी परिणाम भयानक असतील. त्यामुळे जैवतंत्रज्ञान हानिकारक देखील होऊ शकते.

---- ---------------------------

 ■जैवतंत्रज्ञानाचा वापर करून बनवण्यात आलेल्या कोणत्या वस्तू तुम्ही तुमच्या जीवनात वापरता ? 

उत्तर : (1) सर्वांत साध्या आणि सोप्या वस्तू म्हणजे दही-ताक या घरच्या घरी बनवलेले किण्वनाने तयार केलेले अन्नपदार्थ होत (2) इडली, डोसा ढोकळा असे पदार्थ देखील किण्वन करून बनवले जातात हे सर्वात प्राथमिक स्वरूपाचे जैवतंत्रज्ञान आहे. (3) अलीकडच्या काळात निरनिराळे चीज, पनीर, योगर्ट एनर्जी डिक्स असे खाद्यपदार्थ जैवतंत्रज्ञानाचा वापर करून तयार केले जातात. (4) बिनबियांची द्राक्षे, पपया आणि कलिंगडे बाजारात मिळतात. त्यांचा वापर घरी केला जातो. (5) जांभळा कोबी, पिवळ्या आणि लाल भोपळी मिरच्या आणि साठी वापरल्या जाणाऱ्या विलायती भाज्या या जैवतंत्रज्ञानाने वयात येतात. (6) विविध लसी प्रतिजैविके आणि मानवी इन्सुलिन यांसारखी प्रेरके घरोघरी वापरली जातात.

--------------------------

■ मानवी शरीरातील काही अवयव हे बहुमोल का आहेत?

 उत्तर : (1) मानवी शरीर निरनिराळ्या अवयवांच्या कार्यानुसार चालत असते. (2) मेंदू, वृक्क, फुप्फुसे, हृदय, यकृत असे काही अवयव जिवंत राहण्यासाठी महत्त्वाचे आहेत. तसेच आपली ज्ञानेंद्रिये विशेषतः डोळे हे बहुमोल आहेत. (3) या अवयवांचे कार्य बिघडले तर आरोग्याला धोका निर्माण होतो. मेंदूसारख्या अवयवात तर पुनर्जननाची क्षमता देखील नसते. (4) काही अवयवांची डागडुजी शस्त्रक्रियेने करता येते. परंतु अशा अवयवांची कार्यक्षमता कमी झाली तर जगणे असह्य होते. म्हणून अशा अवयवांना बहुमोल म्हटले जाते. 

------------------ -------------

■  लसीकरण म्हणजे काय हे स्पष्ट करा. उत्तर : (1) लसीकरण म्हणजे लस देणे. लस हे प्रतिजन असते. विशिष्ट रोगजंतूच्या अथवा रोगाच्या प्रतिकारासाठी कायमस्वरूपी अथवा काही कालावधीपुरती प्रतिकारक्षमता मिळावी म्हणून ही म देण्यात येते. (2) पूर्वीच्या काळी रोगजंतूंचा वापर करूनच लस तयार केली जात असे. ही लस रोगजंतूंना पूर्णपणे अथवा अर्धमेले करून बनवली जाई. परंतु यातून काही जणांना त्या आजाराची लागण होण्याची शक्यता असे. (3) हे होऊ नये म्हणून शास्त्रज्ञांनी जैवतंत्रज्ञानाचा वापर करून कृत्रिमरीत्या लसी तयार केल्या. त्यांनी रोगजंतूचे जे प्रथिन प्रतिजन (Antigen) म्हणून काम करते, त्याचे जनुक मिळवून त्याच्या मदतीने प्रयोगशाळेतच ते प्रतिजन तयार केले. (4) अशा प्रतिजनाचा वापर लस म्हणून केला, तर सुरक्षितरीत्या रोगप्रतिकारकशक्ती निर्माण होते. व्यक्तींना रोगमुक्त ठेवण्यासाठी अशा लसी देणे म्हणजे लसीकरण करणे होय. (5) प्रतिकारी प्रथिने टोचणे अतिसुरक्षित आहे. त्यामुळे अधिक क्षमतेच्या आणि तापस्थिर लसी देऊन, लसीकरणाच्या मदतीने पोलिओ, हिपॅटायटिस असे रोग दूर ठेवता येतात.

-------------------------------

टिपा लिहा 

■(1) जैवतंत्रज्ञान व्यावहारिक उपयोग. 

उत्तर : (1) जैवतंत्रज्ञानाचे व्यावहारिक उपयोग निरनिराळ्या क्षेत्रात करण्यात येतात. उदा., पीक जैवतंत्रज्ञान पशुसंवर्धन, मानवी आरोग्य इत्यादी (2) पीक जैवतंत्रज्ञानात कृषी उत्पादकता आणि विविधता वाढवली जाते. संकरित बियाणे आणि जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके, तणनाशकरोधी वनस्पती अशा संदर्भात विशेष संशोधन करण्यात आले आहे या पद्धतीने पिकांच्या जास्त उत्पादन देणाऱ्या रोग प्रतिकारक, क्षारता प्रतिकारक तणनाशक प्रतिकारक दुष्काळी तसेच थंडीच्या परिस्थितीतही तग धरू शकणाऱ्या पिकांच्या जाती निर्माण केल्या जात आहेत. बीटी कापूस, बीटी वांगे, गोल्डन राईस अशा जाती आता बऱ्याच लोकप्रिय झाल्या आहेत तणनाशकरोधी वनस्पतीतून बाहेर पडणाऱ्या रसायनामुळे आपसूकच तणांचे नियंत्रण शक्य झाले आहे. जैविक खतांच्या वापराने रासायनिक खतांचा उपयोग कमी करता येतो. हायझोबिअम अॅझोटोबॅक्टर नोस्टॉक, अनाबीना या जीवाणूंचा तसेच अॅझोला या वनस्पतीचा वापर करून वनस्पतींच्या उत्पादनात लक्षणीय फरक पडला आहे. (3) पशुसंवर्धन करताना जैवसंवर्धनाच्या पद्धती वापरल्या जातात. कृत्रिम रेतन आणि गर्भप्रत्यारोपण या पद्धतीने विविध प्राणिज उत्पादनांचे प्रमाण व गुणवत्ता या दोन्हींतही वाढ करण्यात आली आहे. (4) मानवी आरोग्य सुधारण्यासाठी रोगनिदान तसेच रोगोपचार या बाबींचा विचार केला गेला आहे. मधुमेह, हृदयरोग अशा आजारांचे निदान जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने लक्षणे दिसण्यापूर्वीच करता येते. एड्स, डेंग्यू यांसारख्या रोगांचे निदान आणि त्वरित उपचार शक्य झाले आहेत (5) रोगांच्या उपचारासाठी वापरली जाणारी संप्रेरकासारखी औषधे, प्रतिजैविके आणि विविध लसी प्रतिजन इत्यादी आता जैवतंत्रज्ञानाने तयार करण्यात येतात. तसेच रोगोपचार पद्धतीत जनुक उपचार हे देखील शक्य झाले आहेत.

(6) औद्योगिक उत्पादने आणि पर्यावरणाकरिता जैवतंत्रज्ञानाचा निरनिराळ्या पद्धतींनी वापर केला जात आहे. (7) DNA फिंगरप्रिंटिंग, क्लोनिंग यांसारख्या तंत्रांनी व्यवहारात आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत. 

------------------------------

■ औषधी वनस्पतीचे महत्त्व:

उत्तर : (1) आयुर्वेदात नैसर्गिक साधनांचा वापर करू प्रयत्न केले जातात. भारताला आयुर्वेदाचा फार मोठा वारसा आहे. (2) यासाठी लागणाऱ्या औषधी वनस्पती पूर्वी जंगलांतून गोळा केल्या जात असत. (3) महत्त्वाच्या औषधी वनस्पतींची लागवड आता मोठ्या प्रमाणावर केली जाते. (4) जगभरात तुळस, अडुळसा, ज्येष्ठमध अशा काही वनस्पतींचा वापर केला जातो. (5) अॅलोपॅथीच्या औषधात देखील वनस्पती वापरल्या जातात. (6) रसायनांनी तयार केलेल्या औषधांपेक्षा वनस्पतींपासून मिळवलेल्या औषधांचे दुष्परिणाम कमी असतात. त्यामुळे अशी औषधे वापरणे कधीही हितावह असते.

--------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा