Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, २१ ऑगस्ट, २०२३

विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग -२ दहावी 9 सामाजिक आरोग्य

 विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग -२ दहावी

9 सामाजिक आरोग्य



■रिकाम्या जागा भरा

1)हास्यमंडळ हा.........दूर करण्याचा एक उपाय आहे.

उत्तर-ताणतणाव

---------------------------

(2) मदयसेवनाने मुख्यतः....... संस्थेला धोका पोहोचतो.

  उत्तर- चेता

---------------------------

(3) सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कायदा आहे.. 

उत्तर-माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 हा कायदा आहे

---------------------------


■(1) ताणतणाव कमी करणारे छंद.

उत्तर : (1) संगीत ऐकणे (2) निसर्ग निरीक्षणाचा छंद

(3) चांगली पुस्तके वाचणे.

---------------------------

■ (2) सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे रोग. उत्तर : (1) एड्स (2) क्षयरोग (3) कुष्ठरोग.

---------------------------

■(3) मोबाइल फोन्सच्या अतिवापरामुळे उद्भवणारे शारीरिक त्रास.

उत्तर : (1) डोकेदुखी (2) सांधेदुखी (3) दृष्टिदोष.

---------------------------

■ (4) सायबर गुन्ह्याच्या कक्षेत येणाऱ्या कृती.

उत्तर : (1) एखाद्याची खाजगी माहिती काढून त्याला आर्थिक बाबतीत लुबाडणे.

(2) दुसऱ्याने तयार केलेले लिखित साहित्य, सॉफ्टवेअर्स, फोटो, व्हिडिओ, संगीत इत्यादी इंटरनेटवरून मिळवून त्याचा गैरवापर किंवा अवैध विक्री करणे.

(3) इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून बदनामीकारक संदेश पाठवणे,

4)अश्लील चित्रे प्रसारित करणे.

---------------------------

■सामाजिक आरोग्याचे लक्षण कोणते ?

उत्तर : बदलत्या सामाजिक परिस्थितीनुसार स्वतःचे अनुकूल करता येणे हेच सामाजिक आरोग्याचे लक्षण आहे.

---------------------------

■(2) मदयनिर्मिती कशी करतात ?

उत्तर : पदार्थांच्या किण्वनाने मिळणाऱ्या अल्कोहोल या रसायनापासून मदयनिर्मिती करतात.

---------------------------

■(3) अमली पदार्थांचे दुष्परिणाम कोणते ?

उत्तर : वनस्पतिजन्य अमली पदार्थ व काही रसायने तात्पुरती नशा देतात आणि त्यांचे परिणाम मानवी चेतासंस्था, स्नायुसंस्था, हृदय यांच्यावर होऊन कायमस्वरूपी हानी होऊ शकते.

---------------------------

■(4) दुर्धर आजार कोणते ?

उत्तर : एड्स, टीबी, कुष्ठरोग, कर्करोग आणि बऱ्या न होणाऱ्या मानसिक विकृती हे दुर्धर आजार आहेत.

---------------------------

■(5) लहान बालकांनी मोबाइल फोन वापरणे घातक का ठरते? उत्तर : मोबाइलमधून निघणारी प्रारणे प्रौढांच्या हाडांपेक्षा बालकांच्या हाडांना जास्त भेदू शकतात, तसेच बालकांच्या मेंदूची वाढ होत असते. म्हणून या प्रारणामुळे लहान मुलांना मोबाइल वापरणे घातक ठरू शकते.

---------------------------

■अंमली पदार्थ, मदय यांच्या प्रभावामुळे जगाचे भान नसलेल्या, अस्वच्छ ठिकाणी लोळत पडलेल्या व्यक्ती तुम्ही कधी पाहिल्या आहेत का? सर्वात बुद्धिमान असणाऱ्या मानव- प्राण्याची ही दयनीय स्थिती तुम्हांला योग्य वाटते का?

उत्तर : व्यसनाधीनता मानवाला रसातळाला पोहोचवते. दारूच्या अमलाखाली रस्त्याच्या कडेला अर्धवट बेशुद्ध पडलेले पुरुष बऱ्याचदा दिसतात. अमली पदार्थ घेणारे व्यसनी देखील अत्यंत | अस्वच्छ दिसतात आणि ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे देखील असतात.  मदय आणि अमली पदार्थांच्या सेवनाने माणसाची सारासार विचार  करण्याची क्षमता नष्ट होते. तसेच त्याची विवेकबुद्धी चालत नसल्याने त्याच्या बुद्धीचा कोणताही उपयोग होत नाही. अशी माणसे म्हणजे समाजाला शाप आहे. मानवप्राण्याची ही दयनीय | स्थिती खूपच अयोग्य वाटते.

-------------------------

■(2) विषारी मदयसेवनाने अनेकांचे मृत्यू झाल्याच्या बातम्या तुम्ही वाचल्या असतील. असे का बरे होते?

उत्तर : अयोग्य पद्धतीने मदयाची निर्मिती केल्यास त्यात विषारी रसायने तयार होतात. अशा रसायनांनी विषबाधा होऊन मृत्यूदेखील ओढवू शकतो.

कोणत्याही प्रकारचे मदय म्हणजे किण्वनाने मिळवलेले अल्कोहोलच असते. मदयनिर्मितीची प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने केल्यास रासायनिक प्रक्रियेतून विषारी व मृत्यूस कारणीभूत ठरणारी रसायने बनतात.मदयसेवनाचे दूरगामी परिणाम आरोग्यावर होतातच शिवाय पूर्ण कुटुंब त्यामुळे उद्ध्वस्त होऊ शकते. अल्कोहोलमुळे मेंदू व एकंदरीत सर्वच चेतासंस्था, यकृताची कार्यक्षमता यांची  अयमस्वरूपी हानी होते. तसेच माणसाचे आयुष्यमान घटते.ही स्मृती आणि समजून घेणे, शिकणे, सारासार विचार करणे बाढीच्या वयात क्षमता कमी होतात. त्यामुळे शारीरिक अनारोग्याबरोबरच मदयपानामुळे मेंदूचा योग्य विकास होत

-------------------------


(5) लहान बालकांनी मोबाइल फोन वापरणे घातक का ठरते? 

उत्तर : मोबाइलमधून निघणारी प्रारणे प्रौढांच्या हाडांपेक्षा बालकांच्या हाडांना जास्त भेदू शकतात, तसेच बालकांच्या मेंदूची वाढ होत असते. म्हणून या प्रारणामुळे लहान मुलांना मोबाइल वापरणे घातक ठरू शकते.

-------------------------

6) आदर्श व्यक्तिमत्त्व कसे जोपासले जाते? 

उत्तर : वेळेचे व्यवस्थापन, स्वतःच्या कामांचे नियोजन व निर्णय घेण्याची क्षमता हे गुण स्वतःमध्ये जाणीवपूर्वक विकसित केले म्हणजे सामाजिकदृष्ट्या सुदृढ, आदर्श व्यक्तिमत्त्व जोपासले जाते.

-------------------------

(7) सेल्फीसाइड म्हणजे काय ? 

उत्तर : सेल्फी काढणाऱ्या व्यक्तीला स्वतःमागच्या जगाचे भान राहत नाही, धोका समजत नाही या विकाराला सेल्फीसाइड म्हटले जाते. 

-------------------------

(8) Hacking of information कशाला म्हणतात ?

उत्तर : शासनाची, संस्थांची किंवा कंपन्यांची इंटरनेटवरील महत्त्वाची गोपनीय माहिती वेगवेगळे संगणकीय प्रोग्रॅम्स किंवा क्लृप्त्या वापरून मिळवली जाते व त्या माहितीचा गैरवापर होतो. या प्रकाराला Hacking of information असे म्हणतात.

-------------------------

(9) पायरसी म्हणजे काय ?

उत्तर : दुसऱ्याने तयार केलेले लिखित साहित्य, सॉफ्टवेअर्स, फोटो, व्हिडिओ, संगीत इत्यादी इंटरनेटवरून मिळवून त्याचा गैरवापर किंवा अवैध विक्री करणे या गुन्हयाला पायरसी किंवा चौर्य म्हणतात.

-------------------------

(10) सलाम मुंबई फाउंडेशनचे कार्य कोणत्या प्रकारचे आणि कोणत्या वर्गासाठी आहे?

उत्तर : झोपडपट्टीतील मुलांना शिक्षण, खेळ, कला, व्यवसाय यांबाबतीत सक्षम करून त्यांचे आरोग्य व जीवनमान सुधारण्याचे कार्य सलाम मुंबई फाउंडेशन करते.

-------------------------

-------------------------------

■स्त्री-पुरुष असमानतेमुळे मुलींना ताणतणावांची समस्या  भेडसावते. 

उत्तर : बऱ्याचशा घरांमध्ये मुलांना स्वैर स्वातंत्र्य दिले जाते. मुलींवर बंधने घातली जातात. मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न देखील उत्पन्न झाला आहे. त्यांची छेडछाड, चेष्टामस्करी, विनयभंग किंवा बलात्कारासारख्या घटनांमुळे त्यांना अधिकच असुरक्षित वाटते. सामाजिक स्थित्यंतरात स्त्रियांच्यात खूप फरक पडूनही पुरुषसत्ताक समाजामुळे आणि स्त्री-पुरुष असमानतेमुळे मुलींना ताणतणावाची समस्या भेडसावते.

-------------------------

■(3) मद्यसेवन कधीही वाईटच असते.

उत्तर : मदय तयार करताना चुकीच्या प्रक्रियांमुळे विषारी मद्याची निर्मिती होते. अशा मदयाच्या सेवनाने मृत्यू ओढवतो.. मदद्यातील अल्कोहोलमुळे चेतासंस्था व मेंदू यावर विपरीत परिणाम होतात. यकृत व वृक्क यांचे कार्य बिघडते. मदयपीचे आयुष्यमान कमी होते. विदयार्थ्यांच्या मेंदूची स्मरणशक्ती, शिकण्याची क्षमता आणि सारासार विचारशक्ती नष्ट होते. मदयामुळे सामाजिक आणि कौटुंबिक समस्या निर्माण होतात. त्यामुळे मद्यसेवन कधीही वाईटच असते.

-------------------------

■(4) आपल्या डेबिट कार्डाचा PIN नंबर गुप्त ठेवावा.

उत्तर : डेबिट कार्डाने आपल्याच बँक खात्यातील पैसे काढता येतात. हे पैसे काढण्याच्या वेळी PIN नंबर वापरावा लागतो. हा नंबर दुसऱ्या कोणाला मिळाल्यास तो आपले सर्व पैसे खात्यातून काढू शकेल. आपले असे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून आपल्या डेबिट कार्डाचा PIN नंबर नेहमी गुप्त ठेवावा.

-------------------------

■(5) मैदानी खेळांचे महत्त्व अतुलनीय आहे.

उत्तर : मैदानी खेळांमुळे व्यायाम होतो. त्यामुळे शारीरिक फायदे होतात. शिस्त, इतरांशी आंतरक्रिया आणि संघभावना निर्माण होतात. एकाकीपणा नाहीसा होऊन समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व निर्माण होते. मानसिक ताणतणाव व नैराश्य दूर होते. त्यामुळे आनंदी व आरोग्यपूर्ण जीवनासाठी मैदानी खेळांचे महत्त्व अतुलनीय आहे.

-------------------------

■दर्शवलेल्या कृती करण्यासाठी कोणकोणत्या उपकरणांचा गैरवापर होऊ शकतो ?

उत्तर : वरील प्रकारचे गुन्हे करण्यासाठी मोबाईल फोन, संगणक, इंटरनेट अशा साधनांचा वापर केला जातो. तसेच दुसऱ्यांची आधारकार्ड / पॅनकार्ड / क्रेडीट कार्ड / डेबिट कार्ड आणि त्यावरचे PIN वापरून सायबर गुन्हे केले जातात. 

-------------------------

(iii) अशा प्रकारच्या घटनांची दोन उदाहरणे लिहा.

उत्तर : सायबर गुन्ह्यांची दोन उदाहरणे : (1) बँक खात्याची नव क्रेडीट कार्ड/डेबिट कार्ड वापरून दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यातील रह पैसे काडून घेणे. (2) खोटे फेसबुक अकाऊंट उघडून किंवा सोशल{ हो मिडियाचा वापर करून स्वतःची खोटी माहिती देणे दुसऱ्या मुलींना किंवा तरुणींना फसवून त्यांचा विनयभंग करणे. (3) वेबसाईटवर काही चांगल्या गोष्टी दाखवून प्रत्यक्षात खराब माल ग्राहकाला देणे. बिघाड असलेली उपकरणे देणे इत्यादी..

-------------------------

■(iv) महाराष्ट्र शासनाने अशा घटना नियंत्रणात आणण्यासाठी कोणता कायदा अमलात आणला आहे?

उत्तर : महाराष्ट्र शासनाने अशा घटना नियंत्रणात आणण्यासाठी माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 (IT Act 2000) हा 17 ऑक्टोबर 2000 पासून अमलात आणला आहे. या कायदयात 2008 साली सुधारणा केल्या आहेत.

-------------------------

■अशा घटना आपल्या बाबतीत घडू नयेत म्हणून प्रत्येकाने कोणती काळजी घ्यावी ?

 उत्तर : अशा सायबर गुन्हयाच्या घटना घडू नयेत म्हणून आपण  विशेष जागरूक असावे. मोबाईलवरून आपल्या क्रेडीट कार्ड / डेबिट कार्ड / आधार कार्ड इत्यादी संबंधित माहिती कोणालाही देऊ नये.) PIN नंबर कोणालाही दिसणार नाही याची खबरदारी घ्यावी. आपल्या अडीची सुरक्षितता ठेवावी. तसेच संगणक आणि इंटरनेट वापरतांना प्रत्येक वेळा लॉग आऊट करण्याची सवय ठेवावी.

---------------------------------

तुम्ही काय कराल ? का ? 

■ (1) तुमचा बराच मोकळा वेळ इंटरनेट /मोबाइल गेम्स, फोन यांसाठी खर्च होतो आहे. उत्तर- एकदा वाया गेलेला वेळ परत कधीही भरून येत नाही. आपला वेळ अभ्यास, व्यायाम अथवा मैदानी खेळ यांसाठीच वापरणे योग्य आहे. फावल्या वेळात आई-बाबांना मदत करणे योग्य आहे. परंतु जर कामाशिवाय इंटरनेट वापरणे अयोग्य व्हिडिओ पाहणे, संगणकावर किंवा मोबाइलवर गेम्स खेळत राहणे आणि फोनचा अतिवापर करणे अशा सवयी लागल्या की त्याचेच व्यसन होते. त्यामुळे आपली ही सवय प्रयत्नपूर्वक कमी करू आपला वेळ वाया चालला आहे हे ध्यानात ठेवू त्या वेळात काही सकारात्मक व विधायक कामे करू. 

--------------------------------

(2) शेजारच्या मुलाला तंबाखू खायला आवडते. 

उत्तर : तंबाखू खाणे म्हणजे कर्करोगाला निमंत्रण आहे. हे पटवून देण्यासाठी शेजारच्या मुलाला तंबाखू खाण्याचे दुष्परिणाम समजावून सांगू. वेगवेगळ्या माध्यमात तंबाखूचे दुष्परिणाम दर्शवणारी चित्रे, फोटो उपलब्ध आहेत. ती त्या मुलाला दाखवू त्याच्या पालकांना या सवयीविषयी सांगू त्याचे व्यसन दूर करण्यासाठी प्रयत्न करू. •

------------------------------- 

 (3) तुमची बहीण अबोल झाली आहे, सतत एकटी राहते. 

उत्तर : सतत अबोल राहणाऱ्या व्यक्तीच्या मनात नाना विचार येत असतात. कधी कधी अशी व्यक्ती नैराश्याने ग्रस्त असते. यासाठी बहिणीला एकटे पडू देणार नाही. तिच्याशी बोलत राहिले पाहिजे. तिच्या मित्र-मैत्रिणींना घरी बोलावून त्यांच्याबरोबर तिला मिसळायला उद्युक्त केले पाहिजे तिला जे आवडते असे छंद जोपासायला मदत केली पाहिजे. समुपदेशकाची मदत देखील घेता येईल 

--------------------------------

■घराच्या भोवताली रिकामी जागा आहे. तिचा सदुपयोग करायचा आहे. 

उत्तर घराच्या भोवताली असलेल्या रिकाम्या जागेचा उपयोग छोटीशी बाग बनवण्यासाठी करता येईल त्यासाठी माती आणून तेथे रोपे लावता येतील. रोपांची नर्सरी सुरू करता येईल तसेच छोटे मैदान बनवता येईल. अँडमिंटनसारख्या खेळासाठी जाळी आणून लावता येईल. या जागेची स्वच्छता राखली पाहिजे हे लक्षात ठेवून तेथे कचरा फेकायला निर्बंध केला पाहिजे. 

------------------------------

■ तुमच्या मित्राला सतत सेल्फी काढायचा छंद लागला आहे. 

उत्तर : सतत सेल्फी काढण्याच्या सवयीला दूर ठेवणे जरुरीचे आहे. जो अशा सवयीत अडकतो तो केवळ स्वतःचाच विचार करीत असतो त्याला दुसऱ्या कोणत्याच गोष्टीचे भान नसते. यासाठी त्याची सेल्फी काढायची सवय दूर करण्याचा प्रयत्न करू. यासाठी त्याच्या या प्रवृत्तीचे कारण काय ते शोधून काढू. त्याचे मन इतर गोष्टींकडे वळेल याचा प्रयत्न करू. 

-------------------------------

 ■ बारावीत असणाऱ्या तुमच्या भावाला अभ्यासाचा खूप ताण आला आहे. उत्तर: बारावीचा अभ्यास जास्त असतो आणि ज्यानी वर्षभर अभ्यासाकडे विशेष लक्ष दिले नाही अशांना ताण येणे स्वाभाविक असते. यासाठी त्याने वेळेचे योग्य नियोजन करावे, एकेक विषयाचा एकाच वेळी विचार करावा, अभ्यासाच्या मध्ये थोडा वेळ विश्रांती घ्यावी. घरातल्या लोकांशी मनमोकळे बोलावे ताण हलका होईल अशा पद्धतीने घरचे वातावरण ठेवावे तुझ्यासाठी अभ्यास आहे. अभ्यासासाठी तू नाहीस हे सत्य त्याला पटवून दयावे.

--------------------------------

(1) कोणकोणते घटक सामाजिक आरोग्य निर्धारित करतात? 

उत्तर : (1) कोणत्याही समाजाचे आरोग्य टिकून राहण्यासाठी त्या ठिकाणी असणाऱ्या सोयीसुविधा चांगल्या असणे आवश्यक आहे. उदा., अन्न, वस्त्र, निवारा, पाण्याची सोय, औषधोपचार शिक्षणाच्या सोयी व समान संधी, परिसराची स्वच्छता, परिवहनाची सुलभता इत्यादी. (2) आजूबाजूची सामाजिक परिस्थिती आणि राजकीय आधार तसेच गुन्हेगारी असणे / नसणे अशा अनेक बाबींचा सामाजिक आरोग्याशी संबंध आहे. (3) तसेच उद्याने, मैदाने, खेळण्यासाठी मोकळ्या जागा या.व्यक्तिविकासासाठी महत्त्वाच्या ठरतात. याच्याच बरोबर प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व खंबीर आणि आनंदी असणे जरुरीचे आहे. (4) व्यसनाधीनता, गुन्हेगारी प्रवृत्ती, विकृत वागणे आणि विकृत विचार हे सामाजिक आरोग्य बिघडवण्यास कारणीभूत होतात. (5) मित्र व नातेवाइकांचा मोठा संग्रह असणे, समवयस्क चांगले मिळणे, एकटेपणाने राहायचे झाल्यास योग्य छंद जोपासणे, आपल्या कामात आणि कर्तव्यात न चुकता झोकून देणे. (6) इतरांप्रती विश्वास, आदर व माणसांचा स्वीकार करण्याची प्रवृत्ती असे सर्व घटक सामाजिक आरोग्य टिकवून ठेवतात.

-----------------------------  --

■इंटरनेट, मोबाइल फोन्स यांच्या सतत संपर्कात राहिल्याने व्यक्तींमध्ये कोणकोणते बदल घडतात ?

 उत्तर : (1) इंटरनेट, मोबाइल फोन्स यांच्या सतत संपर्कात राहिल्याने लोकांवर शारीरिक, मानसिक आणि सामाजिक परिणाम होतात. (2) मोबाइल फोन्सच्या प्रारणांमुळे शारीरिक समस्या देखील

निर्माण होतात व निद्रानाश, विस्मरण, कानांत आवाज घुमणे, सांधेदुखी व त्याचबराबेर दृष्टिदोष असे शारीरिक त्रास उद्भवतात

 (3) सारखे इंटरनेटवर असल्याने ते एकलकोंडे होतात. त्यांना आपल्या वेळेचे नियोजन करता येत नाही रोजची कामे सोडून आपल्या भरपूर अपव्यय करतात.

 (4) एकल समाजातील इतर व्यक्ती नातेवाईक यांच्याशी सुसंवाद साधणे जमत नाही. फक्त स्वतःचाच विचार करण्याची सवय लागून त्यांच्यामध्ये आत्मकेंद्रीपणा निर्माण होतो. 

(5) अशा व्यक्ती सामाजिक जबाबदाऱ्या घेऊ शकत नाहीत. त्यांचे सामाजिक आरोग्य धोक्यात येते. 

---------------------------------

■ सायबर गुन्ह्यांच्या घटनांमुळे सामान्य माणसाला कोणकोणत्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागते ? उत्तर : (1) सामान्य व्यक्तीच्या आधारकार्ड पॅनकार्ड/क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड क्रमांक किंवा इतर व्यक्तिगत माहिती सायबर गुन्हे करणारे शोधून काढून त्याचा गैरवापर करू शकतात ATM काढांचा PIN क्रमांक मिळवून पैसे काढू शकतात (2) वेबसाइट्सवरून खरेदी करताना माणसे फसवली जातात (3) फेसबुक अकाउंट उघडून त्यात खोटी माहिती देऊन त्या माहितीच्या आधारे तरुणींना फसवून त्यांचा विनयभंग करणे आर्थिक शोषण करणे हा देखील सायबर गुन्हा आहे. (4) इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून बदनामीकारक संदेश पाठवणे, अश्लील चित्रे प्रसारित करणे प्रक्षोभक विधाने पाठवणे असा गैरवापर केला जातो. त्यामुळे समाजातील स्त्रिया व मुलांची मानहानी होते. (5) इंटरनेटच्या माध्यमातून व्हायरस पाठवणे आणि दुसऱ्याचे संगणक आणि मोबाइल नादुरुस्त करणे त्यातील माहिती खराब करून टाकणे हे देखील त्रास देण्यासाठी केले जाते. वरील सर्व घटना या सायबर गुन्हयांची उदाहरणे आहेत. 

---------------------------------

 ■ इतरांशी सुसंवाद साधण्याचे महत्त्व सांगा. उत्तर (1) सध्याच्या जगात खूप स्पर्धा असुरक्षितता आणि चढाओढ आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला मानसिक ताणतणावाला सामोरे जावे लागते. (2) हा तणाव काही काळ मनात तसाच राहिला तर औदासीन्य नैराश्य आणि तत्सम मानसिक आजार निर्माण होतात (3) औदासीन्यातून व्यसने लागू शकतात किंवा आत्मघाताचे विचार मनात येतात अशा वेळी आपली दुःखे आणि समस्या दुसऱ्याशी बोलण्यामुळे हलकी होतात. (4) समुपदेशकांची मदत घेऊन संवादातून समस्या सोडवता येतात. (5) जे लोक आपल्या चांगल्याचा विचार करतात. ते नेहमीच आपली मदत करतात त्यासाठी सुसंवाद करणे आवश्यक आहे.

---------------------------------

■ताणतणाव कमी करण्याचे विविध मार्ग कोणते ?

 उत्तर: ताणतणाव कमी करण्यासाठी पुढील मार्ग आहेत (1) हास्यमंडळ एकत्र जमून मोठमोठ्याने व मनमोकळे हसून आपला ताण हलका करता येतो. (2) सुसंवाद मित्र-मैत्रिणी, समवयस्क, भाऊ बहिणी शिक्षक व पालक या सर्वांशी सुसंवाद साधणे म्हणजेच आपले मन मोकळे करणे याने ताणतणाव कमी होतो (3) लेखन मनातले विचार लिहून काढले आणि आपल्या चुकीच्या विचारांचे विश्लेषण केले तरीही ताण कमी होतो. ((4) छंद जोपासणे वस्तूंचा संग्रह करणे छायाचित्रण, दर्जेदार पुस्तकांचे वाचन पाककला, शिल्पकला, चित्रकला रांगोळी नृत्य इत्यादी छंद मनाला लावून घेतले तर ताण येत नाही आणि रिकामा वेळदेखील सत्कारणी लागतो. सकारात्मक गोष्टीकडे ऊर्जा व मन वळवावे. त्यामुळे नकारात्मक भावना कमी होतात. (5) संगीत संगीत शिकणे ऐकणे, गाणी म्हणणे यांमुळे आनंद मिळून ताण हलका होतो. संगीतात मनःस्थिती बदलण्याची ताकद असते. (6) मैदानी खेळ व व्यायाम मानसिक आणि शारीरिक आरोग्य मैदानी खेळामुळे सुधारते खेळांमुळे शारीरिक व्यायाम शिस्त, इतरांशी आंतरक्रिया संघभावना वाढणे एकाकीपणा संपून व्यक्ती समाजाभिमुख होणे असे अनेक फायदे असतात योगाचा पण सराव असावा. (7) निसर्ग भ्रमण पक्षी निरीक्षण, पाळीव प्राण्याचे संगोपन यानेही ताण कमी होतो.

-------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा