८. शब्दयोगी अव्यय सराव प्रश्न
१) मार्चनंतर एप्रिल महिना येतो.
१) शब्दयोगी अव्यय
२) केवल प्रयोगी अव्यय
३) उभयान्वयी अव्यय
४) क्रिया विशेषण अव्यय
उत्तर-१) मार्चनंतर एप्रिल महिना येतो.
-----------------------------
२) घराजवळ शाळा आहे.
१) स्थानवाचक क्रिया विशेषण
२) केवळ प्रयोगी अव्यय
३) उभयान्वयी अव्यय
४) स्थानवाचक शब्दयोगी
उत्तर-४) स्थानवाचक शब्दयोगी
-----------------------------
३) पुलापर्यंत पाणी होते.
१) क्रिया विशेषण अव्यय
२) कालवाचक शब्द प्रयोगी अव्यय
३) केवलप्रयोगी अव्यय
४) यापैकी नाही
उत्तर-४) यापैकी नाही
-----------------------------
४) त्याने प्रेमापोटी ही गोष्ट केली.
१) भाववाचक शब्द योगी अव्यय
२) उभयान्वयी अव्यय
३) क्रिया विशेषण अव्यय
४) शब्दयोगी अव्यय
उत्तर-४) शब्दयोगी अव्यय
-----------------------------
५)राणी हिनापेक्षा उंच आहे. येथे कोणता विभक्ती प्रत्यय लपला आहे.
१) पंचमी
२) द्वितीया
३) प्रथमा
४) संबोधन
उत्तर-१) पंचमी
-----------------------------
६) 'मध्ये' या शब्दयोगी अव्ययाचा वाक्यात उपयोग करुन योग्य पर्याय शोधा.
१) तु मध्ये मध्ये का बोलतोस ?
२) तु मध्ये पडू नकोस
३) तू दोघांमध्ये पडू नकोस
४) दोघांत तू मध्ये नको पडूस
उत्तर-३) तू दोघांमध्ये पडू नकोस
-----------------------------
७) 'नंतर' या शब्दयोगी अव्ययाचा वाक्य असलेला पर्याय शोधा.
१) व्यसनाचे परिणाम नंतर दिसतात
२) त्याने नंतर फोन केला नाही
३) मी नंतर बोलते
४) माझ्यानंतर तिचा क्रमांक आहे
उत्तर-४) माझ्यानंतर तिचा क्रमांक आहे
-----------------------------
८) 'खालून' या शब्दयोगी अव्ययाचा पर्याय शोधा.
१) खालून वर ये
२) जमिनीखालून इंधन मिळते
३) पुलाखाली पाणी वाहते
४) छताला खालून आधार ह्या
उत्तर-२) जमिनीखालून इंधन मिळते
-----------------------------
९) 'मित्राविना' यातील विना हे कोणते अव्यय आहे.
१) क्रिया विशेषण
२) केवल प्रयोगी
३) शब्दयोगी
४) प्रश्नार्थक
उत्तर-२) केवल प्रयोगी
-----------------------------
१०) खालील पर्याया मधून शब्दयोगी अव्ययाचे वाक्य असलेला पर्याय शोधा.
१) चालतांना पुढे बघ
२) अचानक समोर अंधार दाटला
३) माझी मावशी जवळ असते
४) त्याने सर्वासमक्ष माफी सांगितली.
उत्तर-४) त्याने सर्वासमक्ष माफी सांगितली.
-----------------------------
११) खालील पर्यायामधून शब्दयोगी अव्ययाचे वाक्य असलेला पर्याय शोधा
१) त्याने लग्नाप्रित्यर्थ मेजवानी दिली
२) पतंग वर जात होता
३) मला खाली बसणे आवडते.
४) पुर्वी फार स्वस्ताई होती.
उत्तर-१) त्याने लग्नाप्रित्यर्थ मेजवानी दिली
-----------------------------
१२) 'टेबलाखाली पेन पडले' या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते.
१) टेबला
२) खाली
३) पेन
४) पडला
उत्तर-२) खाली
-----------------------------
१३) 'अंगातल्या कपड्यानिशी ती बाहेर पडली' शब्दयोगी अव्यय कोणते.
१) अंगात
२) निशी
३) बाहेर
४) व आणि क
उत्तर-२) निशी
-----------------------------
१४) 'देशासाठी विरांनी त्याग केला' या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते.
१) विरांनी
२) देश
३) साठी
४) त्याग
उत्तर-३) साठी
-----------------------------
१५) 'परिक्षेपूर्वी' तयारी झाली पाहिजे या वाक्यात अव्ययाचा कोणता प्रकार वापरला आहे.
१) तुलवाचक
२) हेतूवाचक
३) स्थल वाचक
४) कालवाचक
उत्तर-४) कालवाचक
-----------------------------
१६) 'वाघ माझ्यासमोरून गेला' या वाक्यातील अव्ययाचा प्रकार कोणता ते सांगा ? (जाने. -९६) २
१) उभयान्वयी अव्यय
२) शब्दयोगी अव्यय
३) क्रियाविशेषण
४) केवलप्रयोगी अव्यय
उत्तर-२) शब्दयोगी अव्यय
-----------------------------
१७) 'घरामागे धन लपविलेले आहे' या वाक्यातील शब्दयोगी अव्ययाचा शब्द सांगा.
१) घर
२) मागे
३) धन
४) आहे
उत्तर-२) मागे
-----------------------------
१८) 'या टोपीखाली दडलंय काय? या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा (जाने. ९६) २
१) उभयान्वयी अव्यय
२) शब्दयोगी अव्यय
३) क्रियाविशेषण अव्यय
४) केवलप्रयोगी अव्यय
उत्तर-२) शब्दयोगी अव्यय
-----------------------------
१९) 'पुस्तकावर सुंदर कव्हर बसविले' यातील सामान्यरूप कोणते ?
१) पुस्तका
२) सुंदर
३) पुस्तकावर
४) कव्हर
उत्तर-१) पुस्तका
-----------------------------
२०) 'नंतर' या शब्दाचा प्रकार कोणता आहे ? (फेब्रु-९७ )
१) क्रियापद
२) उभयान्वयी अव्यय
३) विशेषण
४) शब्दयोगी अव्यय
उत्तर-४) शब्दयोगी अव्यय
-----------------------------
२१) पुढीलपैकी शुद्ध शब्दयोगी अव्ययाचा शब्द ओळखा
१) मुळे
२) जवळ
३) सुद्धा
४) पुर्वी
उत्तर-३) सुद्धा
-----------------------------
२२) प्रत्यय लावून तयार झालेला शब्द सांगा ? (डिसें-९७)
१) गाडीवाला
२) गाडीमध्ये
३) गाडीसाठी
४) गाडीस
उत्तर-४) गाडीस
-----------------------------
२३) 'गणपती पुळयाला समुद्राजवळ गणपती मंदिर आहे' यातील शब्दयोगी शब्द सांगा.
१) गणपती पुळे
२) जवळ
३) गणपती
४) मंदिर
उत्तर-२) जवळ
-----------------------------
२४) 'चाकूमुळे' यातील 'मुळे' हे कोणते अव्यय आहे ? (डिसें-९८)
१) उभयान्वयी
२) केवलप्रयोगी
३) क्रियाविशेषण
४) शब्दयोगी
उत्तर-४) शब्दयोगी
-----------------------------
२५) 'च, मात्र, पण, सुद्धा' या शब्दांना कोणते शब्दयोगी अव्यय म्हणतात.
१) कालवाचक
२) स्थलवाचक
३) रितिवाचक
४) शुद्धशब्दयोगी अव्यय
उत्तर-४) शुद्धशब्दयोगी अव्यय
-----------------------------
२६) अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा 'तु पण माझ्याबरोबर प्रार्थना म्हण' (डिसें-०८)
१) उभयान्वयी अव्यय
२) शब्दयोगी अव्यय
३) क्रियाविशेषण
४) केवलप्रयोगी अव्यय
उत्तर-२) शब्दयोगी अव्यय
-----------------------------
२७) तुला रामासंबंधी काही माहिती आहे का? या वाक्यात शब्दयोगी ऐवजी कोणता विभक्ती प्रत्यय
वापरता येईल.
१) ने
२) शी
३) चा
४) ची
उत्तर-४) ची
-----------------------------
२८) वर, खाली, समोर, हे कोणत्या जातीचे शब्द आहेत ? (मार्च-०९)
१) उभयान्वयी अव्यय
२) विशेषण
३) शब्दयोगी अव्यय
४) गुणविशेषण
उत्तर-३) शब्दयोगी अव्यय
-----------------------------
२९) 'बाबादेखील मलाच दोष देत आहेत' - शब्दयोगी अव्यय प्रकार ओळखा.
१) कालवाचक
२) शुध्दशब्दयोगी
३) रितीदर्शक
४) परिमाणवाचक
उत्तर-२) शुध्दशब्दयोगी
-----------------------------
३०) 'डोंगरमाथ्यामागे सोनेरी किरणे पसरली होती' या वाक्यामध्ये शब्दयोगी अव्यय कोणता आहे ?
१) मागे
२) माथ
३) किरणे
४) पसरणे
उत्तर-१) मागे
-----------------------------
३१) शब्दाला शब्दयोगी अव्यय जोडल्यानंतरही सामान्यरुप न झाल्यास त्याला म्हणतात.
१) विभक्ती प्रतिरुपक
२) प्रकारदर्शक
३) क्रियापदरूप
४) शुद्धशब्दयोगी
उत्तर-४) शुद्धशब्दयोगी
-----------------------------
३२) 'त्यांच्या घरावर कौले आहेत' या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा (मार्च- ०९)
१) घरा
२) कौल
३) वर
४) त्यांच्या
उत्तर-३) वर
-----------------------------
३३) 'नाचता नाचता तो अधूनमधून माझ्याकडे बघत होता.' शब्दयोगी शब्द ओळखा.
१) अधूनमधून
२) बघत
३) माझ्याकडे
४) नाचता
उत्तर-३) माझ्याकडे
-----------------------------
३४) विभक्ती प्रत्ययांऐवजी शब्दयोगी अव्यय वापरल्यास त्याला म्हणतात
१) विभक्ती प्रतिरुपक
२) विकिरण
३) शब्दयोगी अव्ययांत
४) यापैकी सर्व
उत्तर-१) विभक्ती प्रतिरुपक
-----------------------------
३५) 'पक्षी झाडावर बसतो' या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा (ऑगस्ट-१०)
१) पक्षी
२) झाडा
३) वर
४) बसतो
उत्तर-३) वर
-----------------------------
३६) 'अलीकडे, समोर, मागे, पुढे, खाली' - हे शब्द आहेत.
१) शब्दयोगी
२) क्रियाविशेषण अव्यय
३) एक व दोन बरोबर
४) यापैकी नाही
उत्तर-३) एक व दोन बरोबर
-----------------------------
३७) शब्दयोगी अव्यय हे मूळचे
१) उभयान्वयी
२) केवलप्रयोगी
३) विशेषण
४) क्रियाविशेषण अव्यय
उत्तर-४) क्रियाविशेषण अव्यय
-----------------------------
३८) खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते ? 'जाईच्या मांडवावर सूर्याची सोनेरी किरणे पसरली'
१) पसरली
२) सोनेरी
३) मांडवावर
४) सूर्याची
उत्तर-३) मांडवावर
-----------------------------
३९) खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय शोधा 'उन्हाच्या वेळी त्या झाडाखाली गुरेढोरे उभी राहतात. '४
१) उन्हाच्यावेळी
२) त्या
३) गुरेढोरे
४) झाडाखाली
उत्तर-४) झाडाखाली
-----------------------------
४०) शब्दयोगी अव्यय वाक्यात काय कार्य करतात ?
१) क्रियेबद्दल माहिती देतात
२) शब्दांचा संबंध जोडतात
३) वेळ दर्शवितात
४) काळ सुचवितात
उत्तर-२) शब्दांचा संबंध जोडतात
-----------------------------
४१) पुढील कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय आले आहे ते लिहा (नोव्हें-११)
१) मी पुस्तक वाचन केले
२) त्याने एक सुंदर कविता वाचली
३) पतंग वर जात होता
४) टेबलाखाली पेन पडता.
उत्तर-४) टेबलाखाली पेन पडता.
-----------------------------
४२) 'पावसामुळे तो एका झाडाखाली थांबला' शब्दाची जात सांगा.
१) उभयान्वयी अव्यय
२) केवलप्रयोगी
३) शब्दयोगी
४) नाम
उत्तर-३) शब्दयोगी
-----------------------------
४३) सम, सारखा, सहित, समान, योग्य, विरुद्ध हे शब्दयोगी अव्यय (नोव्हें.-११)
१) नामसाधित शब्दयोगी अव्यय आहेत.
२) विशेषणसाधित शब्दयोगी अव्यय आहेत.
३) क्रिया दाखवून वाक्याचा अर्थपूरा करते.
४) नामाच्या ऐवजी येते.
उत्तर-२) विशेषणसाधित शब्दयोगी अव्यय आहेत.
-----------------------------
४४) 'उन्हाच्यावेळी त्या झाडाखाली गुरे, ढोरे उभी राहतात' वाक्यातील शब्दयोगी अव्यय शोधा.
१) उन्हाच्यावेळी
२) त्या
३) झाडाखाली
४) गुरेढोरे
उत्तर-३) झाडाखाली
-----------------------------
४५) 'हेमाने दारापुढे ठिपक्यांची सुंदर रांगोळी काढली' या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अव्ययप्रकार
सांगा.
१) क्रियाविशेषण अव्यय
२) शब्दयोगी अव्यय
३) उभयान्वयी अव्यय
४) केवलप्रयोगी अव्यय
उत्तर-२) शब्दयोगी अव्यय
-----------------------------
४६) आमच्या घरापुढेच सोमवारची मंडई असते - शब्दयोगी अव्यय ओळखा.
१) आमच्या
२) घरापुढेच
३) सोमवारची
४) मंडई असते.
उत्तर-२) घरापुढेच
-----------------------------
४७) कडे, मधे, प्रमाणे, पुर्वी, अंती, मुळे, विषयी, हे शब्दयोगी अव्यय आहेत
१) नामसाधित शब्दयोगी अव्यय
२) विशेषणसाधित शब्दयोगी अव्यय
३) धातुसाधित शब्दयोगी अव्यय
४) क्रियाविशेषणसाधित शब्दयोगी अव्यय
उत्तर-१) नामसाधित शब्दयोगी अव्यय
-----------------------------
४८) करीता, देखील, पावेतो, लागी, लागून हे शब्दयोगी अव्यय .......... आहेत.
१) नामसाधित शब्दयोगी अव्यय
२) विशेषणसाधित शब्दयोगी अव्यय
३) धातुसाधित शब्दयोगी अव्यय
४) क्रियाविशेषण साधित शब्दयोगी अव्यय
उत्तर-३) धातुसाधित शब्दयोगी अव्यय
-----------------------------
४९) खालून, मागून, आतून, वरुन, जवळून, दुरुन, समोरुन इत्यादी शब्दयोगी अव्यय आहेत
१) नामसाधित शब्दयोगी अव्यय
२) विशेषणसाधित शब्दयोगी अव्यय.
३) धातुसाधित शब्दयोगी अव्यय
४) क्रियाविशेषणसाधित शब्दयोगी अव्यय.
उत्तर-४) क्रियाविशेषणसाधित शब्दयोगी अव्यय.
-----------------------------
५०) पर्यंत, विना, समक्ष, समीप, परोक्ष हे शब्दयोगी अव्यय आहेत.
१) नामसाधित शब्दयोगी अव्यय
२) संस्कृत शब्दसाधित शब्दयोगी अव्यय
३) धातुसाधित शब्दयोगी अव्यय
४) क्रियाविशेषणसाधित शब्दयोगी अव्यय
उत्तर-२) संस्कृत शब्दसाधित शब्दयोगी अव्यय
-----------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा