१२. सामान्यरूप सराव प्रश्न
१) कंदील या शब्दाचे सामान्यरूप कोणते
अ) कंदीलात
ब) कंदील
क) कंदिला
ड) किंदिलाने
उत्तर-क) कंदिला
२) त्रिज्या या शब्दाचे सामान्यरूप शोधा
अ) त्रिज्या
ब) त्रिज्येला
क) त्रिज्यांची
ड) त्रिज्ये
उत्तर-ड) त्रिज्ये
३) छप्पर शब्दाचे सामान्यरूप शोधा
अ) छप्पर
ब) छप्परा
क) छपरा
ड) छपराची
उत्तर-क) छपरा
४) तालिम शब्दाचे सामान्यरूप कोणते?
अ) तालमी
ब) तालिमी
क) तालीमी
ड) तालिमा
उत्तर-अ) तालमी
५) पुस्तकांना या शब्दांत सामान्यरूप कोणते?
१) पुस्तक
२) पुस्तकां
३) पुस्तक
४) पुस्तके
उत्तर-४) पुस्तके
७) (घोडा) रोज खरारा करावा. कंसातील शब्दाचे रुप तयार करुन चतुर्थी विभक्ती एकवचन प्रत्यय
लावा. (डिसें-०५)
१) घोडला
२) घोडयाचा
३) घोड्याला
४) घोडला
उत्तर-३) घोड्याला
८) अनेकवचनी शब्दाच्या सामान्यरुपावर नेहमी येतो.
१) विसर्ग
२) अनुस्वार
३) कंस
४) उपसर्ग
उत्तर-२) अनुस्वार
९)कंसातील शब्दाचे सामान्य रुप निवडा 'माझ्या (अंगण) एक जांभळाचे झाड आहे. '
१) अंगणाला
२) अंगणाशी
३) अंगणाचे
४) अंगणात
उत्तर-४) अंगणात
१०) ....शब्दाचे सामान्यरुप होत नाही.
१) एकाक्षरी
२) दोनाक्षरी
३) पंचाक्षरी
४) यापैकी नाही
उत्तर-१) एकाक्षरी
११) जाईच्या वेलीला सुंदर फुल आहे. सामान्य रुप निवडा
१) सुंदर
२) वेलीला
३) जाईच्या
४) फुल
उत्तर-२) वेलीला
१२) आ-कारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्यरुप होते.
१) आ-कारान्त
२) ई-कारान्त
३) वा-कारान्त
४) या-कारान्त
उत्तर-४) या-कारान्त
१३) 'तारू' या शब्दाची विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वीचे सामान्यरुप कोणते? (डिसें-९८)
१) तारु
२) तारुस
३) तारवा
४) तारवास
उत्तर-३) तारवा
१४) ऊ-कारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्यरुप होते.
१) या-कारान्त
२) वा-कारान्त
३) ई-कारान्त
४) अ-कारान्त
उत्तर-२) वा-कारान्त
१६) योगेश गावाहून आला या वाक्यातील अन्तयाक्षरयुक्त सामान्यरुप सांगा. (मार्च- ०९)
१) गावा
२) योगेश
३) गावाहून
४) आला
उत्तर-१) गावा
१७) 'हिरवा' या विशेषणास सामान्यरुपाचा झालेला विकार ओळखा (ऑक्टो-२१०)
१) हिरवा भाजीपाला चटकन विकला जातो.
२) हिरवा भाजीपाला सर्वांना आवडतोच असे नाही
३) हिरव्या भाजीपाल्याकडे कोणाचेही लक्ष नाही.
४) हिरवा भाजीपाला सर्वांना आवडतो.
उत्तर-३) हिरव्या भाजीपाल्याकडे कोणाचेही लक्ष नाही.
१८) खालील वाक्यातील रिकामी जागा भरा. आजोबा मुलांमेळाव्यात रमून जात
१) चा
२) ची
३) च्या
४) चे
उत्तर-३) च्या
१९) 'सुंदर स्त्रीचे रुप तेजस्वी मोत्यामुळे अधिकच खुलते' या वाक्यातील कोणत्या शब्दाचे सामान्य रुप झाले आहे. (मे-०८)
१) स्त्रीचे
२) मोत्यांमुळे
३) अधिकच
४) खुलते
उत्तर-२) मोत्यांमुळे
२०) 'ओ'कारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्यरुप
होते.
१) ओ-कारान्त
२) या-कारान्त
३) ई-कारान्त
४) श-कारान्त
उत्तर-१) ओ-कारान्त
२१) विभक्तीप्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाच्या मूळ रुपात होणाऱ्या बदलाला काय म्हणतात ?
१) प्रत्यय
२) शब्दसिध्दी
३) अव्यय
४) सामान्यरुप
उत्तर-४) सामान्यरुप
२२) ए-कारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्यरुप होते.
१) ओ-कारान्त
२) या-कारान्त
३) ई-कारान्त
४) श-कारान्त
उत्तर-२) या-कारान्त
२३) 'प्रसादने अंगणातील कुत्र्याला दगड मारुन हाकलेले' या वाक्यातील अधोरेखित शब्दातील सामान्यरुप
ओळखा. (नोव्हें.-११)
१) कुत्रा
२) कुत्रे
३) कुत्र्या
४) कुत्री
उत्तर-३) कुत्र्या
२४) ई-कारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्यरुप होते.
१) ओ-कारान्त
२) या-कारान्त
३) ई-कारान्त/या कारान्त
४) श- कारान्त
उत्तर-३) ई-कारान्त/या कारान्त
२५) सामान्यरूप असलेली शब्द जोडी ओळखा. (डिसें- ११)
१) साठ-साठये
२) विहीर - विहिरीचे
३) देखील-देखलेपण
४) भरभर- भाराभार
उत्तर-२) विहीर - विहिरीचे
२६) ई-कारान्त स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरुप होते.
१) ओ-कारान्त
२) या-कारान्त
३) ई-कारान्त
४) ई / या कारान्त
उत्तर-४) ई / या कारान्त
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा