Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

बुधवार, ९ ऑगस्ट, २०२३

विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग -२ दहावी ३ सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग - २

 विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग -२ दहावी

३ सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग - २



------------------------------

■रिकाम्या जागा भरा

(1) मानवी शुक्रपेशींची निर्मिती वृषण या अवयवात होते.

 (2) मानवामध्ये Y हे गुणसूत्र पुरुषत्वासाठी कारणीभूत असते.

(3) पुरुष आणि स्त्री-जनन संस्थेमध्ये ही ग्रंथी समान असते. (याचे उत्तर शक्य नाही.) (4) भ्रूणाचे रोपण गर्भाशय या अवयवामध्ये होते. 

(5) भिन्न पेशींच्या (युग्मकांच्या) संयोगाशिवाय अलैंगिक हे प्रजनन घडून येते. (6) शरीराचे अनेक तुकडे तुकडे होऊन प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जीवन जगू लागतो. हे प्रजनन खंडीभवन अलैंगिक प्रकारचे आहे. 

(7) परागकोशातील कोष्ठकामध्ये अर्धसूत्री विभाजनाने परागकण तयार होतात. 

(8) तुमच्या वर्गातील प्रणव व प्रिती ही जुळी भावंडे आहेत. तर ह्या भावंडाचा द्वियुग्मजी जुळे हा प्रकार आहे.

--------------------------------

■नावे दया 

■(1) पुरुष प्रजनन संस्थेशी संबंधित विविध संप्रेरके..

 उत्तर : पीयुधिकेतून स्रवणारी पुटिका ग्रंथी संप्रेरक FSH आणि पीतपिंडकारी संप्रेरक LH म्हणजेच ICSH आणि वृषणातून सवणारे टेस्टोस्टेरॉन.

-------------------

 ■(2) पुरुष प्रजनन संस्थेशी संबंधित विविध ग्रंथी. 

उत्तर: शुक्राशय, पूरस्थग्रंथी आणि काऊपर्स ग्रंथी. • 

-------------------

■(3) स्त्री-प्रजनन संस्थेतील अंडाशयातून स्रवली जाणारी संप्रेरके.

 उत्तर : इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन.

-------------------

■(4) फुलातील अतिरिक्त मंडले. 

उत्तर: निदलपुंज, दलपुंज. 

-------------------

■(5) फुलातील आवश्यक मंडले. 

उत्तर पुमंग आणि जायांग • 

-------------------

■(6) जुळ्यांचे प्रकार. 

उत्तर : एकयुग्मजी जुळे, सायामिज जुळे आणि द्वियुग्मजी जुळे 

-------------------

■(7) प्रजननासंबंधी आधुनिक तंत्रज्ञान पद्धती. उत्तर : काचनलिकेतील फलन भाडोत्री मातृत्व, वीर्यपेढी.

-------------------

 ■(8) कोणतेही दोन लैंगिक रोग. 

उत्तर : एड्स, सायफिलीस आणि गोनोन्हीया.

-------------------

■लैंगिक प्रजननात मातापित्याप्रमाणे नवीन जीव गुणधर्माबाबत साम्य दाखवतो, हे विधान उदाहरणासह स्पष्ट करा. 

उत्तर : (1) लैंगिक प्रजनन दोन युग्मकांच्या साहाय्याने होते. एक युग्मक पित्याकडून येते तर दुसरे युग्मक मातेकडून आलेले असते. (2) ही दोन्ही युग्मके अर्धसूत्री विभाजनाने तयार होतात. (3) या दोन्हींचे फलन झाले की युग्मनज तयार होतात. (4) मातापित्यांकडून जी गुणसूत्रे येतात त्यांतून त्यांचा DNA त्यांच्या नवीन संततीत जातो. त्यामुळे त्याचे गुणधर्म मातापित्यां प्रमाणेच असतात. (5) लैंगिक प्रजननाची अनेक उदाहरणे हे दाखवून देतील की, नवा जीव हा काही गुणधर्माबाबत साम्य दाखवतो.

--------

■ आर्तवचक्र म्हणजे काय ? आर्तवचक्राचे संक्षिप्त वर्णन करा. 

उत्तर (1) स्त्री प्रजनन संस्थेत दर 28-30 दिवसांच्या कालावधीने होणाऱ्या बदलांच्या पुनरावृत्तीमुळे आर्तवचक्र सुरू राहते.

 (2) पुटिका ग्रंथी संप्रेरक, पीतपिंडकारी संप्रेरक ही दोन पीयुषिकेतून सवणारी आणि इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन ही अंडाशयातून खवणारी संप्रेरके अशी चार संप्रेरके या चक्राचे नियंत्रण करतात. 

(3) पुटिका ग्रंथी संप्रेरकाच्या प्रभावामुळे अंडपेशीचा विकास होण्यास सुरुवात होते. (4) ही विकसनशील पुटिका 'इस्ट्रोजेन संप्रेरक स्रवते. 

(5) इस्ट्रोजेनच्या प्रभावाखाली गर्भाशयाच्या अंतःस्तराची वाढ किंवा पुनर्निर्मिती होते. दरम्यानच्या कालावधीमध्ये या पुटिकेची पूर्ण वाढ होते.

(6) पीतपिंडकारी संप्रेरकाच्या प्रभावामुळे अंडमोचन होते. म्हणजेच पूर्ण वाढ झालेली पुटिका फुटून त्यातील अंडपेशी अंडाशयाच्या बाहेर पडते. 

(7) अंडाशयामध्ये फुटलेल्या रिकाम्या पुटिकेपासून प्रोजेस्टेरॉन निर्मिती करणारे पीतपिंड तयार होते. 

(8) प्रोजेस्टेरॉनच्या प्रभावाखाली गर्भाशयाच्या अंतःस्तरातील ग्रंथी खवतात. या अंत स्तरावर भ्रूणाचे रोपण होते. 

(9) अडपेशीचे फलन न झाल्यास पीतपिंडाचे रूपांतर श्वेतपिंडात होऊन इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन या दोन्ही संप्रेरकांचे सवणे बंद पडते. 

(10) यामुळे गर्भाशयाच्या अंत स्तराचा न्हास होतो. तेथील ऊती आणि अफलित अंडपेशी योनीमार्गाद्वारे रक्तस्रावाच्या रूपात बाहेर टाकली जाते. साधारणत: पाच दिवस हा रक्तस्राव सुरू राहतो. यालाच मासिक पाळी असे म्हणतात. 

(11) स्त्री गरोदर नसेल तर रजोनिवृत्ती येईपर्यंत दरमहिन्याला असे आर्तवचक्र सुरू राहते.

--------------------------------

■IVF ही संकल्पना स्पष्ट करा. 

उत्तर : (1) IVF म्हणजे In Vitro Fertilization, म्हणजेच शरीराबाहेर फलन. (2) आधुनिक वैदयकशास्त्रातील हे तंत्रज्ञान ज्यांना मूल हवे आहे अशा अपत्यहीन दाम्पत्यांसाठी वापरण्यात येते. (3) शुक्रपेशींचे अल्प प्रमाण अंडपेशीचा अंडनलिकेमध्ये प्रवेश करण्यात असलेले अडथळे या कारणांवर मात करण्यासाठी हे तंत्र वापरतात. (4) मातेची अंडपेशी बाहेर काढून ती काचनलिकेत ठेवली जाते. त्यावर पित्याच्या शुक्रपेशी सोडून काचनलिकेतच फलन केले जाते. (5) हे फलित झालेले युग्मनज नंतर मातेच्या गर्भाशयात रोपण केले जाते अशा तंत्राने अपत्यप्राप्ती करता येते.

----------------------

■लैंगिक आरोग्य राखण्यासाठी तुम्ही काय काळजी घ्याल ? 

उत्तर : शरीरातील इतर संस्थांप्रमाणेच प्रजनन संस्था ही देखील एक संस्थाच आहे. सर्वप्रथम लैंगिक आरोग्याविषयी योग्य आणि शास्त्रीय माहिती असायला हवी. शरीराची स्वच्छता याचबरोबर लैंगिक दृष्टिकोनाबाबत मनाची स्वच्छता हेही आरोग्याचेच लक्षण आहे. लैंगिक संबंधांच्या बाबतीत जागरूकता ठेवावी. नको त्या कोवळ्या वयात याबाबत प्रयोग करण्याने लैंगिक आरोग्य कायमस्वरूपी बदलू शकते. मासिक पाळीच्या काळातील स्वच्छता, गुप्तांगाची स्वच्छता या गोष्टी वैयक्तिक स्वरूपाच्या आहेत. समाजात वावरताना कोणत्याही परिस्थितीत लैंगिक आजारापासून दूर राहावे.

---------------------

■भाडोत्री मातृत्व काचनलिकेतील फलन,वीर्यपेढी इत्यादी आधुनिक तंत्रज्ञान मानवास उपयुक्त ठरेल. या विधानाचे समर्थन करा.

 उत्तर : (1) काही दाम्पत्यांना मूल हवे असून होत नाही अशा वेळी माता किंवा पिता यांच्या शरीरात किंवा प्रजननक्षमतेत काहीदोष असू शकतो. अशा वेळी भाडोत्री मातृत्व, वीर्यपेढी किंवा IVF यासारखी आधुनिक तंत्रे वापरली जातात. (2) स्त्रीच्याबाबत मासिक पाळीतील अनियमितता, अंडपेशी निर्माण न होणे, अंडनलिकेत किंवा गर्भाशयाच्या रोपणक्षमतेतील अडथळे इत्यादी कारणांमुळे अपत्यप्राप्ती होऊ शकत नाही. (3) पुरुषांमध्ये वीर्यामध्ये शुक्रपेशींचा पूर्णपणे अभाव, शुक्रपेशींची मंद हालचाल, शुक्रपेशीतील विविध व्यंग इत्यादी कारणांमुळे वंध्यत्व येऊ शकते. पण आधुनिक वैद्यकतंत्रज्ञानामुळे आता या अडचणींवर मात करता येते. यासाठी पुढील उपाय करता येतात (अ) भाडोत्री मातृत्व ज्या स्त्रियांमध्ये गर्भाशय रोपणक्षम नसते अशा स्त्रियांना भाडोत्री मातृत्व ही उपचार पद्धती वापरता येते. या पद्धतीत जिला मातृत्व हवे अशा स्त्रीच्या अंडाशयातून अंडपेशी बाहेर काढण्यात येते. या अडपेशीचे काचनलिकेमध्ये त्याच स्त्रीच्या पतीच्या शुक्रपेशींचा वापर करून फलन घडवून आणले जाते. यातून तयार झालेला भ्रूण दुसऱ्या भाडोत्री मातेच्या गर्भाशयात रोपण केला जातो. (आ) काचनलिकेतील फलन : अंडपेशी आणि शुक्रपेशी यांचे फलन काचनलिकेमध्ये घडवून आणले जाते. या फलनातून तयार झालेला भ्रूण योग्य वेळी दाम्पत्यातील स्त्रीच्या गर्भाशयात रोपण केला जातो. शुक्रपेशींचे अल्प प्रमाण, अडपेशी अंडनलिकेमध्ये प्रवेश करण्यात असलेले अडथळे इत्यादी कारणामुळे अपत्य होत नसेल तर IVF हे तंत्र वापरून अपत्यप्राप्ती करता येते. (इ) वीर्यपेढी जर पुरुषामध्ये शुक्राणुनिर्मिती होत नसेल किंवा त्यांचे प्रमाण कमी असेल तर अशा दाम्पत्यांना वीर्यपेढीचा लाभ घेऊन अपत्यप्राप्ती करता येते. वीर्यपेढीमध्ये आरोग्यपूर्ण दात्यांकडून सखोल शारीरिक आणि इतर तपासण्यांनंतर त्यांनी स्खलित केलेले वीर्य साठवून ठेवले जाते. या वीर्यपेढीतले वीर्य वापरून IVF तंत्राने भ्रूणाची निर्मिती करण्यात येते.

-------------------------------

■1)कलिकायन.

उत्तर : एकपेशीय कवकामध्ये अलैंगिक प्रजनन हे कलिका तयार 

---------------------------

■(2) खंडीभवन.

तुकडा नवजात सजीव म्हणून जीवन जगू लागण्याच्या क्रियेला खंडीभवन असे म्हणतात.

करून होते, या क्रियेला कलिकायन असे म्हणतात. उत्तर : जनक सजीवाच्या शरीराचे अनेक तुकडे होऊन प्रत्येक

---------------------------

■(3) पुनर्जनन.

उत्तर : विशिष्ट परिस्थितीमध्ये स्वतःच्या शरीराचे दोन तुकडे करून प्रत्येक तुकड्यापासून शरीराचा उर्वरित भाग तयार करून दोन नवजात प्राणी निर्माण करण्याच्या पद्धतीला पुनर्जनन म्हणतात.

---------------------------

■(4) मुकुलायन.

उत्तर : शरीरभित्तिकेवर विशिष्ट ठिकाणी पुनर्जनन पेशींच्या विभाजनाने फुगवटा किंवा मुकुल तयार करून त्याच्या वाढीनंतर त्याचे रूपांतर नवजात सजीवात करणे या क्रियेला मुकुलायन म्हणतात.

---------------------------

■(5) शाकीय प्रजनन.

उत्तर : वनस्पतींमध्ये मूळ, खोड, पान, मुकुल यांसारख्या शाकीय अवयवांच्या मदतीने होणाऱ्या प्रजननास शाकीय प्रजनन म्हणतात.

---------------------------

■(6) फलन.

उत्तर : स्त्रीयुग्मक आणि पुंयुग्मक या एकगुणी पेशींचा संयोग होऊन एका द्विगुणित युग्मनजाची निर्मिती होण्याची क्रिया म्हणजे फलन होय.

---------------------------

■(7) पुष्पवृंत.

उत्तर : फुलांना आधारासाठी जो देठ असतो, त्याला पुष्पवृत म्हणतात.

---------------------------

■(8) परागण / परागीभवन.

उत्तर : फुलाच्या परागकोशातील परागकण स्त्रीकेसराच्या कुक्षीवर स्थानांतरित होतात. यालाच परागण किंवा परागीभवन असे म्हणतात.

---------------------------

■9)स्वयंपरागण.

उत्तर : जेव्हा परागण क्रिया एकाच फुलात किंवा एका झाडाच्या दोन फुलांत होते, तेव्हा त्यास स्वयंपरागण असे म्हणतात.

-------------------------------

■(10) परपरागण.

उत्तर : जेव्हा परागण क्रिया एकाच जातीच्या दोन भिन वनस्पतींमधील फुलांमध्ये घडून येते, तेव्हा त्यास परपरागण असे म्हणतात

-------------------------------

■(11) भ्रूणकोश.

उत्तर : फुलाच्या अंडाशयात एक किंवा अनेक बीजांडे असतात त्यातल्या प्रत्येक बीजांडामध्ये अर्धगुणसूत्री विभाजनाने जो कोश तयार होतो, त्याला भ्रूणकोश असे म्हणतात..

-------------------------------

■(12) भ्रूणपोष

उत्तर : फलनाच्या क्रियेत अंकुरलेल्या परागकणातून बाहेर येणारे दुसरे पुंयुग्मक दोन ध्रुवीय केंद्रकांशी संयोग पावल्यानंतर तयार होणाऱ्या पोषकद्रव्याला भ्रूणपोष असे म्हणतात.

-------------------------------

■13)रजोनिवृत्ती.

उत्तर : स्त्री- प्रजनन संस्थेचे कार्य वयपरत्वे आणि संप्रेरकांच्य कमी प्रमाणामुळे थांबते, त्याला रजोनिवृत्ती असे म्हणतात.

-------------------------------

■(14) 3TURT.

उत्तर : गर्भाशयातील वाढीच्या काळात भ्रूणास अन्नपुरवठ -ण्यासाठी जो अवयव तयार होतो, त्यास अपरा असे म्हणतात.

-------------------------------

■(15) आर्तवचक्र.

उत्तर : यौवनावस्थेनंतर स्त्रीच्या प्रजनन संस्थेमध्ये होणान्य ची दर 28-30 दिवसांच्या कालावधीने पुनरावृत्ती होत असते नरावृत्तीने होणाऱ्या बदलांना आर्तवचक्र किंवा ऋतुचक्र म्हणतात. 

-------------------------------

■(16) पीतपिंड.

उत्तर : अंडमोचन क्रियेनंतर अंडाशयामध्ये फुटलेल्या पुटिकेपासूनसंप्रेरक स्राव निर्माण करणारे पिवळसर रंगाचे पिंड तयार होते, पीतपिंड असे म्हणतात.

-------------------------------

■(17) श्वेतपिंड.

उत्तर : स्त्रीच्या शरीरात अंडपेशीचे फलन 24 तासांत जर झ नाही तर पीतपिंड अकार्यक्षम होऊन त्याचे रूपांतर ज्या पिंडात होते, त्यास श्वेतपिंड असे म्हणतात.

-------------------------------

■(18) अंडमोचन.

उत्तर : संप्रेरकाच्या प्रभावाने पूर्ण वाढ झालेली पुटिका फुर त्यातील अंडपेशी अंडाशयाच्या बाहेर पडते, या क्रियेला अंडमोचन असे म्हणतात.

-------------------------------

■(19) IVF.

उत्तर : काचनलिकेमध्ये फलन घडवून आणि त्यानंतर तयार झालेला भ्रूण योग्य वेळी दाम्पत्यातील स्त्रीच्या गर्भाशयात रोपण करून वाढवणे या तंत्राला IVF म्हणजेच In Vitro Fertilization

-------------------------------

■पुमंग.

उत्तर : पुयुग्मकेनिर्मिती.

-------------------------------

(5) जायांग.

उत्तर : स्त्रीयुग्मकेनिर्मिती. फळ तयार करताना सहभाग.

-------------------------------

(6) भ्रूणपोष.

उत्तर : वाढणाऱ्या भ्रूणाचे पोषण.

-------------------------------

(7) वृषण.

उत्तर : शुक्रपेशीनिर्मिती आणि पुरुष संप्रेरक, टेस्टोस्टेरॉनची निर्मिती.

-------------------------------

(8) वृषणकोश.

उत्तर : वृषणाचे संरक्षण, वृषणाचे तापमान नियंत्रण.

-------------------------------

(9) शुक्राशय.

उत्तर : रेत ज्यापासून बनते तो स्राव तयार करणे. शुक्रपेशींचे पोषण करणे.

-------------------------------

(10) शिश्न.

उत्तर : समागमाच्या वेळी रेत बाहेर टाकणे. एरव्ही मूत्र बाहेर टाकणे.

-------------------------------

(11) अंडाशय.

उत्तर : अंडपेशीची निर्मिती. स्त्री संप्रेरके इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन यांची निर्मिती.

-------------------------------

■1.पुरुष प्रजनन संस्थेशी संबंधित विविध संप्रेरके.

उत्तर : पीयुषिकेतून सवणारी पुटिका ग्रंथी संप्रेरक FSH आणि पीतपिंडकारी संप्रेरक LH म्हणजेच ICSH आणि वृषणातून सवणारे निर्मिती टेस्टोस्टेरॉन.

---------------------------

■(2) पुरुष प्रजनन संस्थेशी संबंधित विविध ग्रंथी. उत्तर: शुक्राशय, पूरस्थग्रंथी आणि काऊपर्स ग्रंथी.

---------------------------

■ (3) स्त्री-प्रजनन संस्थेतील अंडाशयातून स्रवली जाणारी संप्रेरके. उत्तर : इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन.

---------------------------

■(4) फुलातील अतिरिक्त मंडले. 

उत्तर : निदलपुंज, दलपुंज.

---------------------------

■(5) फुलातील आवश्यक मंडले.

उत्तर : पुमंग आणि जायांग.

---------------------------

■(6) जुळ्यांचे प्रकार.

उत्तर : एकयुग्मजी जुळे, सायामिज जुळे आणि द्वियुग्मजी जुळे

---------------------------

■ (7) प्रजननासंबंधी आधुनिक तंत्रज्ञान पद्धती.

उत्तर : काचनलिकेतील फलन, भाडोत्री मातृत्व, वीर्यपेढी.

---------------------------

■एकाच प्रजातीच्या दोन सजीवांमध्ये तंतोतंत साम्य असणे किंवा नसणे हे कशावर अवलंबून असते ?

उत्तर : प्रजनन लैंगिक प्रकारचे आहे की अलैंगिक आहे, गुणसूत्रांमध्ये पारगती किती होते, जनुकांचा पुनःसंयोग कितपत होतो यांवर साम्य-भेद अवलंबून असतात. जनुकांचा पुनः संयोग होत

---------------------------

■एका सजीवापासून त्याच प्रजातीचा नवीन सजीव तयार होणे आणि पेशीविभाजन यांचा काय परस्परसंबंध आहे?

उत्तर प्रजनन या प्रक्रियेत गुणसूत्रांचे विभाजन होते. पेशीविभाजन या प्रक्रियेनेच नवी युग्मके तयार होतात. याच युग्मकांच्या फलनानंतर नवा जीव निर्माण होतो. लैंगिक प्रजननाच्या पद्धतीत या सर्व क्रिया पेशीविभाजनानेच घडतात. अलैंगिक प्रजनन

हे देखील पेशींच्या विभाजनानेच होते.

---------------------------

■स्त्रीयुग्मक आणि पुंयुग्मक जर द्विगुणित (2n) असते । तर काय झाले असते ?

उत्तर : द्विगुणित युग्मकांचे फलन झाल्यास चतुःगुणी (4n) युग्मनज • निर्माण होईल. यामुळे खूप मोठ्या प्रमाणात विकृती निर्माण होतील. गुणसूत्रांची संख्या देखील नियंत्रित राहणार नाही.

---------------------------


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा