Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शनिवार, ३० सप्टेंबर, २०२३

सप्टेंबर ३०, २०२३

दहावी मराठी २०. सर्व विश्वचि व्हावे सुखी

 दहावी मराठी    २०.   सर्व विश्वचि व्हावे सुखी


कृती १ : (आकलन कृती) 

(१) चौकटी पूर्ण करा :

(1) संत ज्ञानेश्वर यांनी मानवाच्या कल्याणासाठी केलेली विश्वप्रार्थना

- पसायदान 

--------------------------------------------

(२) पुढील काव्यपंक्तींचा अर्थ लिहा : 


 (i) जे खळांची व्यंकटी सांडो   - माणसांच्या मनातील दुष्ट भाव नष्ट होऊ दे.

 (ii) दुरितांचें तिमिर जावो    -  (दुरित म्हणजे दुष्कर्म.) सर्व      दुष्कर्मांचा अंधार नष्ट होऊ दे.

 -------------------------------------------------------------

  कृती ४ : (स्वमत/अभिव्यक्ती) 

 • सर्व संतांच्या प्रार्थनेमधील सामाईक सूत्र तुमच्या शब्दांत थोडक्यात लिहा. 

   उत्तर : सकाळी उठल्यावर किंवा घरातून बाहेर पडताना माणूस देवाच्या पाया पडतो आणि 'दिवस चांगला जाऊ दे; कोणत्याही अडचणी नको येऊ देत' अशी आळवणी करतो. रात्री झोपण्यापूर्वी देवाला नमस्कार करून दिवस चांगला गेल्याबद्दल त्याच्याजवळ कृतज्ञता व्यक्त करतो. खरे तर दिवसभरात कधीही संकट आले की, देवाची प्रार्थना करतो. नीट पाहिल्यावर लक्षात येईल की, प्रत्येक माणूस स्वत:साठी, स्वत:च्या कुटुंबीयांसाठी किंवा मित्रमंडळींसाठी देवाकडे याचना करतो. ही खूपच मर्यादित, वैयक्तिक व स्वार्थी प्रार्थना आहे. कारण सामान्य माणसे स्वत:पलीकडे पाहू शकत नाहीत.

संतांचे तसे नाही. त्यांना सर्व प्राणिमात्रांबद्दलच कळवळा वाटतो. त्यांच्या मनात आपपरभाव नसतो. त्यांना सर्व माणसे समान वाटतात; सारखीच प्रिय वाटतात. म्हणून संतमहात्मे सर्व मानवजातीचे कल्याण इच्छितात. म्हणूनच 'जो जे वांछील तो ते लाहो' असे ज्ञानदेव म्हणतात. नामदेवांना वाटते की, सर्वांच्या मनातला अहंकार नष्ट व्हावा. म्हणजे सगळेजण एकमेकाला स्वतःच्या हृदयात सामावून घेतील. संत एकनाथांना सर्वांच्याच ठिकाणी भगवद्भाव आढळतो. संत तुकाराम महाराज सर्वांनी एकमेकाला साहाय्य करीत परमेश्वर चरणांपर्यंत जाण्याचा मार्ग दाखवतात. सर्वच संत स्वतःसाठी काहीही मागत नाहीत. ते समस्त मानवजातीसाठी, समस्त प्राणिमात्रांसाठी परमेश्वराकडे हात जोडून प्रार्थना करतात.

-------------------------------------------------

कृती १ : (आकलन कृती)

 (१) पुढील चौकटी पूर्ण करा :

(i) मानवी सुखदुःखाशी सहृदयतेने समरस होणे

 -   मैत्री 

-------------------------------

(ii) 'सर्वांभूती भगवद्भावो' अशी प्रार्थना करणारे संत

  - संत एकनाथ 

-------------------------------

(iii) सामाजिक प्रबोधनावर भर देणारे संत

  - संत गाडगे माहाराज 

------------------------------------------

(iv) संत तुकारामांचे जीवनसूत्र

- परस्पर सहकार्य 

----------------------------------------------------

(२) आकृत्या पूर्ण करा : 

(i) अपयशी माणसासाठी संतांनी केलेले मार्गदर्शन -

 - धर्मकृत्यांसाठी पैसे खर्च करण्याऐवजी तेच पैसे खर्च करून शिक्षण घ्यावे.

 - स्वतःच स्वतःचा उद्धार करण्यासाठी पुढे सरसावले पाहिजे.

 - सर्वांनी ग्रंथांचा अभ्यास केला पाहिजे.

 - नेहमी सत्य तेच मांडावे.

--------------------------------------------------------

(ii) संतांना माणसाकडून अपेक्षित असलेल्या आदर्श कृती-

- विनम्रता जोपासावी.

- सहृदय मनाने समरस झाले पाहिजे.

 - परस्पर सहकार्यातून मानवी जीवनाचे कल्याण साधावे.

  - अज्ञान नाहीसे करावे.

------------------------------------------

(iii) संतांनी सांगितलेले मैत्रीचे निकष-

 - सहृदय मनाने समरस होणे. 

 - दुसऱ्यांच्या आनंदात आनंद मानणे.

   - दुसऱ्यांच्या दुःखात त्याला आधार देणे.

   - आपपरभाव न मानणे.

------------------------------------------------------


• (३) पुढील तक्ता पूर्ण करा. त्यासाठी कंसातील शब्दांचा उपयोग करा : 

   (नम्रता, मैत्रभाव, विश्वकल्याण, स्वप्रयत्न, सहकार्य)

१) 

 काव्यांश         →     'सर्व विश्वचि व्हावे सुखी

संतांचे नाव     → संत तुकडोजी महाराज

व्यक्त भावना   →    विश्व कल्याण

------------------------------------

२) 

काव्यांश            →   'अहंकाराचा वारा न लागो राजसां '  

संतांचे नाव        →  संत नामदेव

व्यक्त भावना     →  नम्रता

--------------------------------------

३) 

काव्यांश            →  'सर्वांभूती भगवद्भावो' 

संतांचे नाव        →   संत एकनाथ

व्यक्त भावना     →    मैत्री भाव

----------------------------------

काव्यांश       →  'एक एका साह्य करूं। अवघे धरू सुपंथ'

संतांचे नाव      →  संत तुकाराम

व्यक्त भावना   →  सहकार्य

----------------------------------------

५) 

काव्यांश           →  'स्वत:चा उद्धार करा प्रयत्नाने '

संतांचे नाव        →   संत गाडगे माहाराज

व्यक्त भावना     →   स्वप्नयत्न

--------------------------------------------

कृती ४ : (स्वमत / अभिव्यक्ती) 

•  भूतां परस्परे पडो । मैत्र जीवाचें ।' या ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा. 

    उत्तर : ही ओळ ऐकताच आपल्या सर्वांच्या मनात एक भाव नक्की जागा होतो. सर्वांना एकमेकांविषयी प्रेम वाटावे, जिव्हाळा निर्माण व्हावा अशी इच्छा ज्ञानदेव देवाकडे व्यक्त करतात. 

        या ओळीतील 'भूत, मैत्र आणि जीव' हे तीन शब्द खूप महत्त्वाचे आहेत. देह धारण करणारा प्रत्येकजण 'भूत' होय. म्हणून जगातली सगळी माणसे भूत होत. पण फक्त माणसेच नव्हेत, तर सूक्ष्मजीवांपासून ते हत्ती- गेंडे यांसारखे सर्व प्राणिमात्र भूत होत. तसेच वृक्षवेली यासुद्धा सजीवच आहेत. त्यासुद्धा भूत होत. या सर्वांच्या मनात एकमेकांबद्दल निर्मळ, पवित्र अशी प्रेमभावना निर्माण झाली पाहिजे, ही इच्छा ज्ञानदेव देवाजवळ व्यक्त करतात. जात, धर्म, भाषा, प्रांत वगैरे गोष्टींवरून आपण अनेकांना शत्रू समजतो. या भावना बाह्य गुणांवर अवलंबून आहेत. ज्ञानदेव या गोष्टींच्या पलीकडे जायला सांगतात. प्रत्येक जण सुखीच असेल. नेमकी हीच मागणी ज्ञानदेव विश्वात्मक देवाकडे करीत आहेत.

---------------------------------------------------

  या पाठातून तुम्ही काय शिकलात, ते तुमच्या शब्दांत लिहा. 

  उत्तर : सर्व संतांनी व्यापक दृष्टिकोन बाळगून लोकांना उपदेश केला आहे. सर्व लोकांनी एकमेकांशी प्रेमाने वागावे. एकमेकांना, अडीअडचणीत असलेल्या सर्वांना मदत करावी. सर्वांमध्ये सहकार्याची भावना हवी. या तऱ्हेने सर्वजण वागू लागले, तर समाजात शांती नदिल. माणसे सुखासमाधानाने जगू लागतील. या अशा वातावरणातच माणसे प्रगती करू शकतात. अशा वातावरणात चोऱ्यामाऱ्या होणार नाहीत. दंगेधोपे होणार नाहीत. कोणाची पिळवणूक होणार नाही. कोणाची फसवणूक होणार नाही. कोणावर अन्याय होणार नाही. एकंदरीत, सर्व व्यवस्था ही न्यायावर आधारलेली राहील. म्हणून सर्वांनी एकोप्याने राहावे, असे सर्व संत सांगतात. इतरेजनांशी सहृदयतेने समरस झाले पाहिजे. सर्वांनी शिक्षण घेतले पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगला पाहिजे. हा पाठ वाचून मला हाच संदेश मिळाला.------

--------------------------------------------------------------

 

सप्टेंबर ३०, २०२३

दहावी मराठी 19 तू झालास मूक समाजाचा नायक

 दहावी मराठी  19 तू झालास मूक समाजाचा  नायक

कृती १ : (आकलन कृती) 

 (१) आकृत्या पूर्ण करा : 

 (i) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट

 - मळवाट 

---------------------------------------

(ii) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत करणारे

 - खाचखळगे 

--------------------------------------

iii )   डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली कार्ये - 

→  परिस्थितीवर मात करून नवा इतिहास घडवला.

 →  मूक समाजाचे नेतृत्व केले. 

 →  बहिष्कृत भारत जागा केला.

  →  चवदार तळ्याचा संग्राम केला.

------------------------------------------

(२) कवितेतील संदर्भ आणि स्पष्टीकरण यांच्या जोड्या लावा :

कवितेतील संदर्भ                         स्पष्टीकरण

(i) मळवाट              (अ) अन्यायाविरुद्ध आवाज उठवू न   शकणारा समाज 

(ii) खाचखळगे          (आ) पारंपरिक वाट

(iii) मूक समाज        (इ) अडचणी, कठीण परिस्थिती

 उत्तर  : (i) मळवाट  →  पारंपरिक वाट

    ii) खाचखळगे    → अडचणी, कठीण परिस्थिती

    iii) मूक समाज   →  अन्यायाविरुद्ध आवाज उठवू न  शकणारा समाज 

-----------------------------------------------

                       

कृती २ : (आकलन कृती) 

(१) चवदार तळ्याच्या घटनेनंतरच्या पन्नास वर्षांत वातावरणात झालेल्या बदलाचे वर्णन करणाऱ्या ओळी लिहा.

- (i) सूर्यफुले ध्यास घेत आहेत.

  -  (ii) बिगूल प्रतीक्षा करीत आहे.

 -------------------------------------------

(२) चवदार तळ्याच्या घटनेसंदर्भात तुलना करा :

  पन्नास वर्षांपूर्वीची परिस्थिती

 - (i) सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती. 

  - (ii) रणशिंग फुंकले होते.

  - (iii) चवदार तळ्याचे पाणी पेटले होते.

  पन्नास वर्षांनंतरची परिस्थिती 

        - सूर्यफुले ध्यास घेत आहेत. 

       - आता बिगूल वाट पाहत आहे. 

       - आता चवदार तळ्याचे पाणी थंड आहे.

--------------------------------------------------------------

कृती ३ : (काव्यसौंदर्य कृती) 

(१) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कवितेतून जाणवलेले कर्तृत्व तुमच्या शब्दांत लिहा. 

  उत्तर : पारंपरिक वर्णव्यवस्थेने नाकारलेल्या व दैन्य, दारिद्र्याच्या अंधारात खितपत पडणाऱ्या मूक समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नवविचारांचा प्रकाश दाखवला. अन्यायाविरुद्ध न बोलणाऱ्या समाजात जागृती निर्माण केली. सर्व सुखांनी पाठ फिरवलेली असताना व अडचणींचा मार्ग असताना पारंपरिक वाटेने जायचे नाकारून, कठीण परिस्थितीवर मात करून डॉ. बाबासाहेबांनी नवा इतिहास घडवला. बहिष्कृत भारताला आत्मविश्वास दिला. अगाध ज्ञानाच्या बळावर लढा पुकारून शोषित जनतेच्या पायातल्या बेड्या मुक्त केल्या. चवदार तळ्याचा संग्राम यशस्वी केला. अशा प्रकारे पीडित व शोषित समाजाला सन्मानाने जगायला शिकवले.

-------------------------------------------------------------

(२) अगाध ज्ञानाच्या बळावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर केलेले कार्य, तुमच्या शब्दांत थोडक्यात लिहा. 

  उत्तर : अतिशय कठीण परिस्थितीमा डॉ. बाबासाह आंबेडकरांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांनी ही पदवी संपादन केली, ते उच्य विषित होते. त्यांनी ज्ञानाच्या बळावर इथल्या बहिष्कृत समाजाला अन्त करण्याचे अतिशय महत्त्वाचे कार्य अंगिकारले, शोषित, पीडित व वर्णव्यवस्थेतून नाकारलेल्या, समुदयीपासून वंचित असलेल्या जनतेला संघटित केले. त्यांनी 'शिका, संघटित व्हा व कर्म देऊन शोषित समाजाला आत्मविश्वास दिला. अन्यायाविरुदय या देण्यास प्रवृत्त केले. चवदार तळयाचा संग्राम यशस्वी केला. समाजाला बोधितत्त्वाची शिकवण देऊन बौद्ध धर्म स्वीकारला. स्वतंत्र भारता संविधान लिहून भारतीय राज्यघटनेचे ते शिल्पकार ठरले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना, त्यांच्या अगाध कर्तृत्वाला मानवंदनासाठी ''भारतरत्न' हा सर्वोच्च बहुमान सन्मानाने बहाल करण्यात आला.

 ------------------------------------------------------------

 

सप्टेंबर ३०, २०२३

दहावी मराठी १८. निर्णय

दहावी मराठी १८.  निर्णय


कृती १ : (आकलन कृती)

आकृत्या पूर्ण करा : 

 हॉटेलमधील मनोज या वेटरच्या अंगचे गुण

 - प्रमाणिकरण

  - प्रसंगावधान

------------------------------------

    दुकानातील रोबोची वैशिष्ट्ये

-  रोबो हुबेहूब माणसासारखे दिसतात.

  - वागतातही माणसासारखे.

   - त्यांची किंमत प्रत्येकी एक लाख रुपये

 - सर्व्हिसिंगचा खर्च दर दोन महिन्यांनी अडीच हजार रुपये

------------------------------------------------

कृती २ : (आकलन कृतों

 रोबोंना काम करण्यासाठी सज्ज करण्याच्या कृतींच्या घटनाक्रमाचा ओघतक्ता तयार करा :

-  (i) चार्जिंग सुरू करणे.

-(ii) रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत चार्जिंग चालू ठेवणे. 

- (iii)सकाळी ६ वाजता कडक इस्त्रीचे कपडे रोबोंना चढवणे. 

- ((iv) डाव्या खांदयावरील पॉवर स्वीच सुरू करणे.

------------------------------------------------

कृती ४ : (स्वमत / अभिव्यक्ती) 

•  रोबो व माणूस यांच्या वागण्यातील ठळक फरक पाठाच्या आधारे स्पष्ट करा. 

उत्तर: रोबो हे एक यंत्र आहे. माणूस हा एक मन व हृदय असणारा बुद्धिमान सजीव प्राणी आहे. रोबो सजीव नाही. हॉटेल हेरिटेजमध्ये काम करणारे चार रोबो वेटर हे यंत्र होते. यंत्र असल्यामुळे ते कामे अचूक, अधिक वेगाने आणि सफाईदारपणे करीत असतात. त्यांच्यात कामचुकारपणा असण्याचा प्रश्न निर्माण होत नव्हता. अचानक एके दिवशी त्यांच्यात बिघाड झाला आणि विचित्र पद्धतीने वागून त्यांनी मोठा गोंधळ उडवून दिला. तिथे माणसे असती तर वेगळे चित्र दिसले असते. मानवी वेटरांनी परिस्थिती बघून स्वतःहून कामात योग्य ते बदल केले असते. रोबोंसारखी विचित्र कृती नक्कीच केली नसती. दुसऱ्या प्रसंगी तर झोपलेली बाई आणि बेशुद्ध पडलेली बाई यांच्यातला फरक रोबोंना कळलाच नाही. ती बाई बेशुद्ध पडलेली आहे, हे मनोजला कळले. म्हणून योग्य ती उपाययोजना तातडीने केली गेली आणि त्या बाईचा प्राण वाचला. रोबोला स्वतःची बुद्धी नसल्यामुळे तो स्वतंत्रपणे विचार करू शकला नाही. जिथे जिथे यंत्रमानव आहेत तिथे तिथे हेच घडणार.

----------------------------------------------------------

 •  'तंत्रज्ञान हे माणसाला पूरक आहे, पर्याय नाही, या विधानाबाबत तुमचे विचार लिहा.

     उत्तर : मी माझे विचार एका उदाहरणाच्या साहाय्याने सांगतो. एक उच्चशिक्षित दरोडेखोर असतो. तो स्वतःच्या घरातल्या संगणकासमोर बसतो आणि संगणकामार्फत लोकांच्या बँक खात्यांमधून त्यांचे पैसे पळवतो. या दरोडेखोरांना मदत कुणाची होत आहे? त्या संगणकाची, यंत्राची. आता विचार करा. त्या यंत्राच्या जागी माणूस असता तर ? त्या माणसाने त्या दरोडेखोराला मदत केली नसती. म्हणजे आपण करीत असलेले काम योग्य की अयोग्य, चांगले की वाईट, हे यंत्राला ठरवता येत नाही. ते माणूसच ठरवू शकतो. कारण माणसाकडे मन, बुद्धी व भावना या गोष्टी असतात. यंत्राकडे मात्र या गोष्टी नसतात. माणूस स्वतःच्या बुद्धीने, स्वतःच्या अंतःकरणाने काम करतो. यंत्र हे सांगकाम्या नोकर असते. त्याला सज्जन- दुर्जन, पाप-पुण्यवान है काहीही कळत नाही. म्हणून यंत्र कधीच मानवाची जागा घेऊ शकत नाही. कामे त्वरेने, अचूक व सफाईदारपणे करण्यासाठी की मदद करते; म्हणजे ते माणसाला पूरक आहे. ते माणसाला पर्याय ठरू शकत नाही. 

--------------------------------------------------

•  "माणुसकीमुळे माणूस श्रेष्ठ ठरतो, 'या विधानाचा अर्थ स्पष्ट करा. 

  उत्तर : हॉटेल हेरिटेजमध्ये घडलेल्या प्रसंगातून आपल्याला खूप मोलाचा संदेश मिळतो. या हॉटेलमध्ये रोबो वेटर ठेवल्यामुळे खूप फायदा झाला. वेटरसंबंधातल्या समस्या दूर करता आल्या, यात शंका नाही. पण कोणत्याही मानवी व्यवहारांमध्ये एवढे पुरेसे नसते. माणसांशी माणसासारखे वागण्याला खूप महत्त्व असते. असे वागता येण्यासाठी प्रथम आपल्या मनात माणुसकी असावी लागते. रोबो यांत्रिकपणे निर्णय घेतात. एक गोष्ट येथे लक्षात घेतली पाहिजे की, कोणत्याही घटनेने माणसांच्या जीवनात भावनिक व वैचारिक वादळे निर्माण होतात. हा परिणाम प्रत्येकाला ओळखता आला पाहिजे. हे फक्त मानवी मनालाच शक्य आहे. माणसाकडेच माणुसकी असते. सर्व प्राण्यांमध्ये माणूस श्रेष्ठ ठरला, याचे कारण माणसाकडे असलेली माणुसकी होय..

 --------------------------------------------

सप्टेंबर ३०, २०२३

दहावी मराठी १७. सोनाली

दहावी मराठी १७. सोनाली



कृती १ : (आकलन कृती) 

(१) आकृत्या पूर्ण करा :

 लेखकाने निवडलेल्या पिलाची वैशिष्ट्ये

 - जन्म होऊन दोन महिने झाले होते 

 - कमी फिसकार गारे व शांत स्वभावाचे 

 - इतर पिल्लांपेक्षा सशक्त

------------------------------------------

कृती १ : (आकलन कृती)

१) सोनाली आणि रुपाली यांची झोपण्यापूर्वीची दंगामस्ती

- दोघीही बिछान्यात चक्क नाचत, कुदत.  

 - थकल्यावर झोपण्यासाठी आपापली जागा पकडत. 

- रूपाली 'फुस्' करून अंग टाकी व झोपी जाई. 

 - सोनालीला लगेच झोप येत नसे. तिला लहान मुलासारखे थोपटावे लागे. मगच ती झोपी जाई.

------------------------------------------------

कृती २ : (आकलन कृती) 

 (१) तुलना करा : 

सोनाली 

- (i) रुपालीपेक्षा ७ दिवसांनी लहान, लहानखुरी.  दिसायला 

- (ii) रूपाली गुरगुरली की सोनाली बापडी होऊन कोपऱ्यात बसे. 

 - (iii) वय वाढल्यावर रूपालीच्या दुप्पट-चौपट वाढली. 

- (iv) रुपालीला सहज तोंडात उचलून धरी. पण रूपालीला तिचे दात लागत नसत.

 *****

 रूपाली

-(i) वयाने सोनालीपेक्षा मोठी. सुरुवातीला अंगापिंडाने- सुद्धा मोठी.

-(ii) सोनालीवर ताईगिरी करायची. सोनालीवर गुरगुरायची. तिला दमात घ्यायची.

 -(iii) वय वाढल्यावर लहानखुरीच राहिली. 

 -(iv) रुपालीने तरीही आपला ताईपणा सोडला नाही. गुरगुरून 'दटावीत असे. सोनालीला

----------------------------------------------------------------------

 सोनाली आणि रूपाली यांच्यातील मैत्री दर्शवणाऱ्या त्यांच्या दोन सवयी लिहा. 

-(i) सोनाली व रूपाली एकत्र फिरत, एकत्र झोपत 

-(ii) एकत्र जेवण घेत.

-----------------------------------------------------

कृती १ : (आकलन कृती)  

(१) पुढील वाक्यांतून दिसणारे सोनालीच्या स्वभावाचे पैलू लिहा :

वाक्ये                   स्वभावाचे पैलू

    (i) रूपाली सोबत नसली तर पंजे मारी. सोनाली जाळीच्या दारावर 

   - सोनाली रूपालीवर मैत्रिणी- सारखे प्रेम करीत होती.

----------------------------------------------------

      (ii) सोनालीने डरकाळी फोडली. मोठ्ठी एक शांत होऊन

       - जेवणाच्या वेळी फसवले, तर तिला संताप येई.

---------------------------------------------------

 (iii) सोनाली लेखकाचे पाय चाटू लागली.

- झालेल्या चुकीबद्दल क्षमा मागण्याची ही वृत्ती दिसून येते.

-----------------------------------------------

(३) पुढील घटना केव्हा घडल्या ते लिहा : 

घटना केव्हा घडली? 

 घटना                            

(1) सोनाली अण्णांवर रागावली. 

(ii) सोनालीने  पातेल्याची चाळणी केली. 

(iii) लेखक हातातले काम टाकून दरवाजाजवळ धावले.

केव्हा घडली?

- (i) जेवणाचा डबा न घेताच अण्णा गच्चीत सोनालीकडे गेले, तेव्हा. 

- (ii) सोनालीला दूध प्यायला दिलेले पातेले लेखक परत आणायला विसरले, तेव्हा. 

-  (iii) सोनालीची बंगल्याच्या घुमली, तेव्हा. डरकाळी आवारात. 

------------------------------------------------------

कृती ४ : (स्वमत / अभिव्यक्ती)

  •'पशूंना कोणी फसवले तर त्यांना राग येतो,' यासंबंधी तुम्ही अनुभवलेली घटना तुमच्या शब्दांत लिहा. 

           उत्तर : ही आमच्या गावातली प्रत्यक्षात घडलेली घटना आहे. सुट्टीमध्ये टेकाडावरच्या वडाच्या झाडावर पकडापकडी खेळणे हा आमचा लाडका खेळ असे. असेच आम्ही एकदा पारंब्यांना लोंबकळत खेळत होतो. निरंजनने बिस्किटे आणली होती. ती आम्ही वरच्या वर एकमेकांकडे फेकत आणि झेलत होतो. झोके घेता घेता झेल घेणे खूप कौशल्याचे होते. आम्ही बिस्किटे खात होतो. एखादे खाली पडत होते. आमच्या सोबतचा कुत्रा ते पडलेले बिस्कीट खाई. ते पाहून निरंजनला लहर आली. तो खाली उतरला. त्याने एक बिस्कीट दूर फेकले. दूरवर जाऊन त्या कुत्र्याने ते खाल्ले. नंतर नंतर निरंजन बिस्किटे फेकण्याची बतावणी करू लागला. विचारा कुत्रा धावत जाई पण त्याला काही मिळत नसे. तो रागाने गुरगुर करीत होता. निरंजनने पातळसा दगड घेऊन बिस्कीट म्हणून फेकला. कुत्रा मोठ्या आशेने तिकडे धावला. पण बिस्कीट नाही, हे कळताच तो चवताळला. संतापाने निरंजनकडे धावला. निरंजन घाबरून पारंबीवर चढला. सरसर वर चढू लागला. चवताळलेला कुत्रा तिथे आलाच. त्याने झेप घेतली आणि निरंजनला पकडले. पण निरंजनची पॅन्ट फक्त त्याच्या तोंडात आली. पॅन्ट टर्रर्र करून फाटली. आम्ही सगळे स्तब्ध होऊन बघतच राहिलो. 

-------------------------------------------------------

कृती : (स्वमत/अभिव्यक्ती) 

• सोनाली व दीपाली यांच्यातील जिव्हाळा व्यक्त करणारा प्रसंग तुमच्या शब्दांत लिहा. 

 उत्तर : वन्य प्राणी हिंस असतात, अशी सर्व माणसांची समजूत आहे. अन्य प्राण्यांना मारण्यासाठीच ते टपलेले असतात, अशीही एक समजूत माणसांमध्ये निर्माण झालेली आहे. पण वन्य प्राणी माणसांप्रमाणे उत्कटपणे प्रेम करू शकतात, नव्हे करतात, हा हृदय अनुभव या पाठात ठायी ठायी प्रत्ययाला येतो. दीपालीवर सोनालीचा खूप जीव होता. दीपाली सोनालीबरोबर तासन्तास खेळत बसे. पण तिला सोनालीने कधीही इजा केली नाही. एकदा दीपाली सोनालीबरोबर खेळत बसली होती. तेवढ्यात एक पेशन्ट तिथे आला. त्याला ते दृश्य पाहून धक्काच बसला. दीपाली चुकून सिंहिणीकडे गेली असावी, या कल्पनेने तो धावला आणि त्याने दीपालीला चटकन उचलून घेतले. एक परका माणूस प्रिय व्यक्तीला उचलून घेतो याचा सोनालीला संताप आला. ती त्याच्यावर फिसकारली आणि चवताळून त्याच्यावर धावली. तिचा तो अवतार पाहून त्याने दीपालीला तशीच टाकली. तेवढ्यात अण्णा बाहेर आले. त्यांना घडलेली हकिकत समजली. तो प्रसंग प्रत्यक्ष पाहण्यासाठी अण्णांनी त्या गृहस्थाला दीपालीला उचलायला सांगितले. त्या गृहस्थाने दीपालीला हात लावला, मात्र सोनाली चवताळून त्याच्या अंगावर धावली. लेखकांचे घर हे आता तिला स्वतःचे घर वाटत होते. घरातली माणसे ही आता तिची माणसे झाली होती. परक्या माणसांनी घरातल्या माणसांना हातसुद्धा लावणे तिला मंजूर नव्हते. सोनालीच्या मनातली प्रेमाची ही उत्कट भावना या प्रसंगातून व्यक्त होते..

----------------------------------------------------------------------------

 

सप्टेंबर ३०, २०२३

दहावी मराठी १६. आकाशी झेप घे रे (कविता)

दहावी मराठी १६. आकाशी झेप घे रे (कविता) 

कृती १ : (आकलन कृती) 

(१) योग्य पर्याय ओळखा :

(1) सुखलोलुप झाली काया म्हणजे  - सुख उपभोगण्याची सवय लागते.

(ii) पिंजरा सोडून शेप घेतल्याने  - आपल्याला स्व-सामर्थ्याची जाणीव होते.

(iii) देवाने पंख दिल्यामुळे   - शक्तीने संचार करता येतो.

---------------------------------------------------

(३) कवीने यशप्राप्तीच्या संदर्भात सांगितलेली सुवचने लिहा :

 (i) - तुला देवाने पंख दिले आहेत. सामर्थ्याने विहार कर.

  (ii) - कष्टाविण फळ मिळत नाही.

---------------------------------------------------------

कृती २ : (आकलन कृती) 

 (१) तुलना करा :

 पिंजऱ्यातील पोपट

(i) पारतंत्र्यात राहतो 

 (ii) लौकिक सुखात रमतो 

(iii) कष्टाविण राहतो

(iv) जीव कावराबावरा होतो

 (v) मनात खंत करतो

*******

 पिंजऱ्याबाहेरील पोपट 

- स्वातंत्र्य उपभोगतो 

- स्वबळाने संचार करतो 

- कष्टात आनंद घेतो

- मन प्रफुल्लित होतेसुंदर जीवन जगतो

------------------------------------------

(४) पाखराला स्वसामर्थ्याची ओळख करून देणाऱ्या कवितेतील ओळी शोधून लिहा :

- तुज पंख दिले देवाने कर विहार सामर्थ्याने

---------------------------------------------

कृती ३ : (काव्यसौंदर्य कृती) 

 (१) 'आकाशी झेप घे रे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा' या ओळींतील मथितार्थ स्पष्ट करा. 

  उत्तर : 'आकाशी झेप घे रे' या कवितेमध्ये कवी जगदीश खेबुडकर यांनी पारतंत्र्यात खितपत पडलेल्या पाखराला म्हणजेच माणसांच्या परावलंबी मनाला मोलाचा उपदेश केला आहे व स्वातंत्र्याचे मोल समजावून सांगितले आहे. 

    प्रस्तुत ओळीतील मथितार्थ असा की यामध्ये पाखराला आकाशात भरारी घेण्याचे आवाहन केले आहे. वैभव, सत्ता, संपत्ती हा लौकिकातील सोन्याचा पिंजरा आहे. त्यात अडकलेल्या जिवाची गती खुंटते. त्याच्या जीवनाची प्रगती होत नाही. सुखसोईमुळे कर्तृत्व थांबते. म्हणून हा सोन्याचा पिंजरा सोडून ध्येयाच्या मोकळ्या व उंच आकाशात तू झेप घे. अशा प्रकारची आत्मिक शिकवण या ओळींतून प्रत्ययाला येते.

----------------------------------------------------------

(२) 'स्वसामर्थ्याची जाणीव' हा उत्तम व्यक्तिमत्त्व विकासाचा पाया आहे, ' हे विधान स्पष्ट करा.

 उत्तर : जीवन जगत असताना माणसाला अनेक अडचणींना तोंड दयावे लागते. समस्यांचा सामना करता करता कधी माणूस हतबल होऊन जातो. मग तो देवावर हवाला ठेवू लागतो. नशिबाला दोष देतो. पण हे असे वागणे अगदी नकारात्मक आहे. परिस्थिती बदलण्याचा माणसाने निकराने प्रयत्न करायला हवा. 'प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे।' अशी समर्थ रामदासांची उक्ती आहे. त्याप्रमाणे आत्मबळ एकवटणे महत्त्वाचे ठरते. स्वतःच्या सामर्थ्यावर भरवसा ठेवता आला पाहिजे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन गोरगरिबांच्या शिक्षणाची सोय केली. 'रयत शिक्षण संस्था' निर्माण केली. आज त्याचा महावृक्ष झाला आहे. यावरून असे स्पष्ट होते की 'स्वसामर्थ्याची जाणीव' हा उत्तम व्यक्तिमत्त्व विकासाचा पाया आहे. 

--------------------------------------------------------

(३) 'घर प्रसन्नतेने नटले, ' याची प्रचिती देणारा तुमचा अनुभव लिहा. 

   उत्तर : कवी जगदीश खेबुडकर यांनी 'आकाशी झेप घे रे' या कवितेमध्ये माणसाला उपदेश करताना घर प्रसन्नतेने नटायचे असेल तर श्रमदेवाची पूजा करावी लागेल, हे समजावून सांगितले आहे. कोणतीही गोष्ट घरबसल्या मिळत नाही. 'दे रे हरी । खाटल्यावरी' असा चमत्कार होणे शक्य नसते. घर प्रसन्नतेने कसे नटते याची प्रचिती देणारा माझा स्वतःचा अनुभव सांगतो - मला माझ्या आईसाठी थंडीमध्ये स्वेटर विणायचे होते, मी अभ्यासाची व शाळेची वेळ सांभाळून फावल्या थोड्या वेळात दररोज एक तास काढून कष्टाने स्वेटर विणले, ते आईला देताना तिच्या डोळ्यांत जे आनंदाश्रू चमकले, तेच माझ्या कष्टाचे फळ होते. आईचा तो आनंद पाहून मला घर प्रसन्नतेने नटल्याचा अवीट अनुभव आला.

------------------------------------------------------

• प्रश्न. पुढील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दांत लिहा :      'घामातुन मोती फुलले श्रमदेव घरी अवतरले. '

 उत्तर : आशयसौंदर्य : सुप्रसिद्ध मराठी गीतकार जगदीश खेबुडकर यांची 'आकाशी झेप घे रे' ही मराठी चित्रपटातील एक गीतरचना आहे. स्वसामर्थ्यावर अदम्य विश्वास ठेवून कर्तृत्वाचे मोकळे आकाश ओळखावे आणि ध्येयाकडे उंच भरारी घ्यावी, परावलंबित्व सोडून स्वावलंबी व्हावे, ही या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. स्वकर्तृत्वाने यशाचे शिखर गाठावे व उच्च ध्येयाकडे झेप घ्यावी. पारतंत्र्याचा त्याग करून स्वातंत्र्याचे मोल जाणावे, हा अमूल्य संदेश ही कविता देते.

काव्यसौंदर्य : वरील ओळींमध्ये कवींनी श्रमाचे महत्त्व सांगितले आहे. कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही. अविरत प्रयत्न व काबाडकष्ट करून जेव्हा शेतकरी शेतामध्ये खपतो, तेव्हा त्याला मोत्यांसारखे पीक मिळते. त्याच्या घामातून मोती फुलतात. ते धनधान्य त्याच्या घरी येते, तेव्हा त्याच्या श्रमाचे सार्थक होते. जणू श्रमदेव त्याच्या घरी अवतरतात.

भाषिक वैशिष्ट्ये : ध्रुपद व कडवी अशी या गीताची सुटसुटीत रचना आहे. रसाळ शब्दकळा व नेमके मर्म सांगणारी भाषा हे या कवितेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. 'पिंजरा' हे सुखलोलुपतेचे प्रतीक वापरले आहे व त्यात कैद झालेल्या मानवी मनाला 'पक्षी' म्हटले आहे. साध्या शब्दांत गहन आशय मांडला आहे. यमकप्रधान गेय रूपामुळे कविता मनात ठसते.

------------------------------------------------

 

सप्टेंबर ३०, २०२३

दहावी मराठी १५. खोद आणखी थोडेसे

दहावी मराठी  १५.  खोद आणखी थोडेसे



कृती १ : (आकलन कृती)

 (२) आकृती पूर्ण करा :

 'मनातले गाणे' असे म्हटल्यावर तुम्हांला सुचणाऱ्या कल्पना 

- आईवडिलांविषयी कृतज्ञता भाव

 - देशप्रेम, मातृभूमीचा अभिमान

 - गुरुजनांविषयी आदर

 - मित्र/मैत्रिणींबद्दलचा जिव्हाळा

------------------------------------------------------

(३) कवितेतील पुढील संकल्पना व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा : 


      कवितेतील संकल्पना                       संकल्पनांचा अर्थ

  (i) सारी खोटी नसतात नाणी  नसतात.      - सगळे लोक फसवे

 (ii) घट्ट मिटू नका ओठ   करावेत.     - मनातील विचार व्यक्त

 (iii) मूठ मिटून म्हणायचे भरलेली कशाला  - भ्रामक खोट्या समजुती बाळगू नयेत.

 (iv) उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी  - मनातील  सामर्थ्य व्यापक बनवावे

  --------------------------------------------------------------------                                                                                                        

कृती २ : (आकलन कृती)      

 (३) योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा : 

(i) 'खोदणे' या शब्दाचा कवितेतील अर्थ म्हणजे..... 

  - जिद्दीने आणखी प्रयत्न करणे.

---------------------------------            

  (ii) गाणे असते मनी म्हणजे...... 

 - मनात नवनिर्मिती क्षमता असते.

-------------------------------

(४) कवितेच्या आधारे पुढील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा :

  (i) संयमाने वागा तली तळी.             -                 योग्य 

  (ii) सकारात्मक राहा                       -                  योग्य   

  (iii) उतावळे व्हा                              -              अयोग्य             

  (iv) चांगुलपणावर विश्वास ठेवा          -               योग्य

  (v) नकारात्मक विचार करा                -             अयोग्य

   (vi) खूप हुरळून जा                        -             अयोग्य

   (vii) संवेदनशीलता जपा                  -              योग्य

   (viii) जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास कायम ठेवा  -  योग्य 

   (ix) जुन्याच निर्मितीवर विश्वास ठेवा         -        अयोग्य

    (x) नवनिर्मितीवर विश्वास ठेवा                -          योग्य

    (xi) धीर सोडू नका                              -         योग्य

    (xii) यशाचा विजयोत्सव करा                 -      अयोग्य  

----------------------------------------------------           

कृती ३ : (काव्यसौंदर्य कृती) 

 (१) 'आर्त जन्माचे असते, रित्या गळणाऱ्या पानी' ओळींमधील अर्थ तुमच्या भाषेत लिहा.  उत्तर : कवयित्री आसावरी काकडे यांनी 'खोद आणखी थोडेसे' या कवितेमध्ये माणसाने प्रयत्नवादी होऊन जगण्याची उमेद धरावी, असा उपदेश केला आहे. 

     कवयित्री म्हणतात - • घट्ट ओठ मिटून दुःख सोसत बसू नये. आपल्या मनात खोलवर एक गाणे लपलेले असते, ते शोधून काढायला हवे. हे समजावताना त्यांनी 'गळणाऱ्या पानाचे' प्रतीक वापरले आहे. शिशिरऋतूमध्ये पानगळ होते. झाड निष्पर्ण होते. परंतु जे पान सुकून, रिते होऊन झाडापासून विलग होते त्या पानात झाडावर असताना सोसलेल्या वेदना असतात. हे जन्माचे आर्त, आयुष्यात सोसलेल्या वेदना, त्या सुरकुतलेल्या गळणाऱ्या पानात सामावलेल्या असतात म्हणून पुन्हा वसंतात पालवी फुटण्याची उमेद ते बाळगून असते. गळणाऱ्या पानामधून जीवन जगण्याची उमेद पुन्हा जागृत होते, हा आशावाद या ओळींतून व्यक्त झाला आहे.

--------------------------------------------------------------

(२) 'गाणे असे गं मनी' या ओळीतील तुम्हांला समजलेला नवनिर्मिती क्षमतेचा संदेश स्पष्ट करा. 

  उत्तर : आसावरी काकडे यांनी 'खोद आणखी थोडेसे' या कवितेमधून सकारात्मक जीवन जगण्याची शिकवण देताना प्रत्येकाच्या मनात असलेल्या निर्मितिक्षमतेला आवाहन केले आहे.

        कवयित्रींच्या मते - मातीखाली लपलेला झरा शोधेपर्यंत माणसाने अथक प्रयत्न करायला हवेत. धीर एकवटून आयुष्याचा सकारात्मक शोध घ्यायला हवा. घट्ट ओठ मिटून दुःख सोसत राहू नये. प्रत्येकाचे मन हे निर्मितिक्षम असते. त्या अंतर्मनातील गाभ्याशी ज्याचे त्याचे गाणे दडलेले असते. मनाच्या तळाशी असलेले हे गाणे मर्मबंधाची ठेव असते. आपल्यात मग्न होऊन ते गाणे अनुभवणे हे जीवनाचे सार्थक ठरते. आपल्यातल्या निर्मितिक्षमतेचा शोध आपणच घ्यायला हवा. मनात असलेली निर्मितिक्षमता जागी करायला हवी म्हणजे मग 'आनंदाचे डोही आनंद तरंग' ही अवस्था अनुभवता येईल. 

     अशा प्रकारे कवयित्रींनी 'गाणे असते गं मनी' या ओळीतून माणसाला नवनिर्मिती क्षमतेचा संदेश दिला आहे.

------------------------------------------------------------

(३) 'परिश्रमाशिवाय फळ मिळत नाही' याबाबतीत तुम्ही घेतलेला अनुभव लिहा. 

  नमुना उत्तर : आमचे 'बाभूळगाव' हे गरीब शेतकऱ्यांचे गाव होय। डोंगरझाडी व विकट मार्ग त्यामुळे ते तालुक्याच्या गावापासून लांब व सोयींच्या बाबतीत अडचणीचे आहे. आमच्या गावात जेमतेम चौथीपर्यंतच शाळा, तीही एकशिक्षकी एका पडक्या घरात भरायची. पाचवीनंतरच्या विद्याथ्र्यांना जंगलातून वाट काढत दहा किलोमीटर लांबवर तालुक्याच्या गावच्या शाळेत जावे लागायचे. आमचे रोकडे मास्तर फार मेहनती होते. त्यांनी तालुक्याच्या शिक्षणाधिकाऱ्याला एक अर्ज लिहिला व आम्हां मुलांना प्रत्येक पालकाची त्यावर सही आणायला सांगितले. प्रत्येक विदयार्थ्याने आपापल्या पालकांची सही व अंगठा आणला. पंचक्रोशीतही आम्ही जाऊन मोठमोठ्या माणसांना भेटलो. त्यांच्या शिफारशी गोळा केल्या. गेल्या १५ ऑगस्टला आम्ही शिक्षणाधिकाऱ्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले व गुरुजींनी त्यांना पुढच्या शिक्षणव्यवस्थेचा अर्ज दिला. काही निवडक मुलांनी भाषणे करून पुढील शिक्षणाची व्यवस्था गावात होण्यासाठी विनवले. अखेर अथक व निष्ठेने केलेल्या प्रयत्नांमुळे आमच्या गावात जि.प. ची शाळा मंजूर झाली. आम्हांला 'परिश्रमाचे फळ' मिळाले!

--------------------------------------------------------------

 

सप्टेंबर ३०, २०२३

दहावी मराठी १३. कर्ते सुधारक कर्वे

दहावी मराठी १३. कर्ते सुधारक कर्वे



कृती २ : (आकलन कृती) 

 (१) पुढील आकृत्या पूर्ण करा : 

 (i) महर्षी कर्वे यांना अपेक्षित असलेले स्वातंत्र्य प्रकार

 -  राष्ट्रीय स्वातंत्र्य

  -  संपूर्ण स्वातंत्र्य

-------------------------------------------

(ii) महर्षी कर्वे यांचे स्त्री-स्वातंत्र्याबद्दलचे विचार

   - स्त्रियांना गुलामीतून मुक्त करायचे असेल तर देशाला संपूर्ण स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. 

    - आपण गुलाम आहोत याचे स्त्रीला भान आले पाहिजे. 

    - स्त्रीने शिक्षण घेतलेच पाहिजे. 

     - शांतपणे, सोशीकपणे व सहिष्णू वृत्तीने स्त्री-शिक्षणाची चळवळ केली पाहिजे.

------------------------------------------------------

(iii) महर्षी कर्वे यांची प्रेरणास्थाने

 - पंडिता रमाबाई यांचे जीवनचरित्र 

- ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे जीवनकार्य

-------------------------------------------

(२) महर्षी कर्वे यांच्या कार्यकुशलतेचा ओघतक्ता तयार करा.

  कार्यात नेमकेपणा होता.

 - ते बोलत नसत. 

  - विचार करीत असत.

 -विचार पक्का झाला की 

  - तो विचार आचरणात आणत. 

  - लोकांना त्यांच्या कृतीतून त्यांचा विचार समजत असे.

-----------------------------------------------

(३) पाठाच्या आधारे वाक्यांचा उर्वरित भाग लिहून वाक्ये  पूर्ण  करा. 

(i) स्त्रीने स्वातंत्र्य कमवावे असे वाटणे म्हणजे -

 - खडकावर डोके गिळून टाकायला येईल.

----------------------------------------------------------------

 (ii) समाजाविरुद्ध विद्रोह केला तर 

  - वद्रोह करणाऱ्याला समाज गिळून टाकायला येईल.

-----------------------------------------------------------

 (iii) लोकांनी कर्वे यांची ससेहोलपट चालवली तरी

- कर्व्यांनी त्यांना शिव्याशाप दिले नाहीत किंवा आपल्या कार्यापासून विचलित कर्वे झाले नाहीत.

------------------------------------------------------------

कृती ४ : (स्वमत / अभिव्यक्ती)

• 'जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण' हे वचन महर्षी कर्वे यांच्या जीवनाला कसे लागू पडते, ते स्पष्ट करा. 

 उत्तर : अण्णासाहेबांनी फार मोठे स्वप्न पाहिले होते. ते फार मोठी झेप घेऊ पाहत होते. त्यांच्या स्वप्नाला संपूर्ण समाजाची साथ मिळाली. नाही. समाजाने अण्णासाहेबांना ओळखलेच नाही. समाजाने साथ दिली नाहीच; उलट पराकोटीचा विरोध केला. त्यांचा सतत अपमान केला. त्यांना धक्काबुक्की केली. त्यांचे कपडे फाडले. हे रोज घडत होते. त्यामुळे स्वतःचे कपडे रोज रोज शिवण्याची पाळी त्यांच्यावर येई. स्त्री-शिक्षणासाठी देणग्या गोळा केल्या तर भ्रष्टाचाराचा सतत धाक दाखवला जाई. त्यांच्या चळवळीमुळे कुटुंबीयांनाही त्रास सहन करावा लागे. त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यातही आला होता. हे सर्व यातनामय होते. लोककल्याणासाठी अण्णासाहेबांनी या यातना सहन केल्या. आज आपण अण्णासाहेबांची स्मारके उभारतो. परंतु प्रत्यक्ष जीवनात त्यांना दुःख, कष्ट आणि यातनाच सहन कराव्या लागल्या. 'जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण' हे तुकाराम महाराजांचे वचन अण्णासाहेबांना तंतोतंत लागू पडते.

-------------------------------------------------------------------------------

कृती १ : (आकलन कृती) 

 (१) आकृती पूर्ण करा : 

  महर्षी कर्वे यांची स्त्रियांबाबतची स्वप्ने

  - स्त्री स्वाभिमानी बनली पाहिजे.

   - स्त्री शिकली पाहिजे.

  - उच्चविद्याविभूषित होऊन पुरुषांशी स्पर्धा केली पाहिजे.

  - स्त्रीला पुरुषाइतकेच स्वातंत्र्य मिळाले पाहिजे.

---------------------------------------------------------

(२) हे केव्हा घडेल ते लिहा : 

(i) कर्त्या सुधारकाने सुरू केलेले कार्य पूर्णत्वास जाईल , 

     - जेव्हा पुरुषांचेही ‘शिक्षण' होईल.

----------------------------------------------

(ii) स्त्री पुरुषांशी स्पर्धा करू शकेल, 

- जेव्हा ती उच्चविद्याविभूषित होईल.

-------------------------------

(३) चौकटी पूर्ण करा : 

  (i) लेखकांच्या मते, दुसऱ्याच्या दुःखात दुःखी व सुखात सुखी होणारा   - स्थितप्रज्ञ

(ii) कर्वे यांना लोकमानसाने दिलेली पदवी  - महर्षी

(iii) कर्वे यांना राजमानसाने दिलेली पदवी- भारतरत्न

------------------------------------------------------

कृती २ : (आकलन कृती) 

(१) कार्य या शब्दासाठी पाठात आलेली विशेषणे लिहा.     

  कार्य या नामाची विशेषणे :

 मोठे, अतोनात, कठीण, ऐतिहासिक, जटिल, अटीतटीचे, महाकठीण, अलौकिक,  महान इत्यादी.

-------------------------------------------

कृती ४ : (स्वमत / अभिव्यक्ती) 

(१) 'कर्ते सुधारक कर्वे' पाठातून महर्षी अण्णा कर्वे यांचे तुम्हांला जाणवलेले वेगळेपण तुमच्या शब्दांत सांगा. 

 उत्तर : अण्णासाहेब कर्वे यांचे फार मोठे वेगळेपण या पाठातून वाचकांसमोर येते. अण्णासाहेबांनी महान कार्य करून भारताला उपकृत करून ठेवले आहे. जगात अशी अनेक मोठी माणसे होऊन गेली आहेत. पण अण्णासाहेब या सगळ्यांत वेगळे उठून दिसतात. त्याला कारण आहे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातला महत्त्वाचा गुण. बऱ्याच वेळा सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांना स्वतःच्या सामाजिक कार्याचा गर्व असतो. ती माणसे या गर्वामुळे आक्रमक बनतात. अण्णासाहेबांची प्रकृती याबाबतीत नेमकी उलटी होती. त्यांना प्रचंड आत्मविश्वास होता. पण गर्व नव्हता. ते कधीच आक्रमक बनले नाहीत. उलट ते शांतपणे, कोणावरही न रागावता, आक्रस्ताळेपणा न करता आपले काम करीत. त्यांचे अपमान झाले. अडवणूक झाली. त्यांच्यावर हल्ले झाले. जाता-येता त्यांचे कपडे फाडले गेले. पण ते विचलित झाले नाहीत. घाबरले नाहीत किंवा दुःखीकष्टीही झाले नाहीत. ते स्थितप्रज्ञाप्रमाणे शांत राहिले. नव्हे ते स्थितप्रज्ञच होते. हा त्यांचा गुण, त्यांचा वेगळेपणा मला खूप भावला आहे. खूप आवडला आहे.

-----------------------------------------------------

(२) 'स्त्रियांनी शिकणे अत्यंत गरजेचे आहे, 'या   विधानामागील अण्णांचा दृष्टिकोन स्पष्ट करा. 

उत्तर : समाजात स्त्रियांची संख्या पुरुषांइतकीच असते. थोडी कमी-जास्त भरेल. पण साधारणपणे स्त्रिया म्हणजे समाजाचा अर्धा भाग होय. दुर्दैवाने आपल्या समाजाने स्त्रियांना मागासलेले ठेवले. त्यामुळे अर्धा समाज मागासलेला राहिला. त्याचे अनंत तोटे समाजाला आजसुद्धा भोगावे लागत आहेत. बैलगाडीचा एक बैल धडधाकट आहे आणि दुसरा कमकुवत, रोगट व लंगडा असेल तर ती बैलगाडी चांगले कार्य पार पाडूच शकणार नाही. आपण जबरदस्ती केली तर ती कशीबशी ओढली जाईल. काम कसेबसे, तेही अर्धेकच्चे पार पडेल. त्याला वेळसुद्धा प्रचंड लागेल. एकूण नुकसानच होईल. असेच नुकसान सामाजिक प्रगतीमध्ये होते. बहुतेक वेळा हे नुकसान मोजता येत नाही. मोजता न आल्यामुळे आपले किती नुकसान झालेले आहे, हे कळतही नाही. स्त्रियांना मागासलेले ठेवल्यामुळे समाजाची अर्धी बुद्धिमत्ता निरुपयोगी राहते. त्या बुद्धीचा समाजाला उपयोग झाला असता, पण ती वाया जाते. पुरुष बहुतांश वेळा स्वार्थी व आत्मकेंद्री असतो. स्त्री अधिक सामाजिक असते. यामुळे कुटुंबातला पुरुष शिकला तर कुटुंबातील एका व्यक्तीचा विकास होतो. मात्र स्त्री शिकली तर त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो. अखंड कुटुंब शिक्षित होते. आपण हे ओळखले पाहिजे. स्त्रीला पुरुषांच्या बरोबरीचे स्थान दिले पाहिजे.

 ----------------------------------------------------

 

सप्टेंबर ३०, २०२३

दहावी मराठी १२. भरतवाक्य

         दहावी मराठी १२. भरतवाक्य



कृती १ : (आकलन कृती) 

(१) आकृती पूर्ण करा :

 •👍  चारित्र्यसंपन्न बनण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी 

 (१) - सुसंगतीत राहावे  

 (२) - सुविचार ऐकावे

 (3)- बुद्धीचा कलंक झडावा

-----------------------------------------

👍टाळल्या पाहिजेत अशा गोष्टी 

    (१) - विषयवासना नको 

    (२) - दुरभिमान नसावा 

    (३) - निश्चय ढळू नये

------------------------------------

(२) पुढील ओळींचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा : 

 (i) मति सदुक्तमाग वळो 

- कुमार्ग सोडून चांगल्या मार्गावर बुद्धी वळवावी. म्हणजेच सत्कार्य करावे.

 (ii) न निश्चय कधी ढळो

- दृढ केलेला निर्धार कधीही विचलित होऊ नये.

---------------------------------

कृती २ : (आकलन कृती)


(१) आकृती पूर्ण करा :

 मन वाईट गोष्टींकडे वळू नये म्हणून करायच्या गोष्टी 

 - मन भवचरित्रावर (परमार्थावर) जडवावे.

 - मनातील निश्चय ढळू देऊ नये.

  -  भजन मन करताना विचलित होऊ नये. 

  -  मन मलीन होऊ देऊ नये.

------------------------------------------------

(२) योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा :

 (i) कवीच्या मते मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात, म्हणून 

   - सतत परमेश्वराचे नामस्मरण करावे. 

------------------------------------------------

 (ii) सदंघ्रिकमळीं दडो म्हणजे 

 - कमळातून मधुसेवन करणाऱ्या भुंग्याप्रमाणे सज्जनाच्या पायाशी मन गुंतो.

--------------------------------------------------------

(३) पुढील गोष्टींच्या बाबतीत कवी परमेश्वराजवळ कोणतीविनंती करतात, ते लिहा :


            गोष्ट                            विनंती 


    (i) निश्चय          - कधीही ढळू नये. 

    (ii) चित्त             -   भजन करताना विचलित होऊ नये.

     (iii) दुरभिमान     -         सर्व गळून जावा

      (iv) मन              -            मलीन होऊ नये

--------------------------------------------

कृती ३ : (काव्यसौंदर्य कृती) 

 (१) 'स्वतत्त्व हृदया कळो; दुरभिमान सारा गळो; या काव्यपंक्तीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा. 

   उत्तर : माणसाने चारित्र्यसंपन्न होण्यासाठी कवी मोरोपंत यांनी 'भरतवाक्य' या केकावलीमध्ये जनांना मोलाचा उपदेश केला आहे. 

      सत्संग करून माणसाने सन्मार्गाला लागावे. चांगला मार्ग आचरण्यासाठी बुद्धीला योग्य वळण लावावे. स्वतःमधील स्वत्त्व मनोमन ओळखावे. आत्मविश्वास वाढवावा. गर्विष्ठपणाचा त्याग करावा. दुरभिमान अजिबात बाळगू नये. आपले मन वाईट विचारांनी मलीन, भ्रष्ट करू नये. मन शुद्ध करावे. आत्मज्ञान वाढवावे. आत्मज्ञानामध्ये सर्व अनिष्ट गोष्टी जाळून टाकाव्यात. अशा प्रकारे विवेकी व प्रगल्भ विचार या चरणांमध्ये कवी मोरोपंत यांनी व्यक्त | केला आहे.

----------------------------------------------------

(२) सत्प्रवृत्त व्यक्तीची तुम्हांला जाणवलेली वैशिष्ट्ये तुमच्या शब्दांत लिहा.

 उत्तर : सत्प्रवृत्ती व्यक्ती म्हणजे सज्जन व्यक्ती. ही मनाने अतिशय निर्मळ असते. सर्व प्राणिमात्रांबद्दल तिच्या मनात नितांत प्रेमभाव वसत असतो. कुविचारांना त्यांच्या मनात जराही थारा नसतो. त्यांचे हृदय करुणेने ओतप्रोत भरलेले असते. काम, क्रोध, मद, मत्सर, आलस्य व मोह या षड्विकारांवर त्यांनी मात केलेली असते. ते सदैव परोपकारी असतात. दुसऱ्यांच्या दुःखाने व्यथित होणारे त्यांचे मन सतत तळमळत राहते. त्यांच्या हातून सदैव सत्कार्य घडते. त्यांच्या हृदयात दया, क्षमा, शांती वसत असते. सत्प्रवृत्त व्यक्ती अंतर्बाह्य पारदर्शक असते. ही सज्जनांची मला जाणवलेली वैशिष्ट्ये आहे. 

----------------------------------------------

(३) वाईट गोष्टींचा मोह टाळण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल, ते लिहा.

  उत्तर : सर्वप्रथम चांगल्या गोष्टी व वाईट गोष्टी कोणत्या यांची निवड विवेकबुद्धीने करावी. त्यानंतर वाईट गोष्टींचा त्याग करण्यासाठी मन खंबीर करावे. बुद्धी स्थिर ठेवावी. चंचलता सोडून दयावी. चांगल्या मित्रांच्या संगतीत नेहमी राहावे. त्यांचा योग्य तो सल्ला घ्यावा. थोरामोठ्यांचा आदर करावा. त्यांचे अनुभवाचे बोल ग्रहण करावेत. चांगल्या संस्कारमय पुस्तकांचे वाचन करावे. सद्विचाराने वर्तन करावे. दुसऱ्यांचे मन जाणून घ्यावे. शक्यतो परोपकार करावा. आपल्या वागण्याचे कुणीही दुखावणार नाही याची काळजी घ्यावी. प्रेममय हृदय धारण करावे. जनात आपण प्रिय ठरू असे वर्तन करावे. 

------------------------------------------------------------

• 'सुसंगति सदा घडो; सुजनवाक्य कानीं पडो.'

 उत्तर : आशयसौंदर्य : 'केकावली' या काव्यग्रंथाची समाप्ती करताना उपसंहार म्हणून ही 'भरतवाक्य' काव्यरचना कविश्रेष्ठ मोरोपंतांनी लिहिली आहे. तनामनातील दुर्गुण जाऊन सद्गुण कोणते व कसे अंगिकारावे, याबद्दल देवाकडे आर्त प्रार्थना केली आहे. 

    काव्यसौंदर्य : 'सुसंगती' म्हणजे चांगल्या, सज्जन व्यक्तीची मैत्री होय, गुणवान व चारित्र्यवान माणसांच्या संगतीत सदैव राहावे, म्हणजे आपली आत्मिक प्रगती व ज्ञानप्राप्ती होते, असा आशय उपरोक्त ओळींमध्ये व्यक्त झाला आहे. 'सुजनवाक्य' म्हणजे सुविचारांची धारणा जर केली, तर मन निर्मळ व प्रेमळ होते. असाही सुयोग्य सल्ला मोरोपंतांनी जनसामान्यांना दिला आहे. 

भाषिक वैशिष्टस्तुत : ओर्कीमध्ये सामान्य माणसांना परमार्थाची आवड लागावी, म्हणून दोन वर्तन-नियम सांगितले आहेत. सायकाने चारित्र्यसंपन्न होण्यासाठी आदेश केला आहे. प्रत्येक चरणात ११+१३ मात्रेची आवर्तने असणारी है 'केकावली' नावाचे मात्रावृत्त आहे. यातील भाषा साधी, सोपी व वाहक असल्यामुळे हृदयाला थेट मिडणारी आहे. 'घड़ी-बड़ी या यमकप्रधान क्रियापदांमुळे कवितेला सुंदर लय व नाद आला आहे.

 

सप्टेंबर ३०, २०२३

दहावी मराठी 11. गोष्ट अरुणीमाची

दहावी मराठी 11. गोष्ट अरुणीमाची



कृती १ : (आकलन कृती)

• पुढील कृतींतून व्यक्त होणारे अरुणिमाचे गुण लिहा :

(i) चोरांना लाथाबुक्क्यांचा प्रसाद दिला.

- धाडसी वृत्ती 

------------------------------------------

(ii) भाईसाब यांनी दिलेला सल्ला अरुणिमाने शिरोधार्य मानला.

  - वडीलधाऱ्या व्यक्ती चा आदर

--------------------------------------------------

कृती २ : (आकलन कृती)

(१) आकृती पूर्ण करा : 

• अरुणिमाचा ध्येयवादी दृष्टिकोन स्पष्ट करणाऱ्या कृती

  - फूटबॉल व व्हॉलीबॉल या खेळांची नॅशनल चॅम्पियनशिप मिळवली.

    - खेळाशी जोडलेली राहण्यासाठी CISF मध्ये नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला.

-----------------------------------------

कृती २ : (आकलन कृती)

(१) कोण ते लिहा :

(iii) फूटबॉलची व व्हॉलीबॉलची नॅशनल चॅम्पियन 

 - आरुणिमा

 ----------------------------------

 (iv) सर्वांत मोठा मोटिव्हेटर 

 - स्व:च 

--------------------------------------

(vii) एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला 

 - बचेंद्री पाल 

--------------------------------     

(viii) अरुणिमाच्या कुटुंबातील महत्त्वाचे निर्णय घेणारे

 - भाईसाब

-------------------------------------

(२) अरुणिमाविषयी उठलेल्या पुढील अफवांबद्दल तुमचं प्रतिक्रिया लिहा : 

(i) शरीराला जखमा झाल्यामुळे बहुधा अरुणिमाच्या डोक्यावर परिणाम झालेला दिसतोय. 

- समाजातील बहुसंख्य लोक मनाने दुबळे असतात. त्यामुळे अरुणिमाच्या अपार धाडसावर विश्वास बसत नाही. शरीरावर झालेल्या आघातामुळे तिचा मानसिक तोल ढळून वेडाच्या भरत तिच्या हातून असे कृत्य घडले असावे, अशी शंकाही अनेकांच्या मनात आली असणार.

----------------------------------------------------

(ii) अरुणिमाकडे प्रवासाचे तिकीट नव्हते, म्हणून तिने रेल्वेतून उडी मारली. 

 - अरुणिमाने तिकीट काढले नसणार. त्यामुळे टी.सी.च्या नजरेतून सुटण्याच्या प्रयत्नात तिने गाडीतून उडी मारली असावी, अशी शंका काही जणांना येते. अलीकडे प्रामाणिकपणावरील, सज्जनपणावरील समाजाचा विश्वास डळमळीत झाला आहे. त्यामुळे कोणाच्याही चांगल्या कृतीतून वाईट अर्थ काढण्याची सवय समाजाला लागली आहे, हेच या प्रतिक्रियेवरून दिसून येते.

------------------------------------------------------

कृती ४ : (स्वमत / अभिव्यक्ती) 

• (१) 'प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते,' याबाबतचे तुमचे विचार स्पष्ट करा. 

  उत्तर: खरे सांगायचे तर कोणीही शिवाजी महाराज बनू शकत नाही, लोकमान्य टिळक बनू शकत नाही किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरसुद्धा बनू शकत नाही. त्यांच्याइतकी उंची गाठणे कोणालाही शक्य नाही. कारण त्या महान विभूती होत्या. 

           मग आपण काहीही करायचे नाही काय ? आपण काहीच करू शकत नाही काय ? खरे तर कोणतीही व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखी नसते. प्रत्येक व्यक्तीची स्वतःची अशी खासियत असते. एखाद्याला नृत्य आवडते. एखादयाला गायला आवडते. एखाद्याला दुसऱ्याला मदत करायला आवडते. तर कोणाला त्यांतील घडामोडींशी दोस्ती करणे आवडते. आपल्यातला असा वैशिष्ट्यपूर्ण गुण कोणता आहे, हे आपण शोधले पाहिजे. या गुणाची जोपासना केली पाहिजे. त्यात कुणाला मुक्त वाव दिला पाहिजे. मग आपल्या हातून आपोआपच लोकोत्तर कामगिरी पार पडेल. अरुणिमाने नेमके हेच केले. खरेतर अपंग बनलेली अरुणिमा आयुष्यात काहीच करू शकली नसती. पण तिने जिद्दीने स्वत:मधला वेगळा गुण ओळखला. स्वतःचे सामर्थ्य शोधले आणि अशक्य वाटणारी कामगिरी पार पाडली. प्रत्येक व्यक्तीमध्ये अशी अरुणिमा असतेच. फक्त त्या अरुणिमाचा आपण शोध घेतला पाहिजे. जीवनाचा हाच महामंत्र आहे. 

-------------------------------------------------------

(२) तुमच्या मनातील एव्हरेस्ट शोधा आणि शब्दबद्ध करा. 

उत्तर : आपण दिवसभर कोणती ना कोणती कृती करीत असतो. त्या वेळी आपल्या मनात कोणता तरी हेतू असतो. हेतूशिवाय कोणतीही कृती अशक्य असते. आपला हेतू म्हणजेच आपले ध्येय होय. जे ध्येय उराशी बाळगलेले असते, त्याला अनुसरूनच आपण वागत असतो. प्रत्येक कृती करताना आपल्याला आपले ध्येय स्पष्टपणे लक्षात असेलच असे नाही. तरीही आपण आपल्या त्या ध्येयानुसारच कृती करीत असतो, हे नक्की. खूप पैसे मिळवणे हे ज्याचे आयुष्यातले सर्वोच्च ध्येय असते, तो माणूस सतत पैसे मिळवण्याचाच विचार करीत राहील. कळत-नकळत सतत पैसे मिळवून देण्याच्या कृतीकडेच ओढला जाईल. म्हणजे आपले आपल्या मनातले ध्येयच खूप महत्त्वाचे असते. तेच आपल्या जीवनाची दिशा ठरवीत असते. म्हणून आपण आपले ध्येय निश्चित केले पाहिजे. ते नीट समजून घेतले पाहिजे. पर्वतांमध्ये एव्हरेस्ट जसा सर्वांत जास्त उंच आहे, तसेच आपले ध्येय आयुष्यातील सर्वांत जास्त उंच, सर्वांत जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. ती गोष्ट आपल्या मनातील एव्हरेस्टच होय. या एव्हरेस्टचा आपण शोध घेतला पाहिजे. तो सर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

-----------------------------------------------------------

दहावी मराठी
1. जय जय भारत देशा
https://www.godavaritambekar.com/2023/09/1_30.html
2.बोलतो मराठी
https://www.godavaritambekar.com/2023/09/2_30.html
3. कुटुंबाचं आगळ
https://www.godavaritambekar.com/2023/09/2_30.html
4. उत्तमलक्षण
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_30.html
5. वसंतहृदय चैत्र
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_77.html

6. वस्तू
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_42.html
7. गवताचे पाते
https://www.godavaritambekar.com/2023/09/7_30.html
9. आश्वासक चित्र
https://www.godavaritambekar.com/2023/09/11_30.html
10 आप्पाचे पत्र
https://www.godavaritambekar.com/2023/09/10_30.html
11.गोष्ट अरुणीमाची
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_52.html
12.भरतवाक्य
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_96.html
13. कर्ते सुधारक कर्वे
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_89.html
15.  खोद आणखी थोडेसे
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_97.html
16.आकाशी झेप घे रे (कविता)
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_3.html
17. सोनाली
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_43.html
18.  निर्णय
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_57.html
19. तू झालास मूक समाजाचा  नायक
https://www.godavaritambekar.com/2023/09/19_30.html
20.सर्व विश्वचि व्हावे सुखी
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_58.html



 

 

सप्टेंबर ३०, २०२३

दहावी मराठी 10 आप्पाचे पत्र

 दहावी मराठी  10 आप्पाचे पत्र

 


कृती १ : (आकलन कृती)

(२) आकृत्या पूर्ण करा :

 (iii) उताऱ्याच्या आधारे पुढील व्यक्तींचे महत्त्व स्पष्ट करा.

खेळपट्टीची काळजी घेणारा 

  - त्याच्याकडून खेळपट्टीचे स्वरूप समजून घेता येते कारण सामन्याचा निर्णय ठरवण्यात खेळपट्टीचा खूप मोठा वाटा असतो. 

-------------------------------------------

  नर्स

   -   नर्सचे काम डॉक्टरांच्या कामाइतकेच महत्त्वाचे असते.

-----------------------------------------

शिपाई 

   - चांगले काम करून कौतुकास पात्र ठरू शकतो.

-------------------------------------------

(३) योग्य पर्याय निवडा : 

(i) आप्पांच्या मते, चिंतेमुळे फक्त कपाळावरच्या आठ्या वाढतात.

----------------------------------

(ii) शिपाईसुद्धा कौतुकास पात्र ठरतो; जेव्हा  तो चांगलं काम करतो.

-------------------------------

 कृती ४ : (स्वमत / अभिव्यक्ती) 

  ● आप्पांनी तुमच्याविषयीच्या व्यक्त केलेल्या अपेक्षा तुमच्या शब्दांत लिहा. या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही काय कराल, ते लिहा. 

उत्तर : आप्पा अत्यंत जिव्हाळ्याने व अत्यंत साध्यासोप्या शब्दांत आपले मनोगत आम्हांला सांगत आहेत. त्यांना आम्हां विद्यार्थ्यांबद्दल आत्मीयता वाटते. खूप विश्वास वाटतो. आम्ही काहीजणांना बेशिस्त वाटतो. पण आम्ही, खरेच सांगतो, तसे नाही. आप्पांनी हे नेमके -ओळखले आहे. आमच्यातला उत्साह, आमच्या ऊर्मी आम्हांला योग्य दिशेला नक्की नेणार आहेत. त्यामुळे भविष्यात आम्ही नक्कीच काहीतरी अर्थपूर्ण करणार आहोत. आप्पांचे आमच्याविषयीचे प्रेम त्यांच्या शब्दाशब्दांतून मनाला स्पर्श करते. 

        सरधोपटपणे जीवनाचे ध्येय ठरवू नये, हे आप्पांचे म्हणणे मला खूपच पटते. कोणतेही काम निवडायला हरकत नाही. पण ते आवडीने पार पाडायचे, हे मी ठरवूनच टाकले आहे. मी एक वेगळेच ध्येय स्वतःसाठी ठरवून टाकले आहे. मी खूप अभ्यास करणार आहे. खूप विचार करून शोधून काढणार आहे. वर्गात कोणताही विषय उत्तम रितीने कसा शिकवायचा, याचा शोध घेणार आहे. त्याचा शाळेशाळेत जाऊन प्रसार करणार आहे. आधी मला हा विचार सुचला, तेव्हा खूप भीती वाटली होती की माझे कोण ऐकेल? कोण समजून घेईल? पण आप्पांनी सांगितले तसे मी करणार आहे. मनापासून, जीव ओतून मी ठरवलेले काम करणार आहे. मला खात्री आहे की मी यशस्वी  होईनच. 

----------------------------------------------------------------------

कृती १ : (आकलन कृती) 

(१) कारणे लिहा : 

(i) पुस्तकाची पाने व झाडाची पाने दोन्ही महत्त्वाची असतात; कारण - पुस्तकाच्या पानात डोक्याचे खादय असते आणि झाडाच्या पानात झाडाला जगवण्याचे बळ असते.

----------------------------------------------------------

(ii) एका मुलाने आपल्या वाढदिवसाच्या पैशातून झोपडपट्टीतल्या मुलांसाठी पक्का पूल बांधायला आपले पैसे दिले; कारण - त्या मुलांना नाल्यावरच्या एका तुटक्या पुलावरून जावे लागे.

---------------------------------

 (२) आकृती पूर्ण करा :

       वृक्षसंवर्धनाचे फायदे

 - वृक्षांची सावली मिळते.

  -  वृक्ष हवा शुद्ध ठेवतात. 

  -  फुले, फळे, लाकूड, औषधे इत्यादी देतात. 

  -  जमिनीखालील पाणीपातळी टिकवून ठेवतात.

--------------------------------------------------

कृती २ : (आकलन कृती) 

•  चौकटी पूर्ण करा : 

 आप्पांनी विदयार्थ्यांकडून त्यांच्या भावी जीवनाबद्दल व्यक्त केलेल्या अपेक्षा

  - मुलांनी वृक्षप्रेम जोपासावे.

  -  गायनादी कलांकडे लक्ष दयावे

   -   एखादयाने लेखक व्हावे. 

   -   शेतीकडेसुद्धा लक्ष दयावे.

----------------------------------------

कृती ४ : (स्वमत / अभिव्यक्ती) 

 (१) 'पाण्याचे वाया जाणारे थेंब वाचवणं हे दुःखी माणसाच्या डोळ्यातलं पाणी पुसण्याएवढंच महत्त्वाचं काम आहे.' आप्पांच्या या विधानामागील अर्थ स्वतःच्या शब्दांत लिहा. 

उत्तर : आपल्याकडे दोन्ही दृश्ये सहजपणे दिसतात. काही ठिकाणी पाणी वाया चाललेले असते. नळ धो धो वाहत चाललेले असतात. काहीजण अक्षरशः तासन्तास शॉवरखाली अंग भिजवत असतात. साधी तोंड धुवायला गेले तर कितीतरी वेळ आरशात स्वतःला न्याहाळा राहतात आणि बेसिनचा नळ चालूच असतो. कोणालाही याचा खे किंवा खंत काहीही वाटत नाही. पाण्याचा अपव्यय याबाबत सर्वच जण अत्यंत बेफिकिरीने व बेजबाबदारीने वागत असतात. 

        दुसरीकडे अगदी टोकाचे विपरीत दृश्य दिसते. दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता. ग्रामीण भागाची पाण्याअभावी दैना उडाली होती. सर्वत्र हाहाकार माजला होता. कळशीभर पाण्यासाठी लोक रात्रंदिवस मैलोन्मैल भटकत राहायचे. हजारो माणसे गावे सोडून शहरांकडे स्थलांतरित झाली होती. त्या दुष्काळात शेकडो लोक मरण पावले. कित्येकांनी आत्महत्या केल्या. उदयोगधंदे बंद पडले. माणसे बेकार झाली. शेती ओस पडली. उपासमारीची दृश्ये दिसू लागली. त्या दुष्काळाने महाराष्ट्राच्या डोळ्यांत पाणी आले होते. आपण पाणी जपून वापरले तर वाचलेले पाणी तहानलेल्यांना प्यायला मिळेल. जनावरे जगतील. शेती वाचेल. कारखान्यांना पाणी मिळेल. म्हणजे लोकांची दुःखे दूर होतील. समाधानाने जगण्याचा मार्ग  मोकळा होईल. वेगळ्या शब्दांत, 'लोकांच्या डोळ्यांतील अश्रू पुसले जातील.' वाया जाणारे पाणी वाचवणे म्हणजे नवीन पाणी निर्माण करणे होय, हे आपण आता तरी लक्षात घेतले पाहिजे.

---------------------------------------------------

 (२) 'जग विचारेल तुम्हांला, शाळेत तुम्हांला किती गुण मिळाले? पण मी सांगेन जगाला तुम्ही किती गुणी आहात.' यावाक्यांतील अभिप्रेत अर्थ लिहा. 

 उत्तर: आप्पा जीव ओतून विदयार्थ्यांशी बोलत आहेत. मुलांना खरे तर ते जीवनाचे मर्म समजावून सांगत आहेत. केवळ डॉक्टर किंवा इंजिनीअर होणे म्हणजे जीवनातील सर्वश्रेष्ठ यश नव्हे. तसेच, मुले मैदानावर खेळताना-बागडताना मनसोक्त गोंधळ घालत आहेत, असे दिसते. गोंधळ म्हणजे मुलांचे दिशाहीन भरकटणे नव्हे. हा गोंधळ कोणत्याही अर्थाने वाईट किंवा मूल्यहीन नाही. तेथे मुलांमधल्या नैसर्गिक ऊर्मी मुक्तपणे प्रकट होत असतात. यातून एक वेगळीच शिकवण त्यांना मिळते. आपली क्षमता कोणती? आपली धाव कुठपर्यंत आहे? या सगळ्यांचा मुलांना अंदाज असतो. त्यांचे मन स्वतःच्या प्रगतीची दिशा शोधत असते. वरवर पाहता, मुले बेशिस्तीने वागत आहेत, असे वाटू शकते. ज्यांना खरोखर असे वाटते, ते अज्ञानी होत. त्यांना जीवन कळलेले नाही, हा त्याचा अर्थ होय. आप्पा नेमके यावरच बोट ठेवत आहेत. आप्पांना मुलांची ऊर्मी, त्यातला अनावर बेधडकपणा, अलोट उत्साह हे गुण दिसतात. हे गुण ज्यांच्याकडे असतात, ती माणसे जीवनात कोणतेही ध्येय प्राप्त करू शकतात. कोणतेही अवघड कार्य पार पाडू शकतात. म्हणून आप्पांना मुक्तपणे खेळणारी मुले गुणी वाटतात. त्यांच्याविषयी त्यांना भरपूर विश्वास वाटतो. तोच विश्वास ते बोलून दाखवत आहेत.

 ---------------------------------

दहावी मराठी
1. जय जय भारत देशा
https://www.godavaritambekar.com/2023/09/1_30.html
2.बोलतो मराठी
https://www.godavaritambekar.com/2023/09/2_30.html
3. कुटुंबाचं आगळ
https://www.godavaritambekar.com/2023/09/2_30.html
4. उत्तमलक्षण
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_30.html
5. वसंतहृदय चैत्र
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_77.html

6. वस्तू
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_42.html
7. गवताचे पाते
https://www.godavaritambekar.com/2023/09/7_30.html
9. आश्वासक चित्र
https://www.godavaritambekar.com/2023/09/11_30.html
10 आप्पाचे पत्र
https://www.godavaritambekar.com/2023/09/10_30.html
11.गोष्ट अरुणीमाची
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_52.html
12.भरतवाक्य
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_96.html
13. कर्ते सुधारक कर्वे
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_89.html
15.  खोद आणखी थोडेसे
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_97.html
16.आकाशी झेप घे रे (कविता)
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_3.html
17. सोनाली
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_43.html
18.  निर्णय
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_57.html
19. तू झालास मूक समाजाचा  नायक
https://www.godavaritambekar.com/2023/09/19_30.html
20.सर्व विश्वचि व्हावे सुखी
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_58.html



 

 

सप्टेंबर ३०, २०२३

दहावी मराठी 9. आश्वासक चित्र

 दहावी मराठी ९. आश्वासक चित्र


कृती १ : (आकलन कृती)

 (१) कवितेच्या आधारे पुढील कोष्टक पूर्ण करा :

 कवितेचा विषय

- स्त्री- 11- पुरुष | समानतेचे भविष्यकालीन चित्र    आश्वासक आहे. 

कवितेतील पात्रे

- मुलगा व मुलगी

 कवितेतील मूल्य 

  - स्त्री-पुरुष समानता

------------------------------------------------------------------------

   आश्वासक चित्र दर्शवणाऱ्या गोष्टी

       -  (१) मुलगी व मुलगा एकमेकांची कामे करतात. 

       - (२) भातुकलीतून वास्तवात येतील. 

       - (३) दोघांच्या हातात बाहुली व चेंडू असतील

-----------------------------------------------------

(२) मुलीचा आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या कवितेतील ओळी शोधा :

 (i) -  मी दोन्ही करू शकते एकाच वेळी 

  (ii) - उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन   पडतो तिच्या ओंजळीत.

----------------------------------------

  कृती २ : (आकलन कृती) 

   (१) पुढील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा : 

    (i) तापलेले ऊन - भविष्यातील धगधगते वास्तव होय.

(ii) आश्वासक चित्र - भविष्यात स्त्री-पुरुष समानता     वास्तवात येईल, याचे आश्वासन होय.

--------------------------------------------------------------------

   (२) कवितेतील पुढील घटनेतून / विचारातून आढळणारा व्यक्तीचा गुण लिहा : 

  (i) मांडी घालून मुलगा बसतो गॅससमोर  - सहकार्य

  (ii) मी दोन्ही करू शकते एकाच वेळी - आत्मविश्वास

  (iii) जिथे खेळले जातील सारेच खेळ एकाच वेळी -  - समंजसपणा 

-----------------------------------------------------

  कृती ३ : (काव्यसौंदर्य कृती) 

   (१) ती म्हणते, 'मी दोन्ही करू शकते एकाच वेळी. तू करशील ?'  या ओळीचा तुम्हांला कळलेला अर्थ स्पष्ट करा.

 उत्तर : ‘आश्वासक चित्र' या कवितेमध्ये नीरजा यांनी आधुनिक जगातील स्त्रीचे सामर्थ्य व सहभाग यांविषयी दृढविश्वास व्यक्त करताना मुलीच्या तोंडी हे उद्गार लिहिले आहेत.

           भातुकली खेळणारी मुलगी व चेंडू उडवून झेलणारा मुलगा उन्हाच्या आडोशाला खेळत आहेत, हे दृश्य कवयित्री खिडकीतून पाहत आहे. अचानक मांडीवरची बाहुली बाजूला ठेवून मुलगी चेंडू खेळणाऱ्या मुलापाशी जाते व चेंडू मागते. मुलगा तिला हिणवतो की, तू पाल्याची भाजीच कर, चेंडू उडवणे तुला जमणार नाही. तेव्हा मुलगी त्याला अत्यंत आत्मविश्वासाने म्हणते की, मी स्वयंपाक व चेंडू उडवणे हे दोन्ही एकाच वेळी करू शकते. तू माझे काम करशील का? मुलीच्या उद्गारांतून कवयित्रींनी स्त्रीचे सामर्थ्य मार्मिकपणे विशद केले आहे.

------------------------------------------------------------------------

 (२) 'स्त्री-पुरुष समानतेबाबत तुम्हांला अपेक्षित असलेले चित्र तुमच्या शब्दांत रेखाटा. 

       उत्तर : कवितेतील मुलगा व मुलगी परस्परांचे खेळ सहकार्याने खेळतात, यावरून मुलाच्या वागण्यातील बदल स्वागतार्ह आहे. हळूहळू तो आपले कसब दाखवता दाखवता घरसंसार सांभाळणे शिकेल. मोठा झाल्यावर तो स्त्रियांची कामेही करील, कारण मुली पुरुषांची कामे सहजपणे करीत आहेत. स्त्री-पुरुष सहकार्याने एकमेकांची कामे करतील, हे उद्याच्या जगाचे आश्वासक चित्र असेल. दोघेही सारेच खेळ एकत्रित खेळतील. भातुकलीच्या स्वप्नाळू जगातून प्रत्यक्ष वास्तवात स्त्री-पुरुषांची एकमेकांना साथ असेल. स्त्री-पुरुषांमध्ये भविष्यात सामंजस्य व स्नेहभाव निर्माण होऊन स्त्री-पुरुष समानता नक्कीच रुजेल. असे स्त्री-पुरुष समानतेचे आश्वासक चित्र मला अपेक्षित आहे.

-------------------------------------------------------------------------

 (३) कवितेतील मुलगा आणि मुलगी कशाचे प्रतिनिधित्व करतात, असे तुम्हांला वाटते. तुमच्या शब्दांत लिहा. 

   उत्तर : कवयित्री नीरजा यांनी स्त्री-पुरुष समानतेचे भविष्यकालीन आश्वासक चित्र' रंगवले आहे. कवितेतील मुलगा हे 'पुरुषजातीचे' प्रतीक आहे; तर मुलगी ही 'स्त्रीजातीचे' प्रतिनिधित्व करते. स्त्री-पुरुष समानता ही संकल्पना अजून बाल्यावस्थेत असल्यामुळे स्त्री-पुरुष तत्त्व हे मुलगी व मुलगा या लहान वयात दाखवले आहेत. उद्याच्या जगात ते दोघे प्रौढ होतील व एकत्र खेळ करतील, असा आशावाद या प्रतीकांतून कवयित्रीने व्यक्त केला आहे. स्त्री-पुरुषांमध्ये भविष्यात परस्पर सामंजस्य व स्नेहभाव निर्माण होऊन स्त्री-पुरुष समानता नक्कीच येईल, असा दृढ विश्वास कवितेतून व्यक्त होतो.

---------------------------------

दहावी मराठी
1. जय जय भारत देशा
https://www.godavaritambekar.com/2023/09/1_30.html
2.बोलतो मराठी
https://www.godavaritambekar.com/2023/09/2_30.html
3. कुटुंबाचं आगळ
https://www.godavaritambekar.com/2023/09/2_30.html
4. उत्तमलक्षण
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_30.html
5. वसंतहृदय चैत्र
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_77.html

6. वस्तू
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_42.html
7. गवताचे पाते
https://www.godavaritambekar.com/2023/09/7_30.html
9. आश्वासक चित्र
https://www.godavaritambekar.com/2023/09/11_30.html
10 आप्पाचे पत्र
https://www.godavaritambekar.com/2023/09/10_30.html
11.गोष्ट अरुणीमाची
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_52.html
12.भरतवाक्य
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_96.html
13. कर्ते सुधारक कर्वे
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_89.html
15.  खोद आणखी थोडेसे
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_97.html
16.आकाशी झेप घे रे (कविता)
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_3.html
17. सोनाली
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_43.html
18.  निर्णय
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_57.html
19. तू झालास मूक समाजाचा  नायक
https://www.godavaritambekar.com/2023/09/19_30.html
20.सर्व विश्वचि व्हावे सुखी
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_58.html