Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शनिवार, ३० सप्टेंबर, २०२३

दहावी मराठी 10 आप्पाचे पत्र

 दहावी मराठी  10 आप्पाचे पत्र

 


कृती १ : (आकलन कृती)

(२) आकृत्या पूर्ण करा :

 (iii) उताऱ्याच्या आधारे पुढील व्यक्तींचे महत्त्व स्पष्ट करा.

खेळपट्टीची काळजी घेणारा 

  - त्याच्याकडून खेळपट्टीचे स्वरूप समजून घेता येते कारण सामन्याचा निर्णय ठरवण्यात खेळपट्टीचा खूप मोठा वाटा असतो. 

-------------------------------------------

  नर्स

   -   नर्सचे काम डॉक्टरांच्या कामाइतकेच महत्त्वाचे असते.

-----------------------------------------

शिपाई 

   - चांगले काम करून कौतुकास पात्र ठरू शकतो.

-------------------------------------------

(३) योग्य पर्याय निवडा : 

(i) आप्पांच्या मते, चिंतेमुळे फक्त कपाळावरच्या आठ्या वाढतात.

----------------------------------

(ii) शिपाईसुद्धा कौतुकास पात्र ठरतो; जेव्हा  तो चांगलं काम करतो.

-------------------------------

 कृती ४ : (स्वमत / अभिव्यक्ती) 

  ● आप्पांनी तुमच्याविषयीच्या व्यक्त केलेल्या अपेक्षा तुमच्या शब्दांत लिहा. या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही काय कराल, ते लिहा. 

उत्तर : आप्पा अत्यंत जिव्हाळ्याने व अत्यंत साध्यासोप्या शब्दांत आपले मनोगत आम्हांला सांगत आहेत. त्यांना आम्हां विद्यार्थ्यांबद्दल आत्मीयता वाटते. खूप विश्वास वाटतो. आम्ही काहीजणांना बेशिस्त वाटतो. पण आम्ही, खरेच सांगतो, तसे नाही. आप्पांनी हे नेमके -ओळखले आहे. आमच्यातला उत्साह, आमच्या ऊर्मी आम्हांला योग्य दिशेला नक्की नेणार आहेत. त्यामुळे भविष्यात आम्ही नक्कीच काहीतरी अर्थपूर्ण करणार आहोत. आप्पांचे आमच्याविषयीचे प्रेम त्यांच्या शब्दाशब्दांतून मनाला स्पर्श करते. 

        सरधोपटपणे जीवनाचे ध्येय ठरवू नये, हे आप्पांचे म्हणणे मला खूपच पटते. कोणतेही काम निवडायला हरकत नाही. पण ते आवडीने पार पाडायचे, हे मी ठरवूनच टाकले आहे. मी एक वेगळेच ध्येय स्वतःसाठी ठरवून टाकले आहे. मी खूप अभ्यास करणार आहे. खूप विचार करून शोधून काढणार आहे. वर्गात कोणताही विषय उत्तम रितीने कसा शिकवायचा, याचा शोध घेणार आहे. त्याचा शाळेशाळेत जाऊन प्रसार करणार आहे. आधी मला हा विचार सुचला, तेव्हा खूप भीती वाटली होती की माझे कोण ऐकेल? कोण समजून घेईल? पण आप्पांनी सांगितले तसे मी करणार आहे. मनापासून, जीव ओतून मी ठरवलेले काम करणार आहे. मला खात्री आहे की मी यशस्वी  होईनच. 

----------------------------------------------------------------------

कृती १ : (आकलन कृती) 

(१) कारणे लिहा : 

(i) पुस्तकाची पाने व झाडाची पाने दोन्ही महत्त्वाची असतात; कारण - पुस्तकाच्या पानात डोक्याचे खादय असते आणि झाडाच्या पानात झाडाला जगवण्याचे बळ असते.

----------------------------------------------------------

(ii) एका मुलाने आपल्या वाढदिवसाच्या पैशातून झोपडपट्टीतल्या मुलांसाठी पक्का पूल बांधायला आपले पैसे दिले; कारण - त्या मुलांना नाल्यावरच्या एका तुटक्या पुलावरून जावे लागे.

---------------------------------

 (२) आकृती पूर्ण करा :

       वृक्षसंवर्धनाचे फायदे

 - वृक्षांची सावली मिळते.

  -  वृक्ष हवा शुद्ध ठेवतात. 

  -  फुले, फळे, लाकूड, औषधे इत्यादी देतात. 

  -  जमिनीखालील पाणीपातळी टिकवून ठेवतात.

--------------------------------------------------

कृती २ : (आकलन कृती) 

•  चौकटी पूर्ण करा : 

 आप्पांनी विदयार्थ्यांकडून त्यांच्या भावी जीवनाबद्दल व्यक्त केलेल्या अपेक्षा

  - मुलांनी वृक्षप्रेम जोपासावे.

  -  गायनादी कलांकडे लक्ष दयावे

   -   एखादयाने लेखक व्हावे. 

   -   शेतीकडेसुद्धा लक्ष दयावे.

----------------------------------------

कृती ४ : (स्वमत / अभिव्यक्ती) 

 (१) 'पाण्याचे वाया जाणारे थेंब वाचवणं हे दुःखी माणसाच्या डोळ्यातलं पाणी पुसण्याएवढंच महत्त्वाचं काम आहे.' आप्पांच्या या विधानामागील अर्थ स्वतःच्या शब्दांत लिहा. 

उत्तर : आपल्याकडे दोन्ही दृश्ये सहजपणे दिसतात. काही ठिकाणी पाणी वाया चाललेले असते. नळ धो धो वाहत चाललेले असतात. काहीजण अक्षरशः तासन्तास शॉवरखाली अंग भिजवत असतात. साधी तोंड धुवायला गेले तर कितीतरी वेळ आरशात स्वतःला न्याहाळा राहतात आणि बेसिनचा नळ चालूच असतो. कोणालाही याचा खे किंवा खंत काहीही वाटत नाही. पाण्याचा अपव्यय याबाबत सर्वच जण अत्यंत बेफिकिरीने व बेजबाबदारीने वागत असतात. 

        दुसरीकडे अगदी टोकाचे विपरीत दृश्य दिसते. दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता. ग्रामीण भागाची पाण्याअभावी दैना उडाली होती. सर्वत्र हाहाकार माजला होता. कळशीभर पाण्यासाठी लोक रात्रंदिवस मैलोन्मैल भटकत राहायचे. हजारो माणसे गावे सोडून शहरांकडे स्थलांतरित झाली होती. त्या दुष्काळात शेकडो लोक मरण पावले. कित्येकांनी आत्महत्या केल्या. उदयोगधंदे बंद पडले. माणसे बेकार झाली. शेती ओस पडली. उपासमारीची दृश्ये दिसू लागली. त्या दुष्काळाने महाराष्ट्राच्या डोळ्यांत पाणी आले होते. आपण पाणी जपून वापरले तर वाचलेले पाणी तहानलेल्यांना प्यायला मिळेल. जनावरे जगतील. शेती वाचेल. कारखान्यांना पाणी मिळेल. म्हणजे लोकांची दुःखे दूर होतील. समाधानाने जगण्याचा मार्ग  मोकळा होईल. वेगळ्या शब्दांत, 'लोकांच्या डोळ्यांतील अश्रू पुसले जातील.' वाया जाणारे पाणी वाचवणे म्हणजे नवीन पाणी निर्माण करणे होय, हे आपण आता तरी लक्षात घेतले पाहिजे.

---------------------------------------------------

 (२) 'जग विचारेल तुम्हांला, शाळेत तुम्हांला किती गुण मिळाले? पण मी सांगेन जगाला तुम्ही किती गुणी आहात.' यावाक्यांतील अभिप्रेत अर्थ लिहा. 

 उत्तर: आप्पा जीव ओतून विदयार्थ्यांशी बोलत आहेत. मुलांना खरे तर ते जीवनाचे मर्म समजावून सांगत आहेत. केवळ डॉक्टर किंवा इंजिनीअर होणे म्हणजे जीवनातील सर्वश्रेष्ठ यश नव्हे. तसेच, मुले मैदानावर खेळताना-बागडताना मनसोक्त गोंधळ घालत आहेत, असे दिसते. गोंधळ म्हणजे मुलांचे दिशाहीन भरकटणे नव्हे. हा गोंधळ कोणत्याही अर्थाने वाईट किंवा मूल्यहीन नाही. तेथे मुलांमधल्या नैसर्गिक ऊर्मी मुक्तपणे प्रकट होत असतात. यातून एक वेगळीच शिकवण त्यांना मिळते. आपली क्षमता कोणती? आपली धाव कुठपर्यंत आहे? या सगळ्यांचा मुलांना अंदाज असतो. त्यांचे मन स्वतःच्या प्रगतीची दिशा शोधत असते. वरवर पाहता, मुले बेशिस्तीने वागत आहेत, असे वाटू शकते. ज्यांना खरोखर असे वाटते, ते अज्ञानी होत. त्यांना जीवन कळलेले नाही, हा त्याचा अर्थ होय. आप्पा नेमके यावरच बोट ठेवत आहेत. आप्पांना मुलांची ऊर्मी, त्यातला अनावर बेधडकपणा, अलोट उत्साह हे गुण दिसतात. हे गुण ज्यांच्याकडे असतात, ती माणसे जीवनात कोणतेही ध्येय प्राप्त करू शकतात. कोणतेही अवघड कार्य पार पाडू शकतात. म्हणून आप्पांना मुक्तपणे खेळणारी मुले गुणी वाटतात. त्यांच्याविषयी त्यांना भरपूर विश्वास वाटतो. तोच विश्वास ते बोलून दाखवत आहेत.

 ---------------------------------

दहावी मराठी
1. जय जय भारत देशा
https://www.godavaritambekar.com/2023/09/1_30.html
2.बोलतो मराठी
https://www.godavaritambekar.com/2023/09/2_30.html
3. कुटुंबाचं आगळ
https://www.godavaritambekar.com/2023/09/2_30.html
4. उत्तमलक्षण
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_30.html
5. वसंतहृदय चैत्र
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_77.html

6. वस्तू
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_42.html
7. गवताचे पाते
https://www.godavaritambekar.com/2023/09/7_30.html
9. आश्वासक चित्र
https://www.godavaritambekar.com/2023/09/11_30.html
10 आप्पाचे पत्र
https://www.godavaritambekar.com/2023/09/10_30.html
11.गोष्ट अरुणीमाची
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_52.html
12.भरतवाक्य
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_96.html
13. कर्ते सुधारक कर्वे
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_89.html
15.  खोद आणखी थोडेसे
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_97.html
16.आकाशी झेप घे रे (कविता)
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_3.html
17. सोनाली
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_43.html
18.  निर्णय
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_57.html
19. तू झालास मूक समाजाचा  नायक
https://www.godavaritambekar.com/2023/09/19_30.html
20.सर्व विश्वचि व्हावे सुखी
https://www.godavaritambekar.com/2023/09/blog-post_58.html



 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा