Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शुक्रवार, १ सप्टेंबर, २०२३

13 ऑगस्ट-दैनंदिन शालेय परिपाठ

 13 ऑगस्ट-दैनंदिन शालेय परिपाठ 



प्रार्थना


 नमस्कार माझा ज्ञानमंदिरा, सत्यम् शिवम् सुंदरा..... 


 → श्लोक 

 

- फुकाचे मुखी बोलता काय वेचे । दिसंदीस अभ्यंतरी गर्व साचे । 

• क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे । विचारे तुझा तूचि शोधूनि पाहे ।। 


हे मना, तोंडाने फकटची (व्यर्थ) बडबड करण्यात काय अर्थ आहे? अशाने मनात हळूहळू गर्व वाढत जातो. क्रियेशिवाय (कर्म न करता) • व्यर्थ असते. हे मना, तुझा तूच विचार कर आणि नीट शोध घे.



• → चिंतन

- सात सामाजिक पातके - तत्त्वाविना राजकारण, श्रमाविना संपत्ती, नीतिविना व्यापार, चारित्र्याविना शिक्षण, सद्सद्विवेक विलास, मानवतेविना विज्ञान, त्यागाविना पूजा - म. गांधी - यंग इंडिया १९२४ ही सात सामाजिक पातके आपल्या हातून घडू नयेत, याबद्दल प्रत्येकाने दक्ष असले पाहिजे. दुसऱ्याच्या हातून घडत असल्यास त्याला पराक् | पाहिजे. सामाजिक हिताबद्दल दक्ष असणारा समाज ही राष्ट्राची मोठीच संपत्ती आहे..



 कथाकथन 

 - 'प्रदूषण आणि पर्यावरण रक्षण' - रावण, कुंभकर्ण, भस्मासूर, बकासूर इ. राक्षसांना ठार मारल्यानंतर त्यांना नरकात प आले; पण असल्या शिक्षेने ऐकणारे ते साधेसुधे राक्षस नव्हतेच. त्यांनी नरकातही देवांची प्रार्थना, तप सुरू केले. दरम्यान खूप खूप वर्षे गेली, व राक्षसांचे तप, प्रार्थना चालूच होती. खूप खूप वर्षांच्या तपश्चर्येनंतर शेवटी ब्रह्मदेव त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी या राक्षसांना वर सांगितला. सर्व राक्षस चतुर व लबाड होते. ते आधीच्या अनुभवाने शहाणे झाले होते. म्हणूनच त्यांनी अत्यंत कुटिलपणे ब्रह्मदेवाकडे एक विलि मागितला. सर्व राक्षस म्हणाले, “देवा, आम्हांला पृथ्वीवरच पाठवा; परंतु अदृश्य रूपात.' " "तथास्तु,” असे ब्रह्मदेवाने म्हटले. आपण राहिलो तर कोणीही आपल्याला पाहू शकणार नाही. साहजिकच कोणी आपल्याला मारू शकणार नाही, म्हणजेच आपण अमर होऊ, अ राक्षसांची दुष्ट योजना होती. सर्व राक्षस पृथ्वीवर अदृश्य रूपात अवतरले. आणि त्यांनी आपापले विभाग वाटून घेतले. एक राक्षस म्हणाला, राहीन." एका म्हणाला, "मी पाण्यात राहीन." इतर राक्षस म्हणाले, "आम्ही जमिनीवर राहतो आणि तुम्हांला मदत करतो." वागृह जलप्रदूषण, भू-प्रदूषण, ध्वनिप्रदूषण, अन्नप्रदूषण, कचरा प्रदूषण इ. स्वरुपात हे राक्षस पृथ्वीवर राहू लागले.


. या अदृश्य राक्षसांबद्दल पृथ्वीवरील मानवाला काहीच कल्पना नव्हती, पण हळूहळू हे राक्षस आपला प्रभाव दाखवू लागले. पृथ्वीवरील मा वारंवार आजारी पडू लागली. कोणाला ताप, कोणाला कावीळ, कोणाला मलेरिया, कोणाला श्वसनाचा त्रास, कोणास बहिरेपणा, एक ना अनेक, स् रोगराई पसरली. त्यातच पावसाचे प्रमाण कमी झाले. उष्णतामान वाढू लागले. सर्वत्र हाहा:कार उडाला - शेवटी पृथ्वीवरील लोकांनी ब्रह्मदेवाचा धाव केला. ब्रह्मदेवाने नारदाला दूत म्हणून पाठविले. “नारायण ! नारायण !!” नारदाने पृथ्वीवरील सर्व लोकांना हिरव्या हिरवळीचा कानमंत्र दिला. है कानमंत्र होता “झाडे वाचवा ! तरच तुम्ही वाचाल ! !” झाले ! वनीकरणाची, वृक्षारोपणाची नव्या उल्हासात सुरुवात झाली. मानवाने प्रदूषण - | अदृश्य राक्षसांविरुद्ध युद्ध पुकारले.l


→ सुविचार 


 • हिरवी हिरवी गार-गार, झाडे लावू चार-चार!

 इतिहासातहीपेशवे तर अहिल्यादेवींना मान देतच, परंतु टिपू व निजाम या सारखे शत्रूदेखील त्यांना फार मान देत असत.

 • वृक्ष लावा-वृक्ष जगवा, वृक्ष जगवा - जीवनफुलवा → दिनविशेष - 

 

• महाराणी अहिल्यादेवी होळकर स्मृतिदिन - १७९५ : मराठेशाहीतील इंदूर संस्थानचे अधिपती मल्हारराव होळकर यांचे अहिल्याबाई ही सून. पती युद्धात मारला गेल्यानंतर सती जाणाऱ्या अहिल्येस सासऱ्यांनी थोपविले. राज्यकारभाराचे धडे दिले आणि स्वतःच निधनानंतर तिच्या हाती राज्य सोपविले. अतिशय दक्षतेने अहिल्याबाईने पुढची २८ वर्षे राज्यकारभार केला. दरबारात जातीने बसून अनेक कामे ल | झपाट्याने हातावेगळी करीत. शत्रूदेखील त्यांच्याबद्दल आदर बाळगून असत. भ्रष्ट झालेल्या मंदिरांची पुनर्बांधणी, जीर्णोद्धार, देवतांची प्रतिष्ठास घाट-रस्ते, धर्मशाळा बांधणे, अन्नछत्रे चालविणे या सर्व लोकोपयोगी कामांमुळे भारतात व महाराष्ट्रात त्यांचे नाव अजरामर झाले आहे. अहिल्यादे अत्यंत तेजस्वी, शांतवृत्तीच्या, बाणेदार, आचरणाने अत्यंत पवित्र, स्वभावाने स्वाभिमानी, राजकारणात दक्ष व धर्मकारणात सर्वस्वदानी होल


• मूल्ये -

 

• भूतदया, शुचिता, मानवता. → अन्य घटना

  

• 'बालकवी' त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचा जन्मदिन - १८९०

• फ्लॉरेन्स नाइटिंगेल स्मृतिदिन - १९१० १८९८. 

• 

• मराठीतील प्रसिद्ध साहित्यिक पु. भा. भावे यांचे निधन - १९८०



उपक्रम

 अहिल्याबाईंच्या कार्याबद्दल माहिती सांगा 

 • प्रजासत्ताक दिनी परजीवित रक्षण व मानवसेवा करणाऱ्यांचा सत्कार होतो. त्यांची माहिती संकलित करा


 समूहगान

• या भूमीचे पुत्र आम्ही, उंचवू देशाची शान... 

 

 → सामान्यज्ञान 

 • ज्या धाग्यांच्या आधाराने कोळ्याचे जाळे झाडाला अडकविलेले असते ते अत्यंत मजबूत असतात. काही धागे प | मजबूत असतात. तीन जातींच्या कोळ्यांच्या जाळ्यांपैकी असे ताणाचे धागे एकत्र पिळून दोर तयार केला तर तो विमानात वापरलेल्या ना कार्बन तंतूंच्या दोराइतका मजबूत होऊ शकतो. 

 

• भारतातील महत्त्वाचे धबधबे : 

• (१) शरावती : जोग / गिरसप्पा (कनार्टक) उंची : २५३ मीटर. (३) सुबर्णरेखा : हुन्ड्र (झारखंड), उंची : ७४ मीटर. (५) नर्मदा : धवाधार (मध्यप्रदेश), उंची १० ममीटर. (२) कावेरी : शिवसमुद्रम् (कर्नाटक), उंची : ९८ मीटर. (४) घटप्रभा : गोकाक (कर्नाटक), उंची : ५५ मीटर. (६) चंबळ : (1) चलियाँ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा