दहावी मराठी 19 तू झालास मूक समाजाचा नायक
कृती १ : (आकलन कृती)
(१) आकृत्या पूर्ण करा :
(i) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट
- मळवाट
---------------------------------------
(ii) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत करणारे
- खाचखळगे
--------------------------------------
iii ) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली कार्ये -
→ परिस्थितीवर मात करून नवा इतिहास घडवला.
→ मूक समाजाचे नेतृत्व केले.
→ बहिष्कृत भारत जागा केला.
→ चवदार तळ्याचा संग्राम केला.
------------------------------------------
(२) कवितेतील संदर्भ आणि स्पष्टीकरण यांच्या जोड्या लावा :
कवितेतील संदर्भ स्पष्टीकरण
(i) मळवाट (अ) अन्यायाविरुद्ध आवाज उठवू न शकणारा समाज
(ii) खाचखळगे (आ) पारंपरिक वाट
(iii) मूक समाज (इ) अडचणी, कठीण परिस्थिती
उत्तर : (i) मळवाट → पारंपरिक वाट
ii) खाचखळगे → अडचणी, कठीण परिस्थिती
iii) मूक समाज → अन्यायाविरुद्ध आवाज उठवू न शकणारा समाज
-----------------------------------------------
कृती २ : (आकलन कृती)
(१) चवदार तळ्याच्या घटनेनंतरच्या पन्नास वर्षांत वातावरणात झालेल्या बदलाचे वर्णन करणाऱ्या ओळी लिहा.
- (i) सूर्यफुले ध्यास घेत आहेत.
- (ii) बिगूल प्रतीक्षा करीत आहे.
-------------------------------------------
(२) चवदार तळ्याच्या घटनेसंदर्भात तुलना करा :
पन्नास वर्षांपूर्वीची परिस्थिती
- (i) सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती.
- (ii) रणशिंग फुंकले होते.
- (iii) चवदार तळ्याचे पाणी पेटले होते.
पन्नास वर्षांनंतरची परिस्थिती
- सूर्यफुले ध्यास घेत आहेत.
- आता बिगूल वाट पाहत आहे.
- आता चवदार तळ्याचे पाणी थंड आहे.
--------------------------------------------------------------
कृती ३ : (काव्यसौंदर्य कृती)
(१) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कवितेतून जाणवलेले कर्तृत्व तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर : पारंपरिक वर्णव्यवस्थेने नाकारलेल्या व दैन्य, दारिद्र्याच्या अंधारात खितपत पडणाऱ्या मूक समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नवविचारांचा प्रकाश दाखवला. अन्यायाविरुद्ध न बोलणाऱ्या समाजात जागृती निर्माण केली. सर्व सुखांनी पाठ फिरवलेली असताना व अडचणींचा मार्ग असताना पारंपरिक वाटेने जायचे नाकारून, कठीण परिस्थितीवर मात करून डॉ. बाबासाहेबांनी नवा इतिहास घडवला. बहिष्कृत भारताला आत्मविश्वास दिला. अगाध ज्ञानाच्या बळावर लढा पुकारून शोषित जनतेच्या पायातल्या बेड्या मुक्त केल्या. चवदार तळ्याचा संग्राम यशस्वी केला. अशा प्रकारे पीडित व शोषित समाजाला सन्मानाने जगायला शिकवले.
-------------------------------------------------------------
(२) अगाध ज्ञानाच्या बळावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर केलेले कार्य, तुमच्या शब्दांत थोडक्यात लिहा.
उत्तर : अतिशय कठीण परिस्थितीमा डॉ. बाबासाह आंबेडकरांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांनी ही पदवी संपादन केली, ते उच्य विषित होते. त्यांनी ज्ञानाच्या बळावर इथल्या बहिष्कृत समाजाला अन्त करण्याचे अतिशय महत्त्वाचे कार्य अंगिकारले, शोषित, पीडित व वर्णव्यवस्थेतून नाकारलेल्या, समुदयीपासून वंचित असलेल्या जनतेला संघटित केले. त्यांनी 'शिका, संघटित व्हा व कर्म देऊन शोषित समाजाला आत्मविश्वास दिला. अन्यायाविरुदय या देण्यास प्रवृत्त केले. चवदार तळयाचा संग्राम यशस्वी केला. समाजाला बोधितत्त्वाची शिकवण देऊन बौद्ध धर्म स्वीकारला. स्वतंत्र भारता संविधान लिहून भारतीय राज्यघटनेचे ते शिल्पकार ठरले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना, त्यांच्या अगाध कर्तृत्वाला मानवंदनासाठी ''भारतरत्न' हा सर्वोच्च बहुमान सन्मानाने बहाल करण्यात आला.
------------------------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा