Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शुक्रवार, १ सप्टेंबर, २०२३

2 सप्टेंबर -दैनंदिन शालेय परिपाठ

        2 सप्टेंबर -दैनंदिन शालेय परिपाठ 



→ प्रार्थना

 आई माझा गुरु, आई कल्पतरू, सुखाचा सागरू आई माझी..... 


→ श्लोक 

• विदेके क्रिया आपली पालटावी । अती आदरे शुध्द क्रिया धरावी । जनी बोलल्यासारिखे चाल बापा मना कल्पना सोडि संसार तापा || 

• हे मना, विचारपूर्वक आपली वागणूक सुधारावी. मनी आदर ठेवून पवित्र कर्मे करावीत. जसे बोलतोस तसे वाग. या संसारातील दु विचार सोडून दे. 

→ चिंतन विचारकलहाशिवाय बुध्दिनिष्ठ जीवन नाही, बुध्दिनिष्ठ जीवनाशिवाय आत्मसंशोधन नाही, आत्मसंशोधनाशिवाय स्वाभिमानपूर्वक नाही आणि स्वाभिमानपूर्वक सुधारणेशिवाय उन्नती नाही. आगरकर

 → कथाकथन :- 

 संवाद - मनुष्याच्या बोलण्यावरून तो कसा आहे हे समजते. बोलण्यावरून माणसाची सभ्यता, सुसंस्कृतपणा, शालिनता, समजूतदार विद्वान, अहंकारी, डोंगी, पाखंडी, योगी, विनम्र, भांडखोर, हेकेखोर आहे का ते कळते. कुठल्याही व्यवहाराची सुरवात ही गोलचालीवरून होत असते. मग व्यवहार डॉक्टर-पेशंटचा असेल.. व्यापारी-ग्राहकाचा असेल, गुरू-शिष्याचा असेल. बोलाचालीमुळे ओळख होत असते. त्यामुळे कामे होतात क बिघडतात सुध्दा! म्हणून बोलतांना फार विचारपूर्वक बोलावे. कुणाचे मन दुखेल असे बोलू नये. म्हणतात ना मारण्याचे घाव औषध व मलमाने बुजतात पण बोलण्याचे घाव हृदयात पक्के बसतात! म्हणून शब्द हे फार मधुर व नम्र असावेत. मित्रांशी, नातेवाईकांशी, आप्तेष्टांशी, नागरिकांशी किंव | अपरिचितांशी वागतांना आपल्या वागणुकीमध्ये शालीनता, सज्जनता, नम्रता असणे अत्यावश्यक आहे. एखाद्याचे बोलणे आपल्याला जरी आवडत तरीही ते शांतपणे ऐकून घेण्याचा प्रयत्न करावा. त्याचे बोलणे पूर्ण झाल्यावर आपण बोलावे, नाहीतर भांडणाचा प्रसंग ओढवतो. चार चौघांमध्ये बेस असल्यास एखाद्यावर टिकास्त्र सोडू नये. नेहमी सार्वजनिक हित आणि कल्याणाबाबत बोलावे. काही लोकांना स्वतःच्याच गोष्टी सांगायच्या असतात. स्वतःच्या हुशारीचे कर्तृत्वाचे, गुणगान करीत राहतात. त्यामुळे समोरचा ऐकणारा कंटाळत असतो. तेव्हा समोरच्या व्यक्तीची मनस्थिती, विश् समजूनन घेवून समयसूचकतेनुसार बोलावे.

  आपण ज्या व्यक्तीशी वार्तालाप करीत आहो त्यांच्याशी आत्मीयतेने बोलावे. बोलण्यामध्ये संभावितपणा असावा. सान थोर सर्वाकरिता सन्मानजन भाषेचाच वापर करावा. बोलण्यामध्ये सावधपणा असावा, नेहमी संक्षीप्त व मुद्याचेच बोलावे. 'बोलण्यामध्ये मधुरता व शालिनातता, आत्मीयता असाच संतापून बोलणे, तोंड वेडेवाकडे कसून बोलणे हे सर्व हिनकस दर्जाची चिन्हे असतात. त्यामुळे बोलणाऱ्यांवर व इतरावर समोरच्या लोकावर त्या बाई परिणाम होत असातो, असे बोलणे प्रभावशाली होत नाही. उलट समोरचे बोलणाऱ्याला व्यर्थ बडबड करतोस म्हणून गावंढळ समजतील. आपल्याव्या एखादी चूक झाली तर ती प्रामाणिकपणे कबुल करावी व ती पुन्हा पुन्हा न करण्याचा प्रयत्न करावा. अपशब्द कुणालाही न बोलता नेहमी साखरेप्रमाण गोड बोलावे, अपशब्दामुळे सर्व मानवप्राणी आपल्यापासून दूर जाणार नाहीत. शब्द माणसाला तारतात व शब्दच माणसाला मारतात. म्हणून बोलतांना श फेक व्यवस्थित करावी. जेणेकरून आपल्या शब्दाने कुणाचे मन दुखणार नाही. कुणाला सजा होणार नाही. कुणाचे भांडण होणार नाही. कुणाला वैताग अपयश येणार नाही. 

 

→ सुविचार 

• शरीर, मन, आणि बुद्धी यांचा विकास करते, तेच खरे शिक्षण होय. 'शब्द असावे नम्रतेचे शब्द असावे साखरेचे

' • आम्हा घरी धन शब्दांची रत्ने, शब्दाची शस्त्रे यत्न करू । शब्दाचि आमुच्या जिवाचे जिवन, शब्द वाटू धन जन लोका ॥ - संत तुकाराम

 • कार्यात सचाटी, कसोटी आणि हातोटी असल्यावर प्रगती निश्चिती होते. प्राप्तीच्या आनंदापेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक अस 


→ दिनविशेष 

- श्री.म.माटे जन्मदिन - १८८६. श्रीपाद महादेव माटे यांचा जन्म २ सप्टेंबर १८८६ मध्ये विदर्भातील शिरपूर या गावी झाला. कृ . बुध्दीचे श्री.म.माटे एम.ए.नंतर पुण्यातील एस.पी. कॉलेजमध्ये प्राध्यापक झाले. शिकविण्याची हातोटी, विद्यार्थ्यांबद्दल वडीलधाऱ्यांसारखे प्रेम, सखोल या मुळे ते सर्व थरांमधील विद्यार्थ्यांमध्ये 'माटेमास्तर' या नावाने लोकप्रिय होते. त्यांची प्राध्यापकी केवळ महाविद्यालयापुरती मर्यादित नव्हती तर | कित्येक गरीब मुलांना त्यांच्याकडे आश्रय मिळे. बहुविध स्वरुपाचे ललित, वैचारिक लेखन करणारे स्वतंत्र शैलीचे साहित्यिक म्हणून ते मराठीत गा अस्पृश्य व उपेक्षित यांच्या जीवनातील भेदक अनुभवांवर त्यांनी हृदयस्पर्शी लेखन केले आहे. 'उपेक्षितांचे अंतरंग' हे त्यांचे पुस्तक विलक्षण ग अस्पृश्यता विरोधी कार्य करणारे ते कृतिशील व निष्ठावंत समाजसेवक होते. 


→ मूल्ये - • सेवाभाव, बंधुभाव


 → अन्य घटना

 • जपानने माघार घेतल्याने दुसरे महायुध्द संपुष्टात आले- १९४५

  • वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. शंकर आघारकर स्मृतिदिन - १९६२ 

  • विश्वनाथन आनंद याने त्याचा प्रतिस्पर्धी कास्पारोव्ह याचा पराभव करून बुद्धिबळ जिंकला. 

  • कन्याकुमारी येथे विवेकानंद स्मारकाचे उद्घाटन - १९७३ ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर स्मृतिदिन - १९७६ → 

  

उपक्रम 

• उपेक्षितांचे अंतरंग हे पुस्तक मिळवून त्याचे प्रगट वाचन करा. 

• 

→ समूहगान 

• सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ताँ हमारा... 


→ सामान्यज्ञान- • अंटार्क्टिका किंवा दक्षिण धृवीय खंड हे पृथ्वीवरील सर्वांत थंड, सर्वांत उंच, सर्वांत वादळी नि सर्वांत शुष्क भूखंड आहे. क्षेत्रफळ १०३५ कोटि चौरस किलोमीटर असून ते युरोप खंड व ऑस्ट्रेलिया या खंडापेक्षा मोठे आहे. हे खंड जवळजवळ वर्तुळाकार आहे. येथील बहुतेक भूमी एका प्रचंड खंडीय हिमवाहाने (ग्लेसियर) आच्छादलेली आहे. काही ठिकाणी याची जाडी में किमी इतकी आहे. तेथे जगातल्या एकूण बर्फापैकी ९० टक्के बर्फ आढळते. किनाऱ्यालगतचे हिमवाह व खंडीय हिमवाह पुरु हिमनग बनतात. अंन्टार्क्टिटात वॉस्टॉक येथे - ८९.२ अंश सेल्सिअस हे जगातील सर्वात कमी तापमान नोंदले गेले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा