Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

मंगळवार, १९ सप्टेंबर, २०२३

21 सप्टेंबर -दैनंदिन शालेय परिपाठ

       २१ सप्टेंबर -दैनंदिन शालेय परिपाठ

 

प्रार्थना 

प्रार्थना देवा तुला, मिटू देरे पैर बासना....

 → श्लोक

  प्रदोषे दीपकश्चंद्रः प्रभाते दीपकों रवि : त्रैलोक्ये दीपको धर्मः, सुपुत्रः कुलदीपकः ॥

   रात्री चंद्र प्रकाश देतो. दिवसा सूर्य प्रकाश देतो. तिन्ही लोकांत धर्म प्रकाश देतो आणि सुपुत्र कुळाला प्रकाशित करतो.

→ चिंतन

 खरे प्रेम, खरे वात्सल्य कोणत्याही संघटित सिध्दांताचे साचे कधीही कुणावर लादत नाही. ते व्देषाची आणि कलहाची पूजा बांधायला शिकवीत नाही. आजच्या संघर्षमय समाजात आमूलाग्र क्रांती घडवून आणण्यासाठी लागणारी जीवनदृष्टी खऱ्या प्रेमातूनच मिळते जे. कृष्णमूर्ती

 → कथाकथन 

'विक्रम आणि बेताड महाराष्ट्र राज्यातील निमोण गावाच्या वेशीवर खूप जुने एक विवेचे होते. - रातकिडयांचे आवाज सर्वत्र पूर्णपणे स्तब्धता होती. राजा विक्रम चिंचेच्या झाडाकडे वेगाने जात होता. त्याच्या पायादमन एक मोठा साप नि राजा विक्रम न घाबरता आपल्या लक्ष्याकडे वाटचाल करू लागला. चिंचेच्या झाडावर चढून फांदीवर लटकत असलेल्या प्रेताला नीच्या काठ पुरण्याकरिता राजा विक्रम नेत होता. तोच प्रेतावर वास्तव्य करीत असलेला वेताळ बोलू लागला." हे राजा विक्रम, या प्रेताला चार माणसे देवून नेतात त्यास तू एकटा नेत आहेस. नदीचा काठ दूर अंतरावर आहे. या कष्टाचा तुला थकवा होऊ नये व कामाचा कंटाळा येऊ नये म्हणून एक गोष्ट सांगतो. जरासा विरंगुळा होईल. कक्ष देऊन ऐक. निमोण गावामध्ये अनंत नावाचा एक शेतकरी होता. त्याच्याकडे द्राक्षाची बाग होती. देवाने दिलेले सर्व काही होते त्याच्याकडे यंदा द्राक्षाचे चांगले पीक आल्याने त्याने एक मोटारसायकल घेतली होती. उग्न होऊन चार वर्षे झाली होती. सर्व पत्नीला एक मुलगी होती. घरात आई वडील व दोन भाऊ होते. अनंतची पत्नी दुसऱ्यांदा गर्भवती होती. एके दिवशी अनंत द्राक्षाच्या शेतामध्ये आपल्या कामात मग्न होता. तोच घरातून निरोप आला. “घरी बाळ जन्माला आलेले आहे." अनंत खूप आनंदी झाला. धावत पळत तो घरी निघाला. मनात तो विचार करू लागला "घरी सर्व लोक आनंदात असतील. मी जाऊन त्या आनंदात सहभागी होईन." पण तो घरी पोहचला आणि पाहतो तो काय, घरात एक प्रकारची खिन्नता आहे, आनंद वगैरे काही नाही. बाळ जन्माला आल होतं हे मात्र खरं. हे राजा विक्रम, मूल जन्माला येणं ही आनंदाची बाब समजती जाते. तरी सुध्दा अनंतच्या घरी तसे काही दिसून आलेले नाही. याचे कारण काय? या प्रश्नाचे उत्तर तू यायला हवे. माहीत असतानासुध्या त्याचे उत्तर न दिल्यास तुझ्या डोक्याची १०० शकते होतील. " राजा विक्रम उत्तरला, "अनंतच्या घरी दुसऱ्यांदा पण मुलगी जन्माला आली. मुलगा जन्माला आला तर लोक जसे आनंदी होतात, तसे मुलीच्या बाबतीत नाही. मुलींना योग्य शिक्षण दिले जात नाही. त्यांचे नावावर स्थावर व जंगम मालमत्ता केली जात नाही. त्यामुळे मुली एवढ्या स्वावलंबी होत नाहीत. त्यांना नेहमी पुरुषांवर अवलंबून राहावे लागते. मुलींना योग्य शिक्षण दिले गेल्यास त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहतील व राष्ट्राच्या विश्रमातसुध्दा हातभार लावतील." राजा विक्रमाचे उत्तर ऐकून वेताळ जोरात हसला. राजाने उत्तर बरोबर दिले होते. परंतु राजा विक्रमाचे तोते वेताळ त्या प्रेताला घेऊन चिंचेच्या झाडाच्या फांदीवर लटकू लागला.

 → सुविचार

 • 'मुलगा मुलगी एक समान दोघांनाही शिकवा छान.'

 → दिनविशेष

 • कारडॅनो जेरोनिमो स्मृतिदिन १५७६. कारडॅनो जेरोनिमो याचा जन्म २४ सप्टेंबर १५०१ मध्ये झाला. हा इटालियन वैद्यकशास्त्रज्ञ व गणितज्ञ १६ व्या शतकात होऊन गेला. वैद्यकीचा अभ्यास याने पूर्ण केला तरी त्यातील उच्च शिक्षणाची संधी त्याला वंशभेदाच्या वादांमुळे नाकारली गेली. पण त्यांच्या ज्ञानामुळे पेव्हिया बोलांना येथील विद्यापीठात त्याला नोकरी मात्र मिळाली. बीजगणितातील नैपुण्यामुळे यास युरोपात कीर्ती मिळाली. वैद्यक, खगोलविज्ञान, फलज्योतिष इ. विषयांवर याची पुस्तके आहेत. अंकगणित, बीजगणित, खगोलशास्त्र या विषयावर याचे अभ्यासू ग्रंथ आहेत. सोळाव्या शतकात संशोधन करून याने अंध व बधिर मुलांना कसे शिक्षण द्यावे यावरचा ग्रंथ लिहिला.

मूल्ये -

 • संशोधनवृत्ती, ज्ञानवृध्दी.

अन्य घटना -

 • ऑनेज हाईक कॅमरालिंग डच पदार्थ विज्ञानशास्त्रज्ञ जन्मदिन १८५३

  • जागतिक अंधश्रद्धा निर्मूलन दिन

→ उपक्रम

 • अंध व मूकबधिर मुलांना शिक्षण देणाऱ्या संस्थांची माहिती मिळवा.

→ समूहगान 

- कदम कदम बढाए जा, खुशी के गीत गाये जा.... •

 सामान्यज्ञान 

- • पृथ्वीवर मनुष्याचे अस्तित्व निर्माण होण्यापूर्वी सुमारे ३८९ दशलक्ष वर्षापासून कीटक अस्तित्वात आहेत.विंचवाच्या जाती सातशेच्या आसपास आढळतात. उबदार हवामान, दगडगोट्यांचा खडबडीत प्रदेश येथे विंचू सापडतात. विंचवाचे वीष मज्जासंस्थेवर आघात व परिणाम करते. जेमतेम इंचभरापासून ते फूटभर आकार असलेलेही विंचू आढळतात.

 • किळसवाणा प्राणी म्हणून झुरळाकडे आपण पाहतो. पण झुरळे सर्व प्रकारचा कचरा खातात. झुरळे प्लॅस्टिकदेखील खातात. शर पुरातन कालापासून अस्तित्वात असून पृथ्वीच्या उत्क्रांतीच्या प्रतिकूल अवस्थांमध्येही तग धरून राहिली आहेत. जगभर ३५०० जाती आढळतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा