२५ सप्टेंबर -दैनंदिन शालेय परिपाठ
→ प्रार्थना
इतनी शक्ती हमें देना दाता...
→ श्लोक
यौवनं, धन संपत्तिः प्रभुत्वं अविवेकिता । एकैकमप्य नर्थाय किमु यत्र चतुष्टयम् ॥
→ चिंतन
- मनुष्यास मानसिक श्रमाचा जात्या कंटाळा आहे. कारण मानसिक श्रम शरीर श्रमापेक्षा अवघड आहे. मनाची स्थिती लोखंडासारखी आहे. लोखंड वहिवाटीत नसले म्हणजे त्याला तांबेरा येऊन ते कुचकामाचे होते. पण जर त्यावर नित्य घर्षण घडत असेल तर ते सतेज राहून फार दिवस टिकते. ज्याच्या मनाला श्रम करण्याची सवय लागलेली नाही त्याचे मन लोखंडाप्रमाणे गंजून जाऊन कोणत्याही कामास निरुपयोगी होते. वस्तऱ्याला जसा दगड, तशा बुद्धीला अडचणी आहेत. अडचणीच्या दगडावर बुद्धी घासल्याने ती अत्यंत तीव्र होते. - आगरकर
कथाकथन '
वाईट संगतीचा परिणाम'
महेश व राकेश दोघांची छान मैत्री होती. महेश हुशार तर राकेश खोडकर होता. परंतु दोघांची गट्टी मात्र पक्की होती. राकेश खोडकर असल्यामुळे नेहमी दुसऱ्याची गंमत करायचा. महेश मात्र त्याला साथ द्यायचा. एक दिवस राकेशने वर्गातील ड्रॉप्समधील रंगीत खडू चोरले. दुसऱ्या दिवशी गुरुजी आले. त्यांनी ड्रॉप्स उघडला, बघतात तर खडू नाही. गुरुजींनी चौकशी केली असता कुणीच सांगितले नाही. शेवटी गुरुजींनी सर्व मुलांना शिक्षा केली. परंतु महेशनी सांगितले नाही. गुरुजींची गंमत केल्यामुळे दोघेही हसू लागले. हळूहळू दोघांनी शाळेतील मुलांचे पेन्सिल, पेन, खोडरबर, छोट्यामोठ्या वस्तुंची चोरी करणे सुरू केले. ते शाळेला बुट्टी मारुन सिनेमाला जायचे. राकेशने सांगितल्याप्रमाणे महेश आपल्या वडिलांच्या पॉकेटमधील पैसे चोरायचा. महेशचे आईवडील या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचे. दहाव्या वर्गात दोघेही नापास झाले. घरी आईवडिलांनी नापास झाल्याचे कारण विचारले असता, 'आम्ही पेपर चांगले सोडविले, पण परीक्षकांनी नापास केले.' असे उत्तर द्यायचे. नापास झाल्यामुळे दोघांनाही खूप वेळ मिळता. तेव्हा गावातील गुंड प्रवृत्तीच्या मुलांनी यांना हेरले व यांच्याकडून छोट्या-मोठ्या चोरीचे काम करून घेऊ लागले. अशा प्रकारे महेश व राकेश सराईत चोर झाले. पुढे दोघे मिळून चोरी करू लागले. एकदा पोलिसांनी त्यांना पकडले. चौकशीसाठी दोघांच्याही घरी पोलिस गेले. अटक केल्याची माहिती सांगताच त्यांच्या आईवडिलांना धक्का बसला. दोघांच्याही आईवडिलांनी त्यांना घरातून हाकलून दिले. महेश व राकेश मोठ्या शहरात गेले. दोघांनी वेगवेगळ्या ठिकाणी चोरी करायचे निश्चित केले. त्यानुसार ते वेगवेगळ्या मार्गांनी चोरी करण्यासाठी गेले. महेशच्या गुटखा खाण्याच्या व्यसनापीटी तो एका पान टपरीमध्ये गेला. परंतु तेथील विद्युततार तुटलेले होती. तारेतून विद्युतप्रवाह सुरू होता. महेशचा चुकून तारेला हात लागला व तिथेच गतप्राण झाला. राकेश किराणा | दुकानात चोरी करायला गेला. त्या दुकानात उंदीर जास्त जाते. उंदरांना खाण्यासाठी साप पिशवीखाली दडून बसला होता. राकेशचा पाय अंधारामुळे सापावर पडताच सापाने जोरदार चावा घेतला. थोड्या वेळाने राकेश सर्पदंशाने मरण पावला. अशा प्रकारे दोघांचा करुण अंत झाला.
→ सुविचार
• दुर्जनांचा दर्प ही एक भयंकर संकटाची सूचना असल्यामुळे सज्जनांनी तीपासून सावध असणे हेच श्रेयस्कर असते.
• जे वाईट मार्गाने मिळविले जाते, ते वाईट मार्गानेच नष्ट होते. दुष्ट लोक कमीच विचार करत नाहीत व त्यामुळे स्वतःचे नुकसान करून घेतात.
• लोभी मनुष्य केवळ पैसा पाहतो, पण त्याच्या प्राप्तीतील संकटे पाहत नाही, यामुळे त्याचा नाश होतो.
• जो शीलवान आणि ज्ञानी आहे, जो सत्यवादी आहे, आपले कर्तव्य जाणणारा आहे, अशांची संगत परा. वाईटांची संगत भरू नये.
→ दिनविशेष
बॅ. नाथ पै. जन्मदिन १९२४. बॅ. नाथ पै यांचा जन्म कोकणात १९२४ मध्ये झाला. वेंगुर्ला, बेळगाव, पुणे येथे त्यांचे शिक्षण झाले. खंडन येथे ते बॅरिस्टर होण्यासाठी गेले. ते प्रथमपासून राष्ट्रवादी विचारसरणीचे आणि अभ्यासू वृत्तीचे होते. गोवामुक्ती आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. खंडनमध्ये त्यांनी भारतीय समाजवादी गटाची स्थापना केली. तेथेच ते हिंदी विद्यार्थी मजलिसचे अध्यक्षही होते. कोपेनहेगेन येथील सोशालिस्ट इंटरनॅशनलचे ते अध्यक्ष होते. त्यानिमित्त जगभर त्यांचा प्रवास झाला. १९५७ मध्ये ते भारताच्या लोकसभेवर संयुक्त महाराष्ट्र समितीचे उमेदवार म्हणून निवडून गेले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांचा मोठाच सहभाग होता. अभ्यासूवृत्ती, तळमळ, अमोघ वक्तृत्व या गुणांनी त्यांची कारकीर्द घणाघाती ठरली होती. त्यांचे लोकसभेतील भाषण ऐकण्यास पंडित नेहरू आवर्जून उपस्थित राहत. हृदविकाराच्या झटक्याने १९ जानेवारी १९७१ रोजी त्यांचे अचानक निधन झाले. महाराष्ट्र आणि भारत एका निष्ठावंत प्रजासमाजवादी कार्यकर्त्यास मुकला.
→ मूल्ये
• ध्येयनिष्ठा, तळमळ, स्वातंत्र्यप्रेम
→अन्य घटना
• बेंजामिन हॅरिस यांनी अमेरिकेत पहिले वर्तमानपत्र प्रकाशित केले.
• रयत शिक्षण संस्थेची स्थापना काले येथे १९१९
• मराठा महासंघाचे संस्थापक अण्णासाहेब पाटील जयंती- १९३३.
→ उपक्रम
• नाथ पै बद्दल अधिक माहिती मिळवा. चरित्र वाचा, तसेच अण्णासाहेब पाटलांचे चरित्र मिळवा व वाचन करा.
→ समूहगान
• जहाँ डाल-डाल पर सोनेकी चिडिया करती है बसेरा...
→ सामान्यज्ञान
• सायकल १८२० मध्ये सर्वप्रथम अस्तित्वात आली. १८६५ मध्ये तिला बायसिकल हे नाव मिळाले. १८८५ पर्यंतची वर्षे किरकोळ बदल घडवून आणण्यात गेली. १८८५ ला आजच्या स्वरुपातली प्राथमिक अवस्थेतील सायकल अस्तित्वात आली. आताची सायकल सहज वेगाने चालविली तरी ताशी १५ कि.मी. वेगाने चालू शकते. स्पर्धेत जोराने सायकल चालविणारे ताशी ४०/५० कि.मी. वेगाने जाऊ शकतात. तर स्पर्धेमध्ये उतारावर सायकलीचा वेग ८० कि.मी. वरही जाऊ शकतो.
• कोकण रेल्वे हा भारतीय रेल्वेचा कठिण असा प्रकल्प. दोन डोंगरामधील अनेक पूल व बोगदे हे याचे वैशिष्ट्य आहे. काही ठिकाणी दोनशे दहा फूट उंचीच्या खांबावरचे पूल तर काही ठिकाणी साडेसहा कि.मी. लांबीचे बोगदे आहेत..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा