Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शनिवार, २ सप्टेंबर, २०२३

27 सप्टेंबर -दैनंदिन शालेय परिपाठ

        २७ सप्टेंबर -दैनंदिन शालेय परिपाठ

 

→प्रार्थना

 मंगलनाम तुझे सतत गाऊ दे....

→श्लोक 

दातृत्वं प्रियवक्तृत्वं, धीरत्वं, उचितज्ञता । अभ्यासेन न लभ्येयुः चत्यारः सहजा गुणाः ॥ दानशूरपणा, इतरांना आवडेल असे भाषण करण्याची कला, धीरोदात्तपणा आणि प्रसंगावधान हे चार गुण जन्मजात असतात. ते अभ्यासाने साध्य होत नाहीत.

→ चिंतन

 प्रेम करण्याचा व करवून घेण्याचा मूल प्रयत्न करते. प्रत्येक मूल आपल्या निकटच्या माणसांवर प्रेम करते. त्यांच्या उपयोगी पडावे, त्यांना आवडावे अशी त्यांची इच्छा असते. लाडक्या प्रेमळ शब्दांची व कृतीची त्याला तीव्र गरज भासते. जेव्हा प्रौढ व्यक्ती त्याच्याशी खेळते आणि शक्य त्या सर्व तन्हांनी आपले प्रेम व्यक्त करते तेव्हा ती पूर्ण आनंदी असते.

 → कथाकथन

 राजा राममोहन राय आपल्या या देशात स्वी परंपरेत सती प्रदेा अन्यन्य महत्व होते. अशा या अमानुषप्रवेश प्रविरोध प्रत्यबंद करण्यासाठी कोणी जीवाचा आटापिटा केला असेल तर, ते आहेत राजा राममोहन राय १८११ साली सती कंद आणि जीव वाचविण्यासाठी तिथी धडपड तडफड, असा हा दारुण प्रसंग पाहून राजा राममोहन चांगले मानसिक क्लेश झालेत. सड़ी परंपरावादी मुठभर लोकांनी तिचा बळी घेतला. याची त्यांना खात्री पटली. या अशा अमानवी रूढींना कोठेतरी यावा यासाठी त्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा पणाला लावून शासनकर्त्या इंग्रजांना या प्रथेविरूध्द कायदा करण्यास एवढेच नव्हे तर त्यावर उबजावणीस भाग पाडले राजा राममोहन राय यांचा जन्म २२ मे १७७२ चा. त्यांचे घराणे नवाब सिराजुद्दीना यांच्या सेवेत होते. नवाबाने त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून या घराण्याला 'राय' ही सन्माननीय पदवी प्रदान केली होती. दिल्लीचा बादशाह (दुसरा अकबर) याने राममोहन राय यांच्या उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल त्यांना 'राजा' हा किताब देऊन गौरव केला. राजा राममोहन राय हे बहुभाषी होते. बंगाली भाषा असलेले राय संस्कृत व फारसी भाषा घरीच शिकले. या शिवान बनारसला जावून संस्कृत भाषा शिकून वेद पुराणाचे अध्ययन केले. पवित्र कुरआनाचाही त्यांनी सखोल अभ्यास केला. जगात देव एकच असून साध्या देवांच्या मूर्त्या काल्पनिक आहेत, असे त्यांचे पक्के मत झाले. बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी ते तिबेटल गेले. तिथेही त्यांना बुध्दाच्या मुर्त्या दिसल्या. देव एकच आहे तो निगुर्ण निराकार आहे, तेव्हा मूर्तिपूजा कशासाठी ? याच प्रश्नावरून राय यांच्या घरात वाद निर्माण झाला. राय यांचे घराणे मूर्तिपूजक व हिंदुधर्मनिष्ठ होते. राम मोहन राय यांना हे पटत नव्हते. शेवटी वाद न वाढविता राममोहन यांनी घर सोडणे पसंद नव्हे त्यांना घराबाहेर पाठविण्यात आले. राममोहन राय यांच्या काळात धर्माचा समाजावर प्रचंड पगडा होता. धर्म हा समाजाचा प्राण समजला जात असे. धर्मातील नीतिमत्तेचा व्हास झाल्याने ती ढासळली होती. त्यातील अद्वैत संपले होते. धार्मिक सामंजस्य प्रेमाची जागा द्वेषाने व्यापली होती. त्यामुळे देशात जातीयतेचे प्राबल्य वाढून आपसात संघर्ष संहार सुरू झालेत. अशी या परिस्थितीत समाजात शांती व सामंजस्य नांदावे म्हणून राजा राममोहन राय यांनी विवेकाया ज्ञानदीप प्रज्वलित करून समाजासाठी प्रबोधन कार्य सुरू केले. पौर्वात्य- पश्चिमात्य, ज्ञानविज्ञान, धर्म-संस्कृती पांचा तौलनिक अभ्यास करून समाजाला योग्य मार्गदर्शन केले. कर्मठ संप्रदाय निष्ठावंतानी राममोहनराय यांना पाखंडी ठरविले तरीही त्यांनी आपले कार्य थांबविले नाही. राजा राममोहन राय यांनी 'ब्राह्मो समाज'ची स्थापना केली. सर्व संप्रदाचे विसर्जन करावे असे त्याचे मत होते. राय यांच्या प्रखर पत्रकारितेने तसेच अमोध ग्रंथलेखनामुळे त्यांचे नाव जगभरात गाजले. त्याच्या अनेक ग्रंथाचे विविध भाषेत अनुवाद करण्यात आलेला आहे. २७ सप्टेंबर १८३३ हा राजा राममोहन राय यांचा स्मृतिदिन.

→सुविचार:- 

• ज्या राष्ट्रातील स्त्रिया विकसित असतील त्या राष्ट्राचा विकास होण्यास वेळ लागत नाही म्हणून स्त्रियांनी शिक्षणात प्रचंड भरारी घ्यावी व अनिष्ट रूढी जाचक चालिरिती, अंधश्रध्दा यांना मूठमातकी द्यावी.

 →दिनविशेष

  • अनुताई बाप स्मृतिदिन - १९९२. बालशिक्षणाच्या क्षेत्रात स्वयंभू तेजाने अर्धशतक तळपणारी एक तेजस्वी तारका २७ सप्टेंबर १९९२ निखळली. पद्मभूषण ताराबाई मोडक यांच्या तालमीत तयार झालेल्या अनुताईंनी कोसबाडच्या टेकडीवरून आदिवासी बालकांच्या जीवनामध्ये प्रकाशाची किरणे उजळून त्यांचे जीवन आनंददायक बनविले. मुलांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाशी सुसंगत असेच शिक्षण मुलांना मिळायला हवे. ते मुलांना त्यांच्या परिसरातून व त्यांना भावणारेच द्यायला हवे हे त्यांनी स्वतःच्या आचरणातून पटवून दिले, बालवाड्या, अंगणवाड्या, विकासवाड्या आणि कुरणशाळा त्यांनी आदिवासींच्या पाड्यावरून, वस्त्यावरून सुरू केल्या. मोठ्या शहराच्या माँटेसरीत अडकून राहिलेले बालशिक्षण अनुताईंनी महाप्रयत्नांनी ग्रामीण आणि आदिवासी भागात पोहोचविले. आज २५,००० पेक्षा अधिक अंगणवाड्या आणि १८,००० पेक्षा अधिक बालवाड्यांमधून महाराष्ट्राच्या ७५ टक्के पेक्षा अधिक .....पर्यंत बालशिक्षण पोहोचले. याचे श्रेय ताराबाई मोडक आणि अनुताई वाघ यांनाच आहे.

→ मूल्ये

 • निष्ठा, तळमळ

→ अन्य घटना

 • राजा राममोहन रॉय स्मृतिदिन १८३३ 

 • कोमागाटा मारु' हे गदर पार्टीचे जहाज हुगळी नदीच्या पात्रात आले - १९१४ -

  • शिवराम महादेव परांजपे स्मृतिदिन - १९२९

   • जागतिक पर्यटन दिवस

→ उपक्रम

 • अनुताई वाघांचे चरित्र मिळवून वाचा. बालशिक्षणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रसिध्द व्यक्तींबद्दल माहिती सांगा.

→समूहगान

  • बालवीर हो सज्ज होऊ या, गात गात ताल घेत मार्ग काढू या....

 → सामान्यज्ञान

  • दि. १ ऑगस्ट १९८६ पासून भारतात 'स्पीड पोस्ट' ही शीघ्र टपालसेवा सुरू झाली. साध्या पोस्टापेक्षा थोडा अधिक आकार देऊन पत्र/ पार्सल पाठविता येते. ते अंतराप्रमाणे २४ ते ४८ तासात पोहोचविले जाते.

• कालगणना कालाचे मापन करणाऱ्या पध्दतीस लगणना म्हणतात. हे शास्त्र असून इंग्रजीतील क्रॉनॉलाजी व इरा या दोन शब्दांसाठी कालगणना ही संज्ञा मराठीत रुढ आहे. कालगणनेचा मूळ हेतू मुख्यतः घडत असलेल्या व घडलेल्या घटनांचा कालानुक्रम सांगणे असा असतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा