30 ऑगस्ट-दैनंदिन शालेय परिपाठ
→ प्रार्थना
- अता वंदिता मी गुरु माऊलीला, अति सादरे मी नमि या पदाला.
श्लोक -
गुणी गुणं वेत्ति न वेत्ति निर्गुणः । बली बलं वेत्ति न वेत्ति निर्बल: । पिको वसन्तस्य गुणं न वायसः । करी च सिंहस्य बलं न मूषकः ।।
गुणी जनच गुणांची पारख करतात, ज्यांच्या अंगी गुण नाहीत, ते गुणांची पारख करू शकत नाहीत. बलाची पारख बलवानच करू जाणे, निर्बलाचे ते काम नव्हे. वसंत ऋतूचे सौंदर्य कोकिळच करील, कावळ्याला ते शक्यच नाही. सिंहाचे सामर्थ्य हत्तीच जाणू शकेल. उंदराला ते शक्य नाही.
→ चिंतन-
सजीव सृष्टीतला मानव हा प्राणी इतर प्राण्यांशी तुलना करता सर्वात जास्त परावलंबी आहे. माणसाला स्वावलंबी होण्यासाठी अनेकांची | बराच काळ मदत घ्यावी लागते. या प्रक्रियेत पालनकर्ता आपले वर्चस्व प्रस्थापित करीत असतो. आपल्या इच्छाआकांक्षा लहानांवर लादत असतो. अशा परावलंबित्वामुळे लहानांचा आत्मविश्वास जोपासला जात नाही. आज लहान मुलांप्रमाणे स्त्रीजात, समाजातील दलितवर्ग आपले स्वातंत्र्य | हरवून बसलेला आहे. परंतु हा हक्क त्यांनी मिळविला पाहिजे.
→ कथाकथन
- 'ससा आणि चिमणा' - एका जंगलातील झाडावर एक चिमणा राहात होता. त्याला आपल्या सोबत्यांकडून कळले की, बाजूच्या प्रदेशात उत्तम पीक आले आहे. त्यामुळे भरपूर खाणे मिळण्याच्या आशेने तो चिमणा इतर सोबत्यांबरोबर बाजूच्या प्रदेशात गेला. तिकडचे भरपूर खाणे बघितल्यावर घरी परतण्याची त्याला आठवणही येत नाही. चिमणा बरेच दिवस या प्रदेशात राहतो. इकडे चिमण्याच्या रिकाम्या घरट्यात एक ससा येऊन राहतो. काही दिवसांनी धष्टपुष्ट झालेला चिमणा आपल्या घराच्या ओढीने परत येतो. तेव्हा आपल्या घरट्यात मशाला बघून तो म्हणतो, 'चालतो हो इथून ! दुसऱ्याच्या घरात शिरताना तुला लाज वाटली नाही ?' 'उगीच मला कशाला शिव्या घालतोस? हे घर माझं आहे! ससा शांतपणे उत्तरतो. 'माझ्या घरात घुसून मलाच हुसकावतोस काय?' चिमणा रागाने बोलतो.' त्याबरोबर ससा त्याला समजावतो, 'हे बघ.. विहीर, तळे, झाड हे एकदा सोडून गेल्यावर त्यावर थोडीच आपली मालकी सांगता येते ?' तेव्हा चिमणा म्हणतो, 'आपण एखाद्या धर्मपंडिताकडे जाऊन त्यास त्या वादावर निकाल देण्यास सांगू ! ससा या गोष्टीस तयार होतो.' त्या | झाडापासून काही अंतरावर एक रानमांजर या दोघांचे भांडण ऐकत होते. रानमांजराने धर्मपंडिताचे सोंग घेण्याचे ठरविले. जवळच असलेल्या नदीकाठी जप करीत रानमांजर बसले. थोड्या वेळातच चिमणा आणि ससा त्या रानमांजरासमोर येताच रानमांजराने प्रवचन सुरु केले. 'संसारात अर्थ नाही. घरदार, बायकामुले हे सर्व काही क्षणभंगुर आहे. धर्मच माणसाचा आधार आहे.' ससा त्या रानमांजराचे प्रवचन ऐकून चिमण्यास सांगतो की, हा कोणी धर्मपंडित दिसतोय. त्यालाच न्यायनिवाडा करण्यास सांगू या !' 'पण हा तर आपला जन्म वैरी आहे... म्हणून आपण लांबूनच न्याय करायला सांगू !' चिमणा सशाला सांगतो. मग दोघेजण त्याला लांबूनच सांगतात, 'पंडितजी ! आमच्या दोघांत राहण्याच्या जागेवरून वाद निर्माण झाला आहे. | आपल्या शास्त्रानुसार आम्हाला न्याय द्या. आमच्यापैकी जो खोटा ठरेल त्याला आपण खावे,' पंडित रानमांजर या बोलण्यावर ताबडतोब उत्तरते, 'छे! छे! हिंसेसारखे दुसरे पाप नाही. ! मी तुम्हाला न्याय देईन, पण खोटा ठरेल त्यास मी खाऊ शकत नाही. हे पाप माझ्या हातून होणार नाही. मला हल्ली म्हातारपणामुळे नीट ऐकायला येत नाही. तुम्हाला जे काही सांगायचे असेल | ते जवळ येऊन सांगा बघू !' रानमांजराच्या या धूर्त बोलण्यावर चिमणा व ससा विश्वास ठेवतात आणि अगदी जवळ जाऊन बसतात. त्याबरोबर चिमण्याला पंजा मारून व | सशाला दातांनी पकडून ते रानमांजर चट्टामट्टा करते.
सुविचार -
• जीवनाशी निगडित नसलेले तत्वज्ञान हे दोरी तुटल्यामुळे आभाळात भरकटणाऱ्या वावडीप्रमाणे असते.
• जो वेळेवर जय मिळवील तो जगावर जय मिळवील. - नेपोलियन .
• शहाण्या माणसाने विश्वासघातकी आणि धूर्त माणसांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नये.
दिनविशेष -
• नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ कवी बी यांचा स्मृतिदिन - १९४७ : कविवर्य 'बी' यांचे नाव 'नारायण मुरलीधर गुप्ते' हे आहे. त्यांचा जन्म १८७२ मध्ये वऱ्हाडात मलकापूर येथे झाला व त्यांचे पुढील सर्व आयुष्यही वऱ्हाडातच गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षण यवतमाळ येथे व पुढे अमरावतीस झाले. वडिलांच्या अकस्मात निधनाने 'बी' यांना सरकारी कारकुनाची नोकरी करावी लागली. त्यांची पहिली कविता 'प्रणय पत्रिका' ही | असून ती १८९१ मध्ये हरिभाऊ आपटे यांच्या 'करमणूक' पत्रात छापली गेली. 'चाफा' ही त्यांची अतिशय गाजलेली कविता होय.
→ मूल्ये • काव्यप्रेम, कर्तव्यनिष्ठा.
→ अन्य घटना
• नारायणराव पेशव्यांचा वध - १७७३.
• रुदरफोर्ड अर्नेस्ट यांचा जन्मदिन - १८७१.
• इन्टेंट - १ बी हा उपग्रह अमेरिकेच्या चॅलेंजर मधून सोडण्यात आला - १९८३.० सर्पमित्र पु.ज.देवरस यांचे निधन - १९९१
→ उपक्रम
• कवी 'बी' यांच्या काही कविता संकलित करा. 'माझी कन्या' यासारख्या कविता पाठ करा.
→ समूहगान - • हम भारत की नारी हैं, फूल नहीं चिनगारी हैं....
सामान्यज्ञान -
• आवाज मोजण्याच्या मापाला इंग्रजीत डेसिबल म्हणतात. मराठीत त्यालाच ध्वन्यांक म्हणतात. हा कसा मोजता येईल? | शांत ठिकाणी आपला श्वासोच्छवास आपण ऐकू शकतो तो दहा ध्वन्यांक असतो. झाडांच्या पानांच्या सळसळीचा ध्वन्यांक वीस, तर मनगटावरील घड्याळाच्या आवाजाचा तीस ध्वन्यांक असतो. पन्नास ध्वन्यांकाने झोपमोड होते. आपल्या बोलण्याच्या आवाजाचा साठ ध्वन्यांक असतो. मिक्सरचा ध्वन्यांक ऐंशी असतो. त्याने कानाला इजा पोहोचू शकते. आपल्या मोठ्या शहरात ध्वन्यांक पन्नासपेक्षा कमी नसतो. आंतरराष्ट्रीय ध्वन्यांक मान्यता ४५ इतकी आहे. विमानाचा आवाज १०० ध्वन्यांक असल्याने विमानतळ शहरापासून दूर असतात. ध्वनिप्रदूषणाने बहिरेपणा ओढवतो. कार्यक्षमता व अचूकता मंदावते. ध्वनिप्रदूषणाचे दुष्परिणाम चोरपावलाने पण घातक होतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा