31 ऑगस्ट-दैनंदिन शालेय परिपाठ
प्रार्थना -
नमो भास्करा दे अनोखा प्रकाश, तनुचा मनाचा कराया विकास...
→ श्लोक
जनी भक्त, ज्ञानी, विवेकी, विरागी । कृपाळू, मनस्वी, क्षमावंत, योगी । प्रभू दक्ष व्युत्पन्न चातुर्य जाणे । तयाचेनि योगे समाधन बाणे ।।
: हे मना, जो सर्व लोकांत भक्त, विचारी, वैराग्यशील, कृपाळू, संयमी (मनस्त्री), क्षमाशील, योगी, सर्वदा सावधानी, विद्वान, चतुरओळखला जातो तोच सद्गुरु होय. त्याच्या कृपेनेच खरे समाधान मिळते, → चिंतन- आई मूर्तिमंत प्रेम होती, तरी वेळप्रसंगी ती कठोरही होत असे. तिच्या कठोरपणातच खरे प्रेम होते. खरी माया होती. कधी ती प्रेमाने बो तरी कधी रागाने धोपटी, कधी गोड प्रेमाने तर कधी कठोर प्रेमाने ती आम्हाला बाढवी. मुलांचा कोणी अपमान केला तर आई सहन करणार नाही। आईचा अपमान मुलांनी सहन करता काम नये, तरच ती खरी आई व ते तिचे खरे मुलगे.
कथाकथन '
मातृस्मरण : एक अखंड झरा' - मुलांनो तुम्हाला आता एक शाश्वत सत्य सांगते की, आई हे भगवंताचे मूर्त रूप आहे मूर्तीमध्ये देवळातल्या गाभान्यामध्ये तीर्थक्षेत्रावर शोधायला न जाता आपल्या आईच्या रुपात तुम्ही प्रत्यक्ष अनुभवा, असे सांगणे आहे. आपल्या आईवर नितांत प्रेम करा, तिच्या मनोकामना पूर्ण करा आणि तिला आयुष्यभर आनंदी ठेवा. आईसारखे या विश्वात नाही हे लक्षात ठेवा म्हणजे झाले. देवाचे स्मरण तर कराच परंतु आपल्या प्राणप्रिय आईबेसुध्दा नित्य स्मरण करा. अंत करणाय तुमच्यावर प्रेम करणारी केवळ तुमची आईच असते. मूल पोटात असल्यापासून सांभाळ करणारी ही आई मुलाच्या चिंतनात सदैव गर्क असते. तुम् सांगतो की भास्कर दामोदर पाळंदे या कवीने आईचे अनंत उपकार स्मरताना म्हटले आहे की, त्वाचि शिकविले वाढविले त्वां आहे मजवर भार तुझ्या या दृढ ममतेचे होते वारंवार... आईने लहानाचे मोठे केले, प्रेमाने वाढविले, भार सहन केला हे तिचे किती उपकार आहेत. वास्तविक | उपकार मुलांनी कायम स्मरायला हवेत. एका कवीने म्हटले आहे की, माझे देह देऊनी तूंच रक्षिशी, अन्न देवूनि तूच पोशिशी बुध्दी देऊनी काम सांगशी, ज्ञान देऊनी तूच तारिशी... मुख्य म्हणजे एका आईमुळे हा सुंदर देह आपल्याला लाभला आहे हे कधीही विसरू नका. तिने अन्न देऊन आपला हा
देह सर्वाधनि पोसला आपल्याला सुसंस्कारित बुध्दी दिली आणि ह्या जगात वावरायचे कसे हे शिकवले. ज्ञान देऊन आपल्याला शहाणे केले. हे एका आईव्यतिरिक्त |
विश्वात दुसरे कोणीही करीत नाही. म्हणून खरे तर आईच्या अखंड नामस्मरणात आपण प्रत्येक क्षण व्यक्तीत करावा, असे माझे तुम्हाला आपल्या पाठीवरून जेव्हा आईचा मायाभरला हात फिरतो आणि आपण कितीही मोठे झालो, खूप कर्तृत्ववान झालो तरी अतिशय प्रेमाने एकेरी मारणारी फक्त आईच असते. आपली सर्व प्रकारची विचारपूस करणारे आणि अतिशय मोकळेपणाने बोलणारे एका आईव्यतिरिक्त ह्या विश्वात दुस कोणीही नाही.... आपण कितीही मोठे झालो तरी आपल्या उशाशी बसून आपल्या केसातून मायेने हात फिरवणारी आई हे जगातले फार मोठे आश्वा आहे. मुलांनो, ह्या जगात आईवर बेहद प्रेम करणारी काही उत्तुंग माणसे आहेत. इतकी विश्वविक्रमी मुले असूनही झोपतानाही त्यांना उशाला आपन्ना आईच्या नऊवारी पातळाची मऊशार चौघडी लागते. थोडक्यात काय तर आपल्या प्राणप्रिय आईला ह्या विश्वामध्ये दुसरा पर्याय नाही. मुलांनो, म्हणून तुम्हाला इतकेच आता शेवटी सांगते की आपल्या वृध्द झालेल्या आईवर जीवापाड प्रेम करा. तिला केवळ आनंद मिळेल असेच जगा म्हणजे झाले
. → सुविचार
- • 'आई हे सर्व देवतांचे दैवत आहे.' सदैव जन्मदात्रीची सेवा कर तू ज्ञानेशा, मायपित्याची सेवा केल्याने मिळेल मुक्ति आि | आशा। जन्म देऊनि तिने दाविल्या तिन्ही दाही दिशा रे, आईसारखे महान दैवत जगात दुसरे नाही रे ।।
• माता-पित्यासमोर उध्दटपण थट्टामस्करी, अधाशीपणा व क्रोध करू नयेत. आपल्या आई-बापांना जो कधी कडू वा कठोर शब्दांनी दुखवीत नाही तो खरा सुपुत्र.
दिनविशेष -
ताराबाई मोडक स्मृतिदिन - १९७३ आदिवासी भागातील मुलांचे शिक्षण हे खऱ्या अर्थाने 'जीवन शिक्षण' कसे होईल त्य शिक्षणाभिमुख व विज्ञानसन्मुख कसे करता येईल. त्यांच्यासाठी योग्य असे बालसाहित्य कसे पुरविता येईल. त्यांचा अभ्यासक्रम कसा असावा, रह | शिक्षकी शाळेतून त्यांना व्यवस्थित शिक्षण कसे देता येईल या दृष्टीने अनेक प्रयोग व प्रयत्न ताराबाईंनी केले व 'विकासवाडीचा' मजबूत पाया घातला ताराबाईंचे वडील सदाशिवराव केळकर हे प्रार्थना समाजाशी निगडित असल्याने सामाजिक सुधारणा, राजकीय घडामोडी यांची चर्चा घरी चाले बी.ए.च्या वर्गात असतानाच कृष्णाजी वामन मोडक यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांच्याबरोबर अमरावतीस आल्यावर तेथील गव्हर्मेट हायस्कूलमधे त्यांनी शिक्षिकेचे काम सुरु केले. तेथील मतभेदामुळे नोकरी सोडून 'नमुनेदार शाळा' ही मुलींसाठी तीन इयत्तांची शाळा सुरु केली. पुढे भावनगर 'दक्षिणामूर्ती' संस्थेचे गिजुभाई बधेका हे माँटेसरी पध्दतीवर आधारित बाल शिक्षणाचे प्रयोग करीत होते. त्यात त्यांनी सहकार्य केले. नंतर अमरावतीम परतल्यावर त्यांनी समाजकार्य व शिक्षणकार्य सुरु केले. १९३२ साली त्यांनी 'मराठी शिक्षण पत्रिका' सुरु केली. पुढे मुंबईस 'शिशुविहार' शिक्षणकेंद्रात | | काम केल्यावर त्यांनी आपले लक्ष ग्रामीण भागाकडे वळविले. बोर्डी येथे अनुताई वाघ यांच्यासह बालग्राम शिक्षा केंद्राची स्थापना केली. अंगणवाडीची | सुरुवात त्यांनीच केली. तेथे एक हरिजन शाळाही चालवावयास घेतली. आदिवासी मुलांसाठी बोडींपासून जवळच 'विकासवाडी' हा प्रकल्प सुरु केला. त्यातून शेती, भाजीपाला, टोपल्या, विणणे, पत्रावळी करणे, सुतारकाम, शिवणकाम सुरु केले. मुलांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडविला. या प्रयोगाबद्दल भारत सरकारने त्यांना 'पद्मभूषण' किताब व सुवर्णपदक दिले. आदिवासी भागात अथक परिश्रम घेऊन, धडाडीने, श्रध्देने ताराबाई मोडक यांचे का मोलाचे आहे.
→ मूल्ये • समाजसेवा, शिक्षणप्रेम.
→ अन्य घटना • इटालियन शिक्षणतज्ज्ञ व माँटेसरी शिक्षण पध्दतीच्या जनक मानल्या जाणाऱ्या मारिया माँटेसरी यांचा जन्म - १८७०.
• आधुनिक कालखंडातील ख्यातनाम पंजाबी कवयित्री अमृता प्रीतम जन्मदिन १९१९. कार्डबरीकार शिवाजी सावंत यांचा जन्मदिन १९४०
→ उपक्रम • मारिया माँटेसरी व ताराबाई मोडक यांच्या कार्याचा परिचय करून घ्या. -
→ समूहगान
• जयोऽस्तुते श्री महन्मंगले, शिवास्पदे शुभदे...
• सामान्यज्ञान
• भारतीय नागरिकांचा बहुमान करण्यासाठी भारत सरकारतर्फे दिला जाणारा 'पद्मविभूषण' हा क्रमांक दोनचा सन्मान आहे. कोणत्याही क्षेत्रात असामान्य आणि महत्वपूर्ण सेवा करणाऱ्याला हा किताब दिला जातो. -
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा