5 सप्टेंबर -दैनंदिन शालेय परिपाठ
→ प्रार्थना
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः...
→ श्लोक
- गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥
- गुरू हेच ब्रह्मा, विष्णू, महेश्वर (शंकर) आहेत. उत्पत्ती (ब्रम्हा), स्थिती (विष्णू) व लय (शंकर) अशी तिन्ही सामर्थ्य असलेले ते परब्रह्म आहे. अशा सर्व सामर्थ्यशाली गुरुला मी नमस्कार करतो.
→ चिंतन
श्रेष्ठ ज्ञानसंपादनामुळे, विचार सामर्थ्यामुळे आणि सदाचारामुळे 'गुरुपद' मिळते, म्हणूनच शिष्याने गुरुची आज्ञा मोडू नये. गुरुशिष्यसंबंधात शिष्याने सदा नम्र वृत्ती धरावी, गुरुच्या बोलण्याचा राग मानू नये आणि त्यांच्या आज्ञेबाहेर जाऊ नये. आरुणी, कच, कर्ण अशा शिष्योत्तमांचे कर्तृत्व आपल्याला माहिती आहेच. एकलव्याची गुरुभक्ती आपल्या परिचयाची आहे. गुरुशिष्य परंपरा ज्ञानाच्या, कलेच्या सर्व क्षेत्रात दिसतात.
कथाकथन
'डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्'- भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा जन्म आंध्रप्रदेशात ५ सप्टेंबर १८८८ रोजी झाला. एकदा त्यांच्या लक्षात आले की हिंदुधर्मात अस्पृश्यता, जातीयता, अंधश्रद्धा इ. बरेच दोष आहेत. ते आधी दूर केले पाहिजेत. त्या साठी वेद, उपनिषदे, गीता इत्यादींचा अभ्यास करावयस हवा. मग त्यांनी तसा अभ्यास सुरु केला. कोलकता विद्यापीठात प्राध्यापक माणून काम करीत असताना १९२६ साली इंग्लंडमध्ये भरलेल्या जागतिक तत्वज्ञान परिषदेला कोलकता विद्यापीठातर्फे गेले. तेथे त्यांनी आपल्या हिंदुधर्माचे श्रेष्ठत्व जगाला समजावून सांगितले. ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांना तीन वर्षासाठी प्राध्यापक म्हणून बोलविले. तेथून परत आल्यावर आंध्र विद्यापिठाने त्यांना सन्माननीय 'डॉक्टरेट' दिली. यानंतर राधाकृष्णन् बनारस हिंदू विद्यापिठाचे उपकुलगुरू झाले. स्वातंत्र्यानंतर १९५२ साली राधाकृष्णान् यांची उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली. १९५७ साली त्यांना 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब देण्यात आला. 'हिंदू जीवनाषियक दृष्टीकोन, 'आज आपल्याला हवा असलेला धर्म', 'भारतीय तत्वज्ञान', 'जीवनाविषयक आदर्श दृष्टीकोन' असे अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत. १६ एप्रिल १९०५ रोजी अनंतात विलिन झाले. ५ सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिन 'शिक्षक दिन' म्हणून साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीत 'मातृदेवो भव, पितृदेवो या बरोबरच 'आर्चाय देवो भव' असा गुरुजनांचा गौरव माता-पित्या प्रमाणे समान केला जातो. कारण शिक्षक हा राष्ट्राचे भावी आधारस्तंभ निर्माण करणारा शिल्पकार समजला जातो. म्हणूनच आपण दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी डॉ. राधाकृष्णन् यांच्या स्मृतिप्रित्यर्थ शिक्षक दिन साजरा करतो. शिक्षणाची जी नेत्रदिपक प्रगती झाली आहे, ती क्रांतीसूर्य राष्ट्रपिता ज्योतीराव फुले यांच्यामुळेही! क्रांतीसूर्य ज्योतीराव फुले यांचा जन्म १८२७ रोजी झाला. त्यांनी भारतात प्रथम शाळा सुरू केली एका वर्षात त्यांनी २० शाळा सुरू केल्या. गोरगरिबांच्या मुला-मुलींना गोळा करून त्यांनी शिक्षण दिले. १ जानेवारी १८४८ रोजी पहिली मुलींची शाळा सुरू केली. त्या शाळेत त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी विनावेतन शिक्षण शिकविले. सावित्रीबाई फुले ह्या भारतातील पहिल्या स्त्रिशिक्षीका आहेत. ज्योतीराव फुले हे भारतीय शिक्षणाचे आद्यजनक आहेत. त्यांनीही शिक्षणाचे कवाडे सर्वांसाठी खुली केली. त्यांच्याही या कार्याची आठवण व्हावी म्हणून व त्यांचे उल्लेखनीय शैक्षणिक व सामाजिक कार्य स्मरणात रहावे, म्हणून ज्योतिराव फुले यांचाही २८ नोव्हेंबर रोजी स्मृतिदिनानिमित्त शिक्षक दिन म्हणून प्रत्येक शाळेमध्ये साजरा व्हावा असे सर्वार्थाने वाटते.
सुविचार
• विद्येविना मती गेली । मतीविना नीती गेली, नितीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शुद्र खचते । इतके अनर्थ एका विद्येने केले - म. फुले
• शिक्षण ही अशी गोष्ट आहे जी जगभर प्रत्येक ठिकाणी विखुरलेली आहे. हे एक असे घन आहे ज्याला पाहिजे त्याने हवे तेवढे लुटावे.
• शिक्षणाला नीती आणि चारित्र्य यांचे अधिष्ठान हवेच डॉ. राधाकृष्णन
→ दिनविशेष -
• डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा जन्मदिन - १८८८. राधाकृष्णन् यांचा जन्म आंध्र प्रदेशातील तिरुतणी या गावी झाला. प्रथम वर्ग सतत मिळवीत शिक्षण पूर्ण केल्यावर प्राध्यापकाचा पेशा त्यांनी पत्कारला. तत्वज्ञानावरील त्यांचे ग्रंथ व व्याख्याने देशात परदेशात गाजली आहेत. ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांना खास धर्म, नीतीशास्त्र व तत्वज्ञान या विषयावरील व्याख्यानांसाठी सन्मानपूर्वक बोलाविले होते. वॉल्टेअर येथील आंध्र विद्यापीठाचे तसेच बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलगुरू होते. १९३१ ते ३९ पर्यंत ते राष्ट्रसंघात भारताचे प्रतिनिधी होते. १९४९ ते १९५२ पर्यंत भारताचे रशियातील राजदूत म्हणून त्यांनी काम पाहिले. त्या वेळी आपली नेहमीची प्रथा मोडून स्टालिनने त्यांना मुद्दाम बोलावून त्यांची भेट घेतली. १९५२ ते १९६७ पर्यंत प्रथम भारताचे उपराष्ट्रपती व नंतर राष्ट्रपती होऊन ते निवृत्त झाले. धर्म व तत्वज्ञान या विषयावर त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले. स्वतंत्र भारताच्या पहिल्या शिक्षण आयोगाचे (१९४८) ते अध्यक्ष होते. १६ एप्रिल १९७५ रोजी त्यांचे चेन्नई येथे निधन झाले.
→ मूल्ये • ज्ञानलालसा, कर्तव्यनिष्ठा
→ अन्य घटना
• शिवाजी महाराजांच्या पत्नी महाराणी सईबाई यांचे निधन - १६५९
• शांततेच्या पुरस्कर्त्या नोबेल पारितोषिक विजेत्या मदर तेरेसा यांचे निधन - १९९७ सावित्रीबाई फुलेच्या आदर्श विद्यार्थीनी व निबंधकार मुक्ता साळवे जयंती- १८४३
→ उपक्रम
• शिक्षणमहर्षी महात्मा फुले व डॉ. राधाकृष्णन् यांच्या जीवनावर आधारित निबंध लिहा
→ समूहगान
• हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे....
→ सामान्यज्ञान
• १९७२ ते १९८२ च्या दरम्यान पृथ्वीवरील ९१७०० चौरस किलोमीटर भागावरील जंगले तोडण्यात आल्याची माहिती उपलब्ध होते. दर वर्षी सुमारे १५००० चौरस किलोमीटर जंगलाचा ह्रास होत असतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा