1 सप्टेंबर् -दैनंदिन शालेय परिपाठ
प्रार्थना
गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे.......
→ श्लोक
- सुचित्वं, त्यागिता, शौर्य, सामान्यं सुखदुःखयोः । दाक्षिण्यं चानुरक्तिश्च सत्यता च सुहृद्गुणाः ॥ स्वच्छता आणि पावित्र्य, त्याग, शौर्य, सुखदुःखात सहभाग, उदारपणा, प्रेम आणि खरेपणा हे सन्मित्राचे गुण आहेत
→ चिंतन
परिस्थितीचा गुलाम न बनता परिस्थितीला यथासंभव, यथाशक्ती व यावत्शक्य आपल्या ताब्यात आणण्यास जो मनोनिग्रह, स्वार्थत्याग, निर्लोभीपणा आणि धैर्य लागते, ते ज्याच्या अंगात आहे आणि दुःखाची अथवा संकटाची भीती अगर पर्वा न बाळगता जो आपल्या ठायी असणाऱ्या या सद्गुणांचा लोकोपयोगार्थ उपयोग करतो तोच मोठा म्हणावयाचा -
→ कथाकथन
माझ्या मुलाचं बाहेरच्या जगातलं पहिलं पाऊल' ... माझ्या मुलाला हात धरून शिकवा. जगाच्या या विशाल शाळेत त्याचं आज पहिल पाऊस पडणार आहे. बाहेरच्या जगात आपलं आपण वावरण्याचा त्याचा आज पहिला दिवस आहे. काही काळ सगळ्या गोष्टी त्याला अनोळखी आणि नवीन वाटणार आहेत, म्हणून तुम्ही त्याच्याशी हळुवारपणे वागाल अशी मी आशा करतो. तुम्हाला माहितच आहे की आजपर्यंत घर हेच त्याचं विश्व होत. या तो राजा होता. त्याच्या जखमा बांधायला आणि त्याच्या दुःखी भावनांवर फुंकर घालायला मी कायम हजर होतो. परंतु आता सगळ्याच गोष्टी| बदलणार आहेत. आज सकाळी या घरापुढच्या पाय-या उतरुन तो उत्सुकतेने, आनंदाने बाहेर पडेल आणि त्याच्या मोठया धाडसाला सुरुवात करेल. या शाहासामध्ये बहुधा संघर्ष, दुःख आणि निराशाही असेल. या जगात जगण्यासाठी त्याला विश्वास, प्रेम आणि धैयाची आवश्यकता भासेल. म्हणून चोकहो, त्याचा चिमुकला हात धरून, त्याला आवश्यक त्या गोष्टी तुम्ही शिकवाल अशी मी आशा करतो. शिकवाच त्याला, पण शक्य असेल तर ममतेनं, प्रेमानं. सगळीच माणसं प्रामाणिक नसतात, सर्वच स्त्री-पुरूष खरेपणानं वागणारे नसतात, हे त्याला कधीतरी समजून घ्यावं लागेल हे मला माहीत आहे. जगात जसा वाईट माणूस असतो तसा चांगला माणूसही असतो एखादा शत्रू असेल तर एखादा मित्रही असतो हे त्याला शिकवा. दृष्ट आणि दादागिरी करणा- या लोकांना त्यांची जागा दाखवणं ही सर्वांत सोपी गोष्ट असते हे त्याला लवकरात लवकर शिकू द्या. पुस्तक वाचण्यातून मिळणारा आनंद त्याना घ्यायला शिकवा. आकाशात भराऱ्या घेणाऱ्या पाखराचं, सूर्यकिरणांत गुणगुणणा-या मधमाश्यांच आणि हिरव्यागार टेकडीवरील रानफुलांचे शाश्वत रहस्य शोधण्यासाठी त्याला निवांत वेळ मिळू द्या. त्याला असं शिकवा की फसविण्यापेक्षा अपयश पत्करणं अधिक सन्माननीय असतं. त्याला स्वतःच्या विचारांवर निष्ठा ठेवायला शिकवा मग इतरांच्या दृष्टीने ते विचार चुकीचे असले तरीसुध्दा, सर्व जण जरी मेंढरासारखे वागत असतील तरी गर्दीतील एक न होण्याचे वक्र माझ्या मुलाला देण्याचा प्रयत्न करा. इतरांचं ऐकायला त्याला शिकवा. परंतु तो जे ऐकेल त्याला सत्याची चाळणी लावून, जे योग्य आणि चांगलं असेल तेच त्याला घ्यायला शिकवा. आपलं हृदय आणि आत्मा कधीही पैशात मोजून त्याची किंमत ठरवू नकोस, असं त्याला शिकवा. आपलं वागणं योग्य असेल तर आरडाओरडा करणाऱ्या जमावाकडे पूर्ण दुर्लक्ष करायला, आपल्या तत्वासाठी निर्धाराने संघर्ष करायला त्याला शिकवा. लोकहो, त्याला हळुवारपणे शिकवा, पण त्याचे फाजील लाड करू नका. कारण भट्टीतील उष्णतेत तावून सुलाखूनच उत्तम पोलाद तयार होतं. हे सगळं म्हणजे खूप
→ सुविचार
• ‘Head, Heart, and Hand (H) यांचा विकास म्हणजे खरे शिक्षण होय.'
• इष्ट दिशेने होणारे परिवर्तन म्हणजे शिक्षण होय.
→ दिनविशेष
• न्यायमूर्ती तेलंग स्मृतिदिन १८९३ - मुंबई प्रांताच्या उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून सरळ नेमणूक होण्याचे भाग्य प्रथमच ज्या महाराष्ट्रीय हिंदू व्यक्तीच्या वाटयाला आले ते म्हणजे न्यायमूर्ती काशीनाथ त्र्यंबक तेलंग. न्या. तेलंग यांचा जन्म ३० ऑगस्ट १८५० रोजी झाला. लहानपणापासून अतिशय हुशार होते. त्या वेळेस एम.ए.च्या परीक्षेत सुवर्णपदकही त्यांनी मिळविले, एलएल.बी. होऊन अवघ्या बावीसाव्या वर्षी ते मुंबई हायकोर्टात वकिली करू लागले. संस्कृतचेही ते महापंडित होते. रामायण व भगवद्गीता यावरील सूक्ष्म अभ्यास करून लिहिलेले त्यांचे निबंध युरोपात फार गाजले. हिंदू प्राचीन कायद्याचा त्यांचा अभ्यास फारच सूक्ष्म होता. त्याबद्दल इंग्रज न्यायाधीशही त्यांना नावाजत. अलौकिक बुध्दिसामर्थ्यामुळे तळपणाऱ्या तेलंगांनी समाज सुधारणेच्या वेळी आपल्या बुध्दीचा सदैव उपयोग केला. क्षीण प्रकृतीमुळे अवघ्या त्रेचाळीसाव्या वर्षी १ सप्टेंबर १८९३ ला तेलंगांचा अंत झाला. त्या काळाच्या पाश्चात्त्य पंडितांची अशी धारणा होती की प्राचीन ग्रीक कवी होमरच्या इलियड या काव्यावर रामायण हा हिंदू ग्रंथ आधारित आहे. परंतु न्या. तेलंगांनी अत्यंत सूक्ष्म अभ्यासाने रामायणाचे स्वतंत्र अस्तित्व पाश्चात्त्य विद्वानांना मान्य करायला लावले. भगवद्गीतेवरील व रामायणावरील त्यांचे निबंध युरोपात फार गाजले व आदरपूर्वक अभ्यासले गेले
. → मूल्ये
• समाजसेवा, अभ्यासूवृत्ती.
→ अन्य घटना
भूकंपाने टोकिओ व याकोहामा जमीनदोस्त - १९२३. दुस-या महायुध्दास सुरुवात - १९३९,
• आयुर्विमा कॉर्पोरेशनची स्थापना - १९५६.
• शिवाजी विद्यापीठाची स्थापना १९६२ मराठा सेवा संघ स्थापना १९९०
उपक्रम
• न्यायालयाचे विविध स्तर व त्यातील न्यायाधीशांची पदे याबद्दल माहिती घ्यावी. समूहगान बहु असोत सुंदर संपन्न की माहिती घ्यावी..
→ सामान्यज्ञान
• पृथ्वीवरील एकूण पाण्यापैकी फक्त २ टक्के पाणी जमिनीमध्ये असते. ते विहिरी, बोअरवेल, तळी, नदी यातूनच आपल्याला उपलब्ध होते. या २ टक्के पैकी उपलब्ध पाण्यावर सर्व मानवजातीला आपली गरज भागवावी लागते. परंतु गोठलेल्या स्वरूपात पृथ्वीवर पाणी भरपूर उपलब्ध आहे. ते वितळविण्याचे ठरविले तर अनेक शहरे पाण्याखाली गडप होतील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा