१ ऑक्टोबर -दैनंदिन शालेय परिपाठ
प्रार्थना
तुझे मी फेडीन पांग सारे...
श्लोक-
अतिपरिचयादवज्ञा संततगमनादनादरो भवति। मलये भिल्लपुरंधी चन्दनतरूकाष्टं इंधन कुरुते ।
१अतिपरिचय झाला, सतत येणे-जाणे वाढले की, माणसाचा मान राहत नाही. त्याचा आदर केला जात नाही. मलयपर्वतावरील चंदनाची लाकडे भिल्ल स्त्रिया सरपण म्हणून जाळतात.
चिंतन-
गाधीजी म्हणतात की आपल्या अंतरातील आवाज आपल्याला जो आदेश देईल ते सत्य, सत्याला ईश्वर मानून त्याचा लाल आणि तेव्हा तुमचे मन अनन्यनिष्ठ असणे, एकविध असणे आवश्यक आहे. आणि ते तसे राहण्याकरिता भारतीय अध्यात्मशास्त्री सत्य हिंसा ब्रह्मचर्य, अस्तेय व अपरिग्रह या पाच तत्त्वांचा केलेला आहे. नम्रतेवाचून सत्याचा शोध अशक्य आहे. मनुष्याला सत्याचा शोध घेण्यासाठी अहंकार त्यागावा लागतो. त्याशिवाय त्याला असल्यापासून होणाऱ्या दुःखापासून स्वतःला वाचविता येणार नाही.
→कथाकथन
आपले उध्दारकर्ते आपणच पृथ्वीवर माणसांचे जीवन हे कर्माधीन आहे. जीवनामध्ये यश-अपयश, सुख-दुख, प्रगती अधोगती, - वैभव-दारिद्र्य हे आपल्या कर्मातून प्राप्त होत असते. आपले कर्म उवंगतीला नेणारे असले तर आपली प्रगती होते. आपल्याला परा सुख मिळते. आपले कर्म जर अधोगतीला नेणारे असले, दूषित असले तर आपल्याला दुःख प्राप्त होते. आपण उच्च पदावर पोहचतो. आपल्या उज्वल कर्मानं पोहचतो. आपण अधःपतनाला जातो, खूप खाली जातो, आपल्या कर्माने जातो. आपल्या प्रगतीमध्ये इतर लोक जवाबदार नसतात. दुसरे आपलं कधीच नुकसान करत नाहीत. दुसऱ्यांनी नुकसान केलेले नुकसान थोडंबहुत बाहेरचं नुकसान असतं. खरं नुकसान आपल आध्यात्मिक नुकसान आहे. आणि आध्यात्मिक नुकसान आपल्या हातूनच होत असतं. आपण आपले नुकसान करणारे आहोत आणि आपणच आपले उत्थान करणारे आहोत. परमेश्वरानं आपल्या यशाच्या सर्व किल्ल्या आपल्या हाती दिल्या आहेत. आपल्याला स्वातंत्र्य देऊन टाकलं आहे. परमेश्वराची जबरदस्ती नाही आपल्यावर की, "हे जीवा तू अमूकच कार्य केले पाहिजे." ईश्वरानं खूप स्वातंत्र्य देऊन टाकलं आहे. परमेश्वर आपल्याला शेवटपर्यंत संधी राहतो. ठीक आहे. आता जमलं नाही पुढे करशील. आपल्याला जे दिलं आहे त्याचा उपयोग झाला पाहिजे. धन असलं तर आपण बँकेमध्ये टाकतो. नोंद करतो. खात्यामध्ये बरोबर जमा झाले का ते तपासतो. आपल्या संपत्तीची, कागदपत्रांची आपण खूप काळजी घेतो. ज्या गोष्टी आपल्या मोक्ष मार्गासाठी कुठेच कामात नाही त्या गोष्टींची काळजी येतो आणि आपलं जे अंतःकरण आहे ज्या अंतःकरणात परमेश्वराचा भाव आपण ठेवला पाहिजे, त्या अंत:करणामध्ये राग, द्वेष हे सगळं ठेवतो ती पाण ठेवती, साफ करीत नाही. उलट त्यामध्ये आणखी आणखी भर आपण टाकतो. दररोज निंदा ऐकतो. कानातून आपल्या जीवनात विष ओतलं जात असते. आपलं जीवन दररोज दूषित होत असतं. आपलं अंतःकरण स्वच्छ केलं पाहिजे. भक्तीनं, भावानं, परमेश्वराच्या भजनानं आपल्या अंतःकरणाची शुध्दी होऊ शकते. मिळेल तिथे, मिळेल त्या प्रकारे भगवंताचं भजन केलं पाहिजे. आवडेल तो देव, त्या देवाची आराधना केली पाहिजे. जसं जमेल तसेसमेश्वराकडे गेलं पाहिजे. आपली अध्यात्मिक उन्नती साधली गेली पाहिजे. आपली आध्यात्मिक उन्नती साधली तर हे जे कर्म आहे हे यज्ञ कर्म आहे.
+सुविचार
• माणसाने खावे जगण्यासाठी, पण जगावे समाजासाठी - डॉ. आंबेडकर
• आपण आपल्या उज्ज्वल कर्मानं उर्ध्वगतीला जातो, आणि दूषित कर्मानं अधःपतनाला जातो. + दिनविशेष 1-
• भारतात पहिले पोस्टाचे तिकीट छापण्यात आले - १८५४. लॉर्ड डलहौसी भारताचा व्हॉईसरॉय असताना भारतात पहिले पोस्टाचे विकीट छापण्यात आले. त्यापूर्वी थोडेच दिवस इंग्लंडमध्ये सर्वप्रथम छापील तिकीट लावून टपाल पाठविण्यास सुरुवात झाली होती. १ ऑक्टोबर १८५४ ला टपालतिकीट छापण्यात आल्यानंतर भारतीय टपालाची मुहूर्तमेढ रोवली गेली. सुरुवातीची तिकिटे पांढऱ्या कागदावर निळ्या रंगात छापलेली होती. ल्यावर व्हिक्टोरिया राणीचे चित्र होते. १९११ मध्ये जगातील पहिली हवाई टपाल सेवा सुरू करणारा भारत हा पहिला देश होय. १९२६ मध्ये नासिक येथे | सरकारी मुद्रणालयाची स्थापना झाली आणि त्या ठिकाणी भारतीय तिकिटे छापली जाऊ लागली.
→ मूल्ये -
• जनसेवा, राष्ट्रीय एकात्मता
→अन्य घटना -
• डॉ. अॅनी बेझंट जन्मदिन - १८४७
• मेट्रिक दशमान पद्धती आरंभ - १९५८.
• ग. दि. माडगूळकर जन्मदिन - १९१९.
• शिक्षणतज्ज्ञ बाबुराव जगताप स्मृतिदिन - १९७८.
→ उपक्रम -
पोस्टाच्या फिलाटेली या उपक्रमाबाबत माहिती मिळवावी
. • तिकिटे जमविण्याचा छंद जोपासावा.
• समूहगान
• बहू असोत सुंदर संपन्न की महा...
→ सामान्यज्ञान
१-० १९९१ पासून दरवर्षी १ ऑक्टोबर हा जागतिक वयोवर्धन दिन म्हणून साजरा करण्याचे संयुक्त राष्ट्रसंघातर्फे ठरविण्यात आले आहे. आयुष्यभर संपूर्ण कुटुंबाचे ओझे स्वतःच्या खांद्यावर वागविणाऱ्या व्यक्तीस आयुष्याच्या संध्याकाळी मात्र एकाकी व नीरस जीवन जगण्याची वेळ येते, बदलत्या संस्कृतीत उपेक्षेचे जीवन जगावे लागते. आयुष्याच्या संध्याकाळी वृद्धांना सन्मानाने, प्रतिष्ठेने जगता यावे म्हणून हा दिन साजरा करण्याची कल्पना प्रत्यक्षात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा