१२ ऑक्टोबर
प्रार्थना
या भारतात बंधुभाव नित्य व दे दे वरचि असा दे...
→ श्लोक
आलस्य जे कार्य विधातकारी । असो नये तो रिपू या शरीरी । उद्योग सबंध तथा न टाकी । त्या सेविता पावसि सौख्य लोकी ।।
कार्याचा नाश करणारा शरीरातील शत्रु आहे. शरीरात आळस असूच नये. उद्योग हा खरा असून त्याला सोडू नये. उद्योगाची कास धरल्याने या जन्मी सुखाची प्राप्ती होते.
→ चिंतन
प्रतिकूलतेवर मात करण्यातच खरी कसोटी लागते. माणसाला आपले उदिष्ट गाठण्यासाठी परिश्रम करावे लागतात. प्रतिकूल परिस्थिती, संकटे, अडचणी यांच्यावर मात करून अपेक्षित है गाठण्यासाठी अमित कष्ट करावे लागतात. श्रीमंत घरात जन्मलेल्या - हेलन केलरला बालपणी झालेल्या दुर्धर आजाराने दृष्टी, वाणी लागते. परंतु प्रतिकूलतेवर मात करण्यासाठी तिने असामान्य प्रयत्न केले, म्हणूनच तिने म्हटले आहे की, 'बंद दरवाजाकडे लक्ष न दरवाजाकडे पाहायला शिका.
→ कथाकथन
दसरा - - हा सण अश्विन शुध्द दशमीला येतो. अश्विन महिन्याच्या पहिल्या दिवसांपासून नऊ दिवस नवरात्र असते. दहावा दिवस म्हणजेच दसरा, 'दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा' या काव्यातच त्याची महती गौरविलेली आहे. दसरा हा पराक्रमाचा प आहे. मराठयांचे धार्मिक व सामाजिक सण-समारंभ अनंत आहेत. परंतु त्याला दसरा, दिवाळी आणि होळीसारखी श्रेष्ठता नाही. या सणात च आलेले दिसतात, ते म्हणजे ब्राह्मणांचे सरस्वतीपूजन व विद्यारंभ, क्षत्रियांचे शस्त्रपूजन सीमोल्लंघन, वैश्याची शेती हे सर्व एकत्रितपणे दसरा या दूसरा या सणाची परंपरा फार पूर्वीपासूनची आहे. याच दिवशी देवीने महिषासुर या राक्षसाचा वध केला. प्रभु रामचंद्र याच दिवशी रावणावर स्वारी निघाले. पांडव अज्ञातवासात ज्यावेळी विराटाच्या घरी गेले, त्यावेळी त्यांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडावर ठेवली होती. अज्ञातवास तेथील शस्त्रे परत घेतली व त्या झाडाची पूजा केली, तो हाच दिवस. शिवाजी महाराजांनी प्रतापगड किल्ल्यावर भवानी देवीच्या उत्सवाला पाच दिव | केला. पेशवाईतसुध्दा या सणाचे महत्व मोठे होते. बाजीराव पेशवे याच दिवशी पुढच्या स्वारीचे बेत कायम करीत अनेक शूर, पराक्रमी राजे | दुसन्या राज्यावर स्वारी करण्यात जात असत, त्याला सीमोल्लंघन म्हणत दसरा म्हणजेच विजयादशमी हा साडेतीन मुहूतपिकी एक मुहूर्त आहे. विजयादशमी म्हणजे हमखास विजय मिळवून देणारा दिवस. या दिवसाचे महत्व सांगणाऱ्या अनेक कथा आहेत. फार वर्षापूर्वी वरतंतू नावा होऊन गेले. त्यांच्याकडे विद्या अभ्यासासाठी खूप विद्यार्थी येत. अभ्यास करून मोठे होत. त्यावेळी मानधन किंवा फी नव्हती त्यामुळे संपल्यानंतर विद्यार्थी, गुरुदक्षिणा देत, या ऋषीकडे 'कौत्स' या नावाचा एक विद्यार्थी होता. त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यावर गुरुंनी त्याला प परवानगी दिली. याने ऋषींना विचारले की, "मी तुम्हाला गुरुदक्षिणा काय देऊ ? तुम्ही मागाल ते मी आनंदाने देईन." अनी कौत्सा घ्यावयाचे ठरविले. त्यांनी कौत्साला प्रत्येक विद्येबद्दल एक कोटी सुवर्णमुद्रा, याप्रमाणे १४ विद्यांबद्दल १४ कोटी सुवर्णमुद्रा आणावया कौत्स हे ऐकून गांगरून गेला, तो रघुराजाकडे गेला, परंतु राजाने त्याचवेळी विश्वजितयज्ञ केल्यामुळे, खजिना संपला होता, तरीसुध्दा राजाने तीन दिवसांची मुदत मागितली आणि त्याने इंद्रावर स्वारी करण्याचे निश्चित केले. इंद्राला रघुराजाचा पराक्रम माहित होता. त्याने कुबेराला सारी सांगितली. इंद्राने आपट्याच्या पानांची, सोन्याची नाणी बनवून, ती पावसासारखी राजाच्या राजवाड्यात पाडली. कौत्स त्या सुवर्णमुद्रा घेऊन ऋषीकडे गेला. व गुरुदक्षिणा घेण्यास विनंती केली. परंतु ऋर्थीनी त्यातील १४ कोटी मुद्रा घेऊन, बाकीच्या परत दिल्या. अलेल्या सुवर्णमुद्रा परत राजाने नकार दिल्यामुळे कौत्साने त्या मुद्रा आपट्याच्या झाडाखाली ठेऊन, लोकांना लुटायला सामितल्या. लोकांनी त्या वृक्षाची पूजा करून तेवढ्या मुद्रा लुटल्या. तो दिवस दसऱ्याचा होता. म्हणून त्या दिवसापासून त्या झाडाची पूजा करून सोन्याची पाने लुटण्याची प्रथा सुरु झाली. "तपुर | येती घरा, तोचि दिवाळी दसरा!" या तुकाराम महाराजांच्या उक्तीत या दोन सणांचा अजोड असा उल्लेख केला आहे व तो योग्यच
सुविचार
• प्रार्थना म्हणजे आत्मशुध्दीसाठी ईश्वराला घातलेली हाक
• शांती, समाधान आणि आनंद हा प्रार्थनेमुळे मिळतो..
•
→ दिनविशेष
• राम मनोहर लोहिया स्मृतिदिन - १९६७: राम मनोहर लोहियांचा जन्म १९१० सालचा, तीव्र बुध्दिमत्तेच्या राम |
कलकत्ता, मुंबई येथे उच्च शिक्षण पूर्ण करून बर्लिन येथे संशोधन करून पीएच.डी. पदवी मिळविली. भारतात परत आल्यानंतर स्वातंत्र्य हेच ध्येय | लठ्ठ पगाराच्या नोकऱ्यांचा मोह दूर सारला. समाजवादी पक्षाचे प्रभावी कार्यकर्ते व नेते म्हणून ते स्वातंत्र्य चळवळीत चमकले. १९४२ च्या चले | चळवळीतील प्रतिकार सामर्थ्याचे जनकत्व त्यांच्याकडे जाते. या चळवळीच्या काळात गुप्त रेडिओवरची भाषणे ते लिहून देत असत. भाषेतील उस व विशिष्ट व्यक्तीचे वा घटनेचे पृथ:करण करतानाचा त्यांचा तर्ककठोरपणा यांनी ती गाजत असत. पोर्तुगीज अंमलाखालच्या गोव्यातील च त्यांच्याकडूनच तोंड फुटले व यशस्वी लढा देऊन गोवा स्वतंत्र झाला. राजकारण व समाजकारणात अविरत राहूनही आपली रसिकता व साहित्यप्रेम लाई अबाधित ठेवले. 'ललित लेणी' हे सुंदर पुस्तक त्यांनी लिहिलेले आहे. अकाली मृत्यूने अचानक त्यांच्यावर झडप घातली. मृत्यूनेच त्यांच्या कर्तबगार बांध घातला.
मूल्ये - • स्वातंत्र्यप्रेम, ज्ञान, जिज्ञासा
→ अन्य घटना -
• कोलं त अमेरिकेस पोचला - १४९२
• शाहू महाराजांनी मोगल सैन्याच्या मदतीने शूर व राजकारणपटू तारबाईंचा संपूर्ण पराभव केला. - १७०७
• क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा एडन येथील तुरुंगातून सुटण्याचा प्रयत्न - १८८०.
→ उपक्रम -
• गोव्याचा स्वातंत्र्यलढा याबद्दल अधिक माहिती मिळवा.
•राम मनोहर लोहियांचे चरित्र मिळवून याचा.
→ समूहगान
• देश हमारा, निर्मल सुंदर, उज्ज्वल गगन का तारा...
→ सामान्यज्ञान - ० १९९१ मध्ये ब्राझीलमधील रिओदीजानेरो येथे पहिली 'वसुंधरा परिषद' भरली होती. तेव्हापासून पृथ्वीवरील जीवसृष्टीक संरक्षणासाठी आंतराष्ट्रीय स्तरावर 'जैववैविध्य संरक्षण' प्रयत्न सुरु केले गेले.
• डायनोसॉर - हे सुमारे ९ कोटी वर्षापूर्वीच्या काळामध्ये अस्तित असलेले पाठीचा कणा असलेले सरपटणारे प्राणी होत. डायनोसॉर या ग्रीक शब्दाचा अर्थ भयंकर सरडा असून हे नाव सुरुवातीला सापडलेल्या त्याच मोठाल्या सांगाड्यावरून देण्यात आले. पृथ्वीवरून ते संपूर्ण निर्वंश झाले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा