Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

रविवार, १५ ऑक्टोबर, २०२३

14 ऑक्टोबर-दैनंदिन शालेय परिपाठ

 14 ऑक्टोबर-दैनंदिन शालेय परिपाठ

प्रार्थना 

ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो.."



श्लोक -

 नमो देवराया, नमो ज्ञान सिंधो । नमो दीननाथा, नमो दीनबंधो । जय जिजाऊ नमो विश्वकर्त्या, नमो विश्वपाळा । नमो मायबापा कृपाळा, नृपाळा ।। हे देवाधिदेवा, हे ज्ञानाच्या सागरा, आम्ही तुला नमस्कार करतो. है 'विश्व' निर्मात्या, हे विश्वाचे प्रतिपालन करणाऱ्या, हे गोर-गरिबांबर करणाऱ्या दीन दुबळ्यांच्या संख्या, हे मायबापा, आम्ही तुला नमस्कार करतो. 

 

→ चिंतन 

- ज्या व्यक्तीला दुसऱ्यांची नक्कल करण्यापेक्षा स्वतःच्या बुध्दिमत्तेचा वापर करावासा वाटतो, त्या व्यक्तीत निश्चितच सर्जनशीलता असते. - 'सांगकाम्या' बनविण्यापेक्षा त्यांच्यातील नवनवोन्मेषशालिनी प्रज्ञेला, प्रतिभेला आव्हान आणि आवाहन करण्याचे अवघड काम शिक्षकाने पार पाडावे. मग मुलांमधील सर्जनशीलतेला चालना मिळून त्यांच्यातील कल्पनाशक्ती जागी होईल आणि मुलांच्या कल्पना, अपेक्षा आवडीनिवडी यावर प्रकाश पडू शकेल.


कथाकथन 

बाबासाहेबांचे बंड बाबासाहेब आंबेडकर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात आंबवडे गावचे. त्यांचा जन्म १४ १८९० महाएकदलेल्या कहे. तर पूर्वी जागा महार जातीच्या कुटुंबात सूर्योदयापूर्वी एका प्रमुख दलाचे हॉ. भीमराव आंबेडकर समाजातील विषमतेचे चटके असूनही, सवर्ण हिंदूवर केवळ आग पाखडीत न बसता या महाबुध्दीवान बाबांनी घोर तपश्चर्या करून मायभूमित मिळणारे शिक्षण उत्तम प्रकारे पदरात पा आणि मग बडोद्याचे त्यावेळचे राजे सयाजीराव गायकवाड यांच्याकडून आर्थिक साहाय्य घेऊन ते उच्च शिक्षणासाठी परदेशी गेले. तिथून ते कायदे पडित। मायदेशी परतले. पण आपल्या शिक्षणाचा उपयोग केवळ स्वतः सुखासीन व मानाचे जीवन जगण्यासाठी न करता, आपण ज्या दलित समाजात जन्माला आलो. सगीण उध्दार करण्याच्या कामी करण्याचा चंग बाकसाहेबांनी बांधला. त्यानुसार त्यांनी वृत्तपत्रे, संघटना, दलित विद्याथ्यांसाठी वसतिगृहे वगैरे काढली आणि समाजात अभूतपूर्व अशी जागृती निर्माण करायला सुरवात केली. याच हेतूने त्यांनी १९ मार्च १९२७ अशा दिवशी, पूर्वीच्या कुलाबा म्हणजे आताच् जिल्ह्यातील महाड या गावी, अस्पृश्य गणल्या गेलेल्या समाजातील लोकांची एक 'बहिष्कृत परिषद' भरविण्याचे ठरविले. 'एरवी केवळ माणसातच नव्हे, तर प्राणिमात्रात परमेश्वर असल्याचे मानणाऱ्या आपल्या धर्माने विशिष्ट जातींना मात्र आजवर जी पशूंपेक्षाही वाईट वागणूक दिली. ती परिस्थिती आता लवकरात पाटली पाहिजे. असे मनोमन वाटणाऱ्या मंडळींची संख्या सवर्ण हिंदूतही वेगाने वाढत होती. त्यामुळे बाबासाहेबांनी ही परिषद घेण्याची ठरविताच दलितांप्रमाणेच काही सवर्ण हिंदुनीही परिषद यशस्वी करण्यासाठी कंबर कसली, सर्वश्री सुरबा टिपणीस, वि. गं. सवादकर, सं. तु. गायकवाड, शि. गो. जाधव चित्रे, रामचंद्र मोरे आदि कार्यकतें खांद्याला खांदा लावून परिश्रमपूर्वक काम करू लागले. विस्तीर्ण मंडप उभारला गेला. दूर-दूरवरून परिषदेला येणान्या प्रतिनिधींच्या दोन दिवसाच्या मुक्कामाच्या दृष्टीने सर्व व्यवस्था केली. १८ मार्चपासून फाटल्या मळक्या कपडयातील सुमारे ५००० दलित प्रतिनिधी आपापल्या चटणी भाकरीची शिदोरी घेऊन महाडला येऊन दाखल झाले. सेनापती बाबासाहेब यांच्या आदेशानुसार जणू त्यांचे सैनिक सामाजिक विषमतेच्या राक्षसाच करण्यासाठी महाडला येवून धडकले होते. परिषदेच्या पहिल्या दिवशी दलित अनुयायांनी तुडुंब भरलेल्या मंडपात जेव्हा बाबासाहेबांनी प्रवेश केला. तेव्हा त्याच अनुयायांनी केलेल्या त्यांच्या जयजयकाराने मंडप हादरून गेला. त्यानंतर सर्वश्री गं.नी. सहस्त्रबुध्दे, कमलाकांत चित्रे व सुरबा टिपणीस यांची भाषणे झ बाबासाहेब आपल्या धनगंभीर आवाजात अनुयायांना म्हणाले, "माणसांसारखी माणसं आपण, पण आजवर जनावरांपेक्षाही वाईट जीवन जगलो. यापुढे माणूस जगायचं असेल तर शिक्षण घ्या, वाईट आहर सोडून द्या. व्यसनांचा त्याग करा, स्वच्छेनं रहा, आपल्याला माणूस म्हणून जगण्याचे हक्क, सत्ताधीशांपुढे भी मिळणार नाहीत, त्याकरिता संघटित होवून संघर्ष लागेल." बाबासाहेबांच्या या संजीवक वाणीने, मेंढरे म्हणून आलेल्या त्यांच्या अनुयायांचे बघता बघता बाच त्या रात्री सुरबा टिपणीसांच्या घरी बाबासाहेब व इतर कार्यकर्ते यांनी चवदार तळयाच्या पाण्याकरिता सत्याग्रह करण्याची योजना निश्चित केली. 




रात्री सुरक्षा टिपणीसांच्या घरी बाबासाहेब व इतर कार्यकर्ते यांनी चवदार तळयाच्या पाण्याकरिता सत्याग्रह करण्याची योजना निश्चित केली. 


→ सुविचार -• गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, महणणजे तो आपोआपच बंड करून उठेल. • शिका ! संघटित व्हा ! संघर्ष करा. • संस्कार म्हणजे माणसाच्या संवेदना अधिक तरल आणि व्यापक करणे, त्याची विवेकशक्ती जागृत करणे, शिक्षण हे संस्कारासाठीच असते.



→ दिनविशेष 

- धम्मचक्र परिवर्तन दिन १९५६ सनातन हिंदूधर्म मानवी हक्कांपासून दलितांना वंचित करतो. परावलंबी व लाजिरवाणे जीणे जर पाडतो म्हणूनच त्यांनी या धर्माला नाकारले. हिंदू धर्मातील विसंगती उघड केल्या. जातिभेद, वर्णभेद मानणारा हिंदुधर्मही डॉ. आंबेडकर यांनी नाकारला. १४ १९५६ रोजी त्यांनी आपल्या क्रोडों अनुयासांसह बौद्धधर्मात प्रवेश केला. अस्पृश्यांनी हिंदुधर्मातून बौद्धधर्मात प्रवेश केल्याच्या या घटनेचा एकूणच भारतीय धर्मव्यव मोठा हादरा बसला. विषमता जोपासणारा धर्म त्यांनी जेव्हा नाकारला तेव्हा धर्मांतरप्रसंगी ते म्हणाले - "मी यापुढे मनुष्यजातीमध्ये समानतेचा प्रसार करण्यासाठी व्यतीत करीन... 'मी आज जुन्या धर्माचा त्याग करून पुन्हा जन्म घेत आहे.' समताधिष्ठित समाजनिर्मिती हेच ध्येय स्वीकारून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक व राजकीय चळवळी उभारल्या. धर्मांतर ही एक प्रकारे सामाजिक समतेचा व स्वातंत्र्याचा ध्यास असणारी कृती होय. धर्मांतराच्या वेळी केलेल्या प्रति आशय पुढीलप्रमाणे - मी ब्रह्मा, महेश, विष्णू यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही, राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उ करणार नाही, गौरी, गणपती, इत्यादी हिंदुधर्मातील कोणत्याही देवदेवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही., देवाने अवतार घेतले यावर माझा नाही.. बुद्ध हा विष्णूचा अवतार होय. हा खोटा आणि खोडसाळ प्रचार होय असे मी मानतो., मी श्राद्धपक्ष करणार नाही, पिंडदान करणार नाही., बौद्धधर्माच्या कि विसंगत कोणतेच आचार करणार नाही., कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाचे हातून करवून घेणार नाही., सर्व मनुष्यमात्र समान आहेत असे मी मानतो., मी समता प्र करण्याचा प्रयत्न करीन., भगवान बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन., भगवंताने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन., भगवंताने दहा पारमिता मी पाळीन., सर्व प्राणिमात्रांवर दया करीन, त्यांचे लालनपालन करीन., चोरी करणार नाही., खोटे बोलणार नाही., व्यभिचार करणार नाही, दारू ि नाही., ज्ञान शील व करुणा या बौद्धधर्माच्या तीन तत्त्वांची सांगड घालून मी माझे जीवन चालवीन.,, माझ्या जुन्या, मनुष्यमात्राच्या उत्कृर्षाला हानिकारक अस आणि मनुष्यमात्राला हीन व असमान मानणाऱ्या हिंदुधर्माचा मी त्याग करतो व बुद्धाच्या धर्माचा स्वीकार करतो, तोच सद्-धर्म आहे अशी माझी खात्री पटलेली माझा नवा जन्म होत आहे. इतः पर बुद्धीच्या शिकवणीप्रमाणे वागेन.. 


→ मूल्ये 

 • अभ्यासू वृत्ती, व्यासंग 


→ उपक्रम 

- • समग्र केळकर वाङ्मयातील काही भागांचे वाचन करा. 

• ऊर्मिला ढाकरे लिखित 'ऊर्मी' काव्यसंग्रह वाचा व संग्रही ठेवा. 


→ अन्य घटना -

 • पहिले कुटुंब नियोजन प्रसारक र. धों. कर्वे स्मृतिदिन - १९५३.

 • डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा तीन लक्ष अस्पृशांसह बौद्ध प्रवेश - १९५६.

 • साहित्य सम्राट न. चि. केळकर स्मृतिदिन - १९४७. 


समूहगान -

• देश हमारा, धरती अपनी, हम धरती के लात. -


 सामान्यज्ञान

> संपूर्ण जगात एकूण २७९२ भाषा आहेत. पैकी इंग्रजी भाषा अशी आहे, जिच्या लिपीमध्ये आकार, उकार, एकार नाहीत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा