20 ऑक्टोबर-दैनंदिन शालेय परिपाठ
→ प्रार्थना
लावियेला दीप प्रेमे, तेवता ठेवू चला....
→ श्लोक
- सत्य, अस्त्येय, ब्रह्मचार्य, असंग्रह । शरीरश्रम, अस्वाद, सर्वत्र भयवर्जन ।। सर्वधर्मी समानत्व, स्वदेशी, स्पर्शभावना । ही एकादश सेवावी नम्रत्वे व्रतनिश्चये ॥ अहिंसा (कुणालाही शारीरिक व मानसिक त्रास न देणे), सत्य (नेहमी खरे बोलणे), अस्तेय (चोरी न करणे) ब्रह्मचर्य (आपले मन व सर्व इंद्रिय ताब्यात ठेवून संयमाने वागणे), असंग्रह (कशाचाही गरजेपेक्षा अधिक संग्रह न करणे), शरीरश्रम (नेहमी कष्ट करण्यास तत्पर असणे), अम्बर (जिभेच्या आहारी न जाता केवळ शरीर पोषणासाठी साधेच सत्वयुक्त भोजन करणे.), सर्वत्र भयवर्जन (कुणाचीही व कशाचीही भीती न बाळगणे | सर्वधर्मी समानत्व (सर्व धर्माना समान लेखणे), स्वदेशी (स्वदेशात तयार झालेल्या वस्तूंचाच वापर करणे) आणि स्पर्शभावना (उच्च नीच असा भेदन | बाळगता सर्वांशी समानतेने वागणे) या एकादश (अकरा) व्रतांचे पालन निष्ठेने, निश्चयाने व नम्रतेने करावे. (व्रत म्हणजे नियमितपणे निष्ठापूर्वक आचार करावयाची गोष्ट)
→ चिंतन
- जो संकटे निर्माण करतो तोच संघर्षशीलता व सामर्थ्यही प्रदान करतो. सोशिकता आणि धैर्यही देतो, असे न्या. रानडे यांनी म्हटले आहे ईश्वर जर न्यायप्रिय व दयावान असेल, तर मग व्यक्तीच्या वाट्याला येणारे दारिद्र्य, दुःख, दुष्काळ, रोगराई यासारखी नानाविध संकटे माणसावी येतात? तर प्रत्येक व्यक्तीने अंतर्मुख होऊन आपले दोष व चुका शोधाव्यात, त्या सुधाराव्यात, पापकृत्यांचे प्रायश्चित्त घ्यावे, त्यावाचून जीवनात का वाट्याला येणार नाही, असा इशारा ही संकटे देत असतात आणि संकटातून बाहेर पडण्याचे मार्ग आणि आघात सोसण्याचे बळ हे निर्माती जी विश्वशक | तिच्याकडून व्यक्तीस मिळत असते असा रानड्यांना विश्वास होता.
कथाकथन
- राष्ट्रीय एकात्मता दिन २० ऑक्टोबर - हिमालय पर्वतामुळे आपल्या देशाची सीमा सुरक्षित आहे. केवळ खैबर खिंड आणि ब तिच्याकडून व्यक्तीस मिळत असते असा रानड्यांना विश्वास होता. खिंड या वायव्येकडील खिंडीतून आजपर्यंत भारतावर आक्रमणे झालेली आहेत. आता तर हे दोन्ही मार्ग पाकिस्तानात गेल्याने आपला देश निष्ि झालेला होता. हिमालयाकडून आपल्या देशावर परकीय आक्रमण होऊ शकत नाही असा आपला भ्रम होता, पण तो भ्रमच ठरला. हिंदी चिनी भाई असे आपले पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू आणि चीनचे प्रमुख चौ-एन-लाय यांनी एका सुरात म्हटले तो केवळ मैत्रीचा देखावा होता. भारत अंधारात ठेवायचा चीनचा डाव होता हे लगेच १९६२ साली चीनने भारतावर हिमालयातूनच आक्रमण केले यावरून दिसून आले. चौ-एन- भारताच्या पाठीत खंजीर खुपसला. त्याचा जबरदस्त मानसिक धक्का पं. जवाहरलाल नेहरूंना बसला. चीनच्या अनपेक्षित आक्रमणाने भारतीय जनत | काही काळ दिडमूढ होऊन गेली होती. लगेच सारे भेदाभेद विसरून सारी भारतीय जनता आपल्या पंतप्रधानांच्या पाठीशी उभी राहिली. भारतीय जनतेच राष्ट्रीय ऐक्याचे अनोखे दर्शन त्या प्रसंगी जगाला घडले होते. तो दिवस २० ऑक्टोबर १९६२ चा होता. त्या ऐक्य भावनेचे स्मरण व्हावे, तिला उ मिळावा यासाठी त्यानंतर दरवर्षी आपण २० ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय एकात्मता दिन म्हणून पाळीत आहोत. या दिवशी गावागावातून शाळाशाळा | सारे जण एकत्र येऊन राष्ट्रीय एकात्मतेची प्रतिज्ञा सामूहिकरित्या घेत आहोत. केवळ राष्ट्रीय एकात्मतेची प्रतिज्ञा घेऊन देशात खऱ्या अर्थाने ऐक्य दि | येणार नाही. आपण जी प्रतिज्ञा घेतो तिची जाणीव प्रत्येकाच्या अंतःकरणात कायमची भूगती राहिली पाहिजे. पुढे ज्या वेळी पाकिस्तानने आपल्या देशक | आक्रमण केले त्या त्या वेळी साऱ्या भारतीय जनतेने राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन जगाला घडविले आहे. भारतात अनेक पंथांचे असंख्य जातीजमातींचे राहतात. अनेक विचारांचे पक्ष या देशात आहेत. परंतु जेव्हा जेव्हा राष्ट्रावर आक्रमणाचे संकट येते तेव्हा तेव्हा सारी भारतीय जनता एक होते है जगालाही पटले आहे. चीन आक्रमणानंतर सौराष्ट्रापासून तो थेट पूर्वेकडे नेफापर्यंतच्या सीमेच्या संरक्षणाचे महत्व आपल्या सरकारलाही पटले व या सीमेवर आपले लाखो जवान डोळ्यात तेल घालून पहारा देत आहेत. त्यांचे आत्मिक बळ वाढविण्यासाठी आपण घेतलेल्या एकात्मतेच्या प्रतिज्ञेनु सततच वागले पाहिजे, हे निर्विवाद होय.
→ सुविचार
• लोकमताचे बळ निश्चयात आहे, समुच्ययात नाही. लोकमान्य टिळक • धर्म, वंश, भाषा, चालीरीती, आहारविहार, कला, संस्कृती, क्रीडा सण-उत्सव, • भौगोलिक परिस्थिती यातील वेगळेपणा असूनही भारताबद्दलची अस्मिता, मानचिन्हांबद्दल आदर आणि भावनिक एकसंघतेचा कृतीशील धागा यातून राष्ट्रीय एकात्मता व्यक्त होते.
दिनविशेष -
• राष्ट्रीय एकात्मता दिन - १९६२ पासून सुरू : भारत व चीन या देशातील सीमारेषा, भारत, चीन व तिबेट या देशामध्य वाटाचा | होऊन निश्चित झाली. या रेषेला मॅकमोहन रेषा म्हणतात. ती २२०० मैल लांबीची असून तिला आंतरराष्ट्रीय मान्यताही आहे. पण १९५० नंतर चीनने सीमारेषेबाबत पुन्हा पुन्हा वाद सुरू केले. २० ऑक्टोबर १९६२. रोजी चीनने भारतावर आक्रमण केले. त्यावेळी सर्वधर्म, पंथ भेद असलेला आपला भारत एक होऊन तत्कालीन पंतप्रधान पंडितजींच्या मागे उभा राहिला. आपसातले तंटे विसरून लोकांनी भारताच्या सीमा रक्षणासाठी एकजूट केली. त्याची स्मृती म्हणून हा दिवस 'राष्ट्रीय एकात्मता दिन' म्हणून पाळला जातो. या दिवशी राष्ट्रीय एकात्मतेची प्रतिज्ञा घेतली जाते.
→ मूल्ये -
• राष्ट्रनिष्ठा, एकात्मता.
→ अन्य घटना
• समाजशिक्षण मालेची स्थापना - १९५०. पंजाबराव कृषी विद्यापीठाची स्थापना - १९६९.
→ उपक्रम -
• राष्ट्रीय एकात्मतेला पोषक उपक्रम आयोजित करा.
→ समूहगान
• मेरा रंग दे बसंती चोला, माए रंग दे बसंती चोला...
→ सामान्यज्ञान
राष्ट्रीय एकात्मतेची प्रतिज्ञा - राष्ट्राचे स्वातंत्र्य टिकविण्यासाठी व एकात्मता बळकट करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहीन अशी मी प्रतिज्ञा करतो. मी कधीही हिंसाचाराचा अवलंब करणार नाही. धार्मिक, भाषिक, प्रादेशिक मतभेद व गैरसमज किंवा राजकीय, आर्थिक स्वरूपाच्य तक्रारी दूर करण्यासाठी शांततामय व घटनात्मक मार्गाचा, अवलंब करीन.
• अवकाशात जाणारा पहिला मानव - युरी गागारिन (रशिया)
• अमेरिकेचा पहिला अंतराळवीर - ॲलन शेपर्ड (अमेरिका)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा