22 ऑक्टोबर-दैनंदिन शालेय परिपाठ
प्रार्थना
ॐ तत् सत् श्री नारायण तू पुरुषोत्तम गुरू तू ....
→ श्लोक
ऊस डोंगा परी भाव नव्हे डाँगा । काय भुललाशी वरलीया रंगा ।। चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा ।। काय भुललाशी वरलीया रंगा ।। ऊस वाकडा तिकडा दिसत असला तरी त्यामधील रस गोड असतो. वरून दिसणाऱ्या रंगाला व आकाराला भुलून जावू नये. (चोखोबा देहाने जरी कुरूप दिसत असले तरी, दलित जातीत जन्मले असले तरीसुध्दा त्यांची विठ्ठल भावभक्ती ही श्रेष्ठ दर्जाची शुध्द होते।
→ चिंतन
- जीवन म्हणजे समरभूमि आहे, इथे लहानमोठ्या जखमा होणारच - ना.सी. फडके. निसर्गामध्ये एक जीव दुसऱ्या जीवावर जगत असतो. वनस्पती सूर्यप्रकाशावर, शाकाहारी प्राणी वनस्पतीवर, शाकाहारी प्राण्यांवर मांसाहारी तर मित्र आहारी प्राणी वनस्पतीवर, प्राण्यांवर जगत असतात. निसर्गामध्ये अशा अन्नसाखळ्या आहेत आणि त्यांच्या जाळ्या तयार झालेल्या अ जीवो जीवस्य जीवनम्' म्हणूनच प्रत्येक जीवाला जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. या संघर्षात शारीरिक, मानसिक जखमा होणे अपरिहार्य
→ कथाकथन - तुकडोजी महाराज श्री संत तुकडोजी महाराजांचा जन्म विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील यावली या गावा ३० एप्रिल १९ | साली झाला. त्यांचे नाव माणिक, वडिलांचे नाव बंडोजी ठाकर व आईचे नाव मंजुळादेवी असे हो. बाल माणिकाचे ठायी हडपणा - | उपजतच ईश्वरदर्शनाची तळमळ दिसून येई. मुलांप्रमणे इतर खेळ न खेळता, एकतारी व खंजिरीवर भजने म्हणणे, लोकांसमोर कीर्तन | हा त्याचा बाळछंद, प्राथमिक शिक्षण कसेबसे पूर्ण केले असले तरी, शाळेऐवजी शिवमंदिरात, नदीत वा शेतात ध्यानपूजन करण्यासाठी धाव घेत. वडिलांकडून व इतर काही लोकांकडून होणाऱ्या जाचामुळे प्रल्हादाची भूमिका अधिकच अंगी बाणली. मामाचे गाव खंड आडकोजीच्या सहवासात बाल माणिकाची वृत्ती विशेष फुलली. वरखोडचे आडकोजी महाराज १९२१ साली समाधिस्त झाले तेव्हा तुकडोजी महारांजाना जबर धक्का बसला. अल्पवयातच ते तंत्र पंढरपूरला गेले. त्यांनतर १९२३ साली ते रामेटकच्या जंगलात ध्यान करण्यास्तव गेले. १९२५ नंतर तुकडोजी महाराजांच्या भजनाने लोक प्रम होऊ लागले. अनेक संतांच्या व तीर्थाच्या दर्शनासाठी तुकडोजी महाराज भारतभर हिंडले आणि समाजाचे डोळस निरीक्षण केले. अभ्यासक म्हणून येत. एकदा असान चांगली सोय आहे आहे. हजारो वि "आपण या वि शिक्षणतज्ज्ञ इलि "पण या सर्वाचे सोडतात व जुना समर्पक उत्तर इनि "प्रापंचिक पारमार्थिक, देवभक्त-देशभक्त, पंथधर्मादिकांचे लोक यांची विरोधी, विसंगत व भ्रमिष्ट स्थिती लक्षात घेऊन ती दूर करण्या सर्वांना एका छत्राखाली आणणारे धार्मिक माध्यम त्यांनी निश्चित केले व त्याप्रमाणे एक्के-सप्ताह-चतुर्मास्य यज्ञ भजने इत्यादि जुन्या साधन | नवे विचार योजले. १९३० च्या सत्याग्रही शिबीरातून राष्ट्रीय भजनेही गाजविली. १९३४ चिमूर चातुर्मास्य व १९३५ चा सालबर्डीचा अपूर्व | यांनी महाराजांचे महान व्यक्तिमत्व लोकांपुढे आणून सर्वांना भारून टाकले. १९३६ साली महात्मा गांधीनी देखील महिनाभर त्यांना स्वतःजवळ ठेवून घेतले. या वेळेपर्यंत गावोगावी अनेक आरती व भजने मंडळे निर्माण झाली होती. आष्टीला केंद्र नेमून प्रेमीजनांनी त |सुसंघटना निर्माण केली. ग्रंथ प्रकाशन व धर्मसेवाश्रम हे १९३५ साली मोझरीस स्थापन झाले. चातुर्मास्य व धर्मशिक्षणवर्ग यातून उद्योग, व्यापार प्रचारादी विभाग फोफावले व १९४१ पर्यंत तेजस्वी तरूण संघटना रूपास आली. १९४२ च्या आंदोलनात गावोगावचे उपासक कार्य करून आहे. "ते क गेले. चिमूर आष्टीच्या स्वातंत्र्यायुध्दाबद्दल खुद्द महाराजांना सुध्दा इंग्रज सरकारने चांदा चातुर्मास्यातून पकडून, नागपूर व रायपूर जेलमध्ये पायांचा उपय डाबले आणि 'आते है नाथ हमारे' इ. भजनावर बंदी घातली. ' तुकडोजी महाराजांनी १९४३ साली 'श्रीगुरुदेव' मासिक काढले. जुन्या आरती मंडळांना. 'श्रीगुरुदेव सेवा मंडळा' चे रूप दिले. तुकडोजींचे अनु विधायक कार्याचा प्रचार करू लागले. स्वराज्यप्राप्तीनंतर तुकडोजींना बलिदान, यात्राशुध्दी, मंदिरोद्घाटन, सर्वांगीण समाजशिक्षण, आखाडा पल रझाकारांच्या प्रतिकारार्थ शक्ती संवर्धन, व्यसननिर्मूलन, संत संमेलने, भूदान यज्ञ, भारत सेवा समाज कार्य, आदर्श ग्रामनिर्माण इ. कार्ये नेटाने चालविल त्यांच्या कार्याबद्दल म. गांधी, साने गुरूजी, डॉ. राजेंद्रप्रसाद, पंडित नेहरू, विनोभा भावे, जयप्रकाश, आचार्य कृपालानी इ. मंडळींनी गौरव केला
सुविचार
-• जग दुरूस्त करावयाचे तर त्यातील प्रत्येक गाव आदर्श झाले पाहिजे. - संत तुकडोजी महाराज (ग्रामगीता)
→ दिनविशेष - ना.सी. फडके स्मृतिदिन - १९७८ : ना.सी. फडक्यांचा जन्म दि. ४ ऑगस्ट १८९४ मध्ये नगर जिल्ह्यातील कर्जत के झाला. मराठी साहित्यातील ते एक युगप्रवर्तक साहित्यकार म्हणावे लागतील. लेखन शैलीच्या आगळ्या वेगळ्या सामर्थ्यामुळे त्यांनी चरित्र, ना प्रवासवर्णन, क्रीडा समालोचन हे वेगवेगळे साहित्यप्रांत भूषविले. पण ते खरे प्रसिध्दीस आले ते प्रणयरम्य कांदबरीकार म्हणून चुरचुरीत औ इंग्रजी पध्दतीची नवी नादधुर शैली, चतुर भाषा, सौंदर्यपूर्ण, प्रासादिक, सुटसुटीत, सहज स्वाभाविक आणि चटकदार रेखीव शैलीचे लेणे प्रथमच मराठी भाषेला चढविले. त्यांची भाषा वाचताना मनामध्ये रूणझुणत राही. लेखनाइतकेच वक्तृत्वावरही त्यांचे प्रभुत्व होते. फडके यांच्या लघु आणि लघुनिबंध वाचकांना फार आवडत, 'गुजगोष्टी' हा नवा वाङ्मयप्रकार त्यांनी मराठीत रूढ केला. 'प्रतिभासाधन' हे त्यांचे पुस्तक टीकाकारां नावाजलेले आहे. ते दरवर्षी 'झंकार' हा दीपावली अंक प्रकाशित करत असत आणि त्यात त्यांच्या नव्या कादंबरीचा समावेश असे. 'जादुगार', 'अन्त हो अकबर' 'दौलत' या त्यांच्या काही गाजलेल्या कादंबऱ्या आहेत. कथाकार, कादंबरीकार, लघुकथाकार अशा तीन भूमिका गाजविणारा मराठी भाषे | रेखीव रचनाशिल्पी २२ ऑक्टोबर, १९७८ रोजी शांत झाला.
→ मूल्ये
सौंदर्यभिरूची
→ अन्य घटना
• बक्सरची लढाई - १७६४.
• स्वामी रामतीर्थांचा जन्म - १८७३
• विठ्ठलभाई पटेलांचे निधन - १९३३
• चीनचे भारतावर आक्रमण - १९६२
. • भाक्रा नानगल धरणाचे पं. नेहरूंच्या हस्ते उद्घाटन - १९६३. -
• ऊर्मिला ढाकरे लिखित 'ऊर्मी' काव्यसंग्रह वाचा.
→ उपक्रम
ना.सी. फडके यांच्या प्रतिभासाधन या पुस्तकाचे वाचन करा.
→ समूहगान -
दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए...
→ सामान्यज्ञान -
• भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार १९६५ पासून सुरू झाला तो सुरूवातीस एक लाख रूपयांचा होता. १९८२ पासून दीड लाख रू रोख, सरस्वतीची मूर्ती व प्रशस्तीपत्रक देण्यात येते. मराठीमध्ये वि.स.खाडेकर १९७४ आणि वि.वा. शिरवाडकर १९८९ यादोघांना हा पुरस्कार मिळाला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा