23 ऑक्टोबर-दैनंदिन शालेय परिपाठ
प्रार्थना -
असो तुला देवा माझा सदा नमस्कार....
श्लोक -
सत्यमेव जयते, नानृतम् । सत्येन पन्थाः विततो देवयानः ।। नेहमी सत्याचाच विजय होतो, असत्याचा कदापि नाही. सत्याच्या योगानेच पुण्यशील असा मार्ग सापडेल. वार:
चिंतन -
मुंगी हळूहळू हजार कोस चालून जाईल, पण गरूड असूनही जर चाललाच नाही तर तो पाऊलभरही पुढे जाणार नाही. मुंगी आणि गरुड़ यांच्यात सर्वच दृष्टीने फरक आहे. पण मुंगी आपल्या पावलांनी सतत चालत राहते. म्हणून ती शेकडो मैल अंतर चालू शकते. आकाशाला गवसणी घालण्याची शक्ती असणाऱ्या गरूडाने पंख हलवलेच नाहीत तर तो जागच्याजागीच राहतो. ससा आणि कासवाची गोष्ट प्रसिध्दच आहे. असलेल्या शक्तीचा, क्षमतेचा उपयोग केला तरच विकास होऊ शकतो.
कथाकथन
स्वावलंबी बना बनाए डब्ल्यू इलियट हा प्रख्यात हॉर्ड विद्यापीठाचा प्रेसिट प्रमुख होता एक प्रगाड़ म्हणून त्याची पाती होती. विविध देशा एकाएक त्याचे अभिनंदन करण्यासाठी मध्ये आला होता. अने सोय आहे. संशोधन विभागही आहे. विद्यापीठाचा परिसर मोठा आहे. रोजाना नदीचा प्रवाह आहे. २३०० हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनी अनेक विषयांचा अभ्यास करण्यासाठी इथे येत. त्यामुळे जगभर या विश्वविद्यालयह "आपण या विश्व विद्यालयाला जगभर ख्याती प्राप्त करून दिली आहे. त्याबद्दल आम्ही आपले मनःपूर्वक अभिनंदन करीत आहोत" एक शिक्षणतज्ज्ञ इलियटला म्हणाला, "आपल्या कर्तृत्वामुळे हॉर्वर्ड विद्यापीठ ज्ञानाचा खजिना बनले आहे.' "खरं आहे इलियट हसत म्हणाले, या सर्वाचे श्रेय माझं मुळीच नाही. याचं कारण असं आहे की, जगातील अनेक युवक आणि युक्त इसे रो जुना प्रवाह ते नवेशन घेऊन समृध्द होतो. इथे जुने फारच कमी पण त्यात सदैव नव्याची भर पडत असते आणि समर्पक उत्तर इलियटनी दिले आहे. या उत्तरात अहंकाराचा लवलेशही नाही. मोठेपणाचा हव्यास नाही. पण आहे निर्माण करतो. “संधी निर्माण करायची असते. तिची वाट बघायची नसते व तिचा पुष्कळांना असे वाटते असते की नशीब आपला दरवाजा येऊन ठोठावते तेव्हा लगेच दरवाजा उघडला की यशोमाना आपल्या पडेल. नेपोलियन बोनापार्टने एका विद्यार्थ्याला सांगितले, "आता फुकट घालविलेला प्रत्येक क्षण हा भविष्यकालातील दुर्दैवाचा निर्मा गेला क्षण परत येत नाही. कालप्रवाह परिस्थिती सतत बदलत राहने हा निसर्गाचा शाश्वत नियम आहे. अफाट संपली असलेला एक कोटी नोकर-चाकर, गाड़ी-घोडा, राजवाड्यासारखे घर, घरात मुलेबाळे सर्व काही असतानाही दुःखीच राहत असे. त्याला भयंकर ने प झोप नसे. अनेक डॉक्टर्स, वैद्य, हकीम झाले पण रोग काही हटेना. एक दिवस एक साक्षात्कारी संत पुरुष त्या सावकाराच्या घरी आले. त्यांचे स्वागत केले. भोजन खानपान संपल्यावर सावकाराने आपले दुःख व्यथा त्यांना सांगितली. सत म्हणाले. 'तुमच्या रोगाचे फक्त एकच कारण आहे. "ते कोणते ?" सावकाराने विचारले. "तुम्ही अपंग आहात" संत म्हणाले, "यावर उपाय काय?" "स्वतःची कामे स्वतः करा, हाता- पायांचा उपयोग करा, नोकर चाकरांवर विसंबून राहू नका. एवढी मेहनत करा की अंगातून घामाच्या धारा निवळल्या पाहिजेत." प्रत्येक क्षण मेहनतीचा कष्टाचा व ज्ञानप्राप्तीचा असतो. त्याचा योग्य उपयोग करायला शिका. मालाच स्वावलंबी जीवन म्हणतात व अशाच माणसाला शांत सुखाची झोप लागते. जीवन अनुभवांनी समृध्द होते, म्हणून संत रामदासांनी म्हटले आहे... जो दुसऱ्यावरी विश्वासला, त्याचा कार्यभाग
सुविचार-
• आत्मविश्वास, आत्मनिर्भरता माणसाचे मानसिक सामर्थ्य वाढवितात.
• अविरत उद्योग हाच सुखशांतीचा, समाधानाचा बुडाला. झरा आहे. •
मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धारा अधिक शोभून दिसतात.
• यश हे प्रयत्नाला चिकटलेले असते. माणसाचे मोठेपण त्याच्या वयावर नव्हे, तर त्याच्या कर्तृत्वावर अवलंबून असते.
• उद्योगाचे घरी, लक्ष्मी नांदे सर्वतोपरी प्राप्तीच्या आनंदापेक्षा प्रयत्नाचा आनंद अधिक असतो.
• → दिनविशेष
- • डनलॉप जॉन बॉईड स्मृतिदिन-१९२१ : स्कॉटलंडमध्ये आयर्शायर येथे फेब्रुवारी १८४० मध्ये याचा जन्म झाला. हा प्रथम जनावरांचा वैद्यकीय शल्यकर्मज्ञ म्हणून नावारूपास आला. संशोधकवृत्ती, तीव्र निरीक्षण शक्ती आणि नवीन प्रयोग, सतत करून पाहण्याची उत्सुकता याच्याजवळ होती. लहान मुलाच्या तीन चाकी सायकलच्या भरीव टायरचे त्याने निरीक्षण केले. भरीव टायरऐवजी पोकळ टायर हवा भरून वापरल्यास खाचखळग्यातून हादरे बसणार नाहीत. अशी कल्पना त्याला आली. इ.स. १८८७ मध्ये तागाच्या कापडांचे वेष्टन असलेली पोकळ रबरी नळी घेऊन त्यात हवा भरली व आपल्या मुलाच्या सायकलीसाठी त्याचे टायर बनविले. फुटबॉलच्या पंपाने त्यात हवा भरता येत असे. पुढे अधिक सुधारणा करून या शोधाचे ब्रिटीश पेटंट १८८८ साली या शास्त्रज्ञास मिळाले. या शोधाने प्रवासी साधनांच्या प्रगतीस फार मोठा हातभार लागला. आज प्रसिध्द असलेल्या डनलॉप टायर कंपनीचे टायर त्याच्याच नावाने ओळखले जातात.
→ मूल्ये -
• शोधकवृत्ती, निरीक्षण
→ अन्य घटना
• टायफॉइडच्या जंतूचा शोध लावणारा संशोधक जॉर्ज गाफकी यांचा स्मृतिदिन - १९१८.
→ उपक्रम
• रबराचे उत्पादन, विविध उपयोग यासंबंधी माहिती मिळवून सांगा.
→ समूहगान
-• राष्ट्र की जय चेतना का गान वंदे मात्रम...
→ सामान्यज्ञान
10 तेले - अन्नाचा एक महत्वाचा घटक म्हणून तेले मनुष्यास प्राचीन कालापासून माहीत आहेत. यज्ञातील आहुतीसाठी तुपाचा वापर मुक्तपणे होत असे. दिव्यामध्ये जळण म्हणून फार पूर्वीपासून वनस्पतींची तेले वापरली जात. आयुर्वेदात शक्तीदायक म्हणून तुपाची योजना केलेली आढळते. लाकडी सामानाला काही तेले लावली व ती वाळू दिली तर त्या पृष्ठभागांचे हवा व पाणी यापासून संरक्षण होऊन ती टिकतात. एरंडेलाचा उपयोग वंगण म्हणून व औषधी योजनेत रेचक म्हणून पूर्वीपासून केलेला आढळतो. • रक्तपेढी - रक्तदानासाठी आवश्यक असलेली 'रक्तपेढी' कल्पना अलीकडच्या काळातील आहे. रक्तपेढीत रक्ताचा साठा करण्यात येतो. रक्ताचे गुणधर्म टिकवून ठेवण्यासाठी रक्त न गोठणाऱ्या एका विशिष्ट द्रावणात ठेवले जाते आणि ते द्रावण रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले जाते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा