Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

रविवार, २९ ऑक्टोबर, २०२३

30 ऑक्टोबर-दैनंदिन शालेय परिपाठ

 ३०  ऑक्टोबर-दैनंदिन शालेय परिपाठ



→ प्रार्थना 

अता वंदिता मी गुरू माऊलीला, अति आदरे मी नमिया पदाला... 


→ श्लोक -

 संतांचा अनुभव संतची जाणती । येर ते हांसती अभाविक ।। नामाचा प्रताप प्रल्हादची जाणे । जन्ममरण जैणे खुंटविले ।। सेवेचा प्रकार जाणे हनुमंत । तेणें सिताकांत सुखी केला ।। सख्यत्वें पूर्णता अर्जुना बाणली । ऐक्यरूपे चाली मिरवली ।। चोखा म्हणे ऐसा आहे श्रेष्ठाचार । तेथे मी पामर काय वान् । संतांची अनुभूती ही संतालाच ओळखता येते. इतर भाविकांना ती कळत नाही व ते त्याला हसतात. ईश्वराच्या नामाचा पराक्रम हा प्रल्हादान ओळखला म्हणूनच त्याने जन्म आणि मरणाला थांबविले. ईश्वराच्या सेवेची महती भक्त हनुमंतालाच माहित आहे. त्याने प्रभूरामचंद्राला सुखी केले. मित्रत्व काय आहे? ती सख्य भक्ती अर्जुनाने पूर्ण केली. म्हणूनच त्याला पूर्णत्व प्राप्त झाले आहे. चोखोबा म्हणतात, श्रेष्ठत्व अशा प्रकारचे असते. त्याठिकाणी माझ्यासारखा पामर माणसाला त्याचे काय वर्णन करता येईल. • ध्येयाचा नंदादीप अखंड तेवत ठेवा, म्हणजे कर्तृत्वाचा प्रकाश पडेल. 

 

→ चिंतन-

 राग आणि द्वेष यापासून दूर राहणारा मनुष्य आदर्श बनतो. राग आणि द्वेषावर विजय मिळविणारे संतांमध्ये गणले जातात. राग व द्वेषाने पेटून जाऊन दुर्योधनाने आपल्या सर्वस्वाची होळी करून घेतली तर सावत्र आईच्या मत्सरामुळे वनवास पत्करून प्रभू रामचंद्रांनी राग व द्वेषावर विजय

 

कथाकथन 

बळी हा शेतकरी राजा बली हा खरा शेतकरी राजा बरं का. मोठ्ठा शूर घाईत माईत. तो दैत्य नव्हता, थाईत होता. घष्टपुष्ट होत मिळविला. म्हणूनच लोक त्यांची पूजा करतात, धाईत शब्दाचा अपभ्रंश झाला 'दईत' आणि पुढे 'दैत्य !" बळी हा दैत्य नव्हता, आल का लक्षात? बळीराजा हा आपला एक धष्टपुष्ट अगविद्वान | जरददस्त असलेला शेतकरी राजा होता. आपला राजा होता. त्याचं राज्य विध्य आणि सातपुड्याच्या भागात पसरलं होतं. दंडकारण्याच्या वरच्या भागाला हे राज्य होतं. बळीराजा हा सत्ययुगातील राजा ! सध्याच्या मध्य प्रदेशातील बराच भूभाग त्यांच्या राज्यात समाविष्ट होता. मुरैना, दिवा, बुंदेलखंडाचा भागही त्यात प्राचीन काळी होता. नर्मदा आणि तापी या नद्यांमध्ये येणारा दुआब हा बळीच्या राज्याचा भाग होता. प्रचंड स्मृत्री त्या राज्यात नादत असे. शेतकरी सुखी तर जग सुखी असं आज म्हणतो आपण ! पण कृती व वस्तुस्थिती खरंच तशी मात्र नाही. बळीराजा इथे आजच्या परिस्थितीत जास्त पूजनीय वाटतो त्यासाठीच ! पण त्यांच्याशीसुद्धा त्याही काळात प्रचंड 'फसवणूक झाली. हे आजपर्यंत कुणीही नाकारीत नाहीत, हे सुदैव। बर वामनाच्या तिसन्या पायात बळीराजाला पाताळात गाडल्या गेलं, हे सर्व कबूल करतात, एवढा मोठ्ठा प्रचंड दानशूर राजा पाताळात का गाडल्या जावा कारण याकाळच्या देवांना त्याचा पुण्यसंचय खूप मोठा हो आहे याची भीती वाटत होती. कथा अशी सांगतीत की, नर्मदा तीरावर दरवर्षी खूप मोठा य बळीराजा करीत असे. त्यात हजारोच्यावर लोकाना अन्नदान, वस्त्रदान, द्रव्यदान तद्वतच 'तो जे मागेल त्याला ते मिळेल' अशी व्यवस्था होती. सर्व सुख होवो ही बळींची कामना. कुणाच्याही वाट्याला दैन्य, दुःख, दारिद्र्य येऊ नये, यासाठी यज्ञयागाचं प्रयोजन बळीराजाचं असे. त्याचेळचा भूभाग आणि राज्यांच्या सीमारेषा ओलांडून बळीराजाचा उदोउदो होत असे. 'शं नाम सुखं करोती इतशंकरा'" अशा सर्वांचं सुख निहित करणाऱ्या शक्तीचा आराधना बळीराजा करीत असतानाच देवांना तो 'स्वर्गपती' होईल अशी भीती आणि दहशत निर्माण झाली. देव आणि देवांचा राजा इंद्र श्रीविष्णूकडे गेलेत. देवांनी बळीराजाबद्दल, त्यांच्या पुण्यसंचयाबद्दल आणि वाटणाऱ्या 'स्वर्गपती'च्या अस्थिर आसनांबद्दल अवगत करून पाचवा वामन अवतार घ्यायला भाग पाडले, विष्णूने अवतार घेतला. दानशूर बळीराजाचा याचक होऊन तीन पावलं भूमी मागितली. दानशूर बळीराजाने ती देण्याचा संकल्प सोडण्याआधी गुरू शुक्राचार्यांचा सल्ला घेतला. शुक्राचार्यांनी बळीराजाला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करून पाहिला. 'दानशूर' कशा कीर्तीन प्राप्त बळीराजाने ते ऐकलं नाही. शुक्राचार्य शेवटचा प्रयत्न म्हणून जलझारीत सूक्ष्मरूपाने जाऊन बसलेत. जलझारीतून हातवर पाणी घेऊन संकल्प सोडायचा असतो, अशी पद्धत त्याकाळी होती. झारीतून पाणी हातावर पडेना, म्हणून बटू वामनाने गवताचं टोक झारीत घातलं. ते शुक्राचार्यांच्या | डोळ्यात गेलं म्हणून ते दुःखाने झारीतून बाहेर आले. पाणी पडलं संकल्प पूर्ण झाला. वयाच्या २१ व्या वर्षी कायदेभंगाच्या चळवल विवाह झाला. फिरोज हे 'नॅशनल हेरॉल्ड' या वृत्तपत्र मुल झाली. १९५९ मध्ये त्या काँगेसच्या अध्यक्षा म पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या मृत्यूनंतर वे नभोवाणीखाते दिले. शारीच्या मृत्यूनंतर राबविला. पाकिस्तानच्या पूर्वबंगालमधील गांजले 'पाकिस्तान' असे दोन तुकडे केले. त्यांची असा सततचे संप व टाळेबंदी यामुळे देशाची बिघडू ल भारतातील लोकशाहीप्रेमी जनता त्यामुळे नाराज या पक्षाचे घटक पक्ष आपपसांत भांडू लागल्याने । गरिबांच्या उध्दारासाठी अनेक योजना कार्यान्वित पण पाकिस्तानच्या चिथावणीने पंजाबमधले इंदिराजींनी लष्करी कारवाई करून त्यांचा पाडा ऑक्टोबर १९८४ रोजी अंत केला. 


"एकपदी भूमी भारून टाकी । दुजापदे अंबर सर्व झाकी । जिते बळीचे शिरी योजियेजे । पाताळ सिंहासनी त्या बैसविले'


 या सर्व वर्णानातून एक सत्य तेही विदारक की, बुद्धिचातुर्यानं एवढ्या महान शेतकरी राजा बळीला मुख्य प्रवाहातून दूर कुठेतरी परागंदा केलं. पाताळातील सिंहासन ही संकल्पना आत तरल संवेदनशील व्यक्तीला बनवा बनवी वाढली, त्यात अतिशयोक्ती मुळीच नाही. बळीराजा एवढा सक्षम, लोकप्रिय, जननेता ! आदर्श शेतकरी राजा ! सत्ययुगानंतरच्या त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुगाच्या लक्षावधी वर्षांच्या कालौघाच्या प्रवासानंतरही माझी आजी म्हणायची 'ईडा पीडा टळो; बळी राज्य येवो? खरंच बळीचं राज्य येवो. श्रमाला प्रतिष्ठा मिळावी. घामाला दाम मिळावा. सर्व सुखी व्हावेत, शेतकरी व्हावा खराखुरा बळीराजा. चला निर्माण करू अशी व्यवस्था आणि साजरी करू दीपावली. शेती शेतकऱ्यांच्या हितांचे निर्णय घेऊन, | सिंचनाच्या सोयी कशा निर्माण होतील हा संकल्प करून, शेतमालाला योग्य भाव कसा देता येईल याचा गंभीरतेनं विचार करून तशी व्यवस्था होण्यासाठी संकल्प करू या शेतकयांच्या कर्जमुक्त व्यवस्थेसाठी, जगण्याच्या उमेदीसाठी, सुख-समृद्धीच्या प्राप्तीसाठी, शेती शेतकरी यांची समुद्धी पाहण्यास दरवर्षी कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बळीराजा स्वतः घेतात. अपेक्षा असते ती सुगीच्या सुखाची परंतु जे चित्र दिसते ते पाहून त्यांना दुःखच होत असेल येणाऱ्या सर्व बळीप्रतिपदेला आपल्या राजाला सुगी समुद्धीचे पाट वाहताना दिसोत. अशी व्यवस्था आपल्या सर्वांच्या सहकार्य आणि सहभागाने निर्माण व्हावी हीच बळीराजाची इच्छा 

 

सविचार 

ईडा पीडा टळो, बळीचं राज्य येवो. 


→ दिनविशेष - • स्वामी दयानंद सरस्वती स्मृतिदिन: १८८३ - आर्य समाज संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांनी वेदांतील तत्वज्ञानाचे यथाव ज्ञान व्हावे म्हणून सत्यार्थ प्रकाशं नावाचा ग्रंथ संस्कृत व हिंदी भाषांतून लिहिला. स्वामी पूर्णानंदानी त्यांना दीक्षा दिली व दयानंद सरवती असे त्याच नामकरण केले. प्रथम त्यांचे नाव अंबाशंकर होते. त्यांनी आर्य समाजाची स्थापना केली. समाज सुधारणेची त्यांना तळमळ होती. समाजातील अंधश्रष्टा दुराग्रही परंपरा, श्राद्धपक्ष, पिंडदान, गंगास्नान, जरठविवाह, अस्पृश्यता इ. विरुद्ध जोरदार प्रहार करून समाजजागृतीचे काम केले. वेदभाष्य, संस्कारविधी पंचमहायज्ञविधी, गोकरूणानिधी हे गंथ लिहिले. तत्कालिन समाज - धमारील पुराणमतवाद्यांना दयानंद सरस्वतींबद्दल सरस्वतीबद्दल द्वेष उत्पन्न होऊन दयानंद सरस्वतींवर विषप्रयोग केला गेला.


 → मूल्ये 

 • ज्ञान, बुध्दिनिष्ठा, समाजसेवा. 


→ अन्य घटना - 

• यंत्रमाग, दोरखंड वळण्याचे यंत्र वगैरे अनेक उपयुक्त शोध लावणारे ब्रिटिश संशोधक कार्टराईट यांचा जन्म १८२३ 

• स्वातंत्र्य चळवळीतील थोर समाजवादी नेते नरेंद्र देव यांचा जन्म - १८८१. 

• डॉ. होमी जहांगीर भाभा जन्मदिन १९०९ • संयुक्त राष्ट्रसंघाचे भारताल सदस्यत्व - १९४५. उपक्रम - 

• स्वामी दयानंद सरस्वतीचे चरित्र वाचा. समूहगान -

• हम भारत की नारी हैं, फूल नहीं चिनगारी हैं..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा