३१ ऑक्टोबर-दैनंदिन शालेय परिपाठ
प्रार्थना -
नमो भास्करा दे अनोखा प्रकाश, तनुचा मनाचा कराया विकास...
→ श्लोक - व्रजादपि कठोराणि मृदूनि कुसुमादपि । लोकोत्तराणां चेतांसि को हि विज्ञातुमर्हति ।
थोर लोकांची अंतःकरणे वज्राहून कठीण, तर प्रसंगी फुलाहूनही मऊ असतात. ती कोण ओळखू शकेल ?
> चिंतन
- माणसाने माणसास खाऊ नये आणि माणसाने माणसास मारू नये, हा माणुसकीचा पहिला धडा आहे. - ३१ ऑक्टोबर वार: स्वार्थासाठी एकाने दुसऱ्याजवळील हिसकावून घेऊ नये. कोणाला लुबाडू नये. दुसऱ्याच्या दुःखावर स्वतःचे सुख उभे करू नये. स्वतःला चांगले जीवन जगता यावे, म्हणून दुसऱ्याचे जीवन उद्ध्वस्त करू नये. यापेक्षा जगा, जगू द्या असे वागावे.
कथाकथन -
इंदिरा गांधी - (जन्म - १९ नोव्हेंबर १९१७, मृत्यू ३१ ऑक्टोबर १९८४)गंगा, यमुना व गुप्त सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमावर | वसलेल्या अलाहाबाद शहरातील धनवंत व विद्यावंत नेहरू कुटुंबात भारताच्या पहिल्या स्त्री पंतप्रधान इंदिराजी यांचा दिवाळीत जन्म झाला. माता कमला व वडील जवाहरलाल यांनी आपल्या सुस्वरूप मुलीला 'इंदिरा' या नावाच्या जोडीला 'प्रियदर्शनी' असेही आणखी एक नाव कौतुकाने ठेवले. आजोबा मोतीलाल व वडील जवाहरलाल यांच्यासारख्या प्रभावी राजकीय नेत्यांच्या घरात जन्मल्यामुळे इंदिराजींना देशभक्तीचे व राजकारणाचे बाळकडू लहानपणी मिळाले. मात्र, आजोबांना किंवा वडिलांना अधुनमधून तुरूंगवास घडत राहिल्याने इंदिराजींना आपले शिक्षण सलगपणे घेता आले नाही. अलाहाबादेस प्राथमिक शिक्षण झाल्यावर मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण त्यांनी पुण्यात घेतले. ते घेतांना बॅडमिन्टन, लाठी, हुतूतू, लेझीम, पर्वतारोहणी यातही त्या आघाडीवर होत्या. पुढे गुरुदेव टागोरांच्या शांतीनिकेतनमध्ये त्या राहिल्या. पण लवकरच त्यांची आजारातून उठलेली आई कमला यांना हवापालटासाठी युरोपमध्ये न्यावे लागल्याने त्याही त्यांच्याबरोबर गेल्या. ऑक्सफर्ड येथील कॉलेजात त्या शिक्षण घेऊ लागल्या. परंतु मध्येच त्यांना परत भारतात यावे लागल्याने, त्यांना पदवी संपादन करता आला नाही.. वयाच्या २१ व्या वर्षी कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्याबद्दल त्यांना कारावास भोगावा लागला. १९४२ साली त्यांचा फिरोज गांधीशी विवाह झाला. फिरोज हे 'नॅशनल हेरॉल्ड' या वृत्तपत्रात काम करीत. पुढे ते लोकसभेवर निवडून आले. या देशभक्त दांपत्याला राजीव व संजय अशी दोन मुलं झाली. १९५९ मध्ये त्या काँगेसच्या अध्यक्षा म्हणून निवडल्या गेल्या. १९६० मध्ये पतीनिधनाचा आघात त्यांना सहन करावा लागला. १९६४ साली पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या मृत्यूनंतर ते पद लालबहादूर शास्त्री यांना मिळाले. त्यांनी आपल्या मंत्रीमंडळात इंदिराजींना घेऊन त्यांच्याकडे नभोवाणीखाते दिले. शास्त्रीजींच्या मृत्यूनंतर त्या भारताच्या पहिल्या स्त्री पंतप्रधान झाल्या. त्यांनी गरीबी हटवण्यासाठी प्रथम दहाकलमी कार्यक्रम राबविला. पाकिस्तानच्या पूर्वबंगालमधील गांजलेल्या प्रजेला स्वतंत्र करण्यासाठी लष्करी मदत करून त्यांनी भारतद्वेष्ट्या पाकिस्तानचे 'बांगला देश' व 'पाकिस्तान' असे दोन तुकडे केले. त्यांची असामान्य कामगिरी लक्षात घेऊन राष्ट्रपतीनी त्यांना १९७१ मध्ये 'भारतरत्न' किताबाने सन्मानित केले. सततचे संप व टाळेबंदी यामुळे देशाची बिघडू लागलेली अर्थव्यवस्था ताळ्यावर आणण्याच्या हेतूने त्यांनी १९७५ मध्ये 'आणीबाणी' पुकारली. पण भारतातील लोकशाहीप्रेमी जनता त्यामुळे नाराज झाली व १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला हार लागून जनता पक्षाच्या हाती सत्ता गेली. पण या पक्षाचे घटक पक्ष आपपसांत भांडू लागल्याने १९८० च्या निवडणूकीत काँग्रेसने दैदीप्यमान विजय मिळविला. इंदिराजी पुन्हा पंतप्रधान झाल्या. त्यांनी गरिबांच्या उध्दारासाठी अनेक योजना कार्यान्वित केल्या. त्याचप्रमाणे भारतीय वैज्ञानिकांकरवी अवकाशात उपग्रह सोडून जगात दबदबा निर्माण केला. पण पाकिस्तानच्या चिथावणीने पंजाबमधले शीख अतिरेकी स्वतंत्र 'खलिस्तान' नावाचे राष्ट्र निर्माण करण्यासाठी अत्याचार करू लागले असता इंदिराजींनी लष्करी कारवाई करून त्यांचा पाडाव केला. त्यामुळे चिडलेल्या त्यांच्या शीख अंगरक्षकांनी पिस्तुलातून गोळ्या झाडून इंदिराजींचा ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी अंत केला. -
सुविचार-
• (- • उदात्त ध्येय, मोठे साहस, अविरत अभ्यास, भरपूर अनुभव यांनी जीवन सर्व बाजूंनी समृध्द आणि उदाल बनते. तेजस्विता दिनविशेष व निर्भयता येते. • जीवन पुष्प चढा चरणोंपे, मांगे मातृभूमीसे यह वर । तेरा वैभव अमर रहे माँ, हम दिन चार रहे न रहे ।।
दिनविशेष
• मराठी संगीत नाटक शाकुंतलचा पहिला प्रयोग - १८८०. बळवंत पांडुरंग तथा अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या 'संगीत शांकुतल नाटकाचा प्रयोग पुणे येथील आनंदोद्भव नाट्यगृहात झाला आणि ज्याला आधुनिक अर्थाने नाटक म्हणता येईल, असा नाट्यप्रयोग प्रथम रंगभूमीवर अवतरला. या आधी मराठी नाटके नाट्यगृहात दाखविली जात, परंतु त्यांचे स्वरूप अगदी निराळे असे. पौराणिक कथाभाग निवडून मुख्य भर बेडेवाकडे हातवारे, उड्या, युध्द इ. वरच असे. अण्णासाहेबांनी प्रथमच सर्व पात्रांचे संभाषण व पदांसहित नाट्यसंहिता लिहून काढली. त्या बरहुकूम तालीम घेऊन संपूर्ण सुसंवादी नाट्यात्म कथानक सादर केले गेले. या नाटकाने मराठी नाट्यसंस्कृतीच्या इतिहासात क्रांती केली आणि संगीत रंगभूमीचे समृध्द दालन महाराष्ट्राला खुले झाले.
• मूल्ये -
• कलानिष्ठा
→ अन्य घटना
• सरदार वल्लभभाई पटेल जन्मदिन - १८७५.• इंदिरा गांधी स्मृतिदिन - १९८४.
• उपक्रम • • तुम्ही पाहिलेल्या नाटकांपैकी आवडत्या नाटकाबद्दल चर्चा करा
सामान्यज्ञान. • जगातील महिला पंतप्रधानांची माहिती मिळवा.
•
→ समूहगान
जयोस्तुते श्री महन्मंगले, शिवास्पदे शुभदे.....
सामान्यज्ञान
हृदयाचे ठोके-(दर मिनिटास) -हृदयाचे ठोके-(दर मिनिटास)
मनुष्य-७२-हत्ती -३८
लहान मूल-१४०--ससा-२०५
कुत्रा -११०-पांढरा मासा-१६
• जगन्नाथपुरी -
• पुरी हे भारतातील चार धामांपैकी एक आणि ओरिसातील पुरी जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण. जगन्नाथपुरी येथील जगन्नाथाचे मंदिर प्रसिध्द आहे. येथील जगन्नाथ, बलभद्र व सुभद्रा या तीन देवांच्या मूर्ती कडुलिंबाच्या झाडापासून बनविण्यात येतात. दर वेळेस अधिक आषाढ जेव्हा येईल तेव्हा मूर्तिबदलाचा विधी करण्यात येतो. जुन्या मूर्ती बदलून नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते. या विधीस नवकलेवर विधी असे म्हणण्यात येते. जुन्या मूर्ती मंदिराच्या परिसरातील कोईली वैकुंठ भागात विधिवत पुरण्यात येतात. प्रतिष्ठापनेनंतर मूर्तीबदलत नाहीत, हा अपवाद आहे.
•
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा