६ ऑक्टोबर
→ प्रार्थना
अजाण आम्ही तुझी लेकरे, तू सर्वांचा पिता...
श्लोक -
योजी हिताप्रति निवालने पापकर्मे । वर्णी बरेच गुण, झाकुनिया कुकर्मे । ६ ऑक्टोबर वार: दे आपणांस असता व्यसनी त्यजीना । सन्मित्रलक्षण असे वदताति जाणा !
सन्मित्र हा मित्राला पापापासून परावृत्त करतो. हिताचा मार्ग दाखवितो. मित्राचे दुर्गुण किंवा वाईट कर्मे झाकून गुण तेवढे प्रकट करतो. संकटात साथ देतो. सन्मित्राची लक्षणे अशी आहेत.
चिंतन
जग ही माणसाची शाळा आहे.
→ ज्ञान आणि विद्या चार भिंतींच्या आतच मिळतात असे नाही. सबंध जग ही माणसाची शाळा आहे आणि आयुष्याच्या अ घटकेपर्यंत माणसाच शिक्षण चालू असते. शाळेत शिक्षक जी विद्या आपल्याला देतात ती तर मोलाची आहेच. पण त्या विद्येव्द शिकण्यासारख्या कितीतरी इतर गोष्टी आहेत. त्या शिकवण्यासाठी कुणी शाळा काढलेल्या नाहीत. परंतु त्या शिकल्यावाचून मनुष्याच्या खरा आनंद निर्माण होऊ शकत नाही व त्यांच्या अंगी खरा शहाणपणाही येऊ शकत नाही..
कथाकथन
शेजाऱ्यावर प्रेम करा- सुप्रसिध्द इंग्रज कवी जॉर्ज हर्बट हा उत्तम संगीततज्ज्ञही होता. त्याच्या काव्यगायनाने मारा श्र एक दिवस असाच एक कार्यक्रम ठरला. त्याचे कर्णमधुर संगीत ऐकण्यासाठी हजारो लोक जमले होते आणि तो त्वरेने कार्यक्रम कार्यक्रम सुरु करण्यावर त्याचा विशेष कटाक्ष होता. त्या दिवशी तो असाच कार्यक्रमाला निपाला असता एका गरीब पोडेवाल्याच पोया पाठीवरील माल रस्त्यात पडून इतस्तत: विखुरला पोडेही हळकुळेच होते. एवढे प्रचंड ओझे वाहून नेणे त्या घोड्याला शक्य नव्हते ताला अक्कल नसते असे म्हणतात. हे दृश्य पाहताच हर्बट थांबला, इतस्ततः पडलेला माल गोळा केला. घोड्याच्या पाठीवरील थोडा कमी केला. घोडेवाल्याला थोडे पैसे दिले व घोड्यालाही हरभरेचारा खायला घालण्यासाठी पैसे दिले. घोडेवाल्याची ना ओळख ना पाळख हटच्या हृदयातील कनवाळूपणा मोलाचा होता. घोडेवाल्याच्या डोळ्यांत कृतज्ञतेची आसवे उभी राहिली. काहीही न बोलता हर्बट नाट्यगृह दाखल झाला. त्याचा घाणेरडा पोशाख आणि अस्ताव्यस्त केस, गबाळा अवतार पाहून मित्र आश्चर्यचकितच झाले. त्याने आपल्या मित्रांना रस्त्य पडलेली घटना सांगितली तेंव्हा मित्रांनी खाली माना घातल्या. "हर्बट । काय हे? "तुझ्यासारख्या प्रख्यात गायक वादकाने आपल्या रसिकवगांची काही तमा न बाळगता एका भिकारड्या फेरीवाल्याशी इतक्या सलगीने वागणे मुळीच शोभणारे नाही. " म्हणून त्याची निर्भत्सना केली. टिंगलटवाळी केली आणि त्याला दोषही दिला. त्याने हजारो रसिकांना ताटकळत ठेवून घोड्याला चारापाणी देण्याचा आणि अनोळखी गाडीवाल्याला मदत करण्याचा गाढवपणा केलाय, असेच सर्वांचे मत पडले. "अहंमन्यता, संशय आमचे तीन महत्वपूर्ण शत्रू आहेत. त्यांची मैत्री म्हणजे मानवतेला काळोखी, असे मी मानतो." हवं शांतपणे म्हणाला आणि तशाच अवस्थेत रंगमंचावर आपल्या वाद्यवृंदासह उभा राहिला. काव्यगायन कमालीचे रंगत गेले. हृदयात परोपकारी कृत्याचा निनाद उमटत होता. लोक त्याचे भावगीत ऐकताना देहभान विसरून गेले. हर्षोत्फुल्ल मनाने टाळ्यांचा कडकडाट झाला, हजारो मैफली झाल्या. पण त्या दिवशी झालेली मैफल कमालीची रंगली. श्रोतवृंद बेभान होऊन नाचला आणि हर्बट स्वर्गीय आनंदाचा ठेवा हृदयात बाळगून रंगमंचावरून उत्तराला मित्रांनी केलेल्या निर्भत्सनेमुळे त्याला यत्किंचितही वाईट वाटले नाही. पण इतकी उत्कृष्ट मैफल तू कशी काय जिंकलीस?" या मित्राच्या प्रश्नावर तो म्हणाला, "मी येथे येण्यापूर्वी घोडेगाडीवाल्याला जी मदत केली, ते एक सत्कृत्य होते असे मी मानले. माझे समाजातील स्थान, मला मिळत असलेला मान, माझ्या आवाजातील माधुर्य, मार्दव, सारे डोळ्यांतील कृतज्ञतेथे अधू पाहून माझे हृदय आनंदातिशयाने भरून आले. ते जर्म ईश्वरी कार्य होते तसेच समोर बसलेल्या श्रोत्यांना तास-दीडतास आपल्या जीवनातील दुःख विसरायला लावणे हेही मी ईश्वरी कार्यच मानले आणि माझा कार्यक्रम अत्यंत प्रसन्न चित्ताने मी पार पाडला." दया करुणा भावनेने केलेले कोणतेही काम ही ईश्वराची म्हणजेच जनता-जनार्दनाचीच सेव असते. कर्तव्यभावनेची पूर्वी अन्य कामांनाही प्रोत्साहक ठरते. म्हणून भगवान येशू खिस्त आवर्जून म्हणाले होते, Love the neighbour शेजान्यावर प्रेम करा. संकटात सापडलेला प्रत्येक माणूस हा आपला शेजारीच असतो. " हर्बटचे हे उद्गार खरोखरच मनन करण्यासारखे नाहीत काय?
→ सुविचार
• Love the neighbour मित्रांना मदत करावी. शेजाऱ्यांना मदत करावी. • जीवन हे एक सुंदर सुवासिक फूल असून, प्रेम हा त्यातील मध आहे.
• सहानुभूती, प्रेम, मदत व सहकार्य या गोष्टी दुप्पट होऊन सव्याज मिळतात. • शत्रूंना मित्र केले की, शत्रूंची संख्या आपोआप कमी
सानुभूती, प्रेम, मदत व सहकार्य या गोष्टी दुप्पट होऊन सव्याज मिळतात. • शत्रूना मित्र केले की, शत्रूंची संख्या आपोआप कमी → दिनविशेष - • दुसरे नानासाहेब पेशवे स्मृतिदिन - १८५८ : १८५७ च्या स्वातंत्र्ययुध्दात महापराक्रम गाजवून इंग्रजी सर्वेला जबरदस्त देणारा बीर महणून दुसन्या नानासाहेब पेशव्यांचे नाव इतिहासात अजरामर राहील. दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या कारकीर्दीत इंग्रजांनी पेशवाई खाल करून १८१८ मध्ये बाजीराव पेशव्यांना ब्रह्मवर्त येथे पेन्शनवर पाठविले. परंतु पेशव्याचे चिरंजीव नानासाहेब यांच्या मनात मात्र राजकीय सत्तेविरुष् राण धगधगत राहिला. महिला सेनापती झलकारीबाई पती पुरणकोरी झाशीची राणी, यांच्या मदतीने दिल्लीचा लाल किल्ला काबीज करून बा जफर बाला दिल्लीच्या तख्यावर बसवून त्याला स्वतंत्र हिंदुस्थानचा बादशहा जाहीर केले. फितुरीने बळी घेतला, म्हणून नाही तर नानासाहेब पेश १८५७ सालीच भारताला संपूर्ण स्वातंत्र्य मिळवून देऊन इंग्रजांना हाकलून देण्याची वेळ आपल्या शौर्याने आणली होती,
→ मुल्ये
देशभक्ती पराक्रम, राष्ट्रनिष्ठा
→ अन्य घटना
डॉ. मेघनाथ साहा यांचा जन्म १८९३.
दत्तो वामन पोतदार यांचे निधन - १९७९
•
→ उपक्र
. स्वातंत्र्ययुध्दातील पराक्रमी वीरांच्या कहाण्या मिळवून वाचा आणि सांगा.
→ समूहगान
• इन्साफ की डगरपे, बच्चो दिखाओ चलके...
→ सामान्यज्ञान
• राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (नॅशनल डिफेन्स अकॅडेमी) येथे सैन्याच्या तिन्ही दलांच्या सुमारे १८०० युवकांना सेनाधिक शिक्षण देण्यात येते.
• पुणे येथे खडकवासला येथे ही संस्था असून तिन्ही सैनिकी दलांचे प्राथमिक प्रशिक्षण देण्याची सोय या संस्थेत आहे खडकवासल्यापासून समुद्र फार लांब नाही व पुण्यास हवाई दलाचा तळ आहे म्हणून राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीसाठी खडकवासल्याची निवड कर आली. या संस्थेतून १९५५ मध्ये पहिली तुकडी शिक्षणक्रम पूर्ण करून बाहेर पडली. या संस्थेत शालेय शिक्षणाव्यतिरिक्त शिस्त, नेतृत्व व लष्करी शिक्ष यांचा अभ्यासक्रमात समावेश असतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा