माझी माती माझा देश' अभियान
पंतप्रधानच्या नेतृत्वातील भारत सरकारने देशासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या आणि स्वातंत्र्य सेनानींच्या स्मृतींना अमरत्व देण्यासाठी ‘माझी माती, माझा देश’ या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
सामान्य नागरिकांच्या मनामनात वीर आणि वीरांगनांप्रती आपुलकी आणि कृतज्ञतेचा भाव जागृत करणारे हे अभियान राबविल्याबद्दल सरकारचे मन:पूर्वक आभार. ‘मातीला नमन, वीरांना वंदन’ या घोषणेने या अभियानाने समाजात देशभक्तीभाव आणि जगात भारताला विकसित देश म्हणून घडविण्याचा संकल्प केला.भारतात सर्वात मोठी लोकशाही आहे. आज आपल्या देशाने अगण्य क्षेत्रात प्रगती केली आहे. पण आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी खुप स्वातंत्र्य सैनिकांनी, समाजसुधारकांनी तसेच अनेक ज्ञात-अज्ञात देशवासियांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. आज त्या सर्व शूर वीरांचे स्मरण करणे हे आपले आद्यकर्तव्य आहे
आपण देशाच्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्षं पूर्ण झाल्यानिमित्ताने अमृतमहोत्सवी वर्ष मोठ्या उत्साहात साजरे केले. पुढील पंचवीस वर्षांत देश आपल्या स्वातंत्र्याची शंभर वर्षं पूर्ण करणार आहे. याच पंचवीस वर्षांच्या कालावधीला देशाचा ‘अमृतकाळ’ म्हणून संबोधित केले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमृतकाळ पूर्णत्वास येईपर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे लक्ष्य ठरवले आहे. आर्थिकदृष्ट्या आपला देश सशक्त झाला पाहिजे, देशाच्या सुरक्षेसाठी आपले सैन्यसामर्थ्य अन्य देशांच्या तोडीचे हवे, आपापसातील मतभेद विसरुन समाजात परस्पर सद्भाव आणि बंधुभाव विकसित झाला पाहिजे, महिलांचा सन्मान, गरीब, मागासवर्गीय, अनुसूचित जाती-जमाती, शहरी, ग्रामीण अशा सर्व समाजघटकांनी राष्ट्रोत्थानासाठी सक्रिय झाले पाहिजे, देशाने आपल्या सांस्कृतिक वारशाचा अभिमान बाळगला पाहिजे आणि अशा भारताचे निर्माण करणे, हा प्रत्येक भारतीयाचा संकल्प झाला पाहिजे. संपूर्ण देशाने या संकल्पपूर्तीसाठी उभे राहिले पाहिजे, म्हणून पंतप्रधान यांनी पंचप्रणची शपथ घेण्याचे आवाहन केले होते.
या अभियानातंर्गत संपूर्ण देशात एकाच कालावधीत हे सर्व उपक्रम राबवले जाणार आहेत. यामध्ये शिला फलक, वसुधा चंदन, स्वातंत्र्य सैनिक वीरांना वंदन, पंचप्रण, ध्वजारोहण व राष्ट्रगान या पाच उपक्रमातून क्रांतिकारक व आपल्या मातीविषयी जनजागृती केली आहे.
माझी माती, माझा देश अभियान सर्व भारतीयांसाठी प्रेरक ठरणार
माझी माती, माझा देश’ हे अभियान काही टप्प्यात संपन्न होणार आहे. प्रत्येक गावातील मातीचे एकत्रीकरण करून प्रत्येक गावात एका कलशात ही माती गोळा केली जाईल. गावात एकत्रित होऊन सामूहिक कार्यक्रम आयोजित करणे, शाळांमध्ये स्वातंत्र्यसैनिकांचे फलक लावणे, पंचप्रणची शपथ आणि पंच्याहत्तर वृक्षांचे रोपण करुन अमृतवाटिका तयार करणे इत्यादी बाबींचा या अभियानात समावेश आहे.
गावातून हे सगळे कलश जमाकरून विकासखंड येथे आणले जातील. विकासखंडानंतर राज्यांची राजधानी, त्यानंतर दि. 29 व 30 ऑक्टोबरला अमृत वटिकेची निर्मिती होऊन हा कार्यक्रम संपन्न होईल. युवा, क्रीडा, संस्कृती, शिक्षण आणि पर्यावरणमंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम संपन्न होईल.
देशाच्या स्वातंत्र्यासाठीच्या आंदोलनात सर्वसामान्यांना जोडण्यासाठी महापुरुषांच्या पुढाकाराने अनेक आंदोलने झाली. १९०५ साली वंग-भंग आंदोलन झाले होते.
महात्मा गांधी यांच्या नेतृत्वातील जंगल सत्याग्रह,मीठाचा सत्याग्रह भारत छोडो आंदोलन, चरखा तसेच स्वदेशी यांसारख्या आंदोलनांनी समाजाला स्वातंत्र्य चळवळीशी जोडण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती, ज्यामुळे भारतातील अगदी लहान मुलेदेखील देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणपणाला लावून ब्रिटिशांविरोधात मैदानात उतरली. स्वातंत्र्य मिळवणे हेच देशांच्या नागरिकांचे लक्ष्य होते.
दुर्देवाने स्वातंत्र्यानंतर आपल्या देशातील राजकीय नेतृत्वाने भावी पिढीसमोर भविष्यासाठी कोणतेही लक्ष्य न ठेवल्याने आपण दिशाहीन झालो. ही लक्ष्यपूर्ती साध्य करण्यासाठी तिरंगा यात्रा या अभियानातंर्गत संपूर्ण देशात एकाच कालावधीत उपक्रम राबवले जाणार आहेत. यामध्ये शिलाफलक, वसुधावंदन, स्वातंत्र्यसैनिक वीरांनावंदन, पंचप्रण, ध्वजारोहण व राष्ट्रगान या पाच उपक्रमातून क्रांतिकारक व आपल्या मातीविषयी जनजागृती करणार आहे.
माझी माती, माझा देश अभियान सर्व भारतीयांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. स्थानिक स्वराज्यसंस्था व भरतीय नागरिकांना या अभियानात सहभागी करून घेतल्याने प्रत्येकाला हे अभियान आपले वाटणार आहे.
‘माझी माती, माझा देश’ सारखे अभियान राबविले, ज्यामुळे संपूर्ण देश ध्येय प्राप्तीसाठी सक्रिय झाला. याचाच परिणाम सामाजिक आर्थिक,शैक्षणिक, विज्ञान तसेच खेळ या क्षेत्रासह अन्य क्षेत्रांमध्येही आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे.
कोणताही देश हा आपली संस्कृती, त्या देशातील होऊन गेलेले महापुरूष, आपल्या देशासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या प्रेरणेनेच पुढे चालत असतो. आपल्या देशाच्या या पवित्र मातीत त्या हुतात्म्यांच्या बलिदानाचा सुगंध येतो. या भूमीचा कणकण पवित्र आहे. या देशाला वैभव प्राप्त करुन दिलेले महापुरूषही याच मातीत जन्मले, खेळले आणि मोठे झाले. आपले शरीर याच मातीत पिकवलेल्या पवित्र अन्नातून तयार झाले आहे. आपल्याला जो प्राणवायु मिळतो तो इथल्या झाडांपासुनच म्हणूनच तर कवींनी सुजलाम् सुफलाम् दुर्गा, सरस्वती, लक्ष्मी असा उल्लेख करीत या भूमीला नमन केले आहे.
आखाड्यातील पहिलवान आजही ही मातीआपल्या अंगाला लावून स्वतःला पवित्र करतो. देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी या भूमीचा कणकण शंकर भगवान असल्याचे म्हटले आहेच. १४० कोटी भारतवाशी यांना जोडणारी अशी, ही आपली भारतमाता आहे. जगायचे या भारतमातेसाठी आणिमरण पत्करायचे, तेही याच भारतमातेसाठी! हाच भाव देशवासीयांमध्ये निर्माण करण्याचे काम या अभियानाने केले आहे. चला तर मग, आपण सगळ्यांनीही या अभियानात सहभागी घेऊन आपल्या भारत देशाला विकसित बनवण्याचा संकल्प करुया.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा