१. प्रार्थना पसायदान
आता विश्वात्मकें देवें। येणें वाग्यज्ञं तोषावें। तोषोनि मज द्यावें। पसायदान हें ।। १ ।।
जें खळांची व्यंकटी सांडो। तयां सत्कर्मी रती वाढो । भूतां परस्परें पडो। मैत्र जीवाचें।।२।।
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्ये पाहो। जो जे वांछील तो तें लाहो । प्राणिजात ||३||
वर्षत सकळमंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी। अनवरत भूमंडळी । भेटतु या भूतां ॥४॥
चला कल्पतरूंचे आरव। चेतना चिंतामणीचें गांव
बोलते जे अर्णव। पीयूषांचे ॥५॥
चंद्रमे जे अलांच्छन। मार्तंड जे तापहीन। ते सर्वांही सदा सज्जन। सोयरे होतु ॥६॥
किंबहुना सर्व सुखीं। पूर्ण होऊनि तिहीं लोकीं। •। भजिजो आदिपुरुषीं। अखंडित ।।७।।
आणि ग्रंथोपजीविये। विशेषीं लोकीं इयें । दृष्टादृष्टविजयें। होआवें जी ।। ८ ।।
येथ म्हणे श्रीविश्वेश्वरावो। हा होईल दान पसावो। येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया झाला ।।९।।
ज्ञानेश्वर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा