९ ऑक्टोबर
प्रार्थना
खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे...
चिंतन
- गोठलेली मनोबुध्दी प्रवाहित करणे हे शिक्षणाचे कार्य आहे. अपने टेक्वादाने, कर्मका कल्पनेनेति गोठून जाते, मनोद गोठलेला समाज हा जड समाज असतो. ही जड़ता माणसाचा आनंद हिरावून घेते आणि मुर्दा बनविते माची जड़ता जाऊन तो चैतन्याने रसरसला पाहिजे. गोठली मनोबुध्दी प्रवाहित केली पाहिजे. ज्ञानेश्वरानी धर्माचे तत्वज्ञान सर्वसामान्यापर्यंत म्हणून वारकरी संप्रदाय बळकट झाला. अनेक जाती जमातीतले संत कवी उदयास आले. गोठलेली मनोबुद्धी प्रवाहित झाली
-
कचाकचन
कोणती मूर्ती श्रेष्ठ बिरबलाच्या चातुर्याची व बुध्दिमतेची कीती फैलावत चालली व इराणच्या राजाला वाटले आपण → क्षा घ्यावी. मग त्याने एका साच्याच्या, एका रंगरुपाच्या व एकाच आकाराच्या तीन मूर्ती बादशहाकडे पाठविल्या व बरोबर संदेशही पाठविला स्थान लिहिले होते की, 'या तीन मूर्ती अगदी सारख्या दिसतात, तरीसुध्दा यातली श्रेष्ठ कोणती, मध्यम कोणती व कनिष्ठ कोणती याची परीक्षा करून लगा बिया लावून पाठवून द्याव्या. नाहीतर शरणपत्र लिहून पाठवावे.' आता? आता आली पंचाईत ? मूर्ती तर इतक्या सारख्या की एकाच कारागिरीने एकाच साच्यातून ओतलेल्या होत्या त्या ! अगदी तिळाचाही फरक नाही ! आता यात श्रेष्ठ कनिष्ठ कसे ठरवावे ? सगळे हतबुद्ध झाले. बादशहाने शेवटी बोलावून सारे सांगितले. बिरबलाने मूर्तीकडे पाहिले व हसऱ्या चर्चेने तो उद्गारला. 'सरकार, उद्या याचं उत्तर मी देईन आज भी तिन्ही मूर्ती घरी नेतो. त्याने तिन्ही मूर्ती उचलून नेल्या, दुसऱ्या दिवशी दरबारात बिरबल आला तो मूर्तीवर उत्तम, मध्यम व कष्टशा लावूनच | बादशहाने नवलाने विचारले, 'अरे, पण तू ही परीक्षा कशी केली ते तरी सांग, कशावरून ही उत्तम, ही मध्यम व ही कनिष्ठ ? हे कळू दे. "घरी मी खूप वेळ या मूर्तीचं बारकाईनं निरीक्षण करीत राहिलो. तेव्हा मला असं दिसलं की, प्रत्येक मूर्तीच्या उजव्या कानाच्या आतल्या बाजूला एकेक छिद्र आहे! बिरबल म्हणाला. वा! तुझ्या निरीक्षणाला तोड नाही ! बरं पुढं काय झालं ?' बादशहाने विचारले. 'मग काय ?" भी एक तार घेऊन ती त्या छिद्रात घातली. ती पहिल्या मूतीच्या तोंडातून बाहेर आली. दुसरीच्या कानातून तार बाहेर पडली. तिसरीच्या पोटात गेली! बस्स, समजलं मला! पहिली मूर्ती | गळ्यात कनिष्ठ, दुसरी मध्यम व तिसरी श्रेष्ठ होती. बिरबल म्हणाला, 'पण यात श्रेष्ठ, कनिष्ठ कसं काय बुवा ते कळलंच नाही अजून' दरबारातील लोक गोंगाट करू लागले. बिरबल म्हणाला, 'ऐका मंडळी हे बघा या मूर्तीच्या कानातील तार तोंडातून बाहेर पडली' म्हणजेच जोमाने ऐकलेले सारेच बडबडत फिरत असतो तो शहाणा नव्हे तशी ही पहिली मूर्ती आहे. म्हणजे कनिष्ठ अशा लोकांच्या पोटात काही राहातच नाही! आता दुसरी मूर्ती तीही जे लोक एका कानाने गोष्टी ऐकतात व दुसऱ्या कानाने सोडून देतात त्यांचा नमुना दाखविणारी ही मूर्ती असे लोक लोकांचे गुपित जपत नाहीत पण नुकसानही करीत नाहीत. ऐकलेल्या भलाबुन्या सगळ्याच गोष्टीत हे उदासीन असतात. यांना मध्यम प्रतीचे म्हणता येईल तिसरी श्रेष्ठ मूर्ती होय. हिच्या कानातून तार गेली ती थेट पोटातच ! तेथून बाहेर पडलीच नाही. याचा अर्थ हा की असे लोक अनेक गोष्टी ऐकतात, पण त्या लक्षात ठेवतात; पोटी बाळगतात, जिकडे तिकडे सांगत सुटत नाहीत, की दुर्लक्ष सुध्दा करीत नाहीत. उलट गोष्टी चित्तात साठवून सदुपयोग करतात. त्याची साक्ष देणारी ही तिसरी मूर्ती म्हणजे श्रेष्ठ मूर्ती. बाहेरुन सगळी माणसे सारखीच असली तरी मनुष्याची योग्यता त्याच्या स्वभावावर, गुणांवर ठरत असते!" "अगदी खरं!' दरबारी लोक म्हणाले. बादशहा म्हणाला, 'खरोखर ! बिरबलं तुझं हे मानवी स्वभ धन्यवाद मग इराणच्या राजाकडे तिन्ही मूर्ती व त्यांचे गुणवर्णन पाठवण्यात आले. तेव्हा झाल्याचा संदेश पाठवला. आणि वरती बिरबलाला एक बक्षीसही दिले.
सुविचार
• विनय आणि विजय हे शौर्याचे खरे अलंकार आहेत. • कुठे काय बोलावे ! नव्हे बोलूची नये । बोल अनमोल तयांचा ।
• तोल घालवू नये ।। • माणसाचे मोठेपण त्याच्या वयापेक्षा त्याच्या कर्तृत्वावर अवलंबून असते. • इतरांना जे कठीण वाटते, ते सहजपणे करून दाखविणे म्हणजे बुध्दिमत्ता
• बुध्दिमत्ता ही माणसाला लाभलेली सर्वोत्तम देणगी होय.
→ दिनविशेष
• लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख स्मृतिदिन - १८९२ : फेब्रुवारी १८२३ मध्ये गोपाळ हरी देशमुखांचा जन्म झाला. पेशवाईचा नुकताच अस्त झाला होता. एकपाठी असलेल्या गोपाळ हरी देशमुखने संस्कृतचे अध्ययन केलेच पण काळाची बदलती पावले ओळखून इंग्रजी आत्मसात केली. सरकारी नोकरीत जॉईण्ट सेशनजज्ज या हुद्यावरून ते निवृत्त झाले. १८८० मध्ये शासनाने रावबहादूर हा किताब त्यांना दिला. लोकांची सर्वागीण सुधारणा होण्यासाठी पराकाष्ठेच्या तळमळीने 'लोकहितवादी' या टोपणनावाने प्रभाकर या वृत्तपत्रातून त्यांनी शंभर पत्रे लिहिली. ती 'शतपत्रे' या नावाने प्रसिध्द आहेत. 'हिंदुस्थान देशात पार्लमेंट स्थापन होऊन इथल्या लोकांनीच देशाचा कारभार पाहावा.' हे त्यांनी एकोणिसाव्या शतकातच | ठामपणे सांगितले. विविध विषयांवर त्यांनी सुमारे ३२ लहानमोठे ग्रंथ लिहिले. सरकारी नोकरी करूनही अतिशय निस्पृहपणे लोकसेवा करणारा, परखड विचार सातत्याने व्यक्त करणारा हा तेजस्वी देशसेवक लोकहितवादी या नावानेच ओळखला जातो.
→ मूल्ये
• स्वातंत्र्यप्रेम, सामंजस्य, सुधारणाप्रेम 1
→ अन्य घटना
• शिवाजी राजांना वाचविणारा जीवा महाला जयंती - १६३५ • रोहिणी १२५ चे उड्डाण
• हार्मोनियम वादक गोविंद सदाशिव टेंबे यांचे निधन - १९५५
• आंतरराष्ट्रीय कीर्तीचे बसपाचे राष्ट्रीय माजी संस्थापक अध्यक्ष, युगप्रवर्तक कांशीरामजी याचा स्मृतीदिन - २००६.
→ उपक्रम
• लोकहितवादींची शतपत्रे व इतर ग्रंथ मिळवून त्यांचे वर्गात सामुदायिक वाचन करा.
→ समूहगान
• जय भारता, जय भारता, जय भारती जनदेवता....
→ सामान्यज्ञान
7 • भारतातील प्राथमिक शिक्षण व्यवस्था ही जगातील एक मोठी व्यवस्था आहे. शिवाय शाळेबाहेर राहिलेल्या ९ ते १४ वयोगटातील मुलांसाठी २,३८,००० अनौपचारिक केंद्रे भारतभर कार्य करीत आहेत.
• गोंविंदराव टेंबे यांनी हार्मोनियम या साथीच्या वाद्याला स्वतंत्र प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. संगीतावर रसाळ लेखन करणाऱ्या लेखकात त्यांचे स्थान अग्रगण्य मानले जाते. नाट्यसंगीताचे पहिले शिल्पकार, पहिल्या बोलपटाचे संगीत दिग्दर्शक, संगीत क्षेत्रातील पहिले सौंदर्यमीमांसक, संगीतिकांचे पहिले प्रवर्तक वगैरे अनेक क्षेत्रात ते पहिले म्हणून गाजले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा