Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शुक्रवार, ३ नोव्हेंबर, २०२३

12 नोव्हेंबर- दैनंदिन शालेय परिपाठ

 १२ नोव्हेंबर



 प्रार्थना -

  या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वरचि असा दे... 

 

→ श्लोक 

 । तथा चतुर्भिः पुरुषः परीक्ष्यते, श्रुतेन, शीलेन, गुणेन, कर्मणा 

   ज्याप्रमाणे सोने शुद्ध ठरविण्याकरता चार कसोट्या त्याला लावाव्या लागतात. घासून त्याची चकाकी बाह्य आहे की नाही ते ठरते, तोडून त्याचा विवटपणा, तापवून ते काळे पडते की काय ते पाहता येते आणि हातोडीने ठोकून त्याचा मऊपणा हा गुण कसाला लागतो, त्याचप्रमाणे मनुष्य चांगला उस्तो त्याचे शरीराचे व मनाचे गुण, चारित्र्य, विद्वत्ता आणि वर्तन ह्यांवरून 



 ● चिंतन-

•   आईवरी विपत्ती । आम्ही मुले कशाला, बंदीत मायभू ही । आम्ही खुले कशाला । रक्ताळले शरीर । भडका जिवात झाला, आईस सोडवाया । येणार कोण बोला ।। - सेनापती बापट भारतात वशिष्ठ, विश्वमित्र आदि अनेक ऋषीमुनी होऊन गेले. सेनापती बापट हे विसाव्या शतकातील ऋषीच होते. भारतमाता इंग्रजांच्या गुलामीत असताना तिच्या सुपुत्रांनी पुढे सरसावयाचे नाही तर कोणी ? अनेक देशभक्तांनी भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनात तन-मन-धन अर्पण केले. त्याचा परिणाम भारत स्वतंत्र झाला. ती जिद्द आपण सर्वांनी बाळगली तर स्वराज्याचे सुराज्य होईल. 

• 

→ कथाकथन • नामदेव गुरूंच्या शोधात सुमारे सातशे वर्षापूर्वी संत नामदेव यांचा जन्म मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील, नसीं नामदेव| एका शिंपी घराण्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दामाशेट व आईचे नाव गोणाबाई तर पत्नीचे नाव राजाई असे होते. संत नामदेव बालपणापासून | देवभक्त होते. विठ्ठलभक्त होते.. सर्वजण नामदेवास एक महान विठ्ठल भक्त म्हणून मान देत, त्यांचे कौतुक करीत, त्यामुळे नामदेवांना गर्व झाला. त्यांना वाटू लागलं, की मीच खरा संत, माझ्यासारखां देवभक्त कुणीही नाही. एकदा नामदेव आळंदीला आले होते. वडिलकीचे नाते आणि महान विठ्ठलभक्त म्हणून ज्ञानेश्वरांनी नामदेवांच्या पायावर डोके ठेवले व त्यांना वंदन केले. त्यामुळे तर नामदेवांना अधिकच वाटू लागले की, माझ्याइतका मोठा भक्त कोणीही नाही. तेव्हा ज्ञानदेवाच्या मनात आले की, नामदेव हा विठ्ठलाचा निस्सीम भक्त आहे, संत आहे, पण त्याला कोणी गुरू मिळाला | नाही म्हणून हा असा अहंकारी बनला आहे, तेव्हा त्यास कोणी तरी गुरु करून दिला पाहिजे. थोड्याच वेळात तेथे निवृत्तीनाथही आले. त्यांनी नामदेवांचे दर्शन घेतले व नामदेवांना विचारले, "नामदेवा, देवाला कसे प्राप्त करून घेतलेत? कोणत्या गुरूने हा मार्ग दखवला?" त्यावर नामदेव म्हणाले, “मी गुरू कोणालाच केले नाही. माझा गुरू देव." या त्यांच्या बोलण्यात अहंकाराची भावना होती. त्यांच्या समवेत मुक्ताई पण होती; तिला हे जास्त जाणवले. नामदेवांच्या पाया पडायला गेलेली ती मागे फिरली अन् हळू आवाजात ज्ञानदेवास म्हणाली, "दादा, हा अहंकारात वाया गेलाय." त्यावर निवृत्तिनाथांनी सांगितलं, "मुक्ताई, नामा फार मोठा भगवद्भक्त आहे, पण याच्या पाठीशी गुरुचा आशीर्वाद नाही, म्हणून हा असा राहिला." हे ऐकून नामदेवांना फार बाईट वाटले. तसेच ते विठ्ठलमंदिरात देवा पुढे गान्हाणे मांडायला निघाले. देवाने नामदेवांना गुरुचे माहात्म्य सांगितले. शेवटी औंढ्यानागनाथाच्या विसोबा खेचरास गुरू करावयास सांगितले. नामदेव गुरूच्या शोधार्थ औंढ्यानागनाथाला गेले. बरीच चौकशी केल्यावर त्यांना समजले की, गावाबाहेरील देवालयात या नावाचा माणूस आहे. त्या देवळात ते गेले. ते देऊळ फार घाण होते. तेथे रोगाने जर्जर झालेला एक मनुष्य महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपला होता. या गोष्टीचे नामदेवास आश्चर्य वाटले व रागही आला. नामदेवांनी त्या म्हाताऱ्यास पिंडीवर पाय ठेवून झोपण्याचे कारण विचारले. तेव्हा तो मनुष्य म्हणाला, "मी आता फार थकलोय, तूच माझे पाय पिंडीवरून उचलून खाली ठेव." नामदेवांनी त्याचे पाय पिंडीवरून उचलून खाली ठेवले, तोच त्या पायाखाली पुन्हा पिंड तयार झाली. असे अनेकवेळा झाल्यावर नामदेव शरमिंदे झाले व त्यांना कळून चुकले की, मी ज्याच्या शोधात आहे, तो हाच गुरू, नामदेवांनी विसोबाचे पाय धरले आपल्यावर अनुग्रह करण्याची त्यांना त्यांनी विनंती केली.


 → सुविचार

  • शिष्यास गरू भेटला. गुरूभेटीने शिष्यास-नामदेवास पूर्णत्व आले. सारा अहंकार दूर गेला. भक्तीस ज्ञानाची•जोड मिळाली. • गुरूबिण कौन बताये बाँट, बिकट ये घाट ।। ● गुरूच्या / संताच्या बोधवचननी, अभंग, उपदेशाने, स्वतःच्या आचरणाने समाजाला सुयोग्य वळण लागते. • संतांचे जसे मन तशी वाचा, जशी वाचा तशी कृत्ये, याप्रमाणे विचार, उच्चार आणि आचार यात त्यांची एकरूपता असते.

 

 

→ दिनविशेष 

नहा या सर्व देशकार्यात भाग घेणारे पांडुरंग महादेव बापट हे 'सेनापती बापट' या नावाने प्रसिध्द होते. शालान्त परीक्षेत जगन्नाथ शंकरशेट ही संस्कृत शिष्यवृत्ती त्यांनी पटकाविली होती. धोतर, कोट, टोपी हा खादीचा पोषाख आणि सतत समाजोपयोगी काम ही त्यांची वैशिष्ट्ये, पॅरिसला जाऊन ते बॉम्ब विद्या शिकून आले. स्वभाव धाडसी व अन्यायापुढे न झुकणारा होता. मराठी, इंग्लिश, संस्कृत, हिंदी या भाषांवर त्यांचा प्रभुत्व होते. उपनिषदांचे त्यांनी इंग्रजी भाषेत भाषांतर केले. दिव्यजीवन, चैतन्यगाथा ही त्यांची पुस्तके प्रसिध्द आहेत. 'श्रीहरी' वर त्यांची गाढ निष्ठा होती. १२ नोव्हेंबर १८८० म्हणजे कार्तिक शुध्द एकादशीस त्यांचा पारनेर येथे जन्म झाला व कातिकी एकादशीलाच २७ नोव्हेंबर १९६७ रोजी त्यांचे मुंबई येथे निधन झाले. असा हा श्रीहरिभक्त आदर्श देशसेवक. 

 

 → मूल्ये - 

 • देशप्रेम, ईश्वरनिष्ठा.


→ अन्य घटना 

• 'पक्षीमित्र' डॉ. सलीम अली यांचा मुंबईत जन्म-१८९६

 • प्रसिद्ध इतिहासकार व लेखक केशवराव जेधे स्मृती दिन - १९५९.

  • पहिली गोलमेज परिषद (लंडन) - १९३०

   • पंडित मदनमोहन मालवीय यांचे निधन - १९४६.

    • युनेस्कोच्या अध्यक्षपदावर डॉ. राधाकृष्णन् यांची निवड - १९५२. 

  

→ उपक्रम 

• 'आपले तात्या सेनापती बापट' हे इंदुमती फाटक लिखित चरित्र वाचा. 

  

• → समूहगान -

   • देश हमारा निर्मल सुंदर उज्ज्वल गगन का तारा... 

  

 → सामान्यज्ञान 

  • जगातील जवळपास दहा टक्के जमीन कायम बर्फाच्छादीत आहे. बर्फाचे थरावर थर वाढत जाऊन खालच्या थरावर असह्य भार पडतो तेव्हा बर्फाखाली असलेले खडक, माती, जमीन यांना धरून सर्वांत खालचा बर्फाचा थर घसरू लागतो. यातूनच हिमनदीचा उगम होतो. या बर्फाच्या थराची जाडी पन्नास ते तीनशे फूट देखील असू शकते. हिमनदीची रूंदी काही मीटरपासून काही शेकडो मीटरपर्यंत असू शकते. जगातील सर्वांत लांब हिमनदी लँबर्ट ग्लेशियर ही अंटार्क्टिका खंडात असून ५१४ कि.मी. लांब आहे. (१८१) देव, गुरू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा