Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शुक्रवार, ३ नोव्हेंबर, २०२३

13 नोव्हेंबर- दैनंदिन शालेय परिपाठ

 १३ नोव्हेंबर



→ प्रार्थना -

 या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वरचि असा दे.... → 

 

श्लोक

  - कासया भ्रमण देश तीर्थाटणी । सेवीन पायवाणी संता घरी ।। कासया करावें पंचाग्नि साधन । उच्छिष्टभक्षीन संताद्वारी । चोखा म्हणे सुख येईल परासी जाईन संतांसी शरण देवा ||

  -  देशातील तीर्थया करण्यापेक्षा संतांच्या घरी त्यांच्या पायधुळीचा स्वीकार करणे चांगले. कशाला पंचानीचे साधन शेषप्रसादाचे सेवन करणे चांगले, चोखोबा म्हणतात, देवा, मी संतांशी शरण गेल्यानंतर मला सुख आपोआपच प्राप्त होणार आहे. 



 

→ चिंतन

- जो पर्यंत सर्व पददलितांचा उद्धार होत नाही, तोपर्यंत देशाचा उद्धार होऊ शकत नाही. रवींद्रनाथ टागोर, देश म्हणजे केवळ, पर्वत, नद्या, झांडे नव्हे; देश म्हणजे देशातील माणसे. त्या सर्वांची प्रगती तर देशाची प्रगती. 'सारे आहेत' अशी प्रतिज्ञा आपण रोज म्हणतो. त्यातील शेवटचे वाक्य आठवा. 'त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे आहे. असे ते वाक्य आहे. स्वीद्रनाथांनी तर भारताला 'मानवाचे महातीर्थ' असे म्हटले आहे. तिथे ज्ञानाची जागृती हवी राहील



 → कथाकथन

  उपकाराची परतफेड चाळीस-पंचेचाळीस वर्षांचा एक प्रौढ मनुष्य वीस-बावीस वर्षांचा एक तरुण, असे दोघे एक समुद्रमार्गे दुसऱ्या गावी जात होते. जाता जाता भर समुद्रात पृष्ठभागाखाली असलेल्या एका खडकावर ती होडी आपटली व फुटून दोघेही बुडू लागले असता त्यांना एक फळी मिळाली. तिला धरून ते दोघेही पाण्यात कसेतरी तरंगत राहिले. अशा स्थितीत पाच-स जाताच त्या दोघांपैकी प्रौढ मनुष्य त्या तरुणाला म्हणाला, 'या एकाच छोट्या फळीच्या आधाराने पाच-सहा तास पोहून आपणा दोघांना गाठता येणं अशक्य आहे. पोहता पोहता एखाद्या मोठ्या लाटेचा फटकारा बसला तर आपण दोघेही बुडून जाऊ, त्यापेक्षा आपण असं अर्धअधिक आयुष्य जगून झालेलं आहे. तुझ्या खऱ्या आयुष्याला मात्र आताच सुरुवात होत आहे. तेव्हा मी ही फळी सोडतो. तू एकट धरून समुद्रकिनारा गाठ.' यावर तो तरुण म्हणाला, 'छे छे । भी साफटिंग आहे. माझ्यावर कुणाची जबाबदारी नाही. मी जर बुडून मेली आईवडील दुःखी होतील, पण मला भाऊ असल्याने ते उपडे पडणार नाहीत; मात्र तुम्ही मरण पावलात, तर तुमची बायको व दोन होतील. तेव्हा मीच फळी सोडून बुडून जातो. तुम्ही या फळीच्या आधाराने किनारा गाठा.' याप्रमाणे बोलून त्या प्रौढा देता त्या धोर मनाच्या तरुणाने ती फळी सोडली. दुसऱ्याच क्षणी तो सागराच्या उदरात गडप झाला! मग नाईलाज होऊन तो मनुष्य आधाराने पोहत पोहत समुद्रकिनाऱ्यावर पोहोचला. तो घरी गेल्यामुळे त्याची बायको व मुले अत्यंत आनंदून गेली. 'या तरुणाने आपल्याला आत्मबलिदान केले.' या गोष्टीची त्याच्या मनाला मात्र सतत टोचणी लागली. मनाची ही टोचणी कमी करण्यासाठी त्याने एक उपयो तो मनात म्हणाला, 'ज्याने आपल्यावर उपकार केले. त्यालाच साहाय्य करून, आपण उपकाराची परतफेड करू शकत नाही; कारण काळाच्या उदरात गेला आहे. पण असे जरी असले, तरी ज्यांना गरज आहे. असे गरीब विद्यार्थी तर आपल्या गावात बरेच आहेत ना? त्या त्यागी तरुणाच्या स्मरणार्थ त्याच्या नावे आपण मदत करावी.' मनात आलेला हा विचार पक्का होताच त्या गृहस्थाने आपली निम्मी विकल्यामुळे उत्पन्न कमी झाल्याने त्याला अतिशय काटकसरीने जीवन जगणे भाग पडले; परंतु तरीही त्या थोर मनाच्या तरुणाने उपकारांची परतफेड आपण अन्य तन्हेने का होईना करू शकत आहोत, या विचाराने त्याला एक वेगळेच समाधान मिळू लागले.



*सुविचार 

*•ज्याने आपल्यावर उपकार केले, त्यालाच सहाय्य करून आपण आपल्यावर केलेल्या उपकाराची परतफेड करू शक २०ही; पण मानसिक समाधान मात्र लाभू शकते. • शंभरात एखादाच शूर माणूस जन्मतो, आणि हजारात एखादाच असतो; पण दाता हा आढळतो किंवा आढळतही नाही. • उपकाराची भाषा जेव्हा बोलली जाते तेव्हा त्याची किंमत होते, म्हणून उपकाराची भाषा कधीच बोलू नका.


 → दिनविशेष -

  • नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांचा जन्मदिन १८५५. या प्रसिद्ध नाटककार आणि नाट्यदिग्दर्शकाचा - हरिपूर या गावी जन्म झाला. शिक्षणासाठी बेळगावला असताना सुप्रसिद्ध नाटककार अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्याशी त्यांचा झाला. थोडा काळ त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला. परंतु नंतर त्यांनी आपले सारे आयुष्य नाट्यसेवेला वाहून घेतले. किर्लोस्करांच्या शाकुं पदे त्यांनी लिहिली होती. अतीशय गाजली. दुर्गा, झुंझारराव, संशयकल्लोळ, मृच्छकटिक, विक्रमोर्वशीय, शापसंभ्रम व संगीत शारदा अशी सात नाटके त्यांनी लिहिली. त्यांच्या 'शारदा' या नाटकात जरठ-कुमारी विवाहासारख्या सामाजिक समस्या त्यांनी प्रभावीपणे मांडल्या. 'शा त्यांची कलाकृती अस्सल वातावरण, जिवंत स्वभावचित्रण, सुटसुटीत मार्मिक संवाद, प्रासादिक पद्यरचना आणि सहजसुंदर विनोद यामुळे गाजली. मराठी सामाजिक रंगभूमीचा पाया घालण्याचे श्रेय देवलांचे आहे. 


→ मूल्ये

 साहित्यप्रेम मानवता


. → अन्य घटना 

• राजा रणजितसिंग यांचा जन्मदिन - १७८०.

 • ऑस्ट्रिया गणराज्याची स्थापना १८१८. -


 → उपक्रम 

 • रविंद्रनाथ टागोर यांच्या 'गीतांजली' या काव्यसंग्रहास' नोबेल पारितोकि १९१३. 

 • • वसंतदादा पाटील जन्म - १९१७

. • क्रिकेटवरी सी. के. नायडू यांचे निधन - १९६७.

 • विदर्भात कृषी विद्यापीठाची स्थापना १९६८. (अमरावती), 

 • 


→ समूहगान 

• ह्या भूमीचे पुत्र आम्ही, उंचवू देशाची शान.... 

 

 

→ सामान्यज्ञान 

• विभिन्न भाषांतील दैनिक वृत्तपत्रे - •

•  युगान्तर - बंगाली (कलकत्ता) 

•• वसुमती - बंगाली (कलकत्ता) 

• मातृभूमी -उडिया (कटक)

 • नूतन असमिया अस्पमिया (गुवाहाटी) 

• दिनमणि - तामिळ 

(मुदराई) • केसरी - मराठी (पुणे).

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा