१६ नोव्हेंबर
प्रार्थना
ईश्वर अल्लाह तेरे नाम, सबको सन्मति दे भगवान.. जय-सावित्री जप-जिजाऊ।
→ श्लोक -
यदि सन्ति गुणाः पुंसां विकसन्ति एव ते स्वयम् । न हि कस्तूरिकामोदः शपथेन विभाव्यते ॥ जर माणसांच्या अंगी चांगले गुण असले तर त्यांचा आपोआपच विकास होतो, ते सर्वत्र पसरतात व लोकांना कळून येतात. गुणी माणसाला स्वतः ची जाहिरात करावी लागत नाही. 'कस्तुरीचा सुगंध येथे आहे' असे ओरडून, दवंडी पिटून, गाजावाजा करून प्रतिज्ञापूर्वक तो पटवावा लागत नाही. (सत्याला ओरडावे लागत नाही.) नकली व हलक्या मालाची खोटी जाहिरात करून लोक फार काळ फसत नाहीत. सर्वांना सर्वकाळ फसविता येत नाही, अशा अर्थाची इंग्रजीत म्हण आहे.
कथाकथन '
रागावरील रामबाण औषध एक होती ढालगज भवानी. भारी रागीट स्वभावाची स्त्री. एवढ्या तेवढ्या कारणावरून हायला उठायची. तिचा पारा भलताच चढायचा. बोलू नये ते बोलायची ! नको ते बोलायची. हृदयाला घरे पडतील असं बोलायची. नको तेव्हा तिच्या गाला काही धरबंदच नव्हता. दुसन्याला काय वाटेल याची तिला बिलकुल पिता नसे. तिच्या बोला याशी मैत्री करायला तयार नसे. बोलायला धजावत नसे. तिच्या या भांडकुदळ स्वभावामुळे घरातील तर माणसे वैतागली होतीच पण मोहल्ल्यातही कोणी तिच्या वाटेला जात नसे. ती देखील या भांडकुदळ स्वभावामुळे स्वतःशी जळफळत असे. राग शांत झाला की तिला पश्चाताप होत असे. पण जात नव्हती. एक दिवस एक साथ फिरत त्या गावात आला. त्या स्त्रीच्या घरासमोर उभा राहिला. "ओम् भवति भिक्षाम् देहि !" म्हणाला. ती स्त्री म्हणाली, "महाराज! मी फार दुःखी आहे. मला फार राग येतो. मी चिडते, संतापते, अद्वातद्वा बोलते. माणसे दुखावली जातात, मला वाईट वाटत "साधू म्हणाला, "काही विशेष गोष्ट नाही. गावाकडे रामबाण औषध आहे. मी उद्या येईन तेव्हा ते घेऊन येईन तुला देईन. तु स्वभाव एकदम शांत होईल." दुसऱ्या दिवशी साधू आला. त्याने त्या संतापीला औषध दिले म्हणाला, "हे औषध या बाटलीतून प तुला राग येईल तेव्हा ही बाटली तोंडाला लावत नाहीत ही बाटली तोंडाला लावून औषध पीत रहा. मी आता पुन्हा दिवसांनी येईन." एवढं बोलून साधू निघून गेला. त्या बाध्यता सुरुवात केली. जेव्हा राग येई तेव्हा ती बाटली लावून औषधी ही राग शांत झाला की बाटली बाजूला ठेवून देई. सात दिवसानंतर साधू आता बाईने त्यांच्या पायावर डोके ठेवले. म्हणाली, "महाराज माझ्या फार मोठे दुःख आपण दूर केलेत. आपल्या अटीप्रमाणे राग येताच मी बाटली तोंडाला लावून औषध पीत असे. त्यामुळे राग कुठच्याकुठे पाहून जात असे. मन विलक्षण शांत होत असे. कृपा करून मला या औषधाचे नाव सांगा, इतरांनाही या रामबाण औषधाचा चांगला उपयोग होईल. 'साधू हसून म्हणाला, "अगं वेडे, त्या बाटलीत काहीही नव्हते होते. तू बाटली तोंडाला लावलीस की तुझं तोंड बंद होत असे.. तू.. एक शब्दही बोलू शकत नव्हतीस. राग दूर होण्यासाठी आपले तोंड बंद ठेवणे हेच ते रामबाण औषध !" भगवान बुध्द अत्यंत संयमी होते. कुणाशीही फारसे बोलत नसे. चर्चा, वाद-विवाद करत नसत. भिक्षुसंघालाही त्यांनी हाच मंत्र दिला होता. ते भिक्षुसंघाला उपदेश देताना नगाले, "धर्म हा अतिशय श्रेष्ठ शास्ता आहे." "दुःख घालविण्यासाठी 'संयम हे उत्तम साधन आहे. "क्रोध, लोभ, काम वासना, द्वेष, मत्सर, आकार इ. दुर्गुणांवर संयमानेच मात करता येते. "" 'सत्य, अहिंसा, अपरिग्रह यांची उपासना करा. खोटे बोलू नका. कुणावर रागावू नका. राग येताच मौन धारण करा." श्रीकृष्णानेही सर्वांचा आत्मा एक आहे. देहसुख सामावले आहे, असे मागितले आहे. ज्ञानेश्वरांनीही सांगितले आहे आणि मेल्यावर मात्र अपरंपार होते.
सुविचार -
• सेवा जवळून, आदर दुरून आणि ज्ञान आतून असावे.
• संयम हे रागावरील फार मोठे रामबाण औषध आहे.
• चिडविल्याने चिडू नये, रागावल्याने संतापू अगर रागे भरू नये.
• कृतज्ञतेसारखी जगात सुंदर गोष्ट नसते.
• मना करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचे कारण ||
• विष्णू गणेश पिंगळे स्मृतिदिन - १९१५. क्रांतिकारकांनी स्वातंत्र्याचे प्रयत्न आरंभले. त्यातील विष्णू गणेश पिंगळे हे एक
→ दिनविशेष
झुंजार युवक, पुणे जिल्ह्यातील शिरूर हे त्यांचे नाव. स्वतंत्र उद्योग करण्यासाठी ते यंत्रविशारद अभ्यासक्रम पूर्ण करून अमेरिकेत गेले. तेथे त्यांचा हरदयाळ या क्रांतिकारकाशी संबंध आला. बाँब तयार करून त्यांचा एकाच वेळी अनेक लष्करी छावण्यात स्फोट करण्याची त्यांची मोठी योजना होती. परंतु फितुरीमुळे गुप्तता उघड झाली. पिंगळेंना इंग्रजांनी पकडले. 'मायभूमीला स्वतंत्र करावे ही एकच आमची इच्छा होती. तेच ध्येय होते.' अशी त्यांनी बाणेदारपणे जबानी दिली. पिंगळे आदी सात क्रांतिकारकांना फाशीची शिक्षा फर्मविण्यात आली. १६ नोव्हेंबर १९१५ रोजी सकाळ ६ | वाजता लाहोर येथे पिंगळेंना फाशी देण्यात आले. 'आमचे बलिदान ज्यासाठी आहे, ते आमचे ध्येय देवाने पूर्ण करावे.' अशी त्यांनी फाशीपूर्व प्रार्थना केली होती.
मूल्ये • देशभक्ती, निष्ठा.
अन्य घटना
• महात्मा ज्योतिबा फुले व 'सावित्रीबाई फुले' यांचा मेजर कँडी या बिटिश अधिकाऱ्याने शिक्षण बोर्डातर्फे जाहीर सत् केला. - १८५२.
• डॉ. अॅनी बेझंट यांचे भारतात आगमन - १८९३.
• झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा बनारस येथे १८३५.
• सोवियत संघाने जगातील सर्वात मोठे अंतरिक्ष यान प्रोटोन ४ चे प्रक्षेपण केले - १९६८.
→ उपक्रम
• वि.ग. पिंगळे यांचे छायाचित्र मिळवा. त्यांच्याविषयी अधिक माहिती मिळवा. •
• क्रांतिगीतांची माहिती मिळवा.
→ समूहगान
• आओ बच्चों तुम्हे दिखाएँ झाँकी हिंदुस्तान की.... झाला
•
→ सामान्यज्ञान
• पृथ्वीवर जेवढे प्राणी आहेत त्यांच्या ७५% कीटक आहेत, परंतु त्यापैकी ९९.९ टक्के मनुष्याच्या दृष्टीने निरूपद्रवी अ काही उपकारक आहेत. तर उरलेल्या ०.१ टक्का कीटकांच्या सुमारे तीन हजार जाती असून ते माणसाची झोप उडविणारे असे अत्यंत उपद्रवीआहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा