१८ नोव्हेंबर
→ प्रार्थना
प्रभु तेरो नाम जो ध्याये फल पाये सुख लाये...
→ श्लोक
अज्ञेभ्यो ग्रन्थिनः श्रेष्ठाः, ग्रन्थिभ्यो धारिणो वराः । धारिभ्यो ज्ञानिनः श्रेष्ठाः, ज्ञानिभ्यो व्यवसायिनः ।।
अज्ञान्यांपेक्षा ग्रंथ वाचणारे (म्हणजे साक्षर) श्रेष्ठ, त्यांच्यापेक्षा ग्रंथ समजणारे श्रेष्ठ, त्यांच्यापेक्षा आत्मज्ञानी श्रेष्ठ आणि ज्ञान्यांपेक्षा ते ज्ञान कृतीत आणणारे श्रेष्ठ. 'यः क्रियावान् सः पण्डितः ।' असे सुभाषित आहे.
→ चिंतन -
नर करनी करे तो नारायण बन जाता है । साधा आणि सामान्य असा माणूस उत्तम कार्यामुळे 'महापुरूष' होऊ शकतो. कर्तबगारीच्या जोरावर साधा माणूस देवमाणूरु होतो. याचे त्याच्या सत्कार्यास आहे. वाल्या कोळी वाटमारी करणारा माणूस होता. पण योग्य मार्गदर्शन व संधी मिळताच वाल्मिकी ऋषी झाला. त्याचे राम साऱ्या जगाने डोक्यावर घेतले. सद्गुणांना वय, जात, पक्ष, पंथ यांचे बंधन नसते. वाईट काम केले तर त्या नराची गणना रानटी वानरान होते. काम केले तर नराचा नारायण होतो. नरश्रेष्ठ होतो. इतिहासात याचे दाखले मिळू शकतात.
कथाकथन
* ज्युलीला पुरले, तरी ती पुरुन उरली ! - युरोपखंडातील इटली या देशाचा एकेका प्रमुखपदेशन नव्हे तर आपण साम्राज्यविस्तार करावा असे वाटे. ही आपली इच्छा त्याने आपल्या प्रत्येक देश आपल्यासाठी त्याच्या सैन्याने इथिओपियावर म्हणजे पूर्वीच्या अॅबिसिनियावर आक्रमण केले. इटालियन सैन्याच्या च्यायला भिऊन तिथली निम्रो जनता पळून जाई. आणि असा रिकामा मुलूख इटालियन गावाच्या नियो] सादाराला इटालियन सैन्य आपल्या गावाच्या दिशेने येत असल्याची बातमी लागली. त्याच्यापुढे आफ्ना टिकाव नही हेरून तो आपल्या गावकऱ्यांना म्हणाला, 'चला, आपला पैसाअडका घेऊन लवकरात लवकर हे गाव सोडून दुसरीकडे कुठेतरी जाऊ ग्राहक शत्रूच्या बंदुकातोफांना बळी पडू, 'सरदाराच्या सांगण्यानुसार ते सर्व गाव आपल्या बायकापोरांसह अन्य सम्झाले, तरी प्रत्यक्ष त्या सरदाराची चौदा-पंधरा वर्षाची मुलगी ज्युली कुठल्याही तन्हेची हालचाल करीना. पित्याने तिला विचारणा केली असता ती महणाली, 'बाबा तुम्ही गावकरी पैसाअडका घेऊन दुसरीकडे चालला आहात, पण त्या सर्वांपेक्षा कितीतरी पटीने अधिक मोलावा जो राष्ट्र आपल्यावर फटक आहे. त्याचे जिवात जीव असेपर्यंत कुणीतरी रक्षण करायला नको का? मी त्याचे रक्षण करायचे ठरविले आहे त्या सरदाराने तिची नानाप्रकारे समजूत पाण्याचा प्रयत्न केला, पण जेव्हा तो काही आपल्या निश्चयापासून ढळेना, तेव्हा तो सरदार व गावकरी तिला आपण कुठे जात आहोत याची कल्पना देऊन ते गाव सोडून गेले. थोड्याच वेळात इटालियन सैन्य त्या गावात घुसले. त्या संपूर्ण गावात एकटीच राहिलेल्या ज्युला त्यातू 7. तसेच गावकरी कुठे गेले?' याबद्दल विचारले. पण ती काही एक उत्तर देत नाहीसे पाहून त्याच्या हुकुमाने त्या सैनिकांनी एक खड्डा खणून त्यात तिला उभे केले व तिला तिच्या छातीपर्यंत मातीने गाडले. इतके करूनही ती कोणतीही माहिती द्यायला तयार होत नाही पाहून तो सैतान सेनानी दा म्हणाला, 'बया बोलाने आम्ही विचारतो त्या प्रश्नांची उत्तरे दे, नाही तर माझ्या कमरेच्या तलवारीच्या टोकानं तुझे डोळे बाहेर काढीन. मातीबाहेर असलेल्या तुझ्या शरीराचा एकेक तुकडा कापून तो फेकून देईन आणि शेवटी तुला या खड्डयात पूर्णपणे पुरून टाकीन.' या सैतानाने आपले असे हालहाल केले, तर एखाद्या वेळी आपले आईवडील व गावकरी कुठे गेले याबद्दलचा गौप्यस्फोट आपल्याकडून होईल, असा विचार मनात येताच ती त्या मेनानीला खोटेच म्हणाली, "साहेब! माझे असे हाल करू नका मी वर हात ठेवून अगदी खरंच तुम्हाला सांगते." याप्रमाणे बोलून व त्या सेनानीकडून तलवार मागून घेऊन, गौप्यस्फोटाचे साधन ती आपली जीभ ती आपल्या हाती असलेल्या तलवारीने ज्युलीने खाटून टाकली! पुढे त्या देशभक्त व धैर्यशालिनी बालिकेला त्या सैतानांनी पुरले की मारले ते कळू शकले नाही. पण दोन वर्षानंतर गावकन्या जेव्हा तो सरदार आपल्या गावी गेला, तेव्हा त्याला काही आपली ज्युली मिळाली नाही.
→ सुविचार
नाही. 'ज्ञानासाठी या व सेवेसाठी जा.'• काही माणसे जन्मजात थोर असतात. • स्त्रिया ह्या निसर्गतःच (जन्मतःच) हुशार असतात, पुरूषांना मात्र शास्त्रांच्याद्वारे शहाणपण शिकवावे लागते. (स्त्रियो हि नाम खलुएताः निसर्गाद् एव पण्डिताः । पुरुषांणा तु पाण्डित्यं शास्त्रेः एव उपदिश्यते 11)
→ दिनविशेष
फक्त १६ वर्षांचे होते. पानिपतच्या युध्दात मराठ्यांची प्रचंड हानी झाली होती. पराभवाचे दुःखही होते. राज्यातील सरदारात एकोपा नव्हता. परकीय आक्रमणाचा धोका होता. खुद्द चुलते राघोबादादा विरोधात होते. अशा बिकट परिस्थितीत माधवरावांनी तडफदारी दाखविली आणि राज्यकारभारा शिस्त आणली. राक्षसभुवन, कर्नाटकाच्या स्वाऱ्यात त्यांनी यश संपादन केले. त्यामुळे पेशव्यांचा दरारा वाढला. माधवराव पराक्रमी व गुणग्राहक होते. प्रजेला देव मानत असत. करडी शिस्त, प्रजाहितदक्षता, गुणी माणसांची अचूक पारख हे त्यांचे स्वभावविशेष होते. अतिश्रमाने या पेशव्यांचे थेऊरा | अकाली निधन झाले. माधवरावांच्या पत्नी रमाबाई त्यांच्याबरोबर सती गेल्या. तो दिवस १८ नोव्हेंबर १७७२. पानिपतच्या आघाताहून माधवरावा निधन हा मराठी सत्तेवरचा जिव्हारी घाव होता, असे ग्रँड या इतिहासकाराने म्हटले आहे.
→मूल्ये
• जनसेवा, देशप्रेम, निष्ठा.
→ अन्य घटना -
• संगीत सौभद्रचा पहिला प्रयोग - १८८२. • व्ही. शांताराम यांचा जन्म १९०१ • शिवाजी विद्यापीठाची स्थापना - १९६
→ उपक्रम -
• रणजित देसाई यांची 'स्वामी' कादंबरी वाचा. • शनिवारवाडा, पर्वती या ऐतिहासिक ठिकाणांची माहिती मिळवा.
→ समूहगान
• नन्हा मुन्ना राही हूँ, देश का सिपाही हूँ. सामान्यज्ञान • कोळ्याच्या जाळ्याचा धागा हा कोळ्याच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या स्त्रावातून बनलेला असतो. त्याचा वापर मान शरीरात केल्यास शरीर तो बाहेर टाकणार नाही, अशी शास्त्रज्ञांना आशा वाटते. त्यामुळे या धाग्याचा दोरा मानवी हृदयातील झडपांसाठी, कृ नीलांच्या निर्मितीसाठी आणि शस्त्रक्रियेत वापरणे शक्य होईल का यावर संशोधन सुरू आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा