Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, १३ नोव्हेंबर, २०२३

20 नोव्हेंबर- दैनंदिन शालेय परिपाठ

             २० नोव्हेंबर- दैनंदिन शालेय परिपाठ



प्रार्थना-

 लावियेला दीप प्रेमे, तेवता ठेवू चला... 

 

→ शोक 

- नास्ति विद्यासमो बन्धुः, नास्ति विद्यासमः सुहद् । नास्ति विद्यासमं वित्तम्, नास्ति विद्यासमं सुखम् ।। वार : विद्येसारखा बंधू नाही, विद्येसारखा सखा/मित्र नाही, विद्येसारखे धन नाही, विद्येसारखे सुख नाही. 



→ चिंतन-

 साहित्य, संगीतादि कोणतीही कला अंगी नसलेला माणूस म्हणजे शेपूट नसलेला पशूच. माणसाच्या पोटाची जशी भूक असते तशीच डोक्याचीही एक भूक असते. वाचन, लेखन, गायन, वादन, नृत्य, चित्रकारी आदि अनेक कला आहेत, या कलांविषयी प्रेम, आस्था असेल तर जीवन आनंदी होते. आनंदाने जीवन जगता येणे ही सुद्धा एक कलाच आहे. या विविध कला माणसातील जाग आणू शकतात. सूर माता आणि लय पिता यांचे अपत्य म्हणजे संगीत असे म्हटले आहे.


कथाकथन 'प्रबोधनकार ठाकरे' - (जन्म १७ सप्टेंबर १८८५ मृत्यू - २० नोव्हेंबर १९७३) : महाराष्ट्रातील एक लढवय्ये समाजसुधारक, की वक्ते, पत्रकार, नाटककार तसेच ब्राह्मणेतर चळवळ व संयुक्त महाराष्ट्रासाठीची चळवळ यातील आघाडीचे नेते आणि इतिहासकार केशव तथा प्रबोधनकार ठाकरे यांचा जन्म पनवेल जिल्हा रायगड येथे झाला. घरच्या गरीब परिस्थितीमुळे ते मॅट्रिकच्या पुढे शिक्षण घेऊ शकले नाहीत. आ विशेष अभ्यासाने त्यांनी मराठी व इंग्रजी या दोन भाषांवर प्रभुत्व मिळविले. त्यांचा संस्कृत भाषेचा अभ्यासही चांगल्यापैकी होता. त्यानी काही काळ जरी नोकरी केली तरी त्यांच्या स्वाभिमानी व बाणेदार स्वभावामुळे वरिष्ठांशी त्यांचे पटले नाही. त्यामुळे ती नोकरी सोडून पुढे ज्या टकलेखक, तैलचित्रकार, छायाचित्रकार, नाटक कंपनीचे चालक, जाहिरातपटू, विमाएजंट असे विविध व्यवसाय केले. मात्र त्यांचा मूळ समाजसुधारकाचा व सामाजिक विषमतेविरुद्ध दंड थोपटून झुंज देण्याचा असल्याने त्यांनी त्याकरिता पत्रकारिता स्वीकारली व त्या काळी ब्राह्मण समाजातील अहंकारी व कर्मठ अशा ज्या लोकांकडून इतर जातींच्या माणसांना तुच्छतेची वागणूक मिळत होती, त्या कर्मठांविरुद्ध त्याचप्रमाणे अस्पृश्यता, हुडा आदि घातक रुढींविरुद्ध आपली तिखट लेखणी व वाणी वापरली. त्यांच्या लेखणीने जखमी झालेल्या एकाने ते बाहेरगावी गेले असता ते वारल्याची छोटी तार त्यांच्या घरी पाठवली होती! 'खरा ब्राह्मण,' 'टाकलेले पोर,' 'विधिनिषेध' अशांसारखी यशस्वी नाटके जशी त्यांनी लिहिली तशीच 'कोदंडाचा टणत्कार', ग्रामण्यांचा इतिहास', 'भिक्षुकशाहीचे बंड,' 'कुमारिकांचे शाप' यासारखी त्यांची इतरही अनेक पुस्तके सामाजिक परिवर्तनाला पोषक ठरली. सातारच्या छत्रपतींना न्याय मिळवून देण्यासाठी इंग्लंडला जाऊन जिवाचे रान करणारे रंगा बापूजी गुप्ते तसेच संत गाडगेबाबा व पंडिता रमाबाई यांची त्यांनी लिहिलेली चरित्रे अत्यंत प्रभावी ठरली. समर्थ रामदासस्वामींचे इंग्रजीत चरित्र लिहून त्यांनी त्यांची इतर प्रांतीयांना ओळख करुन दिली. त्यांनी लिहिलेल्या वक्तृत्व शास्त्रावरील मराठी ग्रंथाची तर लोकमान्यांनीही प्रशंसा केली. संयुक्त महाराष्ट्रासाठीच्या चळवळीत त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. सामाजिक व धार्मिक विषमतेचा नायनाट करण्यासाठी त्यांनी 'प्रबोधन नावाचे जे नियतकालिक चालविले, त्यावरुन महाराष्ट्र त्यांना 'प्रबोधनकार ठाकरे' या नावाने संबोधू लागला.




'सुविचार -

 'सेवाधर्माला जीवनात श्रेष्ठ स्थान आहे. मानवजातीची निःस्वार्थ सेवा हीच परमेश्वराची उपासना मानावी.' • कलावंतांमुळे जीवनात आनंद निर्माण होतो. कलावंत आहेत म्हणून चांदण्याच्या सौंदर्याची जाणीव होते. कलावंत नसतील तर जीवन कवडीमोलाचे वाटेल. • सुंदर विचार करणारा माणूस हा पूर्ण कलावंत होय. • मानून सामाजिक बांधिलकी ज्यांनी केले काही काम । ठेवावे कर्तृत्वाच्या त्यांचे लोकांनी थोडेसे भान ।। कृतज्ञतेची मनात पणती त्यांचेसाठी लावू या । आपण त्यांना आठवू या ।। 



→ दिनविशेष 

• ग्रामोफोनचा शोध - १८७७ - थॉमस अल्वा एडिसन या अमेरिकन शास्त्रज्ञाने २० नोव्हेंबर १८७७ या दिवशी ग्रामोफोनवा शोध लावला. आवाज ध्वनिमुद्रित करण्यासाठी प्रथम त्याने धातूचा उपयोग केला होता. नंतर त्याने मेणाचा उपयोग करून पाहिला आणि सर्वात शेवटी सध्या प्रचलित असलेल्या तबकडीचा (डिस्क) उपयोग केला. आपल्या या ग्रामोफोनवर सर्वप्रथम त्याने स्वतःच्या आवाजातील गाणे ध्वनिमुद्रित केले. शास्त्रीय ज्ञानाचा उपयोग व्यावहारिक सुखसोयीसाठी करणारा हा संशोधक १८ ऑक्टोबर १९३१ रोजी मृत्यू पावला. 


• मूल्ये

•   • विज्ञाननिष्ठा, चिकाटी. 


→ अन्य घटना 

• टिपू सुलतान यांचा जन्म १७५०. 

• प्रसिद्ध रशियन लेखक टॉलस्टॉय यांचे निधन - १९

 • प्रसिद्ध पत्रकार केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांचा स्मृतिदिन - १९७३ 


→ उपक्रम 

• एडिसनने लावलेल्या अन्य शोधांची माहिती मिळवा. 

• प्रबोधनकार ठाकरे यांचे 'देवळाचा धर्म आणि देवळाचा धर्म' हे पुस्तक मिळवा व वाचा. - 


→ समूहगान 

मेरा रंग दे बसंती चोला, माए रंग दे बसंती चोला... 



→ सामान्यज्ञान

 • शिकागो हा अमेरिकेतील विमानतळ सर्वात गजबजलेला विमानतळ आहे. या विमानतळावरून दर ४२.५ सेकंदांनी विमान उडते. अमेरिकेतील सर्व विमानांनी एकाच वेळी उड्डाण के पास अमेरिकेच्या भूमीवर सूर्यकिरणे पडणार नाहीत इतकी त्यांची संख्या आहे.

 • रेडक्रॉस - जगातील बहुतेक सर्व देशांमधील नागरिकांचा सहभाग असलेली मानवहितवादी, सेवाभावी व स्वयंसेवी संघटना, युद्धात जखमी झालेल्या व आजारी सैनिकांची देखभाल व शुश्रूषा करण्याच्या मूळ उद्देशाने ही संघटना स्थापण्यात आली. तथापि नंतर हिची उद्दिष्टे व्यापक झाली. स्विस मानवतावादी झां आंरी द्यूनां यांना रेडक्रॉस चळवळीचे जनक मानतात. पांढऱ्या शुभ्र पार्श्वभूमीवर अधिक चिन्हासारखी तांबडी फुली हे या संघटनेचे बोधचिन्ह आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा