२२ नोव्हेंबर- दैनंदिन शालेय परिपाठ
प्रार्थना
1- ॐ तत् सत् श्री नारायण तू पुरुषोत्तम गुरू तू...
1- झलकारी कोरिन तुम झलको, हर नारि रूप की आभा में,
श्लोक
जारगण ज्योति सी दमक उठो, भारत की इस प्रत्यभा में तेरे पथ पर चलने वाली, ललनाओं को कैसा विराम? निज मातृभूमि की रख कारिनि, झलकारी लो शत्-शत् प्रणाम ।। परिक्षत हरि भासारखा दुसरा अवगुण नाही, सत्यासारखे दुसरे तप नाही. मनाच्या पावित्र्यासारखे दुसरे तीर्थ नाही. विद्येसारखे दुसरे धन नाही.
- चिंतन
- - कोठेही अस्तित्वात असलेले दारिद्र्य हे इतरत्र असलेल्या समृद्धीला मारकच असते. जॉन केनेडी. मानवी संपत्ती ही खरी संपत्ती असते. ती असेल तर भयंकर विनाशातूनही राष्ट्र पुन्हा तेजाने उभी राहतात. नसेल तर समृद्ध राष्ट्रही रसातळाला जातात. याला जगाचा इतिहास साक्ष आहे. भारताचा इतिहासही साक्ष आहे. ही संपत्ती कशा स्वरूपात जतन करावयाची हे प्रत्येक राष्ट्रानेच ठरवायचे. समृद्ध, बलवान, आनंदी, संस्कारी नागरिक हे राष्ट्राचे बलस्थान आहे.
→ कथाकथन
१८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामातील वीरांगना झलकारी बाई- 'खुब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली राणी श्री' ह्या ओळी तुम्हा सर्वांनाच माहीत असतील परंतु सत्य हे आहे की कवी निर्मलजी लिहितात.... क्षत्राणी ! अहा छबीली !! वह झलकारी बाई थी ।। स्वातंत्र्यसंग्रामात झलकारी बाईने राणी लक्ष्मीबाईला राजवाड्यातून विश्वासू सैनिकासोबत मोरी (भांडेरी फाटक) दरवाजा मार्गे बिदुर वा सुरक्षित पाठवून स्वतः इंग्रजांसोबत लढत राणी लक्ष्मीबाई नव्हे तर झलकारी बाई शहीद झाल्या. अशी 'वीरांगना झलकारी बाई' किती जणांना माहिती आहे... अशा या वीरांगना झलकारी बाईंचा जन्म २२ नोव्हेंबर १८३० मध्ये झाशी-बालाजी मार्गावर असलेल्या भोजला या गावी चर्मकार कुटुंबात झाला. तिचे पती पुरण कोरी झांशीचे राजा गंगाधर रावाकडे सैनिक होते. झलकारीबाई तेव्हा फक्त १२ वर्षाची होती; तेव्हा जंगलामध्ये लाकडे तोडीत असतांना एका चित्त्याशी तिचा सामना झाला. तिने त्याच्याशी युद्ध खेळून त्याचा जबडा फाडला व त्याला ठार मारले. १९५३ मध्ये गंगाधरराव बारल्यानंतर इंग्रजांशी झांशी राज्याचे विलीनीकरण ब्रिटिश साम्राज्यात करण्याचे ठरविले. तेव्हा राणीने 'मैं झांशी नही दूंगी' अशी घोषणा दिली. त्यामुळे युद्ध अटळ होते. सेनापती रघुनाथसिंहच्या नेतृत्वाखाली सेना लढण्यास तयार झाली. झलकारीबाई बाण चालविणे, तलवार, बंदूक थोडे स्वारीमध्ये निपूर्ण होती. म्हणून महिला सेनापतीचे नेतृत्व झलकारीबाईकडे देण्यात आले. १८५७ च्या उठावाची ठिणगी झांशीमध्ये सुद्धा पडली व युद्ध सुरू झाले. युद्धाचे नेतृत्व झलकारी चे पती पुरणकोरी भाऊ बक्श यांनी केले. झलकारीबाई राणी लक्ष्मीच्या चिंतेत होती. राणी जर इंग्रजांच्या हाती लागली तर बुंदेलखंडाचे नाव बुडेल म्हणून झलकारी बाईने राणी लक्ष्मीबाईला राजवाड्यातून विश्वासू सैनिकासोबत मोरी दरवाजा (भांडेरी फाटक) मार्गे विठुर या सुरक्षित स्थळी पाठवून स्वतः झलकारी राणी लक्ष्मीचा पोशाख घालून युद्धास तयार झाली. झलकारीबाई दिसण्यात राणी लक्ष्मीबाई सारखीच शौर्यवान व तशीच पराक्रमी असल्याने कोणाला तिचा संशय सुद्धा आला नाही. पूर्ण दिवसभर त्वेषाने झलकारी लढत होती समोर येणाऱ्या शत्रूला सपासप कापीत होती. तिकडे तात्या टोपे यांनी पलायन केले होते. इकडे पती पुरनकोरी ही शहीद झाल्याचे समजताच झलकारी अधिक त्वेषाने इंग्रजी सैन्यावर तुटून पडली, कारण जोपर्यंत राणी लक्ष्मीबाई सुरक्षित स्थळी पोहचत नाही तोपर्यंत तिला चैन नव्हती. राणी सुखरूप सुरक्षित स्थळी पोहचल्याचे संकेत मिळताच ती सुखावली व लढता लढता अचानक एक गोळी तिच्या दिशेने आली व ती घोड्यावरून धारातीर्थी पडली. १९५७ च्या स्वातंत्र्य संग्रामात शहीद झाली. आपली किर्ती मागे ठेवून आपल्या जीवनाची इतिश्री केली. अशा या वीरांगणा झलकारी बाईस शतशः प्रणाम ! अशी या वीरांगना झलकारी बाईचे शौर्य व धैर्य पाहून इंग्रज सेनापती जनरल ह्यू रोज म्हणतो 'जर भारताच्या एक टक्का स्त्रीया या मुली झलकारी बाईसारख्या स्वातंत्र्याच्या ध्येयाने प्रेरित झाल्या तर आपल्याला हा देश सोडून पळावे लागेल. ' राष्ट्रकवी मैथिलीशरण गुप्त यांनी लिहिलेले आहे की, जाकर रण में ललकारी थी, वह झांशी की 'झलकारी' थी । गोरा को लड़ना सिखा गई, राणी बन जौहर दिखा गई । है इतिहास में झलक रही, वह भारत की सन्नारी थी।
→ सविचार
• कर्तत्ववान मनुष्य आपल्या कर्तृत्वाची जाणीव कृतीनेच करून देतो.सुविचार कर्तृत्ववान मनुष्य आपल्या कर्तृत्वाची जाणीव कृतीनेच करून देतो. • स्वातंत्र्याचे मंदिर बलिदान करणाऱ्याच्या रक्ताशिवाय उभे राहात नाही.
• दिनविशेष →
• • जॉन एफ. केनेडी स्मृतिदिन - १९६३ - वयाच्या अवघ्या ४४ व्या वर्षी अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदी प्रचंड बहुमताने निवडून आलेली असामी म्हणजे जॉन केनेडी ही होय. २९ मे १९१७ मध्ये एका श्रीमंत आणि खानदानी घराण्यात त्यांचा जन्म झाला. हॉर्वर्ड विद्यापीठात त्यांनी पदवी संपादन केली. सैन्यदलातही त्यांनी काही वर्षे काम करून सैनिकी जीवनाचा अनुभव घेतला. 'धैर्याचे महामेरू' हा ग्रंथ त्यांनी लिहिला. अत्यंत उमदे | व्यक्तिमत्व आणि मानवतावादी दृष्टीकोन हा त्यांचा स्वभावविशेष. निग्रोंनाही विद्यापीठात मुक्त प्रवेश हवा अशी त्यांची उदार व मानवतावादी दृष्टी होती. दि. २२ नोव्हेंबर १९६३ रोजी त्यांची डलास गावी गोळ्या झाडून हत्या केली गेली. त्यांच्या अकाली निधनाने सारे जग हळहळले. *
मूल्ये -
• देशप्रेम, ध्येयनिष्ठा.
→ अन्य घटना
• दुर्गादास राठोड यांचा स्मृतिदिन (१७१८) • १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामात झाशीची राणी लक्ष्मीबाईला राजवाड्यातून विश्वासू सैनिकासोबत मोरी दरवाजा (भांडेरी फाटक) मार्गे बिठुर या सुरक्षित स्थळी पाठवून स्वतः इंग्रजांशी लढता लड़ता वीर झाली अशी वीरांगणा झलकारी बाईची जयंती - १८३०० प्रसिद्ध विचारवंत केल. दप्तरी यांचा जन्मदिन (१८८०)
•
→ उपक्रम
• जॉन केनेडी भारतात आले होते, तेव्हा पंडित नेहरूंसमवेत गप्पा मारतानाचे छायाचित्र प्रसिद्ध झाले. ते मिळवा व वर्गात लावा.
• विविध राष्ट्रध्वजाचे चित्र काढा व ते रंगवा (अॅटलासमधील चित्राची मदत घ्या.)
• भवानी शंकर, परीक्षित हरि, वृन्दावन लाल वर्मा, चीखे लाल वर्मा, माता प्रसाद, राष्ट्रकवी मैथिलीशरण गुप्त. निर्मलजी, मोहनदास नैमिशराय यांचे 'वीरांगणा' झलकारी बाई' हे वर्णन पुस्तके वाचा.
→समूहगान
• दिल दिया है जान भी देंगे, ए वतन तेरे लिए.......
→ सामान्यज्ञान
• जीवशास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार इ.स. १६०० पासून पृथ्वीतलावरुन सस्तन प्राण्यांच्या १२० जाती व पक्ष्यांच्या २२५ जाती न झाल्या. प्राण्यांच्या १६०० जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. गेल्या २५ वर्षामध्ये दरवर्षी किमान एकतरी जात या वेगाने वन्य प्राणी नष्ट होत आहेत भारतातील काही राष्ट्रीय प्रयोगशाळा नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी- दिल्ली (१९५०) नॅशनल केमिकल लॅबोरेटरी- पुणे (१९५०)
• नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्युट - हैद्राबाद - (१९६१)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा