Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, १३ नोव्हेंबर, २०२३

28 nov

 २८ नोव्हेंबर




प्रार्थना - सुखी ठेवी सर्वास देवराया....


श्लोक - 

जहाँ दया तहाँ धर्म है, जहाँ लोभ तहाँ पाप ।जहाँ क्रोध तहाँ काल है, जहाँ छिना तहाँ आप || 

-संत कबीर जय-सावित्री जेथे दया तेथे धर्म, लोभ तेथे पाप, जेथे क्रोध तेथे काळ. जेथे क्षमा तेथे परमेश्वर । 


→ चिंतन

- मानव सारिखे निर्मिक निर्मिले । कमी नाही केले । कोणी एक ॥। कमी जास्ती बुध्दी मानवा वोपिली । कोणा नाही दिली । पिढी जाद ।। शुद्रादिक नाही कशामध्ये उणा । अवयवी खुणा | आर्यापरी ।। मानवाचे हक्क ते का विसरले । अतिशुद्र झाले । पशुवत ।। - महात्मा फुले. 


 कथाकथन -

  समाजजीवनाचा तोल ढळतो, नीतीचा अधःपात होतो, माणसाचा असुर बनतो, तेव्हा समाजाला सावरणारा महात्मा जन्माला येतो. बुध्द, येशू, रबर, सॉक्रिटिस, गांधी, आंबेडकर असे युगप्रवर्तक निर्माण होतात. वेदनांच्या वाटेने चालत राहतात. क्रॉस, विषप्राशन, अपमान, अवहेलना झेलत नसल्याचा शोध घेतात. पीडितांच्या आर्त आक्रोशाने व्यथित होतो तो महात्मा । २० फेब्रुवारी १८२७ साली ज्योतिबांचा जन्म झाला. ज्योतिर्बाचे हॉल माळी होते. मुळचे गोन्हे पण बागकाम करणारे फुले झाले. त्यांनी समाजसेवेचे उद्यान फुलविले. आई चिमणाबाई ज्योतिबा ९-१० महिन्याचे असतानाच देवाघरी गेली. जॉन नावाच्या मिशनऱ्याची मुले सांभाळणाऱ्या सगुणाबाई क्षीरसागर यांनी ज्योतिबांना सांभाळले. ज्योतिबांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. भेदाभेदाचे भान नसलेल्या ज्योतिबांना एका लग्नसमारंभात भान आले. थॉमस पेन त्यांच्या वाचनात आला. विचारयात्रा सुरू झाली. माणसाचे मन हेच त्याचे मंदिर असते. विद्येविना मती गेली, मतिविना नीती गेली, नीतविना गती गेली, गतीवाना वित्त गेले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले शिक्षण हेच समाजमानस परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे, हे लक्षात येताच अस्पृश्यांसाठी, स्त्रियांसाठी त्यांनी शाळा उघडल्या, अनाथाश्रम काढले, वृत्तपत्र काढले. धर्म जन्माने न मिळता माणसाच्या स्वतः च्या बुध्दीने स्वीकारला पाहिजे. विवाहबाह्य अनौरस पुत्र दत्तक घेतला. केशवपनविरूध्द चळवळ उभारली. सत्यशोधक समाजाची स्थापना केली. 'गुलामगिरी', 'शेतकऱ्याचा आसूड' ही पुस्तके लिहिली. शेतकऱ्यांच्या व्यथा इंग्रज प्रशासनाच्या कानी पोहचविल्या. शेतकरी हा समाजाचा कणा आहे. पोशिंदा, अन्नदाता आहे, असे मत मांडले. चाळीस वर्षे चंदनासारखे झिजले. प्रवास केला. व्याख्याने दिली, लेख लिहिले, स्वातंत्र्य, समता, लोकशाही, विज्ञान, इहवाद या आधुनिक मूल्यांवर भर देऊन सामाजिक क्रांतीची पेरणी केली. डॉ. आंबेडकरांनी त्यांना गुरु मानले. विचारांना कृतीशिलतेची जोड दिली. 'जैसे बोलणे बोलावे', तैसे चालणे चालावे, मग महंतलीला स्वभावे, अंग बाणे, या समर्थवाचनाची सार्थकता सिध्द करणारा हा महात्मा, सर्व सुखाचे आगर, नीतितत्वांचे माहेर असा हा महात्मा २८ नोव्हेंबर १८९० साली अनंतात विलीन झाला. खरं तर शिक्षणाची जी नेत्रदिपक प्रगती झाली आहे. ती केवळ क्रांतीसूर्य राष्ट्रपिता ज्योतीराव फुले यांच्यामुळेच ! त्यांनी भारतात प्रथम शाळा सुरू बिली एका वर्षात त्यांनी २० शाळा सुरू केल्या. गोरगरिबांच्या मुला-मुलींना गोळा करून त्यांनी शिक्षण दिले. १ जानेवारी १८४८ रोजी पहिली मुलींची शाळा सुरू केली. त्या शाळेत त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी विनावेतन शिक्षण शिकविले. सावित्रीबाई फुले ह्या भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका आहेत. ज्योतीराव फुले यांच्यामुळेच भारतीयांना विविध क्षेत्रातील ज्ञानार्जन करण्याची संधी मिळाली. त्यामुळे ज्योतीराव फुले हे भारतीय शिक्षणाचे आद्यजनक आहेत. कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता शिक्षणाचे कवाडे सर्वांसाठी खुली करून संपूर्ण देशाचे हित व जागृती करणारे खरे राष्ट्रपिता होत. त्यांच्या या कार्याची आठवण म्हणून २८ नोव्हेंबर स्मृतीदिन हा शिक्षक दिन म्हणून साजरा व्हावा महात्मा ज्योतिबा फुले (जन्म २० फेब्रु. १८२७ - मृत्यु २८ नोव्हेंबर १८९०) ' - यदा यदा हि धर्मस्य


*सुविचार 

*- जाणिवांची प्रगती आणि समाजाची पुनर्व्यवस्था - पुनर्रचना यासाठी शिक्षण हे एक मूलभूत साधन आहे. केवळ गोड बोलणारी माणसे पुष्कळ असतात, पण हितकारक व कटू सत्य बोलणारी दुर्मिळ असतात. - महर्षि व्यास 

• स्वर्गापेक्षा . चांगल्या पुस्तकाचे मी अधिक स्वागत करीन, कारण पुस्तके जिथे असतील, तिथे स्वर्ग निर्माण होतो. - लो. टिळक • महात्मा फुले हे खरे धोर शिक्षक होते. एक निकृष्ट शिक्षक सांगत जातो. एक सामान्य दर्जाचा शिक्षक स्पष्टीकरण करतो. एक चांगला शिक्षक प्रात्यक्षिक करतो - म. गांधी. आणि खरा थोर शिक्षक प्रेरणा देतो. 

• आपल्या ध्येयाविषयी तुमच्या हृदयात उत्कट निष्ठा असली पाहिजे, ती क्षणिक असता कामा नये. आदर्श विषयीची ही निष्ठा सतत टिकणारी, सतत प्रयत्नशील व अचंचल अशी हवी - स्वामी विवेकानंद. 


→ दिनविशेष - 

 महात्मा जोतीराव फुले स्मृतिदिन - १८९० : महात्मा जोतीराव गोविंदराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. १८५१ मध्ये मुलींसाठी यांनी खास शाळा भारतात काढली. आपली पत्नी सावित्रीबाई हीस शिकवून शिक्षिका बनविले. शेतकऱ्यांचा आसूड, गुलामगिरी, इशारा, जातिभेदविवेकसार आदि ग्रंथ त्यांनी लिहिलं. शेतकरी, कष्टकरी लोकांना शिक्षण मिळाले पाहिजे, त्याशिवाय देशाचा विकास होणार नाही. या गोष्टीकडे लक्ष वेधून सत्य, समता व बंधुभाव या तत्वांचे महत्व महात्मा फुले यांनी महाराष्ट्रास पटविले. बहुजन समाजात शिक्षणाचा प्रसार, स्त्री-शिक्षण, स्त्रियांचे प्रश्न इत्यादि समाजसुधारणा त्यांनी केवळ शब्दांनी नव्हे तर कृतींनी करून दाखवल्या. त्यांना महाराष्ट्राचे आद्य समा सुधारक मानले जाते. 


→ मूल्ये - 

• समाजसेवा, देशप्रेम, समानता, सहिष्णुता.


अन्य घटना

बंगालचे प्रसिध्द गायक के. सी.डे. यांचे निधन - १९६२.


 → उपक्रम - 

 • सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेबद्दल माहिती मिळवा


→ समूहगान

 • आम्ही बालक या देशाचे, शिकू धडे सारे विज्ञानाचे ..


→ सामान्यज्ञान 

 • बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संस्था.

  • १९२४ मध्ये बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना 

• १९४५ मध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना

  • १९४६ मध्ये मुंबईत सिध्दार्थ कॉलेजची स्थापना 

• डिक, खळ आपण चिकटविण्यासाठी वापरतो. डिंक झाडापासून मिळतो. खळ ही कोणत्याही स्टार्चपासून बनविता येते. त्यासाठी मुख्यतः तांदूळ, गहू, मका वापरतात. खळ नंतर खराब होऊ नये नि बुरशी धरू नये किंवा तिला मुंग्या लागू नयेत म्हणून त्यात थोडा मोरचुद घालण्याची पध्दत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा