Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, १३ नोव्हेंबर, २०२३

29 nov

 २९ नोव्हेंबर



प्रार्थना 

मंगलमय चरणि तुझ्या विनंति हीच देवा....


 → चिंतन-

 विद्या, धन, प्रतिष्ठा लाभे मला अता ही आईविणे परी मी हा पोरकाच राही । - माधव ज्युलियन मातेसारखे दुसरे दैवत नाही. असे एक संस्कृत सुभाषित आहे. 'आई माझा गुरु आई कल्पतरू' अशी कृतज्ञता साने गुरुजींनी व्यक्त केली आहे. आईला आपल्या मुलांवर प्रेम केल्याशिवाय राहवत नाही. पायाला काटा टोचला तर बाळाच्या तोंडून 'अंग आई ग' असे उद्गार निघतात. आपले दुःख आई दूर करणार इतकी त्या बाळाला मनोमन खात्री असते. अतिपरिचयामुळे क्वचित आपणास आईची महती कळत नाही. आचार्य अत्रे यांन 'श्यामची आई' या चित्रपटाबद्दल 'राष्ट्रपतींचे सुवर्णपदक' हा सन्मान लाभला. ती आठवण त्यांनी आपल्या 'कऱ्हेचे वाणी' या आत्मचरित्रात लिहिली आहे. आचार्य अत्रे यांनी आपल्या नातेच्या अस्थींचे विसर्जन केले नि मग त्यांना ती सन्मानाची वार्ता कळली. 'आई होती तेव्हा तिची किंमत कळली नाही आणि ती गेल्यावर कशाचीच कसली किंमत वाटली नाही.' असे दुःखद उद्गार त्यांनी काढले.


कथाकथन 

  असे दुःखद उद्गारआईचे प्रेम कहतात- 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी' बाकी सर्व गोष्टी माणूस पैशाने विकत शकतो. पण त्याला मिळत नाही ती एकच गोष्ट म्हणजे 'आईये 'प्रेम' म्हणून तर कवी माधव ज्युलियन यांच्या कवित भोर-विद्याधनप्रतिष्ठा लाभ आता मला ही, आईविणे परी मी हा पोरकाच राही आईचे प्रेम आपल्याला जन्मतः प्राप्त झालेले असते, म्हणून आपल्याला त्याची किंमत वाटत नाही. बाळाची चाहूल लागल्यापासून आई त्याचे घेऊ लागते. आपल्या बाळाची भूक, झोप, सोयी- सवयी तिला ज्ञात असतात. म्हणूनच बाळाकडे येण्यासाठी हिकरणी गवळण अवर कडा उतरून आली. आईचे हे प्रेम केवळ मानवातच आढळते असे नाही तर पशू, पक्षी, सारे प्राणी यातील माता एकाच भावनेने ओथंबलेल्य असतात. पार उंच आकाशात उडत असते; पण तिचे चित्त आपल्या बाळापाशी असते. पाण्यात कासवी आपल्या बाळांपासून दूर असते. पर आपल्या दृष्टीने ती आपल्या बाळांवर प्रेम करते, त्यांना मोठे करते. कोंबडी दाणे टिपत असते. पण काही धोका आहे, असे वाटले तर धावत जाऊन आपल्या पिल्लांना पंखाखाली घेते. आपल्या पिल्लांच्या रक्षणासाठी मांजरी त्यांच्या जागा दहा वेळा बदलते. घरातील पाळलेली कुत्री रोज सर्वांच्या अंगावर उड्या मारणारी, पण तिची पिल्ले लहान असताना ती कोणाला जवळ फिरकूही देत नाही. स्वतःच्या पिल्लांना धोक आहे, असे वाटलं क सपण आपली पिल्ले मिळते आणि धोका टळला अशी खात्री झाली की, ती पिल्ले आपल्या तोंडातून बाहेर सोडते. असे हे मातृप्रेम, कवीनीही त्याचे वर्णन 'वात्सल्य' या शब्दात केले. पण प्रसंगी ती माता एखाद्या सौदामिनीसारखी संतप्त होते. आपल्या अपत्याला ती कठोरातील कठोर शिक्षा देते पण तीही कशासाठी ? तर त्याच्याच हितासाठी ना ! जेव्हा माता आपल्या बाळाला शिक्षा करते तेव्हा ती अप्रत्यक्षपणे स्वतःलाही शिक्षा करत असते बाळाला उपाशी ठेवलं, तर मातेच्याही घशाखाली घास उतरत नाही. मातेचे हे प्रेम कधी आटत नाही. ते परतफेडीची अपेक्षा करत नाही. भेदभाव बाळगत नाही. उलट चार मुलांत एखादे मूल अपंग, दुबळे असले तर आईला त्याची विशेष काळजी वाटते. म्हणूनच तर मतिमंद मुलाचे आपल्या मारे कसे होईल, या विचाराने त्याची माता अस्वस्थ होते, कवी मोरोपंतानी मातेच्या प्रेमाची ही महती जाणली होती. म्हणूनच ते, प्रसादपट झाकिती परी परा गुरूपे थिटे, म्हणून म्हणति भले न ऋण जन्मदेचे फिटे । परमप्रिय गोष्टीची बरोबरी माणूस आईशी करतो. शेतकरी आपल्या जमिनीला 'काळी आई' म्हणतो, तर वारकरी विठ्ठलला 'विठाई माऊली' म्हणून साद घालतो आणि ज्ञानेश्वरासारख्या बालयोग्यात त्याला 'ज्ञानेश्वर माऊली' दिसते. 

 

सुविचार

 • वंदना जितकी सुंदर बोलते तितके सुख बोलत नाही. शेले, आंग्लकवी. • कवी हा शब्द सृष्टीचा ईश्वर असतो. • प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं । मातीमध्ये उगवूनही मेघापर्यंत पोचलेलं ॥ ● मनातील विचारांचा सुंदर अविष्कार म्हणजे काव्य. • हृदयपूर्वक केलेल्या लहान दानाचे मोल अनमोल आहे. 



दिनविशेष -

 कवी माधव ज्युलियन स्मृतिदिन - १९३९ ५ मराठी असे आमुची मायबोली' ही मराठी भाषेविषयी स्वाभिमान व्यक्त करणार कविता ज्यांनी लिहिली त्या माधव ज्युलियन यांचा हा स्मृतिदिन. त्यांचे संपूर्ण नाव माधव त्र्यंबक पटवर्धन असे होते. त्यांचे बालपण बडोद्यास गेले. एम. ए. झाल्यानंतर पुणे व कोल्हापूर येथे प्राध्यापक म्हणून काम केले. इंग्रजी, मराठी, संस्कृत, फारसी आणि गुजराथी या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते फारसी-मराठी कोशही त्यांनी तयार केला. 'छंदोरचना' या त्यांच्या ग्रंथाबद्दल विश्वविद्यालयाने त्यांना डॉक्टरेट पदवी देऊन त्यांचा गौरव केला. विद्वान, व्यासंगी व कल्पक असल्यामुळे आधुनिक कवींमध्ये त्यांचे नाव आदराने घेतले जाते. ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही होते. २९ नोव्हेंब १९३९ रोजी त्यांचे निधन झाले. पुण्यातील टिळक रोडवर त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ माधवराव पटवर्धन सभागृह उभारण्यात आले. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कामकाज तेथूनच चालते.

 

 → मूल्ये

  • साहित्यप्रेम -

 

 → अन्य घटना 

 •रिय उनकर गो. स. सरदेसाई यांचे निधन - १९५९. 

 • भारतरत्न जे. आर. डी. टाटा स्मृती दिन - १९९३.

 

 → उपक्रम 

 • माधव ज्यूलियन यांच्या कविता वाचून अर्थ सांगा.

 

 → समूहगान

  • पेड़ों को क्यों काटते हो, दो पेड लगाके देखो ना...

  • 

 → सामान्यज्ञान 

 • धोर व्यक्तींच्या उपाधी 

 • न. चिं. केळकर साहित्यसम्रा

  • जिजाऊ, इंदिरा गांधी - 1 राष्ट्रमाता

   • गो. ह. देशमुख - लोकहितवादी

    • शिवाजी महाराज छत्रपती 

    • माधवराव अणे लोकनायक 

    • भाऊराव पायगोंडा पाटील - कर्मवीर 

    • पांडुरंग महादेव बापट - सेनापती 

    • भीमराव आंबेडकर - आद्य युगप्रवर्तक 

    • बाळ गंगाधर टिळक - लोकमान्य धोंडो केशव कर्वे- महर्षी 

    • सावित्रीबाई फुले - क्रांतीज्योती 

    • कांशीरामजी - युगप्रवर्तक शाहू महाराज - राजर्षी

     • ज्योतिबा फुले - महात्मा

      • बहन मायावती युगनायक 

      • बबनराव घोलप - क्रांतीकारी लोकनेता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा